भाग 2
" अगं थांब थांब.. इतकावेळ काढला शेवटची पाने तर वाच," तो लगेच म्हणाला.
" मिहिर एवढं लिहिले आहे , पुढे काही नाही.." ती नकारार्थी मान हलवत म्हणाली.
" असं कसं , मेंन तर इथे आहे .." तो डायरी स्वतः च्या हातात घेऊन म्हणाला.
" तु नेहमी म्हणते ना मला कसं तुझ्या मनातलं कळले...डायरीत माझे नाव कधी डायरेक्ट लिहिले नव्हते.वगैरे" तो तिच्याकडे बघून म्हणाला तशी तिने होकारार्थी मान डोलावली.
" खरं सांगू , जेव्हा तुझी डायरी बेंचवर मिळाली ना ..लगेच परत करणार होतो .."" मला काही जास्त वाचण्यात इंटरेस्ट वगैरे नव्हताच , तुला देण्यासाठी येणार तोच शेवटच पान उघडलं गेलं , आणि बस तिथेच माझं ह्रदय बंद पडले.." तो तिला सांगत हळूच शेवटचे पान उघडलं.
इथे साधी, स्वच्छ सुरेख सुरूवात केली डायरी इथे मात्र उलट होती ..ना इथे शब्दांचे बंधन होतं ना अक्षराच बस मन रितं होतं.
काव्या मॅडम तर आपण कधी शेवटी काय काय रेखाटले होते तेच आठवत नव्हते . ती स्वतः कशावरून याला समजलं बघू लागली.चेहऱ्यावर गोंधळलेले भाव पसरले होते. तिने मिहिरकडे बघितले त्याचं वेळी त्याने तिच्या डोळ्यातील प्रश्न अचुक पद्धतीने हेरला..
त्याने हळूच तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि दुसऱ्या हाताने शेवटी पानाच्या खालच्या बाजूला इशारा केला.खाली "मिहिर नगरकर " नावासोबत खुप साऱ्या हार्ट इमोजी आणि आय लव्ह यू... लिहिले आले दिसले .
जास्त स्पष्ट दिसत नव्हते पण खरे होते,हे मात्र नक्की..आडव्या उभ्या रेषांनी भरलेलं पान , तिच्या मनाच्या कोपऱ्यात साठवलं मांडत होत्या ..
तिने हळूच अक्षरावरून हात फिरवला, नकळत डोळ्यातून पाणी टपकलं . तसं त्याने तिचा चेहरा वर करून एका हाताने अश्रू पुसत तिला मिठीत घेतले.
कॉलेजमध्ये कधीच त्याला आपल्या भावना तिला सांगता येत नव्हत्या…
ती जास्त बोलकी नव्हती , मित्र-मैत्रिणींचा फारसा गोतावळा नाही.
आपण बरं आणि आपलं काम बरं… इतकंच तिचं छोटंसं विश्व होतं..
आणि याउलट मिहिर…कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून सगळ्यांचा लाडका…मित्रांच्या घोळक्यात फिरणारा हसतमुख… सगळ्यांना पटकन आपलंसं करणारा.
पण तरीही त्या गोंधळातही त्याचं लक्ष कायम तिच्यावरच असायचं..
ती शांत, वेगळी, थोडी अबोल…आणि कदाचित म्हणूनच त्याला अधिक आवडलेली होती.
ती त्याच्यासाठी एक कोडं होती. ज्याचं उत्तर शोधायची त्याला घाई नव्हती,
कारण त्याला ती तशीच आवडत होती.. पण एक भीती होती .
ती नकार देईल आणि सगळंच संपेल म्हणून तो थांबला होता , स्वतःलाच थांबवत होता.

पण त्या दिवशी ती डायरी त्याच्या हातात आली,आणि त्याचं आयुष्यच बदललं.
ते शेवटचं पान, गोंधळलेली अक्षरांनी… आडव्या-उभ्या रेषांनी पण त्या सगळ्यात एक नाव…"मिहिर नगरकर" आणि त्यासोबत लहान लहान हार्ट्स आणि एक साधं… पण सगळं सांगून जाणारं — "I Love You"
त्या क्षणी… त्याला काहीच विचारायची गरज उरली नाही.कारण उत्तर त्याच्या समोर होतं, त्या दिवसानंतर तो थांबला नाहीस्वतः पुढाकार घेतला.
तिच्याशी बोलायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या जगात स्वतःची जागा निर्माण केली, तिच्या शांततेला समजून घेत.तिच्या न बोललेल्या शब्दांना ऐकत, तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधत होता
आणि मग एक दिवस त्याने सगळं मन तिच्यासमोर मांडलं.
नाटक नाही , दिखावा नाही, फक्त प्रामाणिक भावना त्याने मांडलेल्या.
ती काही क्षण शांत राहिली, जशी ती नेहमी असायचीपण यावेळी तिच्या डोळ्यांत उत्तर होते, तिने हळूच होकार दिला…आणि त्या एका क्षणाने दोघांचं आयुष्य कायमचं बदललं.

काव्याने डायरी अलगद बंद केली.आणि पुन्हा एकदा मिहिरच्या खांद्यावर डोकं टेकवलं.
"आपली सुरुवात किती सुंदर होती ना…" ती हळूच म्हणाली.
मिहिरने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं.
"आणि अजूनही आहे…" तो हसत म्हणाला
"आणि अजूनही आहे…" तो हसत म्हणाला
खोलीतला पसारा अजूनही तसाच होता,पण त्या
क्षणीत्यांच्या आठवणींनी सगळं पुन्हा सजवलं होते.
क्षणीत्यांच्या आठवणींनी सगळं पुन्हा सजवलं होते.