बालपण व तरुणपण

Reality
शाळेत केलेल्या खोड्या म्हणजे बालपण,
कॉलेजचा राडा म्हणजे तरूणपण,
बालपण म्हणजे पाणी अवखळ,
तारुण्य म्हणजे रक्तातली सळसळ.

उत्साह बालपणीही, उत्साह तारुण्यातही,
फक्त, लहानपणी ती चंचलता, तर यौवनात तो उन्माद,
काय माहित जमेल का,
पुन्हा लहान होणं या जन्मात.

तारुण्य म्हणजे अफाट संधी,
बालपण म्हणजे आजीची मांडी,
बालपण म्हणजे सापशिडीचा खेळ,
तारुण्यात मज्जा की भविष्य? बसतच नाही मेळ.

"बाबा येताना खाऊ घेऊन या"
हक्काने सांगण म्हणजे बालपण,
"आता आपण मोठे होतोय व बाबा लहान"
ही असते तारुण्यातली जाण.

कितीही त्रास झाला तरी,
'चलता है' म्हणत टाळून देतो,
जबाबदारीच्या ओझ्याखाली,
आपण स्वतःलाच विसरून जातो.

तारुण्याच्या ह्या टप्प्यावर,
जीवन छटांचा शोध आपण घेतो,
तरी, लहानपण पुन्हा यावं,
म्हणुन आपण झुरत राहतो.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →