Login

विवाह करार 15

सुपेश चा निर्णय त्यालाच ठरतोय त्रासदायक
जाम डोकं दुखायला लागलं घरचे काम, घरची कटकट आणि ऑफिसचे काम यामध्ये नुसतं फक्त टेन्शनच वाढत आहेत आणि कामाकडे दुर्लक्ष होत आहे. ऑफिस मध्ये कधी चुका न करणार मी  माझ्या हातून चुका होत आहेत. अशाने माझं काम माझ्या हातातुन निघून जाईल.  परत घरी बसून काय करायचं. सगळं प्रॉब्लेम सुरू आहे यावर काहीतरी उपाय करावा लागेल. नक्कीच उपाय करावा लागेल नाहीतर पुन्हा आयुष्य बरबाद होईल.

सगळ्या पहिले तयार करून झालेल्या फाइल्स सरांकडे देऊन येतो.
सर ह्या फाईल मी चेक केल्या सॉरी सर याच्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त केल्यात यानंतर आता परत अशी चूक होणार नाही याची मी पूर्ण प्रयत्न करेन.

Ok Ok जास्त टेन्शन घेण्यासारखे नाहीये मला माहिती आहे की नेहमी तुझं काम प्रामाणिकपणे पार पाडत असतोच. पण यावेळेस काय प्रॉब्लेम असेल. तुला हवी असेल तर तु काही दिवसाची सुट्टी घे. रिलॅक्स हो तुझे घरचे काम पार पडल्यानंतर ऑफिसला जॉईन कर.

नक्की सर दोन दिवसाची सुट्टी हवीच. सर सध्या नाही  पुढच्या आठवड्यात घेईल सुटी. सर मदत करू शकता का  मला थोडे पैसे हवे होते........
कशाला हवा पैसे तुला आणि किती पाहिजेत.....

ऍक्च्युअली सर मला राहायला नवीन जागा घ्यायची होती. त्या जागेमध्ये जरा प्रॉब्लेम आहे. तिथे आम्ही नाही राहू शकत त्यामुळे नवीन जागे पुरते तर हवे होते.
हे सगळं ऐकून सुपेशच्या बॉसला जरा टेन्शनच आलं एवढे पैसे देण्यापेक्षा त्यांनी त्याला एक प्लॉट दिला काही दिवसांपुरता राहायला.
एवढे पैसे एकदम द्यायचे म्हटलं म्हणजे त्यापेक्षा तू एक काम कर माझा एक प्लॉट खाली आहे तुम्ही दोघे तिथे जाऊन रहा ज्यावेळेस तुझी पैशांची सोय लागेल त्यावेळेस नवीन प्लॉट घे आणि माझा प्लॉट खाली कर वाटेल तेवढे दिवस राहा.ठीक आहे.........

ठीक आहे सर मला काही प्रॉब्लेम नाही पुढच्या आठवड्यात मी तिथे शिफ्ट होतो....

ठीक आहे मग मी उदयाला चाबी देईल तुला, वाटले तर तु एकदा ते घर पाहून घे त्याची जरा साफ सफाई करावी लागेल खुप दिवसांपासुन बंद आहे तो नतर तुम्ही तेथे राहू शकता.

Ok सर आधी जाऊन येऊ आम्ही तिकडे......

सुपेश संध्याकाळी घरी उशिरा जातो, रुपेश बाजूलाच असल्यामुळे त्याला सुपेश च्या आयुष्यात काय चालू आहे याची कल्पना होतीच. म्हणून तो सुपेशला बाहेर असतानाच कॉल करतो.
काय रे सुपेश कुठे आहेस तू अजून घरी आला नाहीस किती उशीर झाला. ऑफिस  तर कधीच बंद झाले असेल तु का  आला नाही अजून.

काही नाही दादा बस थोडं काम होतं ऑफिसचं राहिलेलं ते पूर्ण करून घेतलं म्हणून थोडा उशीर झाला......

ठीक आहे तुला माझी काही मदत हवी आहे का म्हणजे घरचे प्रॉब्लेम आहे त्यासाठी किंवा अधिक काहीतरी......

अरे नाही दादा तसं काही नाही मी करतो सगळ व्यवस्थित .मी आहे न तू नको टेन्शन घेऊ. हवी वाटेल त्यावेळी मी तुला नक्की सांगेल तुझीच मदत घेईल........

ठीक आहे मग वेळेवर घरी येत जा. उशीर झाला की मला काळजी वाटते तुझी.....

हो दादा आलोच मी थोड्यावेळात......

सुपेश उशिरा घरी येतो त्यावेळी वृषाली आपल्या बेडरूम मध्ये असते. तो बेल वाजवतो वृषाली दरवाजा उघडत नाही. त्यामुळे तो स्वतःच जवळची चाबी घेऊन दरवाजा उघडून आत मध्ये प्रवेश करतो.  

कोणी नाही असल्याचे पाहून तो सरळ किचनमध्ये जातो. पाण्याची बॉटल घेऊन पाणी पितो आणि हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर डोके मागे टेकवून शांततेत डोळे मिटून बसतो.
त्याला तशीच उशिरा झोप लागते......

खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाश हा सुपेश च्या चेहऱ्यावर पडला आणि पक्षांचा येनाऱ्या आवाजाने झोप पूर्ण झाली तेवढ्यात वृषालीही तिथे येऊन पोहोचली.

Good Morning रात्री तू जेवण केलंस की नाही सुपेशने वृषालीला विचारले.

  अच्छा, तुला काय एवढी काळजी लागली तु तर मस्त निवांत जेवण करून झोपलास ना. ही मॉर्निंग तुझ्यासाठी चांगली आहे माझ्यासाठी नाही त्यामुळे हे फॉर्मालिटी माझ्याजवळ नको वापरत जाऊ प्लीज.

अरे, सकाळी सकाळी उठल्या उठल्या असे का बोलतेस तु......

अच्छा तुला माहितीच नाही मी असं का बोलते, मी तुला सांगितलं ना मला इथे राहायचं नाही मग का बर तु माझी एक डिमांड पूर्ण करू शकत नाही.

वृषाली चे बोलणे ऐकून सुपेशच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. त्याला वाटलं वृषाली ही त्याच्यावर प्रेम करायला लागली म्हणून ही अशा प्रकारचे बोलत आहे.
अगं पण मी तुझ्यासाठी घर पाहायला  गेलो होतो. तुझ्यासाठी म्हणून तर मला उशीर झाला रात्री यायला.

खरंच, खरंच तुम्ही दुसरं घर बघितल. आपल्यासाठी आपण इथून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार. सॉरी मी उगाचच तुमच्यावर ओरडले मला माफ करा. कधी जाणार आपण तिकडे राहायला.

वेळ आहे अजून मी उद्या तिकडे जाऊन पाहतो, नंतर तुला घेवुन जाईल. पुढच्या आठवड्यात जाऊ आपण तिकडे राहायला.



हे ऐकुन वृषालीला अत्यानंद झाला स्वर्ग मिळाल्यासारखं  तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सुपेशला विचार करत होता, तिला इथं राहण्यात काय प्रॉब्लेम होता आणि रुपेश पासून दूर राहणे तिला काय आनंद मिळणार होता, कारण त्या दोघांमध्ये पती-पत्नी सारखं काही नव्हतं. ती त्याला सगळ्या त्याच्या माणसापासून दुर का नेत आहे हे त्याला कळतच नव्हते.
सुपेश तीच्यावर जेवढे प्रेम करत होता, तेवढा तिच्या डिमांड पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. पण याची जाणीव वृषाली ला नव्हती.

सुपेश रुपेश ची भेट घेतो....
दादा मी दुसऱ्या भागात राहण्यासाठी जागा पाहत आहे. इथ वृषाली राहायचं नाही म्हणते. रोज रोज भांडण करून तुम्हाला त्रास होण्यापेक्षा जरा दूर राहतो. फार दूर नाही थोड्याच अंतरावर आहे इथून जागा. अधुन मधून इथे येत जाईल. जर मला यायला जमले  नाही तर तू कॉल करत जा.

मला सांग तू हे लग्न वृषालीच्या इच्छांनीच केले ना? तरीही ती तुझ्या सोबत असे का भांडत राहते?  तुझ्या सोबत का लग्न केलं तिने असं भांडायला. तुमच्या दोघं एकत्र  नवरा बायको सारखे राहता की नाही? मला संशय आहे.
बोलशील आता काहीतरी मी तुला काही विचारत आहे.

मी तिच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मेसेज केले  फक्त एका वर्षासाठी. एका वर्षांमध्ये ती कधीही मला सोडून जाऊ शकते. पण आता तिच्या वडिलांनी तिला माहेरी परत न  येण्याची धमकी दिली त्यामुळे ती जरा असं करनार असं मला वाटते. बस एवढेच.....

बस एवढेच, किती सहज बोलत आहेस सुपेश अरे तुझ्या  आयुष्यासोबत खेळला तु आणि एवढेच म्हणतोस.
तुझं डोकं फिरल का तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला असं का केलंस तू मला सांगितले ते तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि आता सांगत आहेस कॉन्ट्रॅक्ट मेसेज केल म्हणून. तू त्याच वेळेस मला का खरं सांगितलं नाहीस, का खोटं बोललास. ती मनापासून लग्नाला तयार  नव्हती आता यात नुकसान कोणाच होणार तुझंच ना. ती निघून जाईल तिच आयुष्य जगायला आणि तू आयुष्यभर तिच्या आठवणी तळमळत बसशील. आठवण ही कोणती नेहमी तुझ्या सोबत भांडत राहत. कोंडमारा करून  घेतला स्वतःचा, आयुष्याची राख रांगोळी करून घेतली. काय मिळेल तुला हे सगळं करून मी तुझा भाऊ आहे तू एकदा मला विचारायचं होतं, सांगायचं होतं. हे सगळं आई बाबाला माहीत झालं तर काय होईल याचा तरी विचार करायचा होता. सुपेश काय करून बसला रे तु ?

बरोबर आहे दादा, मी चुकलो पण मी त्यावेळेस विचार केला की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून एक वर्ष जर सोबत राहण्याने वृषाली चे मन बदलले आणि तीही माझ्या प्रेमात पडली तर कायमची माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत राहील म्हणून मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. तू कदाचित मला हे करू दिले नसते म्हणून मी तुला सांगितले नाही. त्यावेळी वृषालीला मदत करण्याची भावना ही माझ्या मनात निर्माण झाली होती. वेळेवर लग्नाला नकर देण्यापेक्षा हा मार्ग मला सोयीस्कर वाटला......


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →