Login

विवाह करार 21

वृषाली आमिषांना बळी पडेल का? सुपेश चे प्रेम तिला रोखण्यास पुरेसे ठरेल का?
पुरे आता जावई प्रवचन. तुम्हा दोघांचे म्हणणे तरी काय आहे. एवढेच न की मी सुपेश सोबत सुखात राहो. त्यांना कसला ही माझ्यापासून त्रास होता कामा नये, एवढेच न की अजून काही आहे.......

हे बघ बेटा तुला मी जन्म दिला आहे. आम्ही लहानच मोठ केलं आहे तुला. आमचा जीवतला जीव तुझ्यात आहे.  आमची प्राथमिकता तुच आहेस. पण तु अशी बेजबाबदार वागशील तर आम्हाला अशे पाऊल उचलावे लागणारच.....

तुझी कुठेही दिशाभूल होऊ नये आणि तुझे जिवन आनंदात, सुखात जावो एवढीच अपेक्षा आहे आमची......

ठीक आहे आई मी सुपेशला नाही सोडणार. आता तर तुमच्या मनासारखे होईल न. सांग असे बाबांनाही.......

पुढे.......


पण मी माझे काम, ऑफिस जाणे बंद करणार नाही . तो आणि तुम्ही मला हवी तेव्हढी आर्थिक मदत करणार का? मला हवं ते हवे तेव्हा, वाटेल तसेच मी करेल. तरच मी हे लग्न आयुष्यभर टिकवायला तयार आहे.....

हे ऐकून ज्योती ताईंना धक्काच बसला. आपली मुलगी असं कसं करू शकते. लग्न टिकवण्यासाठी अटीतटीची भाषा वापरू शकते. यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.

यावर काय बोलावे हे ज्योती ताईंना सुचत नव्हते. त्यांनी कसं बस स्वतःला सावरले.
" वृषाली हे काय बोलत आहेस तू लग्न टिकवण्यासाठी  पैसा मागत आहेस. तुला समजते का तू काय करतेस ते..."

हे बघ आई तुला हव आहे ते मी करायला तयार आहे. मलाही माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. ते मी स्वतः पूर्ण करू शकत नाही, आणि तुम्ही ही मला सपोर्ट करणार नाही. त्याशिवाय मी माझ आयुष्य कस आनंदात जगणार. वृषालीने आईला उत्तर दिले.

ठीक आहे मी सांगते तसं तुझ्या बाबाला मी सुचवते तुलाही लवकर त्यांचं उत्तर.......

ठीक आहे काळजी घे स्वतःची आणि बाबांची  ठेवते फोन......

एवढ्यात सुपेश घरी येतो त्याला पाहताच वृषाली चा चेहरा अजुन रागाने लाल होतो. पण त्याला बोलण्यात काही अर्थ नाही हे वृषालीच्या लक्षात येत. त्यामुळे काही न बोलता ते सरळ किचनमध्ये निघून जाते.......

मी आईला सांगितले तर खरं की आम्ही दोघ आयुष्यभर सोबत आहोत. पण पैशासाठी हे सगळं  बोलणं सोपं आहे. जर हे माझ्याच अंगलट आले तर! हे बोलून मी चुक तर नाही केली ना?  आता काय करायचं सुपेश सोबत असलेली शाब्दिक जवळीक मला कायम ठेवावी लागेल. तो रागावला आणि बोलला नाही माझ्यासोबत  तर सर्व स्वप्नांचा  धिंगाणा होईल जे माझ्यासाठी घातक आहे....

म्हणजे माझं पहिलं टार्गेट सुपेश नंतर आई - बाबा....

वृषाली एकदम फ्रेश मूड मध्ये सुपेश साठी चहा घेऊन येते, "हा घ्या गरमागरम चहा ..."


सुपेश, "अरे वा आज न बोलता लगेच चहा आला. वा एकदम कडकं आणि मला हवा तसाच चहा बनवला आज तु."

"ये दिल काश जिंदगी भर ऐसी चहा मिल जाती तो मजा आ जाता. लाजवाब स्वाद "

वृषाली ही हसून त्याला दाद देते, "शुक्रीया शूक्रिया जनाब आपका तहेदील से शुक्रिया."

"चहा म्हणजे अमृत आणि ते अमृत हे भाग्यवंतानाच मिळतो, आणि काही दिवस का असेना मीही त्यामध्ये समाविष्ट आहे." हसत हसत सुपेश मनातील भाव वृषालीपर्यंत पोहचवत होता......

आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे. आणि मला माझे  मूडऑफ करायचे नाही. तुम्हालाही ऑफिस ला जायचं आहे ना. मग उरका पटकन, आपण सोबत जाऊ. मला तुमच्यासोबत बोलायचे आहे.


चालेल सुपेश ने आनंदाने हो म्हटले तेवढाच वेळ तुझ्यासोबत राहायला मिळेल मलाही.....

दोघांनी फ्रेश होऊन नाष्टा सोबत केला. आणि आपआपले टिफीन सोबत घेऊन दोघेही निघाले....

"मी खुप आनंदी आणि नर्व्हस ही आहे. आज माझा पहिला दिवस आहे ना. त्यामुळे मला जरा भीती वाटत आहे. मी आधी कधीही अस  काम केलेले नाही."


त्यात काय मोठे एकदा सवय पडली की सगळं काही जमतं. असं काही फारसं अवघड नसतं कम्प्युटर हाताळायचं.
एकदा करायला जमल्यानंतर लक्षात आलं म्हणजे जमेल सगळं.

गेल्या गेल्याच तुला काम थोडी सांगणार आहेत. तुला आधी त्याचा ट्रेनिंग दिलं जाईल. त्यानंतर तुला काम करायला सांगतील.....

माझ्यासाठी तुझ्याच ऑफिसमध्ये एखादी जॉब असेल तर बघ ना म्हणजे दोघं सोबत जाऊ, सोबत घरी येऊ आणि मला अडचण आल्यास तू शिकवशील. दिवसभर आपण सोबत राहू, त्यामुळे सोबत वेळ घालवता येईल, आहे की नाही मस्त आयडिया....


हो छान आयडीया आहे. पण माझ्या ऑफिसमध्ये वेकेन्सी नाही आहे त्यामुळे तू तिथे नाही येऊ शकत. व्यवस्थित काम कर तिथेच ज्यावेळेस माझ्या ऑफिस मध्ये देखील वेकेन्सि असेल त्यावेळेस मी तुला माझ्या ऑफिस मध्ये बोलावून घेईल. तोपर्यंत तू तिथेच ट्रेन होऊन जाशील. तुला दुसरे काम शिकायची गरज पडणार नाही......

हो हेही बरोबरच  आहे.  तुमचं ऑफिस आलं तर तुम्ही जा आणि मी जाते समोर माझ्या ऑफिस मध्ये. आणि जे बोलायचं होतं ते राहूनच गेलं.....

मी देतो न तुला सोडून तुझ्या ऑफिस पर्यंत.

नको कशाला इथून मी ऑटोने जाईल. नका टेन्शन घेऊ तुम्ही. जा तुम्ही By.........

जशी तुझी इच्छा, By. सांभाळून जा आणि Best Of luck . घाबरु नको आणि मन लावून काम कर. संध्याकाळी सुट्टी  झाले  की मला कॉल कर मी घ्यायला येईल तिकडे......

ठीक आहे.......By.

वृषाली तिथून समोर एकटीच जाते. वास्तविकता तिला सुपेशसोबत बोलायचे होते म्हणून ती त्याच्या सोबत गेली होती. पण नेमके जे बोलायचे ते राहून गेले........

वृषाली ऑफिसमध्ये पोहोचतेच. पोहोचल्या पोहोचले ती पूर्ण स्टॉप मध्ये मैत्रिणीला शोधत असते. ते दिसतात तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली आणि जीवात जीव आला की कोणीतरी आहे इथं आपल्याला सांगणार. ती मैत्रिणी जवळ गेली आणि तिला तिची जागा दाखवली. तीने काय काम करायचे ते सांगून दिले. तशी ती आपल्या कामाला काहीतरी सुरुवात करायला लागली. अडचण आली तर  ती तिच्या मैत्रिणीला विचारत होती. तशी ती स्वतः हुशार होती. कोणत्तेही काम ती लगेच आत्मसात करत होती. थोड्या वेळात इथं ऑफिसचे ऑनर म्हणजे विवेक ची एन्ट्री ऑफिसमध्ये झाली. त्याला पाहताच पहिले वृषाली फार घाबरली कारण त्यांनी आल्या आल्या तिला कॅबिनमध्ये बोलावले होते.

विवेक हा श्रीमंत आई वडिलांचा एकुलता एक सुशिक्षित आणि लाडाने बिघडलेला मुलगा. दिसायला हँडसम स्मार्ट बॉय शिवाय तो तितकाच त्याच्या कामात तरबेज होता. कामात चुका करणे त्याला आवडत नसे. वृषालीसारख्या स्वप्नातील आयुष्य जगणाऱ्या आणि त्यामागे धावणाऱ्या मुलींच्या शोधत असतो. वृषाली तर स्वतः चालून आली मग ही संधी सोडणे शक्य नव्हते.....

मी आत येऊ का सर, वृषाली कॅबिनमध्ये येण्याची परवानगी मागते....

हो या आत या मॅडम, केबिन मधून आवाज आला........

वृषाली  ज्यावेळी आत गेली त्यावेळी विवेक खुर्चीवर बसलेला होता. नमस्कार सर माझ नाव वृषाली पाटील. मी आजच जॉईन झाले. सर मी लवकरात लवकर काम शिकण्याचा प्रयत्न करेल.

अरे वा आधीच सर्व माहिती काढलेली दिसते. मी सांगायच्या आधीच सर्व पॉइंट क्लिअर केले तु.
Very Good I am impressed. याच सफाईने कामही करा.म्हणजे मला ही तुमच्यासारख्या  सुंदर मुलीला प्रमोशन करायला त्रास होणार नाही....

नक्कीच सर, मी तुमच्या अपेक्षांवर खरे उतरेल. माझे काम मी मन लावून करेल. प्रमोशन मधून डावळण्याची तुम्हाला संधी नाही देणार. वृषाली excited, होऊन बोलली......

That's good keep it up.....
Best of luck, miss........

वृषाली सर..........

O yaa वृषाली...... You may go now.........

Yes sir..........

ती कॅबिन मधून बाहेर आली त्यावेळी आनंदात ही होती, तितकीच घाबरलेली ही वाटत होती. आल्या आल्या तिने हातात पाण्याचा पेला घेतला. पाणी पिऊन रिलॅक्स झाली...

रिया तिच्या जवळ आली तिची मैत्रीण, काय ग काय म्हणालेत सर तुला. खुप वेळ थांबलीस कॅबीनमध्ये. Some thing special .....

रियाने जिभेला आवर घालत म्हटले......

वृषाली, एकदम रागात म्हणजे काय म्हणायचे आहे तुला. आल्या आल्या मी कॅबीन मध्ये काही special करायला नि बोलायला गेले होते. असं कस बोलू शकतेस तु. तु हेच करते का इथे येऊन.......


तुम्हाला काय वाटते रिया ला सगळे माहीत आहे आणि तिने तरीही वृषालीला का विवेच्या तावडीत आणले,
यात तिचा काय फायदा, वृषाली विवेकच्या प्लॅनिंग मध्ये अडकेल का, सुपेश तिची सुखरूप सुटका करू शकेल की वृषलीचे जिवन ऑफिस मध्ये अडकून उद्धवस्त होईल
यासाठी वाचत रहा..........

साखळी बंधनाच.ी


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →