"ए प्रतीक्षा चल ना बाई जायला उशीर होईल आपल्याला किती हळूहळू आवरतेस." ती प्रतीक्षा ला बिल्डिंग खालून आवाज देत बोलली.
"जानी आ रही हू थोडा सब्र करो आणि काय ग चोमडे थोडा उशीर झाला तर काय बिघडते." प्रतीक्षा जिना उतरतच बोलते.
"अगं ये ना करू नको करू बस गाडीवर उशीर होतोय." ती म्हणते.
"हो चल." प्रतीक्षा म्हणते.
त्या दोघे तिच्या एक्टिवावरून जात असतात. दोघींनीही पांढऱ्या रंगाचा पटियाला सूट घातलेला असतो. रस्त्यांवर लहान मोठे सगळेच होळी खेळत असतात ती मागे बसलेली असते आणि प्रतीक्षा गाडी चालवत असते. ती त्या लहानग्या होळी खेळणाऱ्या मुलांना कुतूहलाने बघत असते की तेवढ्यात एक फुगा येऊन तिच्या पाठीवर फुटतो ती कळवळते.
प्रतीक्षा गाडी थांबवून इकडे तिकडे पाहते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मुलगा त्या दोघींकडे घाबरून पाहत असतो.
प्रतीक्षा त्याच्याकडे येते आणि त्याला खनकण कानाखाली मारते काही सेकंद तर त्याला कळतच नाही नेमक आता घडलं काय तो तसाच गालावर हात ठेवून उभा राहतो.
"काय रे ए डोळे फुटले का? नीट बघून तो फुगा फेकायचा ना." प्रतीक्षा त्याची कॉलर धरत बोलते, ती त्याला अजून एक मारणार इतक्यात ती प्रतीक्षाला सावरते आणि घेऊन जाते. जाताना त्या मुलावर एक ओझरता कटाक्ष टाकते त्या दोघे गाडी घेऊन निघून जातात.
तो अजूनही सुन्न होऊन तिथे उभा असतो. त्याच्या खांद्याला एका हाताचा स्पर्श होतो तो वळून पाहतो त्याचा मित्र गणेश असतो.
"काय आक्या कुठे हरवलास आणि गालाला काय झालं?" गणेश विचारतो (गालावर प्रत्यक्षाच्या हाताचे वळ उमटलेले असतात.
आकाश घरी येतो जेवण करून झोपायला जातो तेव्हा त्याला दुपारचा प्रसंग आठवतो तो विचार करतो, "कोण असेल ती मुलगी तिला आपल्यामुळे लागलं आपण सॉरी पण नाही म्हटलं एकदा तरी भेटायला पाहिजे, म्हणजे सॉरी म्हणता येईल." याच विचारात आकाश झोपून जातो.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
