Login

विवाह करार - 23

कोणी मारले असेल सुपेशला? यामध्ये वृषाली चा तर हात नसेल ना?


        इकडे वृषाली ऑफिस मध्ये गेली. आणि लगेचच तिने तिच्या कालच्या राहिलेल्या कामाला सुरुवात केली आज विवेक लवकर ऑफिसमध्ये हजर होतात. तोच खाली जात असताना तिच्याकडे नजर टाकली आणि तिला पाहून स्वतःच हसला.

तेवढ्यात वृषालीला तिच्या आईचा कॉल आला...


वृषालीला आईचा फोन येते.  ती कामात असल्यामुळे फोन रिसीव करत नाही. सायलेंट केलेला असल्यामुळे त्याकडे तिचे लक्ष ही जात नाही.. तिला लगेच कॅबिनमध्ये बोलावले जाते. एक फाईल घेऊन जी तिला मीटिंगसाठी तयार करणे आवश्यक होते......

वृषाली, "मी आत येऊ का सर........"

विवेक लगेच लगेच उत्तरला, "प्लीज कम,....."

"वृषाली बसा काल सांगितलेली फाईल तुम्ही तयार केलेली असेलच ती मीटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे मला..."

वृषाली, "yes sir, फाईल तयार आहे एकदा तुम्ही चेक करून घ्या म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम यायला नको."

विवेक,  "अरे वा फारच स्पीड दिसते तुमचा कामाचा. असं जर तुम्ही काम करत राहिला तर आमची प्रगती निश्चितच होईल आणि तुमची ही........"

"काहीतरी मस्करी करताय सर तुम्ही माझ्यापेक्षा टॅलेंटेड आणि हुशार लोक हे ऑफिसमध्ये आहे. ते लगेच तुमच्या शब्दात  काम पूर्ण करून घेतील.  तुम्ही मला उगाच झाडावर चढवण्याचा प्रयत्न करत आहात असं मला वाटत आहे......." वृषालीने हसत उत्तर दिले.

विवेक, " मी तुमच्या कामा ची बढाई नाही करत आहे. तुम्ही जे चांगलं काम केलं त्याचं कौतुक करत आहे आणि तुम्ही चुकीचा अर्थ लावत आहात....."


"मला तसं म्हणायचं नव्हतं सर पण एका दिवसात एवढी कामात मी तरबेज नाही झाली की तुम्ही  माझे कौतुक करावे. पण मी कामात तरबेज होईल एक दिवस हे मात्र नक्की........"वृषाली

"द्या ती फाईल बघू जरा, छान व्यवस्थित रित्या तयार केले. तुम्ही  असेच लक्षपूर्वक काम करत रहा. तुम्ही जाऊ शकता. मॅडम थँक्स फॉर फाईल......"

"Wel Come sir ....."

बाहेर येऊन वृषाली आईचा आलेल्या कॉलला पाहते. ती त्यांना परत कॉल करते. हा सांग आई तू काय म्हणत होते मगाशी मी जरा कामात होते. म्हणून तुझा फोन नाही उचलला गेला.

ज्योतीताई ठीक आहे. काही हरकत नाही पण तू मला त्यादिवशी एक गोष्ट सांगितली नाही. ती मला तुझ्या सासूबाईंनी सांगितली काल. काय झाले होते काल तुला तू डॉक्टरकडे कशासाठी गेली होतीस.
त्यांना कसं माहिती मी डॉक्टर कडे गेली होती. एवढ्यासाठी सुपेशने त्यांना कॉल केला विश्वासच बसत नाही माझा..

काय एवढं असं काय बोलतेस सविता ताईचा कॉल आला होता त्यांना. त्यांनी नव्हता केला सविता ताईला कॉल......

तू आधी सांग तुला काय झाले होते काय गुड न्यूज आहे का? असं तुझ्या सासूबाईंनी सांगितलं काल आम्हाला आणि तू मला सांगितलं नाहीस किती वेळ बोलली तू माझ्यासोबत.

वृषाली एकदम भडकून काय बोलत आहेस तू,  तुला सगळं माहीत असताना तू कसा काय विचारू शकते.  असं कसं शक्य आहे ते तुला कोणी सांगितले असे रिकाम्या गोष्टी. तू फोन ठेव आधी मी सुपेश ला फोन करून  विचारते..

आता काय विचारते इकडे एवढी आनंदाची बातमी ऐकून  सविताताई आणि त्या भाऊजीना एव्हढा  आनंद झाला आहे की त्यांनी ही बातमी  पूर्ण पसरवली आहे. प्रत्येक जण त्यांना  अभिनंदन करत आहे.......

    समजा ही बातमी खरी असली तर काय बिघडते बेटा. तुमचं लग्न झालंय दोघांचं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, समाजाच्या मान्यतेने तुम्ही पती-पत्नी आहात........

आई प्लीज, "परत सुरु होऊ नकोस. मला हे सगळं माहिती आहे ते नको सांगू तू मला......"

वृषालीने रागात फोन कट केला आणि सुटी टाकून बाहेर निघून गेली.....

वृषाली बेल वाजवून वाजवून कंटाळते पण आतमधून सुपेश काहीही प्रतिसाद देत नव्हता. वृषाली रागात असल्याकारणाने जोरात दरवाजाही वाजवू लागली.ती शेवटी थकून स्वतःजवळच्या चाबिने लॉक उघडून आत मध्ये जाते........

जोरत ती ओरडते...........

सुपेश काय झाले, "हे तुम्हाला काय झाले, कोणी केले." बोलाना जोरात रडत रडत ती त्याला हलवत होती आणि बोलत होती. तिचा आवाज बाहेर जाणाऱ्या लोकांनी ऐकला नि तिच्या घरात प्रवेश केला.......

तीने घाबरून लगेच सुपेश च्या भावाला म्हणजे रुपेश ला फोन केला.........

हॅलो दादा मी वृषाली, "तुम्ही लगेच या मला काही सुचत नाही. बघान ह्यांना काय झाले तर हे काही बोलत नाही. तुम्ही फक्त लवकर या......"

    रुपेश, म्हणजे काय झाले. "डॉक्टरांना फोन केला की नाही. मी लगेच निघतो तु डॉक्टरांना फोन करून घे तोपर्यंत......"

  रुपेश ने लगेच त्याच्या मामाला फोन लावला आणि त्यांनाही बोलावून घेतले..........

     सुपेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्या गर्दीतून एका बघ्याने  पोलिसांना कॉल केला............

थोड्याच वेळात पोलिसाची गाडी आली.........

लागोपाठ रुग्णवाहिका ही आली. डॉक्टरने सूपेशला तपासले नि मृत घोषित केले......

तेवढ्यात रुपेश नि त्याचे मामा दोघेही तिथे आले.......
काय झालं हे सुपेशला. "अरे बोल की माझ्या भावा. अहो मामा पहा हे सगळं काय झालं ते. कोणी मारले माझ्या भावाला? का मारले? कोणाचे काय वाईट केले होते त्याने......?"

गर्दीतून एक बोलला, अरेरे कोणी केले असेल हे एवढे क्रूर कृत्य एखादा नराधमच करू शकतो. खुप चांगला आणि प्रेमळ व्यक्ती होता सुपेश........ फार वाईट झाले.

         बाजूला व्ह्या आधी सगळे, बाजूला व्हा. कोणीही कशालाही हात लावू नका. जिथची वस्तू तिथच्या तिथं राहू द्या. त्यातील एक पोलिस कर्मचारी म्हणाले. कोण आहेत हे मृत व्यक्ती, नाव काय यांचे कोण कोण राहत होते या घरात. इन्स्पेक्टर राठोड विचारायला लागले.....

          सुपेश चे मामा बोलले, "हा सुपेश माझा लहान भाचा, काही दिवसांपूर्वीच या घरात राहायला आलेले. ही वृषाली सुपेशची पत्नी, दोघेच राहत होते या घरात. मी ह्यांचा मामा आणि रुपेश कडे हात दाखवत हा माझा मोठा भाचा सुपेश चा मोठा भाऊ रुपेश. आम्ही ही याच शहरात वेगवेगळ्या भागात राहायला आहोत...."
हे सगळं रडत रडत मामा बोलत होते.

        अच्छा तर, यांचे कोणासोबत काही भांडण झाले होते का? म्हणजे काही वैमनस्य वगैरे ज्यातून हा खून झाला असणार, किंवा कर्ज घेतलेले असणार त्यातूनही होऊ शकते. बॉडी पोस्टमॉर्टन करीता घ्या ताब्यात. आणि काही संशयास्पद दिसले तर पहा आजू बाजूला व्यवस्थित चौकशी करा. हे बघा आम्ही तुमचे दुःख समजु शकतो. पण तुम्ही साथ दिल्या शिवाय आम्ही गुन्हेगारांना शिक्षा देऊ नाही शकणार. तुम्हाला कोणावर संशय असेल तर सांगा. बाकी पोस्टमॉर्टन रिपोर्ट आल्यावर समजणार आहेच.....

    पोलिस कर्मचारी नि रुग्णवाहिका सुपेश ची बॉडी घेऊन जातात. बाकी जमलेली गर्दी ही आप आपसात चर्चा करत निघून जातात. त्यात फक्त वृषाली चा रडायचा आवाज येत असतो. मामा सुपेश च्या आईवडिलांना वृषालीचा apagjat आणि सासु सासऱ्यांना सूपेशाचा  अपघात झाल्याचे  ही माहिती देतात. हे सगळं रडत रडत मामा बोलत होते.

 

      हे समजताच  सुपेशच्या बाबांनी नि त्याच्या सासाऱ्यांसोबत सुपेशकडे धाव घेतली. त्यांना खरं समजताच त्यांच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे झाले.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →