Login

विवाह करार -13

वृषाली च्या होकारानंतर लग्न पार पडले.
आता वृषाली चे सगळे प्रयत्न फेल गेले आणि तिला नाईलाजाणे लग्नास तयार व्हावे लागले. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज च पण करावे लागेल. असं केल्यामुळे वृषालीचें जर मन परिवर्तन झाले  आणि एका वर्षाने ती कायमची त्याची बायको म्हणून त्याच्या जीवनात त्याची अर्धांगीनी म्हणून सहवास करेल याची सुपेश ला अपेक्षा वाटत होती.

या उलट एका वर्षानंतर आपण लग्नाच्या या बेडीतून कायमचे मुक्त होऊन हवे तसे आयुष्य जगण्यास मोकळ होऊ.

दोघांनी आपापलली इच्छा मनात ठेवून लग्न करण्यास तयारी दर्शविली आणि लग्नाचा दिवस उगवला सर्वीकडे  कामाची धावपळ सुरू झाली, फुलांच्या माळा बनवत होते, कुणी फुलांनी घर सजवत होते. कोणी रांगोळी काढण्यात  व्यस्त होते, कोणी पूजेचे साहित्य आणण्यास व्यस्त होते सगळे आपापल्या कामत मग्न झाले .

नाही नाही म्हणताना नवरदेव - नवरी सजली आणि मंडप पाहुण्यांनी सजला.  दोघांनी पारंपरिक मराठी वस्त्र परिधान केले होते. वृषालीने  नऊवारी साडी तर रुपेशने धोतर पगडी चा वापर केला.  वृषालीही नऊवारी साडी मराठी मध्ये राजकुमारी वाटत होती. नऊवारी साडी त्यावर गडाभर नेकलेस कानात टोंगल, डोक्यावर चंद्राची कोर, ओठावर हलकी लिपस्टीक, पायात पैजन, केसांचा  बांधलेला अंबाडा, त्यावर मोगऱ्याचा मोहक गजरा आधीच नाजूक असणारी वृषाली आज अधिकच मनमोहक दिसत होती कोणाचीही दृष्ट लागावी इतकी सुंदर ते दिसत होती. तसेच पारंपारीक कपड्यांमध्ये सुपेश ही खूप देखणा वाटत होता.



  थोड्याच वेळात सप्तपदी सुरू झाली. सप्तपदी संपल्यावर जाणाऱ्यांची जेवणाची घाई आणि इकडे मंडपात वधू-वरास फेरे घेण्यास उभे करण्यात आले त्यानंतर आंतरपाठ घेऊन विवाह करण्यात आला या सगळ्यांमध्ये संध्याकाळ झाली. फोटोशूट वगैरे सर्व कारण पाठवल्यानंतर नववीचा विदाईची वेळ आली विदाई च्या वेळेस वृषाली आणि बाकी मंडळी ही नवरीला सार करण्यास सज्ज झाले होते.  काय परिस्थिती येते मुलीच्या आई वडिलांवर एवढ्या लाडात वाढवलेले पोर दुसऱ्याच्या स्वाधीन करावी लागत आहे.
कसे स्वप्न असते न आई वडिलांचे मुलगी लाडात लहानाची मोठी करायची कशासाठी तर एक दिवस ती मोठी होऊन दुसऱ्याचे घर चांगल्या पद्धतीने सांभाळेल आणि त्या घरातील लोकांना आपलंसं करून त्यांच्यासोबत जीवनभर विश्वासाने साथ देईल.


वेळ आली पाठवणीची
दाटलेल्या अश्रूंना वाट ती देण्याची
अश्रूंनी सजले सगळे चेहरे
बदलला मंडपाचा नजारा
सुकुनि गेला तो मोहक
मोगऱ्याचा फुललेला गजरा



पाठवणी नंतर वेळ होती ती सासरी स्वागताची. नव वधूचे स्वागत आहे तेही थाटात व्हायला पाहिजे. सूपेशच्या घरी ही स्वागताची तयारी झाली. दारात मोठी सुबक  रांगोळी काढण्यात आली, दारापासून देव घरापर्यंत फुलांनी पाऊलवाट सजवण्यात आली.  उंबरठयावर तांदुळाचे माप ठेवण्यात आले ते ओलांडून गृहप्रवेश करावा लागत होता. त्याच्यापुढे एक कुंकवाची प्लेट ठेवण्यात आली त्यामध्ये पाय बुडवून  तिला देव घरापर्यंत  लक्ष्मीपावलांनी चालत जायचे होते. शिवाय आजूबाजूला दोन मुली उभ्या करण्यात आल्या वधू वरच्या  डोक्यावर फुल पाकळ्याची उधळण करण्यासाठी.सगळं झाल्यानंतर वधु वराचे खेळ खेळण्याची वेळ आली. या खेळात वृषालीला काहीही इंटरेस्ट नव्हता पण सुपेश मुळे तिला हे सगळ करावं लागत होते.
सर्व झाल्यानंतर वृषालीला एका रूममध्ये बसवण्यात आले. तिथे तिला रिलॅक्स होता आले. चहा पाणी तिथेच झाले.

सकाळी ओवळणीचा, शिदोरी नि उखाणे हे कार्यक्रम झालेत.
या सगळ्यात वृषाली माता फार थकली होती आणि तिला कंटाळवाणी वाटत होते थोड्याच वेळात तिच्या घरचे मंडळी आली त्यांचे जेवण वगैरे होऊन  संध्याकाळी सर्व  वृषालीला सोबत घेऊन परत केले.

हे सगळं ग्रामीण भागातील होणाऱ्या लग्न पद्धतीनुसार केल्या जत आहे. त्यामध्ये हळद लावून ओवाळणी घालने,उखाणे घेणे आणि लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नवरीला वरातीचे मंडळीसोबत परत माहेरी पाठवणे परत दोन दिवसानंतर नवरदेव नवरीला घ्यायला येतो आणि तिच्या माहेरी  सत्यनारायणचे पुजन केल्या जाते. सत्यनारायणाचे पूजन झाले की मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन  नवरीची पाठवणी केली  जाते. सासरी सुद्धा सत्यनारायणाची पूजा केली जाते. कुलदेवतेच्या दर्शनासाठी  वधू-वरास आणि त्यांचे सोबत आणखी एका मित्रास पाठवले जाते. हे सगळे पारंपारीक प्रथा वृषालीच्या वडिलांनी त्यांच्या ग्रामीण भागातील असून त्यांनी  आचरणात आणले आणि शुपेशच्या आई-वडिलांनाही सांगितले असं करायला. त्यांनीही तसेच केले.

     लग्नानंतर काही दिवस सुपेश वृषालीला बाहेरगाव पाठवण्यात आले तिकडे दोघांनी खूप शॉपिंग आणि पर्यटन प्रेक्षणीय स्थळे पाहिले एन्जॉय करून काही दिवसांनी घरी परत आले.
आता वेळ होती वृषालीच्या सासरी वावरण्याची कारण घरात सर्व मंडळी एकत्र होती.

सुपेशाच्या वहिनी नि सविता ताई सकाळी लवकर उठले. स्वयंपाक घरात कामाला लागल्या वृषाली मात्र उशिरा आली पहिला दिवस असल्यामुळे काही जास्त न बोलता वृषाली बेटा सकाळी थोडा लवकर उठत जा सविता ताई म्हणाल्या.
त्यावर वृषाली फक्त हो बोलली आणि तिथून निघून गेली.

सुपेश गुड मॉर्निंग काय ग काय झालं चेहरा पाडायला सकाळी सकाळी.

वृषाली काही नाही तुमची आई  सकाळी लवकर उठून खाली यायचं बोलल्या.

सुपेश मग तू काय बोलली त्यावर.....

वृषाली मी हो म्हणून  निघून आली.......

मला नाही लवकर उठायचं का म्हणून मग का हो म्हणायचं.......

पण काही दिवस तर तुला हे करावंच लागेल ना अजून तर मी पेपर आणलेही नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे.......

वृषाली म्हणजे तुम्ही बोलले होते की लगेच करून घेतो.मग का नाही केली अजून.......


   लग्न नि ऑफिसच्या गडबडीत होतो. मी फोन करून सांगितले होते पेपर बनवायचे आहेत म्हणून तर ते बोलले मी तयार करून ठेवतो नंतर येऊन घेऊन जाशील मी उद्या पेपर घेऊन येतो......

वृषाली, ठीक आहे फक्त काही दिवस ऐकणार मी सून म्हणून नंतर नाही. पेपर लवकरात लवकर तयार करून आणा......

सतीश काही न बोलता निघून गेला थोड्यावेळाने वृषाली ही खाली आली आणि किचनमध्ये गेली.......

अरे वा सुपेश व किती छान वाटते दोघी मिळून नाश्ता आणत आहेत घर कसे भरल्यासारखे वाटते वृषाली आल्यामुळे.

हो दादा तु म्हणतो ते बरोबर आहेस का वाटणार नाही एक मेंबर आपल्या घरात वाढलाना......

आहेतच माझ्या सुना चांगल्या, लक्ष्मी पावलांनी आल्यात त्यांच्या वास्तव्याने घर भरल्यासारखं वाटणार नाही तर काय?
असेच माझे घर नेहमी आनंदी आणि एकत्र राहो हीच माझ्या ईश्वराला मनापासून प्रार्थना करते.....

हे सगळं सुपेशच्या कानावर आईचे शब्द ऐकायला येतात आणि तो नर्व्हस होतो. कारण त्याने सगळ्यांना दगा दिला. वृषाली सोडून गेली, तर पुढे काय होईल त्याच्या मनात ही शंका निर्माण झाली आणि तो जेवण करतांना एकदम उठून गेला.

अरे, सुपेश काय झालं असं का चालला अरे जेवण करून घे पण तो बाहेर निघून गेला.......

वृषाली ही खाली मान घालून किचनमध्ये निघून गेली......

रुपेशला एकदम वाटले  विचारा काय झाल जेवण करता करता उठून गेला नक्कीच काहीतरी लपवत आहे. असं मला वाटते. त्याला विचाराव लागेल काय झाले ते आत्ताच फोन करून विचारते. हो  विचार  त्याला काय झाले ते...

पण तेवढ्यात सुपेश घरात परत येतो सर्वांना sorry. म्हणून रूममध्ये निघून जातो.......


रूममध्ये वृषाली असतेच तिथं काय हो  काय झालं होतं जेवण करता करता निघून गेले. सर्वांना किती काळजी वाटत होती भरल्या ताटावरून जाऊ नये अन्नाचा अपमान होते असे बाबा नेहमी सांगत होते.......

हे मला माहिती आहे जेवणाच्या ताटावरून उठून जात नसतात. मला हेही माहीत होतं की ज्या घरात आनंद आहे त्या घरात दुःखाला वाटा देऊ नये, पण माझ्या हातून ते घडले त्याचा मार्ग  सापडणं शक्य आहे. ताट परत वाढता येते, जेवण ही परत करता येईल पण एकदा भरलेलं घर मोडलं तर त्याचा मेळ कसा बसवायचा हे माझ्या डोक्यात आले म्हणून मी निघून गेलो.......


 


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →