Login

विवाह करार -25

सुपेशला आणि त्यांच्या खऱ्या प्रेमाला मिळाली मृत्यूची साथ. केला तिने मोठा गुन्हा यात.
    सूपेशला आधी जेवणातून विष दिले. नंतर त्याच्यावर चाकूने वार केले. पैसे लॉकर मधून काढून घेतले जेणेकरून हे सगळ चोरांनी घडवून आणले असे नाटक तुम्ही रचले, बरोबर न वृषाली मॅडम, असच झालं न सगळ. बर एक सांगा यात तुम्हाला साथ कोणी दिली हे सगळ करायला. कोण आहे तुमचा तो प्रियकर, काय नाव आहे त्याचे? धमक्या आवाजात पोलीस आता वृषाली सोबत बोलायला लागली.

नाही, हे खोटं आहे, अजिबात खोटं आहे. मला कोणीही साथ नाही दिली. माझा कोणी प्रियकर नाही. असं कस बोलत आहे तुम्ही. माझा नवरा होता तो. मी का मारेल त्याला. आता वृषाली पूर्णतः घाबरली होती.
  
   कारण तो तुला पसंत नव्हता. तुला हे लग्न मान्य नव्हते. तुम्ही contract marriage केले होते. तरीही करार पूर्ण होण्याआधी तुमच्यात असे की झाले की तुम्ही स्वतःच्या जीवावर उठलात. ह्यांना संशयित म्हणून आमच्या सोबत न्यावे लागेल असे पोलिसांनी वृषाली च्या घरच्यांना सांगितले.

    अहो असं कसं बोलत आहे तुम्ही मामा उद्गारले, अहो साहेब सून आहे ती या घरची आणि तिला च येवढे दुःख मिळाले त्यातही तुम्ही तिला घेऊन गेले तर लोक काय म्हणतील आम्हाला. असं नका करू तुम्हाला हवे ते इथेच विचारा तिला.
   नाही तस नाही चालणार. याना आम्ही सोबत घेऊन चाललो. जर ह्या निर्दोष असतील तर आम्ही यांना काहीही होऊ देणार नाही. पण जे तिथं जमेल ते इथ जमणार नाही.

   वृषाली ला पोलीस सोबत घेऊन जातात. तिचे हाताचे ठसे घेऊन ते आणि सूपेश च्या खुनातील मिळालेले ठसे मिळवून रिपोर्ट तयार केले जातात. त्यामध्ये वृषालीचेच ठसे मिळतात. त्यावरून यामध्ये तिचाच हात असल्याचे स्पष्ट झाले होते.  आता फक्त कबुली जबाब नोंदवून घेण्यास तिला पोलिसांनी सोबत ठेवलेले होते.

      हा तर वृषाली बाई काय म्हणणे आहे तुमचे. तुम्ही काही सांगू शकता की आम्ही तुमच्याकडून आमच्यापद्धतीने विचारायचे तुम्हाला. पोलीस मॅडम वृषालीसोबत बोलल्या.

        अहो खरंच मॅडम मला काहीही माहीत नाही. हे मी आधीही सांगितले, तरीही तुम्ही मला का इथे आणलेले आहे मला समजत नाही. वृषाली रडत रडत बोलली.

       मॅडम ने तिच्या एक जोरदार कानाखाली ठेवून दिली. आणि थर्ड डिग्री वापरल्याशिवाय तु बोलणारच नाही . जशी तुझी मर्जी. तुला सरळ शब्दात सांगायला जमणार च नाही.
  
            नाही नका मारू मला मी सांगते सगळ.
.. सांगते.

वृषाली ने बोलायला सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांनी तिचे रिकॉर्डिंग करण्यास सुरवात केली.


मी आणि सूपेश ने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले होते. ही कल्पना त्याचीच होती. कारण मला हे लग्न करायचे नव्हते. आणि नकार देवून ही माझे घरचे मला हे लग्न करायला भाग पाडत होते. मी एक वर्ष या करारा नुसार या लग्नास बांधलेली होते. पण सूपेशला हे लग्न मोडायचे नव्हते. तो माझ्यावर प्रेम करत होता. त्याने मी प्रेग्नेंट असल्याची खोटी माहिती त्याच्या घरी दिली. ज्यामुळे मी रागाच्या भरात त्याला जेवणातून विष दिले. आणि सगळे दागिने लोकर मधून काढून लपवून ठेवले. विषामुळे त्याला त्रास होत होता तो ओरडत होता बाहेर कोणाला आवाज जाऊ नये म्हणून मी त्याचे तोंड बांधून घेतले आणि परत त्याच्यावर चाकूने वार केले. मला तो आधीपासूनच पसंत नव्हता. ही गोष्ट त्यालाही माहीत होती. तरीही तो हे लग्न वेगळ्या प्रकारे करू असे मला पटवून दिले. आणि यात मला कायम अडकवून ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. म्हणून हे सगळे घडले. त्याने खोटं सांगितलं नसत तर कदाचित माझ्याहातून हा गुन्हा घडला च नसता. मला माफ करा मी जाणून नाही केले रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला आहे.

बरोबर आहे तुझे रागाच्या भरात झाले असले तरी तू हे लपवले होते. हा त्याहीपेक्षा मोठा गुन्हा आहे. याची शिक्षा तुला मिळणारच.

वैशालीच्या एक गैरसमज झाल्यामुळे तिने सुपेशची जीवन साखळी संपवली. त्याच धुंदीत न कळत तिने स्वतःच्याच जीवनाची साखळी तुरुंगवासासोबत जोडली..

अशा प्रकारे सूपेश आणि वृषाली चे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पूर्णत्वास न जाता तिच्या हातून गुन्हा घडला. तिच्या इच्छे विरुद्ध हे लग्न झालेच नसते आणि तिच्या आई वडिलांनी तिचे म्हणणे ऐकले असते, तर हे सगळे टळले असते.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →