अन दादा मला वाटतं लग्नला नकार दिला असता तर त्यात काही बदनामी झाली असती आणि आपला अपमान झाला असता. त्यावेळी झालेल्या बदनामीमुळे कदाचित आई बाबा मानसिक ताणामुळे खचले असते. एवढे दिवस आम्ही सोबत राहलो ना आता कदाचित विभक्त झालं तर ती मुलगी माझ्या लायकीची नव्हतीच असं समजून तेही तिला विसरतील आणि कदाचित मीही त्यावेळी सहन करू शकत नव्हतो. प्रकरण वेगळं असतं आणि मला कुठे माहित होतं हिचा स्वभाव एवढा चिडचिडा आणि भांडखोर आहे म्हणून ती मिळाली त्यावेळी कधी तिचा रागीट चेहरा माझ्या समोर आला नाही.
आता जे झाले ते झाले, त्याच्यावर काही चर्चा करून उपयोग नाही आता पुढे काय करायचं ते ठरवावे लागेल तु एखाद्या वेळेस मामाला फोन करून सर्व हकीकत सांगून दे म्हणजे वेळेवर काही गरज पडली तर त्यांना फोन करून बोलावता येईल. सध्या मला ऑफिसचा जास्त काम आहे वेळ काढून मामाकडे जाऊ शकणार नाही. सविस्तर फोनवर बोलूही शकणार नाही...
आता जे झाले ते झाले, त्याच्यावर काही चर्चा करून उपयोग नाही आता पुढे काय करायचं ते ठरवावे लागेल तु एखाद्या वेळेस मामाला फोन करून सर्व हकीकत सांगून दे म्हणजे वेळेवर काही गरज पडली तर त्यांना फोन करून बोलावता येईल. सध्या मला ऑफिसचा जास्त काम आहे वेळ काढून मामाकडे जाऊ शकणार नाही. सविस्तर फोनवर बोलूही शकणार नाही...
ठीक आहे सुपेश मामाला कळवतो पण तू तर भाड्याचं घर घेऊन कसं राहणार घर खर्च आहे त्यात खर्चात घर भाडे देणे खूप जास्त ताण येऊ शकते तुझ्या पॉकिटवर आणि तुझ्यावर ही.......
काळजी नाही दादा कारण घर ऑफिस कडून मिळणार आहे जोपर्यंत मला दुसरा नवीन घर मिळत नाही तोपर्यंत मी तिथे राहू शकतो बाकी खर्च मी हाताळण्याचा प्रयत्न करतो.
जशी तुझी इच्छा सुपेश सांभाळून जा आणि गरज वाटल्यास मला फोन कर जा.......
ठीक आहे दादा आणि आई बाबाला फार सांगू नको आणखी त्यांना त्रास होईल त्यात ते दोघे लांब राहतात तिकडे.
त्यांची काळजी नको करू तू वेळेवर फोन उचलत जा म्हणजे नाही उचलला तर त्यांना टेन्शन येते.......
ठीक आहे दादा आता येतो मी. ऑफिसलाही जायचं आहे......
ठीक आहे सांभाळून जा By.....
सुपेश ऑफिस मध्ये जातो. सर ही फाईल एक वेळेस तपासून घेता का.......
हो बर झालं तु आणलीस मी मागवणारच होतो. अजून वेळेवर धांदल उडायला नको........
सर ते तुम्ही आज चाबी आणणार होता......
Sorry, मी विसरलोच आणली पण द्यायचे विसरलो. हे घे चाबी आणि आधी बघून घे तु नंतर तुझ्या वृषालीला दाखवशील. म्हणजे परत तुझा व्याप नको वाढायला, म्हणून सांगतो बर का.......
Yes sir, dont worry.....
ऑफिस मधून काम पूर्ण करून सुपेश लवकर ऑफिस बाहेर पडतो आणि तो घर पाहायला निघून जातो. छोटसं सुंदर घर बांधलेले आहे आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला छानसा बगीचा आणि एक छोटी विहीर होती. सुपेश ला आवडला पण वृषालीला आवडणे महत्त्वाचे होते कारण तिला जर तो पसंत पडला नाही तर परत पुढे त्याला त्रास होणार होता. आत मध्ये जाऊन सुपेशने पूर्ण रूम वगैरे चेक केले आणि तो परत लावून वृषालीकडे घरी गेला तिथे त्यांनी तिला सविस्तर सांगितले. दोन रूम,हॉल, किचन, बाथरुम वगैरे आहे. बऱ्याच ठिकाणी थोड थोड काम करावं लागेल. बाकी मला ok वाटले...
हे आहे ते घर जिथं आपण रहायला येणार आहोत. तु पाहून पसंत कर म्हणजे झाले. कस वाटल तुला. इथे राहायला आवडेल की नाही तुला........
तिथल्यापेक्षा ठीक आहे शांत आहे एकांत आहे. चालेल छान आहे आपण इथेच राहू तुला काही प्रॉब्लेम नाही ना इथे राहायला मला तर नाही........
छे छे मला काय असणार आहे तुला नाही म्हणजे मला नाही. ठीक आहे मग फिक्स आपण इथे येऊ एक दोन दिवसात इथे सामान घेऊन येऊ. एक-दोन दिवसात याची स्वच्छता काढून घेऊ,व्यवस्थित करून घेतो सगळ बाहेरून आणि आत मध्ये ही म्हणजे नंतर त्रास नको व्हायला......
हो कारण खूप दिवसापासून बंद असल्यासारखं वाटते. स्वच्छता आधी करून घ्यावी लागेल.
चला मग वृषाली मॅडम आता तिकडेही पॅकिंग करावे लागेल
हो चला.... वृषाली आनंदात हो बोलली....
हो चला.... वृषाली आनंदात हो बोलली....
सुपेशला वृषालीचा स्वभाव समजत नव्हता ती कधी एकदम रागावून त्याला जिवंत ठेव की गिळून टाकु असे करत होती. आणि कधी कधी एवढी आनंदी होऊन वाहते त्याच्यासोबत जणु काही त्यांचं जन्मोजन्मीचं नातं आहे. पण तो विचारात बिचारा तिच्या प्रेमात एवढा वेडा होता का तिच्याकडून तो नेहमी प्रेमाची अपेक्षा करत होता आज ना उद्या अपेक्षा पूर्ण होईल याच भ्रमात वावरत होता.......
रुपेश पासून दूर जाऊन एकांतात राहण्याचा आनंद वृषाली साठी फार मोठा होता. ती आनंदात विसरले किती सुपेशला पसंत करत नाही. ती त्याच्यासोबत प्रेमाने राहत होती. त्याच्या खाण्यापासून ते ऑफिसमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारी मध्ये ती लक्ष देत होती मग त्याच्यासाठी टिफीन करेपर्यंत.....
भोळा सुपेश हा तिच्या रागाकडे आणि रोजच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करून तिच्या या प्रेमळ स्वभावात गुंतत होता. पण मनातून तिच्याशी बोलण्यास आणि तिच्या जवळ जाण्याची त्याला नेहमी भीती वाटत होती.......
सुपेशने ऑफिस मधून दोन दिवसाची सुट्टी काढली आणि तो नवीन जागेची साफसफाई करण्यासाठी एक व्यक्ती सोबत घेऊन निघून गेला. सगळी स्वच्छता झाल्यानंतर त्याने इकडचे सामान तिकडे शिफ्ट केले.
वृषाली ही मदत करेल ना म्हणून तीही सोबत आली कोणती वस्तू, सामान कुठे ठेवायचं हे सांगत होती आणि काही किचनची सामान ती स्वतः तिच्या हाताने लावत होती.......
सर्व घर मी माझ्या आवडीने सजवेल. नाही कोणालाही यामध्ये हस्तक्षेप करू देणार आणि मला काहीतरी नवीन साहित्य विकत आणायचे आहे तुम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत ते मला आणून द्या.
हो देईल आणून....
सुपेश ला माहीत होते इथे नाही म्हणण्याचा काही उपयोग नाही उलट वाद निर्माण होईल त्यातही त्यालाच हार मानावी लागेल.......
सुपेश ला माहीत होते इथे नाही म्हणण्याचा काही उपयोग नाही उलट वाद निर्माण होईल त्यातही त्यालाच हार मानावी लागेल.......
दोघांनी मिळून किती मस्त घर सजवले ते आणखी थोडं सामान आणलं की खूप छान दिसेल. तुम्ही नेहमी माझ्यासोबत भांडतच राहता. असं शांततेत राहिला की कसं मस्त वाटतं.......
सुपेश हो तुझे म्हणणे बरोबर आहे शांततेत दोघांमध्ये काम चांगले होतात, फक्त काम चांगले होतात. तो बिचारा विचार करू लागला की मी कधी भांडत असतो नि कशासाठी
वृषालीला नेमकं सुपेसला काय म्हणायचे होते, हे समजलं नाही पण ती स्माईल करून किचनमध्ये निघून गेली......
सुपेशने बाहेर गार्डनची साफसफाई केली आणि आणखी काही फुलझाडे,फळझाडे त्याच्यामध्ये लावली सर्व झाडांना पाणी देऊन त्याने व्यवस्थितपणा तिथे निर्माण केला.......
दोघांनी मिळून सर्व कामे केले आणि सर्व साहित्य व्यवस्थित लावून संध्याकाळी सोबत जेवण केले दिवसभरात एकदाही त्यांच्यात वादविवाद झाला नाही हे महत्त्वाचे.
ऑफिसमधून काढलेली दोन दिवसाची सुट्टी अशीच घराच्या सफाई मध्ये निघून गेली. आता मला उद्या ऑफिसमध्ये जावं लागेल. तुला इथं बोअर होणार आता दिवसभर एकटीला.
नाही त्याची काळजी तुम्ही नका करू दिवसभरात मी काहीतरी व्यवस्था करेल माझ्या मनोरंजनाची. तसेही उद्या मला यातली काम पुरणार आहेत म्हणजे उद्याचा दिवस याच कामात निघून जाईल. त्यामुळे मनोरंजन करण्याला वेळ नाही मिळणार आणि संध्याकाळी तुम्ही परत येताच ऑफिस मधून वैशालीने स्पष्टीकरण दिले......
हो तेही बरोबर आहे. उद्या दिवस तुला हेच काम पुरणार आहेत. संध्याकाळपर्यंत मी येतोच येताना काही आणायचे आहे का तिकडून.......
मार्केटमधून ताजा भाजीपाला आणला तर चालेल असं मला वाटतं.......
ठीक आहे येताना काहीतरी घेऊन येईल.........
ऑफिसमध्ये पोहोचल्यवर सुपेश केबिन मध्ये जातो. थँक्यू सर तुम्ही मला तुमचं घर काही दिवसांसाठी राहायला दिले...
काही हरकत नाही, तसही ते रिकामेच होते तुझ्या उपयोगात आले म्हणजे त्या जागेचा टीपटॉपपना ही राहील. कसं वाटलं घर वृषालीला आवडले की नाही. फार मोठे नाहीये साधारण आहे कधीतरी मला जाऊ असं वाटलं म्हणून ते घेऊन ठेवले. आज ते तुझ्या कामात आले मला चांगले वाटत आहे....
सुपेश छान आहे घर तिलाही आवडलं पण तिच्या हाताने सजवले तिने ते घर. तिकडंच वातावरण प्रसन्न आहे.........
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
