असं कसं होऊ शकते आपला मुलगा एवढा साधा सरळ त्याच्यासोबत असा विश्वासघात कोण करू शकते या विचारात सुपेशचे बाबा खाली पडले त्यांना कळत नव्हते हे सगळं कसं झालं ते त्यांना सावरायला रुपेश पुढे गेला आणि जोरजोरात रडायला लागला त्या दोघांना सावरायला मामा आणि वृषालीचे बाबा होते.
ही बातमी वृषाली च्या घरी कळाली.पण सुपेशच्या आईकडून लपवल्या गेलं त्यांनी पोस्टमार्टम झाल्यानंतर सांगायचे ठरले. पण जो पर्यंत बॉडी घरी पोहचेल त्याआधी बाकी नातेवाईका पर्यंत ही बातमी कळाली. हळूहळू सगळे नातेवाईक सुपेशच्या घरी जमू लागले. काहींनी फोन केला या सगळ्या हालचाली वरून काहीतरी वाईट घडले याचा अंदाज सविता ताईंना आला. त्यांनाही घाबरल्यासारखे होऊ लागले. काय करू नी काय नाही सुचत नव्हते.त्यांनी सुपेशचा नंबर लावून बघितला, वृषालीला फोन लाऊन पाहिला पण कोणीही फोन उचलला नाही. रुपेशला फोन लावला त्याने उचलला पण नुसती कलकल आणि रडणे ऐकायला येत होते.यावरून त्यांच्या लक्षात आले सुपेश ला काही तरी झाले. ज्यावरून तिथे ज्योतीताई त्यांना सात्वनेने आणि लहान बाळाप्रमाणे सांभाळत होत्या त्यावरून त्यांच्या लाडक्या मुलाला काहीतरी झाले याची त्याला खात्री पटली. पण काय झाले मला का कोणी सांगत नाही. त्यांनी सुपेशकडे जाण्याचा अट्टाहास सुरू केला. ज्योती ताई आणि बाकी काही महिला पाहुण्यांनी त्यांना समजून सांगण्याचा अपयशी प्रयत्न केला. त्या रडत होत्या आणि सुपेशबद्दल बोलत होत्या. ज्यावेळी त्यांना माहिती मिळाली सुपेशबद्दल त्यावेळी त्यांना धक्काच बसला त्यांचा लाडका, म्हातारपणाची सहारा देणारी लाठी मोडल्या गेली होती. त्या स्वतःला याचे दोषी मानू लागल्या. का कुणास ठाऊक त्यांनी वृषालीला आरोपी समजून नको नको ते बोलण्यास सुरुवात केली. त्या रडत होत्या आणि बोलत होत्या.सगळ्यांना फार दुःख झाले. सुपेश बद्दल जाणून पण त्यापेक्षा त्याची आई मुलगा गेल्या गेल्या सूनेबद्दल अस कस बोलू लागली आहे याचे आश्चर्य वाटत होते. बॉडी घेऊन अँब्युलन्स आली. सगळी अंत्यसंस्काराची तयारी झालेली होतीच फार उशीर न करता मुख दर्शन घेऊन लगेच स्मशानभूमीकडे सगळ्यांनी धाव घेतली. घरचा तरुण मुलगा असा अपघाती गेला म्हणजे अशी धास्ती बसणे साहजिकच आहे. सर्वांनी दुःखाचे शब्द बोलुन निघण्याची तयारी केली.
घरातील वातावरण भयानक होते. त्यात भयान शांतता पसरली होती.सगळ्या याच विचारात होते की हे सगळ कसे झाले. एवढ्या शांत मनमिळाऊ स्वभावाचा सुपेश चा कोण शत्रू असु शकते. ज्याने त्याला एवढ्या क्रूरतेने मारले. चोर असता तर चोरी करून गेला असता सोबत सूपेशला का मारावे त्याने. तेवढ्यात पोलीस दाखल झाले.
नमस्कार, मला माहित आहे मी चुकीच्या वेळी आलेलो आहे, पण माझा नाईलाज आहे. गुन्हेगाराला पकडणेही आवश्यक आहे. मला mrs. सुपेश सोबत बोलायचे आहे. त्यांना बोलवता का? इन्स्पेक्टर बोलले.
सुपेश चे मामा बोलताना समोर आले, अहो साहेब ती आधीच दुःखात आहे तिला कसलही भान नाही आणि तुम्ही तिला का अजून त्रास देता बाहेर बोलावून.
हे बघा मिस्टर, मला सगळ समजते जर तुम्ही सहकार्य केले नाही तर आम्हीही काही करू शकणार नाही. आणि सुपेश सोबत त्याच राहत होत्या. त्यामुळे त्यांना जे माहिती आहे हे तुमच्यापैकी कोणीही सांगु शकणार नाही.
म्हणजे काय विचारायचे आहे तुम्हाला, आम्ही ही त्याच्या संपर्कात असायचो. आम्हाला विचारा नाही सांगता आले तर तिलाही बोलावून घेऊ,परत मामा उच्चारले.
मधातच साविताताई बोलल्या, एवढे म्हणतात साहेब तर घ्याकी तिलाही बोलावून आपल्यापेक्षा ती आपल्या मुलाबरोबर होती. कदाचित याना काही मदत मिळेल तिच्या बोलण्याने.
हो कारण रिपोर्ट नुसार आधी तुमच्या मुलाला जेवणातून विष देण्यात आले होते आणि नंतर त्याच्यावर चाकूने वर करण्यात आले. आणि आम्हाला तपासात जाणवले की त्या घरात चोरीही झालेली होती. तर काय काय चोरीला गेले आणि सुपेशा बाहेर कुठं जेवण करून आला का याबद्दल वृषाली मॅडम च सांगू शकतील आम्हाला म्हणून त्यांना बोलावले जास्त फायद्याचे होईल या केस करीता.
हो बरोबर आहे तुमचे बोलावते मीच तिला तुम्ही बसा असं म्हणत सविता ताई आत गेल्या. आणि त्यांनी वृषालीला बोलावून आणायचे सांगितले.वृषाली ही रूम मध्ये निस्तब्ध अश्रू ढाळत बसलेली होती.
थोड्या वेळाने वृषाली ही बाहेर आली. तिच्या अवस्थेकडे पाहून ती काही प्रतिसाद देईल असे वाटत नव्हते. पण तिच्यासोबत बोलणे महत्त्वाचे होते. त्याला कारण ही तसेच होते.
त्यातील एक पोलिस कर्मचारी पुढे येत बोलल्या, आम्हाला तुमची मनस्थिती समजते, पण ही वेळ एक अपराध्याला पकडण्याची ही आहे. हा खून झाला त्यावेळी तुम्ही कुठे होतात मॅडम आणि तुम्ही दोघांनी सोबत जेवण केले का? केले तर ते घरी केले की बाहेर जावून केलेत? तुमच्या घरात चोरी झाल्यासारखे वाटत होते, या चोरीत काय काय चोरीला गेले आपण सांगु शकता का?
हे सगळे प्रश्न ऐकून वृषाली घाबरली, तिला काही सुचत नव्हते, रडावे की बोलावे,पण तिला त्या जागेवरून उठून जायचे होते ते तिला जमणार नव्हते किंवा ती तसे करू शकत नव्हती. ती काही न बोलता एकदम रडायला लागली.
लेडी पोलीस ने पाणी आणून वृषालीला द्यायला सांगितले, त्याप्रमाणे तीने पाणी पिवून ही बोलायला सुरुवात केली नाही. आता मात्र पोलीसांनी आवाजाचा पारा वाढवीला आणि पोलीस चौकी मध्ये तुम्हालाही नेण्यात येईल जर आता तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर. हे ऐकून ती जरा जास्तच घाबरली.
मला का घेऊन जाणार मी काही नाही केले मी ते घरीही नव्हते. हे सगळ घडले त्यावेळी आणि मला काय माहीत कोणी चोरी केली, नी कोणी सुपेशला मारले. मला काहीही माहीत नाही. वृषाली घाबरत घाबरत बोलू लागली. आणि जोर जोरात रडू लागली.
आम्हाला तुमच्या हाताचे ठसे हवे आहेत. जेणेकरून आम्हाला पुढील गोष्टी करण्यास मदत होईल, पोलीस मॅडम बोलल्या.
वृषाली आणखी जास्त घाबरली आणि म्हणाली माझे हाताचे ठसे का हवेत. त्याने तुम्हाला कोणती मदत होईल. तुम्ही लोक मला आरोपी ठरवत तर नाही न. मी का असे करेल, काय कमी होते मला, तुम्ही लोक मला फसवत तर नाही?
यावेळेस वृषाली वरच्या आवाजात बोलायला लागली. ती मागचे सगळे विसरून फक्त पोलिसांच्या बोलण्यावर भर देत होती.
तिच्या वागण्याने सगळेच हापचक झाले. पण ती जणू शुद्ध हरवल्यासारखी वागत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय तिच्यावर जो होता तो अधिक बळकट झाला.
रिलॅक्स वृषाली मॅडम असं इथे कोणीही बोलले नाही आणि तुम्ही आता बोलल्या आहाच तर सांगा त्या दिवशी रात्री तुम्ही दोघे साधारण किती वाजता जेवण केले आणि तुम्ही किती वाजता बाजारात गेल्या होत्या. कमाल ची गोष्ट तर ही आहे की तुम्ही रात्रीचे जेवण करून बाजारात एकट्या गेल्या होत्या. नेहमी सगळ्या वस्तू सुपेश तुम्हाला आणून देत होते. त्याच दिवशी एवढे काय आवश्यक होते तुमचे जाणे. बोला काहीतरी सांगा वृषाली बाई पोलीस मॅडम आवाजावर जोर वाढवत बोलल्या.
नाही नेहमी मीच आणत होते जे घरात हवं आहे ते सगळ. आणि म्हणून त्यादिवशी जेवण झाल्यावर मी फिरत फिरत बाजाराकडे निघून गेले. आणि सूपेशला बर नव्हतं वाटत म्हणून तो घरात पडून राहला. एरव्ही आम्ही दोघेही जेवणानंतर बाहेर जात होतो. पण त्यादिवशी तो नाही बोलला बाहेर यायचे म्हणून मी निघून गेले.
