भाग 1
"अहो..." ती गडबडीत त्याला आवाज देत रूममध्ये येत होती.
"अहो ..हे काय आज तुम्हाला सुट्टी म्हणून सगळं कपाट खाली करून बसला आहात .." ती कंबरेवर हात ठेवून रूममध्ये नजर फिरवत म्हणाली .
तो अजूनही कपाटातून काहीतरी काढण्यात व्यस्त होता , तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलेच नाही.
ती नकारार्थी मान हलवत पुढे आली , हळूच त्याच्या खांद्यावर थोपटलं, तसा तो त्याने खांद्या हलवला...पण मागे वळून बघितले नाही .
"मिहिर नगरकर, कपाटातून जरा लक्ष काढा आणि समोर उभ्या बायकोकडे बघा जरा.." ती त्याचा हात पकडून स्वतः कडे वळवत म्हणाली.
तो हसून तिच्याकडे बघतो, चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती .. दोन्ही हात मागे घेतले होते ..
"ओहो.. मिसेस नगरकर , यु आर व्हेरी ब्युटीफूल" तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकून म्हणाला ,तशी ती त्याच्या छातीवर हलक्या हाताने मारून त्याला मिठी मारली.
" हाय..बायको, काय ते लाजने... उफ्फ्..!" तो छाती चोळू डोळे मिचकावत म्हणाला.
" गप्प बस्सा, आणि सांगा हे सगळं काय चालू आहे.." ती पसाऱ्याकडे हात करून म्हणाली.
" काय कुठे काय चाललंय?" तो काही माहित नसल्यासारखे खांदे उडवत म्हणाला.
" गप्प बसा, पुर्ण दिवस जाईल माझा आवरायला.." ती चिडून सामान उचलत म्हणाली.
ती पुढे चालू लागली ,तस त्याने मागून तिला घट्ट मिठी मारली ...
"कशाला चिडचिड...मी आहे ना मदतीला.." तो तिला मस्का मारत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला.
" हो मगं तर दुसरा दिवस उगवेल.." ती कोपरा मारत म्हणाली.
आणि पुढे निघाली
आणि पुढे निघाली
" बरं बाई..दोन मिनिटं थांब तर ,
बघ मला काय मिळाले आहे" त्याने परत तिला मागून मिठी कैद करत म्हणाला.
बघ मला काय मिळाले आहे" त्याने परत तिला मागून मिठी कैद करत म्हणाला.
" काय हो तुमचं.." ती वैतागून म्हणाली.
" बायको प्लिज..." लाडात येत तिच्या गालावर किस करत म्हणाला , तशी तिने लाजून मान खाली घातली.
" डोळे बंद कर ना.." तो तिच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर मारत म्हणाला, तसं तिने होकारार्थी मान डोलावली अनं डोळे मिटून घेतले.
त्याने मागून एका हाताने एक डायरी तिच्या समोर केली,
" डोळे उघड.." तो हळू आवाजात म्हणाली.
" डोळे उघड.." तो हळू आवाजात म्हणाली.
तिने हळूच डोळे उघडले, तसे चेहऱ्यावर हास्य तरळले..
" अय्या..हि कुठे मिळाली?" त्यांनी मागे वळून मिहिरकडे बघत विचारले.
" अय्या..हि कुठे मिळाली?" त्यांनी मागे वळून मिहिरकडे बघत विचारले.
"हेच तर शोधत होतो कितीवेळ.." मिहिर हसत म्हणाला.
त्यांनी हळूच डायरीवर हात फिरवला,
" खुप दिवसांनी मिळाली...
आपली सुरूवातच इथून झाली ना " मिहिर यांनी हसून काव्याच्या डोळ्यात बघून विचारले, तशी ती हुंकार भरला ..
आपली सुरूवातच इथून झाली ना " मिहिर यांनी हसून काव्याच्या डोळ्यात बघून विचारले, तशी ती हुंकार भरला ..
ती चालत बेडवरचा पसारा बाजूला गेला आणि डायरी घेऊन बसली तो हसत तिच्या बाजूला जाऊन बसला ..
"काय काव्या मॅडम , लग्न झाल्यानंतर विसरला की तुमच्या बेस्टीला.." मिहिर डायरी कडे इशारा करून तिला चिडवत म्हणाला
तशी ती खुदकन हसली , 'डायरी कोणाची बेस्टची असू शकते' हा कॉलेजपासून पडला प्रश्न...
काव्याला लेखनाची आवड, नेहमीच तिच्या डायरी असणार ,मग ती कॉलेजमध्ये असो , बसमध्ये बसायला जागा मिळाली की असो नाहीतर प्रवासात तिला डायरी सोबत हवीच असायची ...
त्यामुळे तो नेहमीच तक्रार करत असे .
त्यामुळे तो नेहमीच तक्रार करत असे .
" हो माझी बेस्टीचं होती ...माझं मन डायरीत मोकळं व्हायचंपण काय आहे ना मिहिर जसे तु आयुष्यात आला आणि मनात जे काही आलं तसं तुला सांगितलं मग कधी डायरीत विशेष काही लिहिलं गेलंच नाही , तुच माझा बेस्टी झाला.." काव्या मिहिरच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये बघून म्हणाली .
तशी मिलियन डॉलर्स वाली स्माइल त्याच्या चेहऱ्यावर पसरली .तिने हळूच डोके त्याच्या खांद्यावर टेकवले आणि डायरीचं पहिलं पान उघडलं...
जास्त झगमगाट नाही, रंगरंगोटी नाही साधं .. स्वच्छ सुरेख अक्षरात तिचं नाव लिहिलं होतं ...ठळक आणि उठून दिसत होते ,
तिने हळूच अक्षरावरून हात फिरवला , खाली दोन ओळी
'पर्सनल डायरी आहे कृपया वाचू नका..' महत्त्वाची गोष्ट लिहिली होती .
तिने हळूच अक्षरावरून हात फिरवला , खाली दोन ओळी
'पर्सनल डायरी आहे कृपया वाचू नका..' महत्त्वाची गोष्ट लिहिली होती .
तिने तिथं हात फिरवला आणि मिहिर कडे तिरक्या नजरेने पाहिलं,
तसे त्यांने बिंदास खांदे उडवले.
तसे त्यांने बिंदास खांदे उडवले.
"अशी काय बघते , आता तुझ्याबद्दल तुझ्या बेस्टीकडूनच मला कळणार ना ... हा तुझी कुणी मैत्रीण असती तर तिला विचारले असते , हि भेटली मग न उघडता मला तुझ्या मनातलं थोडी कळणार आहे.." मिहिर लगेच सावध भुमिका घेत म्हणाला.
"विचारायची काही पद्धत असते , डायरेक्ट कोण डायरी उघडू शकते.." ती तक्रार करत म्हणाली.
" हो विचारून काही फायदा नसेल तर काय करायचे.."
" तुझ्याकडे आलो असतो आणि तु हसत हसत परमिशन दिली असतीस डायरी विचायची.." तो डोळे मोठे करून म्हणाला ,
तशी तिने नकारार्थी मान हलवली.
" तुझ्याकडे आलो असतो आणि तु हसत हसत परमिशन दिली असतीस डायरी विचायची.." तो डोळे मोठे करून म्हणाला ,
तशी तिने नकारार्थी मान हलवली.
"घ्या माहित होते, म्हणून स्वतः ला मीच परमिशन दिली" तो डोळे मिचकावून म्हणाला.
तिने हळूच मान डोलावली आणि पुढची पाने पलटू लागली ,
प्रत्येक पानावर तिचा एक नवीन दिवस, नवा अनुभव तिने आपल्या शब्दात व्यक्त केला होता.
कुठे कविता, तर कुठे दोन ओळी मनातले भाव पसरले होते.
एका पानावर तर एक फोटो लावला होता ..
दोघांनी एकत्रच फोटोवरून हात फिरवला, कॉलेजच्या एका फंक्शनमध्ये दोघांच्या नकळत , दोघांचा कॅन्डिड फोटो काढला होता.
त्यांचा पहिला सोबतचा फोटो जो तिने जपून ठेवा होता.
त्यांचा पहिला सोबतचा फोटो जो तिने जपून ठेवा होता.
त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले, तेच प्रेम दिवसेंदिवस फुलत चालले होते.
डायरीची पाने पलटत होती , तासभर दोघेही आपल्या आठवणीत रमले होते , ती आपल्या डायरीतल्या शब्दांनी बोलत होती ..
कितीतरी वर्षांनी आपले शब्द वाचताना मनात स्पर्शून जात होते.
आणि त्या एका क्षणाने दोघांचं आयुष्य कायमचं बदललं..
शेवटी दिर्घ श्वास घेतला आणि ती डायरी बंद करून लागली..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
