Login

विवाह करार 14

लग्नानंतर दोघांमध्ये होऊ लागले भांडणे. वृषालीला समजावण्याचा प्रयत्न केला वडिलांनी
वृषालीला एकदम राग आला, ती म्हणाली तुम्हाला काय म्हणायचं हे सगळं माझ्यामुळे होते. मी तुम्हाला म्हटले नाही लग्न करा. मी तुम्हाला डायरेक्ट बोललो ते मला तुमच्याशी लग्न करायचे नाही. हा पर्याय तुम्ही शोधून काढला, तुम्ही मला या घरात आणली, तुम्ही एक वर्षाचा कालावधी घेतला, त्यामुळे काही झालंतर तुम्ही मला दोष देत बसू नका यात माझी काहीही चुकी नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना स्पष्ट सांगायला पाहिजे होतं तेच की तुम्हाला हे लग्न करायचं नाही आहे.

हे बघ वृषाली मी तुला काहीही म्हणत नाहीये तुला दोष देत नाहीये.  तू मला विचारले म्हणून मी नुसत सांगितले,  मी का उठून गेलो तिथून बाकी मी काहीही बोललेलो नाहीये.

एवढा नेहमी त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही एकदाच मला लवकर मोकळी करा आणि तुम्हीही मोकळे म्हणजे तुम्हाला दुसरे लग्न करून तुमचं एकत्र कुटुंब ठेवण्यास मदत होईल आणि मी सुटेल.

आणलेत मी पेपर ड्रॉवर मध्ये ठेवले वाचून घे एकदा नंतर सिग्नेचर करशील मी संध्याकाळी करेल.

खूप खूप उपकार झाले तुमचे तुम्ही बोलले त्याप्रमाणे कागदपत्र तयार केले धन्यवाद.

काही दिवसांनी रुपेश ची ट्रान्सफर झाली आणि तो बाहेरगाव प्लांट वेगळा प्लॉट विकत घेऊन राहिले लागला आणि इकडे सुपेश आणि  वृषाली आणि आणि सुपेशचे आई वडील असे चौघे जण राहू लागले. हळूहळू वृषाली च्या स्वभावात बदल होऊ लागला ती चिडचिड करायला लागली. घरात साध्या साध्या गोष्टीवरून भांडायला लागली रोजची कटकट म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला वेगळे राहण्याचा सल्ला दिला.

म्हणून सूपेश फ्लॅट मोठा असल्यामुळे दोघेही तिथे राहायला गेले आणि  तिथे ते वेगवेगळे राहू लागले.

रुपेशचा संसार चांगला सुरू होता आणि त्यांच्या घरात एक नवीन लहान पाहून बाळ  येणार होता. त्यामुळे वातावरण हे आनंदाचे होते. शेजारी आणि घरचे. रुपेश च्या बायकोची नेहमी चांगली काळजी घेत होते. तिचे तोंड भरून कौतुक करत होते. शेजारी रुपेशच्या बायको सोबत वृषालीला ही म्हणत होत्या तुम्ही कधी देणार आनंदाची बातमी. लवकरात लवकर तुमच्या घरात एक पाळणा हलवा अशा प्रकारचे वेगवेगळे भाष्य करत होती. त्यामुळे वृषाली वैतागली आणि ती वृषाली यावरून सुपेशसोबत भांडण करू लागली.

हे बघा सुपेश मला इथ अजिबात राहायचे नाही. त्यांच्या आयुष्यातील घडत आहे किंवा घडेल ते सगळे माझ्या आयुष्यात घडाव अशी अपेक्षा करू नका त्यांच्यामुळे आपल्याच रोज भांडण होतात त्यांच्या शेजारी राहण्यापेक्षा परक्या लोकांमध्ये जाऊन राहणं कधीही वेगळं मला इथ राहायचं नाही मला पाहिजे.

अग पण वृषाली एवढ्या लवकर दुसरा प्लॉट कसा काय मिळणार. आणि सध्या माझ्याकडे पैसे ही नाहीत. एखादा महिना काढू आपण इथे तोपर्यंत काहीतरी मार्ग काढतो मी....

वृषाली ते शक्य नाही मला इथे राहायचं नाही म्हणजे नाही मी इथे राहणार नाही.

अरे मामाजी तुम्ही याना अंदर या की.........

वृषाली अरे बाबा तुम्ही अशे, म्हणजे अचानक आलात  कसे काय आलात काही फोन नाही, निरोप नाही सांगायचं होतं आज येणार आहे म्हणून........

मी आधी सांगितलं असतं तर तुझं हे स्वरूप मला पाहायला मिळालं नसतं. कारण या घरात कोणीही मला तू कशी वागते हे कदाचित सांगितलं नसतं. आता मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यामुळे मला वाटत आहे की माझी शिकवण तू सगळी विसरली आहेस माहेरी शिकवन तुला कदाचित काहीही लक्षात नाही म्हणून तू अशी मूर्खा सारखे वागत आहेस. काय चुकलं का आमचं? हा तुझं लग्न करून दिल म्हणून का  लाडात लहानच मोठं केलं म्हणून असा अपमान करतेस तू आमचा? 

बाबा असं कसं बोलता तुम्ही मी काय केलं. तुम्ही काय झाल तुम्हाला काही माहीत नाही. तुम्ही आत्ताच आले डायरेक्ट मला बोलत आहे. चुकी माझीच कशावरून असेल.

तुझी चुकी आहे बेटा.  तुला फक्त त्यांच्या शेजारी राहायचं नाही, याच्यावरून कोणाची चुकी आहे सरळ सरळ समजते.
आणि एक गोष्ट लक्षात घे तुला वाटत असेल की नेहमी नेहमी भांडून तु  इथून डायव्हार्स घेऊन कायमची माहेरी येशील तर चुकीचा विचार करते आहेस तु. हे भलते  तुझ्या डोक्यात असेल तर माहेरी यायचं नाही तुज्यासाठी  माहेरचे दरवाजे कायमचे बंद आहे. तु जोपर्यंत या घराची सून आहेस तोपर्यंतच माझी मुलगी आहेस.......

बाबा तुम्ही काय बोलताय, तुम्ही माझे बाबा  आहात की त्यांचे. तुम्ही माझी बाजू घ्यायला पाहिजे तुम्ही त्यांना सपोर्ट करत आहात.

मला माहित आहे मी कोणाला आणि का सपोर्ट करत आहे तुला हे लग्न आधीपासूनच मान्य नव्हते. तु फक्त देखावा केलास  लग्न मान्य करायचा आणि आता मोडण्यास निघाली. तुला काय वाटतं मला काही समजत नाही तू खुशीनाम हे लग्न मोडू शकतेस पण परत माझ्या दारात पाय ठेवु नकोस.
अहो पण बाबा मी काय केले असं का बोलताय तुम्ही. वृषाली केविलवाणा चेहरा करून बाबाला विचारात होती......

हे पहा तुझं तू काय करायचं ते पाहून घे माहेरहून कोणीही येणार नाही जोपर्यंत तू इथे व्यवस्थित राहत नाहीस तोपर्यंत.


सुपेश एकदम मधात बोलला मामाजी असं काय करताय, शांत व्हा आधी तुम्ही समजत तसे काहीही नाही. थांबा तुम्ही चहा वगैरे जेवण  करून जा. मी सगळ व्यवस्थित सांगतो तुम्हाला यात वृषालीची काहीही एक चूक नाही. माझ्या मूर्खपणामुळे हे सगळं झालंय मी तुमची माफी मागतो तुम्ही रागावून जाऊ नका माझ्यासाठी तरी थोडा वेळ थांबा.

आता ते शक्य नाही मला इथे एक मिनिट ही थांबणं शक्य नाही. मला उशीर होतोय मी चाललो. रामराम.

वृषाली चे बाबा रागात निघून गेले.....

परत  वृषाली सुपेशवर भडकली हे सगळं तुमच्यामुळे झाल तुम्हीच एका शब्दात ऐकलं असतं  तर हे सगळं बाबाच्या कानापर्यंत पोहोचल नसतं आणि  ते असे  रागात निघून गेले नसते.
    आता तुमचं समाधान झालं असेल ना पण ही गोष्ट लक्षात ठेवा मी इथं राहणार नाही आणि मला वाटेल त्या दिवशी मी हे घर सोडून निघून जाईल कायमची. हे नका समजू की बाबांनी मला  इकडे येऊ नको म्हटले म्हणून मी तुमच्यासोबत आयुष्य काढेल. ते कधीही शक्य होणार नाही. काय हो तुम्ही तर बोलले माझ्यासाठी वाटेल ते करणार, माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार होते तुम्ही काय झालं त्या शब्दांचा सांगा. एक प्लॉट ही तुम्ही माझ्यासाठी घेऊ शकत नाही....

चुकीचं समजत आहे एक प्लॉट म्हणजे साधी गोष्ट आहे का?  माझ्याकडे एवढे सध्या पैसे नाहीत म्हणून मी बोललो आणि तु रागावून जोरात बोलले आणि तुझ्या बाबांनी  ऐकले आणि त्यांना संशय आला यात माझी काय चुकी, उगाच आता मला दोष देत बसू नको. आधीच मला उशीर झाला मला ऑफिसला जायचंय आहे By.......

हो तु दिवसभर ऑफिसमध्ये थांब आणि मी मूर्खासारखे एकटी बसून राहते. मला शॉपिंगला जायचे आहे पाहिजे मी बाहेर जाते

अग पण दोन दिवसा आधीच तर तू शॉपिंग करून आली आता काय आणायचा आहे तुला आणखी आणि मी तुला आता सांगितलं माझ्याकडे साठी पैसे नाही आहेत थोडेफार आहे ते खजूर बसले काही काम पडले तर काय करायचं

ते तू तुझं पाहून घे मला पाहिजे म्हणजे पाहिजेत.....

उद्या देतो आता नाही येत माझ्याकडे....

सुपेश ऑफिसमध्ये निघून गेला वृषाली तिचे घर काम पूर्ण करून टीव्ही पाहत होती......

हे काय सुपेश तुझे सध्या ऑफिसच्या कामांमध्ये  लक्ष दिसत नाही. किती चुका आहेत. तुझ्या कामांमध्ये आधी तर असं होत नव्हतं आता काही प्रॉब्लेम आहे का?  तुझं लक्ष नाही कामांमध्ये. या सगळ्या फाईलस ने आणि परत चेक करायचे चूका आहे ते व्यवस्थित करून परत पाठव आणि हे नेहमी नेहमी चालणार नाही काही प्रॉब्लेम असेल तर क्लिअर करून घे नंतर ऑफिस जॉईन कर सुट्टी घे काही दिवसांची.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →