न राहून सुपेश ने एक मार्ग काढला तो म्हणजे दोघांनी लग्नानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यासारखी राहायचे. लोकांच्या नजरेत आपण नवरा बायको असु असे केल्याने तुझ्या आई-वडिलांची इमेजही कायम राहील आणि त्यांना मानसिक ताण येणार नाही.
लग्न झाल्याचा आनंदही होईल त्याचबरोबर तुला लग्न करायचे नाही म्हणून तू तुझ्या इच्छेनुसार काही दिवसात हे लग्न मोडून तिला हवे तसे जिवन जगता येईल. यात थोडी रिस्क आहे पण या शिवाय दुसरा पर्याय नाही. जर तुला योग्य वाटत असेल तर तू आपण याचा अवलंब करू शकतो, पळून गेल्यापेक्षा हे करणे माझ्या मते योग्य आहे त्यामुळे तुझी नि माझी इमेज चांगली राहील, आई-वडिलांनाही त्रास होणार नाही.
आपले लग्न झाल्याने दोन्ही परिवारातील लोकांना आनंद होईल आणि पुढील परिस्थिती पाहून तुलाही यातुन सुरक्षित बाहेर पडता येईल. सुपेश बोलत होता पण त्याच्या मनाला होणारे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
लग्न झाल्याचा आनंदही होईल त्याचबरोबर तुला लग्न करायचे नाही म्हणून तू तुझ्या इच्छेनुसार काही दिवसात हे लग्न मोडून तिला हवे तसे जिवन जगता येईल. यात थोडी रिस्क आहे पण या शिवाय दुसरा पर्याय नाही. जर तुला योग्य वाटत असेल तर तू आपण याचा अवलंब करू शकतो, पळून गेल्यापेक्षा हे करणे माझ्या मते योग्य आहे त्यामुळे तुझी नि माझी इमेज चांगली राहील, आई-वडिलांनाही त्रास होणार नाही.
आपले लग्न झाल्याने दोन्ही परिवारातील लोकांना आनंद होईल आणि पुढील परिस्थिती पाहून तुलाही यातुन सुरक्षित बाहेर पडता येईल. सुपेश बोलत होता पण त्याच्या मनाला होणारे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
थोडा वेळ गप्प बसून वृषाली बोलली, करार मॅरेज ना आपल्या या गोष्टीवर विश्वास कोण ठेवणार. तर लग्न झाल्यानंतर माझ्यावर काही संकट वगैरे येणार नाही कशावरून मी लग्नच्या बोहल्यावर चढल्यावर त्यात अडकणार नाही, तर माप ओलांडले म्हणजे मी पूर्णतः तुझ्या घराची जबाबदारी आहे त्यातून मला कसं बाहेर पडता येईल ते मला जमलं नाही, तर मग काय आपल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले कसं सिद्ध करायचं, त्यापेक्षा नातेवाईकांच्या साक्षीने नि आशीर्वादाने आपण पती पत्नी होणार न मंडपात मग कस सिद्ध करता येईल की आपला विवाह हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट होता.अशा प्रकारचे बरेच विचार वृषालीच्या मनात ढवळा ढवळ करत होते.
तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला तरी दुसरा मार्ग सुचत नाही. मंडपात लग्न झाल्यानंतर तुला यातून बाहेर पडणे शक्य होणार नाही, असं तुला वाटते पण लग्नानंतर आपण वकीलामार्फत करार विवाहाचे पेपर बनवून घेऊ आणि त्याच्यावर दोघे मिळून स्वाक्षरी करू. म्हणजे तुला पुरावाही मिळेल आणि वाटेल तेव्हा पेपर पुढे करून वेगळ होऊ शकतेस. अशाप्रकारे आपल्याला करता येईल वृषालीला समजून सांगितले.
करार विवाह झाल्यानंतर मला बाहेर पडणे शक्य होईल का? तुमची फॅमिली काय म्हणेल? तूम्ही घरच्यांना कसे नि काय उत्तर देणार. त्यांना आपण का वेगळ होत आहोत, असं का केलं त्यांनी विचारलं तर मग काय सांगायचं विचार केला तुम्ही........
आज नकार देण्यापेक्षा एका वर्षानंतर नकार देने सोपे होईल. एका वर्षानंतर खूप काही होऊ शकते म्हणजे वेगळ व्हायला खूप काही कारण मिळू शकतात. असं मला वाटते तू बघ विचार करून आणि सांग मला.....
वृषाली शांततेत म्हणाली, खरंच की, एका वर्षाचा कालावधी खुप मोठा असतो. एका वर्षात आपण वेगळं होण्यासाठी खुप कारण निर्माण करू शकतो. काहीही करू शकतो आपण. ठीक आहे मला मान्य आहे पण त्यातही माझ्या काही अटी आहेत.........
सुपेश शांत मनाने ऐकून घेतो आणि कोणत्या अटी आहेत तुझ्या? असा प्रश्न तिला करतो.
त्यावर वृषाली म्हणते त्या करार नुसार तुमचे आणि माझे कोणत्याही प्रकारचे वैवाहिक संबंध होणार नाही आपण एका खोलीत राहू पण कधीही पती-पत्नी म्हणून सोबत येणार नाही, मी काय करेल, कुठे जाईल, किती वाजता घरी यावे, काय घालावे, काय घालू नये, कसे रहावे याबद्दल मला तुम्ही किंवा कोणीही अडवणार नाही. आणखी कोणत्या प्रकारचे जबरदस्ती माझ्यावर कोणी करणार नाही. मानसिक तणाव मला देणार नाहीत. हे सगळ शक्य होत असेल तर मी तयार आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे करार विवाह करायला.
हो बरोबर आहे तुझे पण तु माझी बायको म्हणून माझ्या घरात आलीस तर काही बंधने पाडावेच लागतील तुला एका सुनेप्रमाणे, कमीत कमी परिवारासमोर तरी तु माझी बायको आहे. म्हणून वागावे लागेल तुला काही महिने तरी त्यानंतर तुला वेगळे होण्यासाठी मी तुला कधी अडवणार नाही......
ठीक आहे, वृषाली बोलली सर्वांच्या समोर मी तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून, तुमची बायको म्हणून घरातील पद्धती आणि सवय अंगी कारण्याचा प्रयत्न करेल पण कोणी नसताना मी याची जाणीव ठेवणार नाही आणि तसेच तुम्हीही करावे असं मला वाटते.
तर ठरलं मग आधी सर्वांसमोर मंडपात परंपरेने लग्न करायचं. पेपर बनवतो नंतर आपण दोघे मिळून त्याच्यावर सह्या करू म्हणजे आपला होईल करार विवाह. तुला यावर अजून काही विचार करायचा आहे का की मी पेपर तयार करू? सुपेश परत एकदा वृषालीला विचारतो.
नाही हाच मार्ग आता सोयीस्कर जाईल आपल्याला तुम्ही घ्या वकिलाची भेट आणि करा खोट्या लग्नाचे कागदपत्र तयार.
दोघांनी मिळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. आणि याबद्दल सध्या तरी कोणालाही काही न सांगण्याचा दोघांनी निर्णय घेतला आणि दोघेही देवाचं नाव घेऊन घरी निघाले.....

इकडे रुपेश दादा हा सुपेश वाट पाहत होता, कारण त्याला माहीत होते सुपेश वृषालीची भेट घेण्याकरिता गेला आणि यामध्ये लग्न मोडण्याची भीती त्याला जास्त होती म्हणून तो काळजीने राहून - राहून इकडून - तिकडे तिकडून - इकडे करत होता त्याच्याकडे त्याच्या आईचे पूर्ण लक्ष होते सविताताईंनी त्याला नराहून विचारले काय रे आज काय झाले तू असा काळजीत का दिसतो, तु कोणाची वाट पाहत आहेस का?
यावर तो थोडा बिचकला आणि नाही मी कुठं काही नाही कोणाचीही वाट पाहत नाही. बस आपल सहज वेळ जात नव्हता म्हणून फेऱ्या मारत आहे. बाकी काही नाही.
सविताताई ने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेही रूपेशला सुचत नव्हते......
पण त्याच्या बोलण्यावरून काहीतरी समस्या आहे याची कल्पना सविता ताईंना आली होती,पण रुपेशने सांगितल्याशिवाय त्यांना काही कळणार तरी कसे......
तेवढ्यात सुपेशची एन्ट्री होते आणि तो त्याला पाहून आश्चर्यचकित झाल्यासारखा होतो पण तो सुपेशला काहीही विचारू शकत नव्हता कारण आई समोर उभी होती त्यामुळे त्याने फक्त काय रे कुठे गेला होतास सगळं बर आहे ना एवढेच विचारलं.......
त्यावर सुपेश, हो काही प्रॉब्लेम नाही डोन्ट वरी सगळं व्यवस्थित झालं आणि होईल हसत उत्तर दिलं आणि तिथून निघून गेला.......
सुपेश हसून बोलला आणि काही काळजी करू नका ते सांगून गेला त्यामुळे आता काळजी करण्यासारखी काही नाही म्हणून त्याही त्यांच्या काम करण्याकरता किचनमध्ये निघून गेल्या.
संध्याकाळी जेवताना सर्वजण एकत्र बसले. रुपेशचे लक्ष सूपेशकडेच होते ते पण त्याच्या चेहऱ्यावरून तो फार आनंदी नव्हता वाटत. पण त्याचे थोडे प्रमाणात समाधान झाल्यासारखे वाटत होते पण तरीही त्याच्याशी बोलल्याशिवाय रुपेश ला शांतता कुठे मिळणार होती म्हणून त्याने जेवण करतानाच मेसेज केला की जेवण झाल्यावर मला येऊन भेट. सुपेशला मोबाईल दाखवायला म्हणजे त्याला कडेल की रुपेशने त्याला मॅसेज केला आहे.
रुपेशने लगेचच मोबाईल पाहला आणि मॅसेज वाचून त्याला हो चा रिप्लाय दिला..........
जेवणानंतर सगळ्या आपल्या कामात व्यस्त झाल्यानंतर दोघे भाऊ बाहेर गार्डन मध्ये भेटले. काय - काय झाले, काय म्हणाली वृषाली, लग्नाला तिने होकार दिला की नाही, अरे बोल लवकर काहीतरी बोल माझी आतुरता वाढत आहे, तिने होच म्हटले असेल मला माहित आहे माझ्या भावाला कोण नकार देऊ शकत नाही, तिने नकार देऊन मोठी चूक केली, तिची चुक लक्षात आली असेल आणि आता तिने होकार दिला की नाही बोलकी सुपेश........
सुपेश ला विचार पडला त्यातले काही सांगायचं की नाही सांगायचं कारण त्याला सर्व माहिती होतं आधी जे घडले होते पण यानंतर त्याला काही सांगितलं आणि त्यान नकार दिला तर, तर परत वृषाली ही मोठ्या संकटात सापडेल त्यामुळे दादाला न सांगणे योग्य आहे असे मला वाटते.
