सुपेश ला भीती वाटायला लागली होती वृषाली त्याला सोडून खरचं जाणार का? तिला कसे थांबता येईल. त्यात तिची इच्छा थांबायची असली पाहिजे....
आता काय करायचे हे त्याला सुचत नव्हते. वास्तविक पाहता तिने अजून जाण्याबद्दल काही बोलल नव्हत. पण ती आता जॉब करायला लागली म्हटल्यावर कधीही ती विभक्त होऊ शकते.......
मी काय करायच, जर ती खरचं गेली तर सगळ्यांना काय उत्तर द्यायचे. तो या विचारात असतानाच ज्योती ताईचा फोन येतो......
हॅलो कसे आहात, खूप दिवस होऊन गेलेत वृषालीला पाहायला. आणि तिच्या सोबत बोलनेही झाले नाही. तिची खुप आठवण येत होती म्हणून म्हटले फोन करून पाहावं. तिला तर वेळ नाही . आणि तुम्हीही दिवसभर ऑफिस मध्ये असता. तिला न लावता मी तुम्हाला लावला. याचे कारण म्हणजे तिथं बाप लेकीचे काही झाले होते. हे मला जाणून घ्यायचे आहे म्हणून म्हटले आधी तुमच्या सोबत बोलावे.....
वृषालीचे बाबा जरा शांत स्वभावाचेच आहेत, पण एखाद्यावेळी त्यांना राग आला म्हणजे ते कोणालाही काहीही बोलून जातात रागाच्या भरात. मी याआधीही कॉल करायचं विचार केला होता. हे तुम्हाला काही बोलले असतील मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. तुम्ही त्यांच्या बोलण्याचा काही राग नका करून घेऊ......
मामी काहीतरीच काय, मी कशाला राग करू, मोठ्यांनी बोलले म्हणजे वाईट मानायचे नसते. त्यांच्या रागातही प्रेम दडलेले असते. तुम्ही का एवढे वाईट वाटून घेता...
फार मनाला लागेल असे मामाजी मला बोलले नाही. त्यांचे आणि वृषालीचे बोलणे झाले होते. त्यामुळे तिला थोडा राग आलेला आहे. बाकी काही नाही.......
फार मनाला लागेल असे मामाजी मला बोलले नाही. त्यांचे आणि वृषालीचे बोलणे झाले होते. त्यामुळे तिला थोडा राग आलेला आहे. बाकी काही नाही.......
ती काहीतरी चुकली असेल ही म्हणूनच एवढे रागात होते घरी आल्यानंतर ही.......
तिथं बोलले ते पण घरी येऊन त्यांनाच वाईट वाटले की तुम्हाला विनाकारण त्रास झाला. त्यांनी अस करायला नको होते.......
आता आहे का ती तिथं......
नाही मी आता बाहेर आलेलो होतो, मी सांगू का तिला फोन करायला.......
नाही, राहू द्या मीच करते तिला फोन.........
ठीक आहे चालेल, तुम्ही करून घ्या जर तिने नाही रिसिव्ह केला तर मग मी घरी गेल्यानंतर करतो.........
हो. ठीक आहे.
ज्योती ताई वृषालीला कॉल करतात.........
वृषाली नंबर पाहून आनंदित होते, ती लवकर कॉल रिसिव्ह करते. ....
हॅलो, आई कशी आहेस, तुलाही नकोसे झाले होते काग मी. एवढ्या दिवसात एकदाही तु मला कॉल केला नाही. तुलाही माझी आठवण आली नाही. सर्वांनी मला हाकलून लावले. कोणाला माझी गरज नव्हती, मी ओझे झाले होते, असे सरळ सांगायचं होतं ना. असं दूर केल्यापेक्षा माझ्या आयुष्याचा निर्णय मी स्वतः घेतला असता........
असं का बोलतेस बेटा काय! मुलगी कधी आई-वडिलांना ओझं होतं का? आम्ही तुझं लग्न तुझ्या भल्यासाठी करून दिल,, पण तू तिथेही व्यवस्थित राहत नाही म्हटल्यावर राग तर येणारच ना बेटा. तेही तुझ्या वडिलांनी प्रत्यक्ष पाहिल्यावर, तर कोणी सांगितलं असतं तर विश्वास नसता बसला त्यांचाही आणि माझाही. सुपेश खूप चांगला मुलगा आहे. नेहमी नेहमी अशी चांगली व्यक्ती आयुष्यात येत नाही. आता तरी समजून घे आणि त्याच्यासोबत व्यवस्थित रहा आणिनाहीतर फार मोठे नुकसान करून घेशील रे बेटा तू......
हे बघ आई आजही तू तेच सांगायला मला फोन केला असेल तर प्लीज ठेव फोन. मला नाही ऐकायचं तेच तेच ते मला माहिती आहे सुपेश किती चांगले आहेत, गुणी व्यक्तिमत्त्व आहे. म्हणून त्याच्यासोबत लग्न करणं कितपत योग्य आहे बाकी काही गोष्टीचं घेणं देणं नसते का ? माझी स्वप्न कोण पूर्ण करणार? मला हवं ते मिळवायचा आहे.
असं दुसऱ्याच्या भरवशावर जगणं आणि माझ्या स्वप्नांचा विचार सोडून द्यायचा का? माझ्या विश्वाससाने मी माझा जीवनसाथी निवडायचा ठरवलं होतं. तुमच्यामुळे माझं स्वप्न भंग झाला पण मी अजूनही धीर सोडलेला नाही.......
मी तुला फोन केला आहे हे तुझ्या बाबांना माहिती नाही. तुला त्यांची माफी मागावी लागेल जोपर्यंत तुम्ही दोघं सोबत येणार नाही तोपर्यंत ते तुला माफ करणार नाहीत.
सुपेशशिवाय माझं अस्तित्व काहीच नाही का? माझ्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही लोक त्यांना देत आहे का असं ?
मला असंच करणार होते, तर मला लहानाचं मोठं का केलं, का मला चांगली स्वप्न दाखवली, चांगलं शिक्षण दिले, वागणूक दिली, सर्व तुमच्याच मनाने करणे होतं तर का माझ्या भावना सोबत खेळले तुम्ही.
गैरसमज करून घेऊ नकोस बेटा, हे सगळं तुझ्या भल्यासाठी केले आम्ही. यात आमचा काय फायदा सांग बर. कोणत्याही आई वडिलांचा विश्वास असतो त्यांच्या मुलांवर आणि स्वतःच्या शिकवणुकीवर तसा आमचाही होता,पण आम्हाला याची जाणीव झाली नाही की, आम्ही तुम्हाला संस्कार आणि शिक्षण देण्यास कमी कधी पडत गेलो.....
Sorry बेटा आमच्यापासून तुझे फार नुकसान झाले. आम्ही तुला जन्म देऊन,तुझ्या इच्छा पूर्ण करून,लाड पुरवून,तुला शिक्षित करून खुप मोठ्या चुका केल्या. खरंच तुझ्या तर हात जोडून आम्ही दोघांनी माफी मागायला पाहिजे.......
मी आताच बाबाला फोन करायला सांगते. आणि तुमच्या दोघांचा काडीमोड करून घ्यायला सांगते म्हणजे तू ही मोकळी आणि पाहुणेही मोकळे. तुझ्या लाईफस्टाईल मुळे स्वप्नांमुळे कमीत कमी चांगल्या माणसाच्या आयुष्याचा सत्यानाश नाही होणार. तो झाला तर आम्ही भरूनही देऊ शकणार नाही. तुझ्या बाबांनी तुला एवढंच सांगितलं असेल की , यायचं तर तू तुझ्या नवऱ्यासोबतच यायचं. पण आता तसे नाही. मी सांगते, यायचं तुझ्या बाळाला घेऊनच यायचं इथे सुपेश सोबत नाहीतर बिलकुल यायचं नाही. तुझा तो सगळा देखावा होता पण तुझा तापट स्वभाव होता तुला शांत मुलगा शोधून दिला, कमाई करणार शोधून दिला, अजून काय हवय ग तुला. तुझे जे स्वप्न पाहते ना ती तुझ्या आवाक्या बाहेरच्या आहेत, होतील पूर्ण, स्वप्न आहेत ना आज ना उद्या होतील, जर तूही सुपेशला साथ दिली तर तेही तुला साथ देतील. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू त्याच्या लायकीची नाहीये.....
तुला जर लग्न मोडायला काही मदत पाहिजे असेल तर सांग उद्या तुझ्या बाबाला पाठवते आणि कायमचा तुला त्यांच्यापासून दूर करते. मला वाटले एवढे दिवसात तर काहीतरी तुझ्यात बदल झाला असेल, पण तु सुधारणार नाही, आम्ही मरेपर्यंत हे सुधारणार नाहीस. पहा तुला काय करायचे आहे ते आणि सांग आम्हाला. आणि काही करण्याआधी आमच्या नाहीतर त्या तुझ्या सोबत राहणाऱ्या भल्या माणसाच्या मनाची अवस्था समजून घेण्याचा थोडातरी प्रयत्न कर म्हणजे खूप होईल.
मी तुझ्या बाबाची समजुंत काढायला निघाली होती पण तु पटवून दिलं मला की त्यांची काही चुकी नाही........
बस झाले आई किती गोडवे गायचे आता जावयाचे, तुम्ही मुली पेक्षा जावयाला का जास्त महत्त्व देत आहे हेच मला समजत नाही. त्यांनी अशी कोणती जादु केली आहे तुमच्यावर देवजाने..... वृषाली ठसक्यात बोलली..

हे जर तुला समजले असते तर आज लग्नाच्या एवढ्या दिवसानंतर तुझी समजूत काढण्याची गरज पडली नसती.....
वृषालीच्या आई म्हणजे ज्योतीताई रागात बोलल्या...
पुरे आता जावई प्रवचन. तुम्हा दोघांचे म्हणणे तरी काय आहे. एवढेच न की मी सुपेश सोबत सुखात राहो. त्यांना कसला ही माझ्यापासून त्रास होता कामा नये, एवढेच न की अजून काही आहे.......
हे बघ बेटा तुला मी जन्म दिला आहे. आम्ही लहानच मोठ केलं आहे तुला. आमचा जीवतला जीव तुझ्यात आहे. आमची प्राथमिकता तुच आहेस. पण तु अशी बेजबाबदार वागशील तर आम्हाला अशे पाऊल उचलावे लागणारच.....
तुझी कुठेही दिशाभूल होऊ नये आणि तुझे जिवन आनंदात, सुखात जावो एवढीच अपेक्षा आहे आमची......
ठीक आहे आई मी सुपेशला नाही सोडणार. आता तर तुमच्या मनासारखे होईल न. सांग असे बाबांनाही.......
