चौकटीबाहेरचे जग
भाग १
" आई, अगं हे जुने हिशोबाचे कागद आणि डायऱ्या आता रद्दीत काढ. आता सगळं काही मोबाईलवर एका क्लिकवर येतं. तू अजूनही त्या २० वर्षांपूर्वीच्या सवयी का धरून ठेवली आहेस.? " राहुलने वैतागून विचारलं.
अनुराधाने आपल्या चष्म्यावरून राहुलकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली,
" अरे बाबा, हाताने लिहिलेलं ते आपलं असतं. तुमच्या त्या क्लिकवर माझा विश्वास नाही. कधी बॅटरी संपली किंवा फोन हरवला की गेलं सगळं शून्य ! माझं हेच बरं आहे."
अनुराधा एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी. घर कसं चकाचक ठेवायचं, सण-वार कसे परंपरेनुसार साजरे करायचे आणि पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा, यात तिचा हात कोणीच धरू शकत नव्हतं.
पण बाहेरचं जग वेगाने बदलत होतं आणि अनुराधाने स्वतःभोवती एक सुरक्षीत चौकट आखून घेतली होती. तिला तंत्रज्ञानाची भीती वाटायची आणि बदलाची तर त्याहूनही जास्त.
पण बाहेरचं जग वेगाने बदलत होतं आणि अनुराधाने स्वतःभोवती एक सुरक्षीत चौकट आखून घेतली होती. तिला तंत्रज्ञानाची भीती वाटायची आणि बदलाची तर त्याहूनही जास्त.
एके दिवशी घरात एक मोठी आणीबाणी आली. अनुराधाचे पती, जे घराचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळायचे, त्यांना अचानक ऑफिसच्या कामासाठी दोन महिन्यांसाठी परदेशी जावे लागले. राहुल सुद्धा त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये इतका व्यग्र होता की त्याला घराच्या कामासाठी वेळ देणे कठीण जात होते.
" अनु, हे बघ... मी तुला हे बँकिंग ॲप आणि काही महत्त्वाचे नंबर्स मोबाईलमध्ये सेव्ह करून दिले आहेत. आता तुलाच वाणसामान मागवणे, बिलं भरणं हे सगळं बघावं लागेल." पती निघाले तेव्हा अनुराधाला सांगत होते.
अनुराधाचा चेहरा पांढरा पडला.
" अहो, पण मला हे कसं जमणार ? मला तर साधं मेसेज वाचतानाही भीती वाटते. मी बँकेत जाऊन रांगेत उभी राहीन, पण हे ऑनलाईन मला नको."
पती हसले आणि म्हणाले,
पती हसले आणि म्हणाले,
" अनुराधा, एक वाक्य मी वाचलं होतं,
'बदल हा अटळ असतो, तो स्वीकारला की आयुष्याचा प्रवास सोपा होतो.' तू पन्नाशी पार केलीस म्हणून शिकणं थांबवू नकोस. प्रयत्न तर करून बघ ! "
'बदल हा अटळ असतो, तो स्वीकारला की आयुष्याचा प्रवास सोपा होतो.' तू पन्नाशी पार केलीस म्हणून शिकणं थांबवू नकोस. प्रयत्न तर करून बघ ! "
ते गेले आणि अनुराधा खऱ्या अर्थाने एकटी पडली. पहिल्याच आठवड्यात घराचं वीजबिल आलं. राहुल घरी नव्हता. अनुराधा तो कागद घेऊन तासन् तास बसली होती. तिला भीती वाटत होती की जर तिने चुकीचं बटन दाबलं तर तिचे पैसे बुडतील किंवा काहीतरी अघटित घडेल.
त्याच दिवशी दुपारी तिची मैत्रीण वैशाली घरी आली. वैशाली अनुराधाच्याच वयाची होती, पण ती खूप अपडेटेड होती. तिने पाहिलं की अनुराधा त्या कागदाकडे बघून रडकुंडीला आली आहे.
" काय ग अनु, काय झालं ?" वैशालीने विचारलं.
" हे बघ ना वैशाली, हे बिल भरायचंय. पण मला काहीच समजत नाहीये. मला वाटतंय मी काळाच्या खूप मागे पडलेय. मला या नवीन जगाची भीती वाटतेय ग ! " अनुराधाने आपली व्यथा मांडली.
वैशाली हसली आणि म्हणाली,
" भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या भीतीपोटी थांबून राहणं चुकीचं आहे. चल, मी तुला शिकवते. बदल हा शत्रू नसून तो आपला मित्र आहे."
वैशालीने अँप ओपन केलं. तिने अनुराधाला तिचा स्मार्टफोन हातात घ्यायला लावला. सुरुवातीला अनुराधाचे हात थरथरत होते. तिला वाटलं की फोनला स्पर्श केला की काहीतरी बिघडेल. पण हळूहळू, वैशालीच्या मार्गदर्शनाखाली तिने पहिलं बिल ऑनलाईन भरलं. जेव्हा फोनवर 'Success'असा मेसेज आला, तेव्हा अनुराधाच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ते एखाद्य युद्ध जिंकल्यासारखं होतं.
तिला जाणवलं की, आपण ज्या बदलाला राक्षस समजत होतो, ते तर आपलं आयुष्य सोपं करणारं साधन होतं. पण हे तर फक्त पहिलं पाऊल होतं. अनुराधाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. तिला फक्त बिलं भरायला शिकायचं नव्हतं, तर तिला या बदलत्या जगासोबत स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची होती.
तिने ठरवलं की आता ती मागे वळून बघणार नाही. ती राहुलला म्हणाली,
" राहुल, मला तो लॅपटॉप कसा सुरू करायचा ते शिकवशील? मला काहीतरी नवीन शोधायचं आहे."
" राहुल, मला तो लॅपटॉप कसा सुरू करायचा ते शिकवशील? मला काहीतरी नवीन शोधायचं आहे."
राहुल चकित होऊन तिच्याकडे बघतच राहिला. अनुराधाच्या डोळ्यांत आता भीती नव्हती, तर एक नवी जिज्ञासा होती. पुढच्या दोन महिन्यांत अनुराधा काय चमत्कार करणार होती, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा