मैत्रिणी सोबत पार्टी करून ती आनंद साजर करत होती.पण मैत्रिणीच्या बोलण्याचा तिला राग आला होता. त्याच्या बोलण्याने तिच्या अहंकाराला ठेस लागण्यासारखं झालं होतं. घरी सुपेश तीची वाट पाहतच होता. त्याला पाहतच वृषालीला त्याच्या कालचे बोलणे आठवले. तू कुठेही जा पण एक मेसेज करत जा. तिने आजही त्याच्या शब्दाला महत्त्व दिले नाही.
सॉरी काल तुम्ही सांगितले पण माझ्या लक्षातच नाही राहिलं. तुम्हाला मेसेज करायला की माझ्या मैत्रिणी सोबत पार्टी करत होती म्हणून सॉरी
काही हरकत नाही. तुला आठवण आहे मी काहीतरी म्हटलं हेही खूप झाले. आणि विशेष म्हणजे तुला ते पटलं हे महत्त्वाचं आहे. सुपेशने समजूतदारपणा दाखवत उत्तर दिले....
वृषाली आत मध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर येते चहा घेणार तुम्ही मी करत आहे माझ्यासाठी....
ठीक आहे तू करतच आहे तुझ्यासाठी तर मग मी ही घेतो. आपण आज मंदिरात जाणार होतो, आता चालायचं का नाही वृषालीला त्याने विचारले.
जायचं आहे ना थोड्या वेळानंतर आधी चहा बनवते. काहीतरी खायला करते आणि नंतर जाऊन येऊ. चालेल ना तुम्हाला.....
सुपेश हो मला काही हरकत नाही. जाऊया की तुझ्या वेळेनुसार मी लवकर आलो होतो बाहेर जाण्यासाठी तुला उशीर झाला यायला........
हो सॉरी लक्षातच नाही राहिलं. आलीस मी चहा घेऊन...........
ठीक आहे.......
थोड्या वेळानंतर वृषाली चहा घेऊन आली आणि आरामात सोबत बसून दोघांनी चहा घेतला.........
तुम्ही तोपर्यंत टीव्ही वगैरे बघा मी जेवणाची तयारी करून घेते नंतर आपण मंदिरात जाऊ.......
रुपेश त्यापेक्षा आपण आधी मंदिरात जाऊन येऊ नंतर दोघं मिळून जेवनाची तयारी करू. कामही लवकर होतील आणि तुला मदती होईल.........
वृषाली ठीक आहे, मी तयारी करून येतेच मंदिरात जाण्यासाठी........
वृषाली मंदिरात जाण्यासाठी तयारी करून हातात पूजेचे ताट घेऊन येते. तिला पाहता आश्चर्याने पाहू दंग होतो कारण त्याने तिला कधी अशी हातात पूजेचे ताट घेऊन मंदिरात जाताना पाहिले नव्हते....
चालायचे, अहो चला की काय बघत आहात......... वृषाली लटकेत बोलली....
सुपेश, ह.... हो चला की, दोघेही निघाले मंदिरात जाण्यासाठी एक सांगु जर तुला राग येणार नाही तर........
वृषाली सांगा, त्यात राग येण्यासारखे काय आहे. तुम्ही माझ्याशी मनसोक्त बोलू शकता मी बोलण्यावर बंधन घातलेले नाहीये....
सुपेश खूप सुंदर दिसत आहेस, तू पण का कुणास ठाऊक माझ्या नशिबात तुझं प्रेम नाहीये मी का आवडत नाहीये तुला.
वृषाली आज माझं मूळ खूप छान आहे प्लीज असं बोलून मला दुःखी करू नका....
मी बोलण्याची परवानगी काढली होती ती यासाठीच.......
आज असे काय झाले की तुझं मूड खूप छान आहे आणि तू मला आत्ता सांगतेस.......
आज असे काय झाले की तुझं मूड खूप छान आहे आणि तू मला आत्ता सांगतेस.......
गोष्ट सांगायचीच आहे पण जेवण करतेवेळी सांगायचं ठरवलं होतं मी म्हणून नाही बोलले...
काय सांगायचे आहे आता सांगितले तरीही चालेल जेवायच्या वेळेस मला नाही आवडली त्यामुळे माझे जेवण अपूर्ण राहिले तर.....
असं नाही होणार एवढी वाईट बातमी नाहीये. मी चांगली बातमी असं सांगितलं त्यामुळे जेवणाचा या गोष्टीचा काय संबंध......
पण माझ्यासाठी जे चांगले आहे तेच तुझ्यासाठी चांगले आहे असे थोडी होते.
Hmmm, असू शकते.......
तेही बरोबर आहे म्हणा ठीक आहे. सांग मग काय झाले आज असे तुला फार आनंद झालाय त्याचा........
मी आज माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती.
हो माहितीये मला, रोज जाते ना तू मग आज काय त्यात नवीन.........
मधेच काय बोलताय, ऐकून घ्या पूर्ण मी काय सांगत आहे ते......
ठीक आहे सॉरी सांग काय सांगायचं आहे तुला......
मी माझ्यासाठी जॉब शोधला उद्यापासून मीही ऑफिसमध्ये जायचं ठरवलं. जेणेकरून माझा खर्च मी करू शकते तुमच्यावर ओझ राहता कामा नये.......
ओझं कसलं त्यात मी कधी म्हटले की तु जड होते मला. मी खर्चासाठी कधी किचकित केले. मी फक्त एक वेळा बोललो होतो पैशाची कमतरता आहे. त्यामुळे आपण दुसरे घर उशिरा घेऊ त्याशिवाय काही म्हटलेलं आहे का?
नाही तुम्ही म्हटले तर नाही, पण मला कसतरी होते माझ्याच मनात त्याची खंत निर्माण होते. की मी तुमच्यावर विनाकारण ओझ बनवून राहत आहे. म्हणून मी माझ्यासाठी जॉब शोधलाय. त्यासाठी मी नवीन मैत्रिणी बनवल्या आणि त्यांचे सोबत टाईमपास करत होती. आता मैत्रिणी सोबत मला एक ऑफिस आणि तिचा ऑफिसमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉबही मिळालेली आहे. त्यामुळे तुमच्यावरचे बरेचशी जबाबदारी कमी होणार आहे...
अरे हो मीच विसरलो होतो आपले लग्न नाही तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेले आहे. मी तुझी जबाबदारी सांभाळणे म्हणजे तुला माझ्या जीवनासोबत गुंतून ठेवणे होईल. तुला बंधनात अडकुन राहायला आवडत नाही.
Any way, congratulation तुला तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला मार्ग मोकळा झाला त्याबद्दल अभिनंदन.
हो, आता सहा महिने झाले आपण एकत्र राहत आहोत. अजून किती दिवस असे चालायचं. मला ही काहीतरी करावेच लागेल न माझ्या भविष्यासाठी....
त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्यामुळे तुम्ही अडकुन पडले आहात. तुम्हालाही आयुष्य आहेत, तुमचेही जी स्वप्न आहेत ते किती दिवस अस तात्काळत ठेवायचे.......
होईल तितक्या लवकर यातून तुमची सुटका करायचे मी ठरवले आहेत....
होईल तितक्या लवकर यातून तुमची सुटका करायचे मी ठरवले आहेत....
हो बरोबर आहे तुझे, विनाकारण अडकून राहण्यात काय अर्थ आहे, असो तुला जॉब मिळाला त्याबद्दल अभिनंदन आणि माझ्या पार्टी चे काय? मला नाही मिळणार का पार्टी मी मित्र नसेल पण शत्रू ही नाही तुझा..........
देईल की तुम्हालाही पार्टी पण त्यासाठी एक महिना थांबव लागेल.......
बापरे एवढी मोठी पार्टी देणार का? की त्याच्या नियोजनासाठी महिनाभर मला वाट पहावी लागेल.......
नाही तसे नाही, पण आता पार्टी द्यायचे म्हटलं तर घरातील जेवणा शिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. आणि महिनाभर थांबले तर पहिले पेमेंट मिळाले की बाहेर फिरायला जायचे नि पार्टी करायचे ठरवले होते....
आता ती तुमची इच्छा तुम्हाला कशी पार्टी पाहिजे ते सांगा......
सुपेश थोडा वेळ विचार करून एक काम करू आज घरच्या जेवणावर सेलिब्रेशन करू. महिनाभराने परत करू तुला द्यायची आहे तशा प्रकरची पार्टी तु देशील. जर त्यावेळी तुझी इच्छा असेल........
वृषाली लगेच बोलली, काही हरकत नाही जशी आपली आज्ञा सरकार ......
चला मग झाले का देवबाप्पा चे दर्शन.
हो झाले की.......
चालायचे का मग आता की थोडा वेळ थांबायचे........
नाही, जाऊया आपण परत येऊ आणखी कधीतरी निवांत गप्पा मारायला देवबाप्पासोबत.......वृषाली हसत बोलली.....
लगेच दोघेही घरी परत आले. पण सुपेश ला बिलकुल घरी येण्याची घाई नव्हती. त्याला वृषाली सोबत असच चालत आणि बोलत राहावंसं वाटतं होते. पण त्याच्याजवळ दुसरा पर्याय ही नव्हता. तिच्या परवानगीशिवाय तो काही करूही शकत नव्हता......
दोघांनी घरात प्रवेश केला......
बसा तुम्ही मी पाणी आणते.वृषाली बोलत किचनकडे निघाली.....
सुपेश नको राहू दे मीच येतो तिकडे आधी जरा फ्रेश होऊन घेतो नंतर आलोच......
तु कर तुझी कामं, मी आलोच........
सुपेश जरा अस्वस्थच वाटत होता. त्याला भीती वाटायला लागली होती. त्याच्या जीवनात वृषाली त्याची पत्नी म्हणून आली, तीने कायम पत्नी म्हणून राहावे, अशी त्याची मनोमन इच्छा होती पण ती या लग्नापासून दूर जाण्याच्या तयारीला लागली होती. त्याचे स्वप्न परत एकदा भंग होणार होते.......
फ्रेश होण्यापेक्षा एकांतात मन हलके करणे गरजेचे होते.......
फ्रेश होण्यापेक्षा एकांतात मन हलके करणे गरजेचे होते.......

