Login

विवाह करार 22

वृषाली च्या अस्वस्थतेचा चुकीचा अर्थ लावला सविता ताईने. ही चुकीची गुड न्यूज काय वादळ आणणार सुपेशाच्या जीवनात. वाचू पिढील भागात.
रीयाने वृषालीचें मुड ऑफ केले. त्यामुळे ती थोडी उदास झाली. तिच्या मैत्रिणीला आपलं खास समजत होते त्याच मैत्रिणी तिला असं बोलत होते तिला आवडले नाही. तिच्याशिवाय त्या ऑफिसमध्ये सध्या तरी वृषालीची ओळखीचे कोणी नव्हते म्हणून ती जास्त काही न बोलता आपल्या जागेवर जाऊन बसली. हे सगळे विवेक कॅबिनमधून पाहत होता. यावरून त्याच्या एक लक्षात आले की वृषाली स्वच्छंदी आणि रागीट आहे. त्यामुळे तिला मिळवणे अवघड आहे पण त्याच्यासाठी अशक्य नाही.

    तिला काही जुन्या फाईल दिल्या गेल्या. तिला त्याच परत रिन्यू करून प्रिंट करून देण्यास सांगण्यात आले. हे तिची सुरुवात होते. हे काम ती सहज पूर्ण करून गेली.

चल वृषाली, जायचं नाही का घरी? इथेच ऑफिसमध्ये थांबायची इच्छा आहे की काय रिया वृषालीला म्हणाली.

तू चलना, झालं बस माझे ही, मी आलेच.

काग कसं वाटलं काम चेहऱ्यावरून तरी वाटते तुला काही फारसा अवघड नाही गेला.

नुसते फाईल्स नवीन करणे होते ना, त्यात फार काही अवघड नव्हतं ते कोणीही करू शकत होतं.

अच्छा, सॉरी मी सकाळी जे बोलली त्याच्याबद्दल , मी सहज मजा केली होती आणि तु सिरीयस झाले..

वृषाली इट्स ओके.....

ती तिच्या गडबडीत सुपेशला मेसेज करायचं विसरून गेली. आणि सरळ घरी निघून गेली.

थोड्या वेळात सुपेश घरी येतो.

कसा गेला मग मॅडम आजचा पहिला दिवस ऑफिसमध्ये. चांगलाच गेला असेल म्हणून तर तू मला न कळवता सरळ निघून आली. काम कसं वाटलं,  कर्मचारी कसे आहेत. बॉस कसे वाटले. एकंदरीत आमचा अनुभव काय आहे तुमचा...

छान आहे, म्हणजे सरांनी ही चांगल्या प्रकारे समजून सांगितले. स्टाफ सोबत फारसा संपर्क आला नाही. पण तरीही चांगलाच वाटला. मला फारसे काम आज मिळाले नाही.पण जे मिळाले ते काम फार अवघड नव्हतं. निर्जीव झालेल्या फाइल्सला जीवन दान देणे होते. त्यामुळे आजच्या एकंदरीत दिवस मस्त गेला.....

म्हणजे आता पार्ट्या कमी आणि काम जास्त होईल तर..... सुपेश ने हसत म्हटले.

यावर काही न बोलता वृषाली किचनमध्ये निघून गेली आणि दोघांच्या जेवणाची तयारी केली. जेवण करता करता त्यांनी गप्पा केल्या आणि फिरायला निघून गेलेत...


वृषाली सुपेशला म्हणाली  मला आईचा फोन आला होता. खूप वेळची माझ्यासोबत बोलली पण बाबांचा राग अजून शांत झालेला नाही, असे तिने सांगितले. त्यासाठी दोघांना सोबत यावं लागेल त्याशिवाय ते मला माफ करणार नाही. असे आई म्हणाली. याबद्दल तुम्हाला काय वाटते.......

त्यात काय जाऊ एक दिवस दोघे सोबत. माफी मागू त्यांची, करतील ना मग माफ.......

काय माहिती करतील की नाही. पण मी कधीही त्यांच्या एवढा राग पाहिला नाही. असे कसे रागीट झाले एवढे अचानक...

मनातील इच्छा पूर्ण नाही झालं की किंवा मग त्यांनी दाखवलेला मार्ग चुकला की होते बऱ्याचदा........

वृषाली एकदम शांततेत सुपेशकडे पाहत होती..........

काय झालं, अशी का बघत आहेस तु माझ्याकडे........

मी विचार करत आहे, मग तुम्हाला कधी राग आला नाही का? तुमच्याकडे मी रागाला येताना कधी बघितले नाही......

मी रागावलो आणि नाराज ही झालो तर माझी समजूत काढणार कोणी नाही. हे कदाचित त्या रागालाही माहीत असावं.......

चालता चालता वृषाली अचानक चक्कर येऊन खाली पडली........

सूपेश एकदम घाबरला, काय झाले वृषाली, उठ न, ये वृषाली..
तिला पडलेले पाहून सुपेश ओक्साबोक्सा करत होता. त्याला काही सुचत नव्हतं नेमकं काय करायचं.....

त्याने तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला. तो सरळ वृषाली ला डॉक्टर कडे घेऊन गेला.

डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले थोड्या वेळात शुद्धीवर येईल असे सांगितले. तोपर्यंत सुपेशला औषधं आणायला पाठवले.....

सुपेश च्या मोबाईल ची रिंग वाजली, आणि कधी नव्हे ते सविता ताईचा फोन आला. काय करत आहेस सूपेश लग्नानंतर आईला विसरलास. आठवण नाही येत का रे बाळा?

तस नाही आई मी नंतर करू का तुला फोन......

काही झाले का तिकडे, फारसे काही नाही पण वृषाली अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. मी डॉक्टर कडे नेले म्हणून म्हटले नंतर करतो तुला कॉल....

खरंच सांगत आहेस तु, ठीक आहे, घे काळजी. घरी गेल्यानंतर निवांत सकाळी कर फोन.......

सुपेश सोबत एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला आणि परत लगेचच ज्योती ताईंना कॉल केला.

हॅलो, अभिनंदन विहीनबाई, तुम्ही आजी होणार आहात. तोंड गोड करा. एवढी आनंदाची बातमी तुमच्या वृषालीने आपल्याला दिली. मी तर खूप आनंदी आहे. काय करू काय नाही असं झाले मला.........

ज्योतीताई, अहो ताई तुमची ऐकण्यात चुकी झाली असेल मी तर काही दिवसा आधी वृषाली सोबत बोलले पण मला तिने काही सांगितले नाही. म्हणजे मला म्हणायचे आहे तस असत तर मला तिने सांगितले असते न....

असं काय बोलता ताई तिलाही त्यावेळी समजले नसेल, तिची पहिलीच वेळ आहे. आज ते दोघे डॉक्टर कडे गेले होते.  आता उद्या सांगतील तुम्हाला. ऐकूनच किती आनंद झाला मला. बाळ आल्यावर किती आनंद होईल. मी होणाऱ्या आजोबांना सांगते आता तुम्हीही तिकडे सांगा. काळजी नका करू सगळ छान होईल.......

सुपेश औषध घेऊन डॉक्टर कडे गेला डॉक्टरांनी अनियमित खानपानांमुळे कमजोरी आली आणि त्यांना गिरकी येऊन त्या पडल्या. बाकी काळजी करण्यासारखे काही नाही. वेळेवर जेवण करा नि पाणी जास्तीत जास्त पिण्यास सांगा.....

सुपेश ने सुटकेचा श्वास सोडला. वृषाली कस वाटत आहे तुला आता बर असेल तर चालायचं का ?

हो मी ठीक आहे, चला.......

काय म्हाले डॉक्टर, जेवणाच्या वेळा बदलल्या तु आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे झाले. त्याची काळजी घेतली तर परत असे होणार नाही. जा गोळ्या घ्यायच्या जेवण करून.

तु आराम कर थोडा,  हे घे पाणी  आणि  गोळ्या घेवून
घे. म्हणजे सकाळ पर्यंत बर वाटेल तुला....

औषध घेतल्यावर वृषालीला लगेच शांत झोप लागली. सुपेश मात्र नेहमीसारखा विचारात मग्न होता. त्याला त्याच्या जीवनात निराशाच पदरी पडलेली दिसत होती. त्यातून मार्ग काढण्याचे त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत होते.
यात अजुन भर पाडली ती सविता ताईंनी.

Good Morning, आता बर वाटते न तुला वृषाली. मला वाटत आज तू आराम करावा. औषधांमुळे त्रास होऊ शकतो.

नाही नको आता कुठं मी जॉईन झाले आणि दुसऱ्याच दिवशी सुटी टाकने योग्य नाही वाटत. मी करेल मॅनेज तुम्ही नका टेन्शन घेऊ. आज जरा उशीर झाला मला उठायला तर आवाज द्यायचा होता......

उगाचच म्हटले कशाला तुला त्रास द्यायचा. मला वाटले आज तू दिवसभर आराम करशील म्हणून मी तुझी झोप मोडली नाही.....

नको तान घेऊ, नाष्टा तयार आहे. तु आवर तुझ मी चहा बनवतो तोवर..........
मीच तुला ऑफिसपर्यंत सोडवतो......

ठीक आहे चालेल. तुम्ही जा तोवर मी रेडी होऊन आलेच......

वृषाली लगेच तयार होऊन किचन मध्ये जाते. तिथेच चहा नाष्टा करून घेते. लगेच टिफीन ची तयारीला लागते......

टिफीन घेऊन लगेचच दोघेही निघाले. आज सुपेश ने वृषालीला ऑफिसपर्यंत सोडले, बर वाटत नसले तर मला कॉल कर मी घ्यायला येईल.

हो चालेल मी करतो तुम्हाला कॉल. पण तशी वेळ येणार नाही ठीक आहे. By......

सुपेश त्याच्या ऑफिसकडे परतला........

इकडे वृषाली ऑफिस मध्ये गेली. आणि लगेचच तिने तिच्या कालच्या राहिलेल्या कामाला सुरुवात केली आज विवेक लवकर ऑफिसमध्ये हजर होतात. तोच खाली जात असताना तिच्याकडे नजर टाकली आणि तिला पाहून स्वतःच हसला.

तेवढ्यात वृषालीला तिच्या आईचा कॉल आला...


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →