घे ssss तुझा चवदार केक. हजार रुपयांची नुसती क्रीमच चोपडली आहे त्याला. कुठूनही कापा पोकळ नुसता.
हातातल्या केकचा बॉक्स टेबलावर भिरकावून मोरे बाई निकितावर खेकसल्या.
हातातल्या केकचा बॉक्स टेबलावर भिरकावून मोरे बाई निकितावर खेकसल्या.
त्यांचा तो अवतार पाहून निकिता गोंधळलीच.
पण हा केक तर चांगला....
तुम्ही गप्प बसा विजयभाऊ .
ऑर्डर घ्यायच्या आधी तुमच्या बायकोने भरपूर केक पुराण ऐकवलं. आता अजून ऐकायची हिंमत नाही माझी. आताच्या आता माझे पैसे परत करा.
विजयला म्हणजे निकिताच्या नवऱ्याला बोलण्याची संधी न देताच मोरे बाई पैसे मागू लागल्या.
त्यांचा हा गोंधळ ऐकून बाहेरचे २-३ रिकामटेकडे उगीचच डोकावू लागले म्हणून निकिताने गपचूप पर्स मधून हजार रुपये काढून मोरे बाईंना दिले. तश्या तोंड वाकडं करून त्या निघून गेल्या.

झालं तुझ्या मनासारखं वागून ? सांगितलं होतं ना मी हे केक-बिक बनवणं आपलं काम नाही . केकचा आणि आपला संबंध फक्त वाढदिवसापुरता. तो पण रेडीमेड केकशी. त्यामुळे उगाचच लोकांच्या मागे लागून ऑर्डर घेणं बंद कर.
विजय चिडून निकिताला म्हणाला तशी निकिताने आपली चूक कबूल करत मान डोलावली.
विजय चिडून निकिताला म्हणाला तशी निकिताने आपली चूक कबूल करत मान डोलावली.
२ दिवसानंतर ....
विजय संध्याकाळी घरी आला आणि पाहतो तर काय निकिताच्या पुढ्यात वाटाण्याच्या शेंगांचा डोंगर.
हे काय निकिता एवढ्या शेंगा कशाला निवडत बसलीस ? आणि स्वस्तात मिळाल्या म्हणून अख्खी भाजीची टोपलीचं विकत घेतलीस का ? की कोणी पाहुणे येणार आहेत जेवायला ?
विजय काहीशा आश्चर्याने म्हणाला.
विजय काहीशा आश्चर्याने म्हणाला.
नाही. मी उद्यापासून ११ लोकांना सकाळचा टिफीन देणार आहे त्यामुळे ते ११ आणि आपण २ असा १३ लोकांचा स्वयंपाक आता रोजचं होणार . निकिताने भरभर शेंगा सोलत शांतपणे उत्तर दिले.
अगं पण तुला हे तरी जमेल का ? आणि ११ लोक मिळाले तरी कसे ? खो खो हसत विजय म्हणाला.
इथून तिथून ओळखीवर मिळविले मी आणि तसही केक चा आणि माझा रोजचा संबंध नसला तरी जेवण बनवण्याशी आहे त्यामुळे उगाच मला टोकू नकोस.
निकिता ठामपणे म्हणाली.
निकिता ठामपणे म्हणाली.
खरंतर विजय सकाळीच ऑफिसला निघून गेल्यानंतर निकिता भरभर कामं उरकायची. त्यानंतर तिचा संपूर्ण दिवस लोळण्यात आणि मोबाईल पाहण्यातच जायचा त्यामुळे तिला आता कंटाळा येऊ लागला होता.
विजयने तिला एखादी नोकरी करण्याचे सुचवले होते पण तिला त्यात इंटरेस्ट नव्हता.
विजयने तिला एखादी नोकरी करण्याचे सुचवले होते पण तिला त्यात इंटरेस्ट नव्हता.
एकदा असंच मोबाईल चाळत असताना तिला तिच्या माहेरची मैत्रीण नीलमचे फेसबुक पेज दिसले.
नीलमने त्या पेजवर आपल्या घरगुती वाळवणाच्या व्यवसायाची जाहिरात केली होती. शिवाय कस्टमर्सचे चांगले फीडबॅक , प्रत्येक पोस्टला असणारे लाइक्स , व्हीव्स, त्याखालील लोकांचा कमेंटरुपी प्रतिसाद हे सर्व पाहून अल्पावधीतच तिचा व्यवसाय भरभराटीला आल्याचे निकिताला समजले.
शेजारी राहत असताना कायम शांत आणि लाजरी असणारी नीलम रेकॉर्डेड व्हिडिओमधे प्रत्येक पदार्थाची धडाधडा माहिती देत होती. मधेच अस्खलितपणे इंग्रजी शब्द वापरत होती. लोकांच्या शंका सहज दूर करत होती.
आत्मविश्वासाने ठासून भरलेली ही नीलम आणि तिचा वाढता व्यवसाय पाहून निकिताला आश्चर्य वाटले आणि शेवटी तिनेही मनाशी असाच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

विजयला याचा काहीच त्रास नव्हता फक्त त्याचे म्हणणे होते की जे झेपेल तेच कर ते ही व्यवस्थित शिकून .
नेमकी हीच बाब निकिताने गांभीर्याने घेतली नाही .
नेमकी हीच बाब निकिताने गांभीर्याने घेतली नाही .
आजकाल जे काही करायचं, आहे शिकायचं आहे ते सर्व यूट्यूब वर तसेच इतर सोशल साईड वर उपलब्ध आहे . तेच बघून करता येईल असा विचार करून निकिताने आधी घरगुती केकचा व्यवसाय सुरू केला .
यूट्यूब वर पाहून पाहून सुरुवातीला १-२ जणांना छोटे केक करून दिले. त्यांचा चांगला प्रतिसाद पाहून तिने मोरेबाईंच्या मागे लागून त्यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या केकची ऑर्डर घेतली आणि तिथेच ती फसली. केक चांगला आकर्षक दिसावा म्हणून भरपूर आयसिंग क्रीम फासले.परिणामी चव बिघडली आणि व्यवसाय सुरू होण्याआधीच बंद करावा लागला होता.

हे सर्व आता विसरून
दुसऱ्या दिवशी पहाटे निकिता लवकर उठली . एकीकडे मोठ्या टोपात मसाला परतून भाजी शिजत टाकली तर दुसरीकडे भराभर पोळ्या लाटल्या , भाजल्या आणि ११ डबे भरून तयार केले.
तिची मेहनत पाहून विजयला कौतुक वाटले .
१५ दिवस असेच सुरळीत पार पडले. माफक दर आणि चांगले जेवण यामुळे तिच्या ग्राहकांची संख्या वाढली.आता एकटीने भार झेपेना म्हणून तिने स्वयंपाकाला एक आणि भांडी कामाला एक अशा मदतनीस लावल्या .
महिना भरत आला तसे तिने ग्राहकांकडून पैसे मागायला सुरुवात केली. हातांच्या बोटावर मोजता येतील इतक्या संख्येच्या प्रामाणिक लोकांनी पूर्ण पैसे दिले तर काही जण आज - उद्या करत टाळाटाळ करू लागले. सुरुवातीलाच आम्ही अँडव्हान्स दिले आहेत आता थोड्या दिवसांत देतो, अजून पगार नाही आला, दोन महिन्यांचे देतो एकदम, अशी कारणं मिळू लागली तर काहींनी तिचे फोन उचलणेचं बंद केले.
मेहनतीच्या तुलनेत मिळणाऱ्या बिन भरवशाच्या मोबदल्यामुळे दोनचं महिन्यात तिला हा व्यवसाय गुंडाळावा लागला.

१० दिवस कसेबसे गेल्यानंतर एकदा विजय घरी आला तेव्हा संपूर्ण घर थोड्या फार खेळण्यांनी, भिंतीवर काही ठिकाणी लावलेल्या कार्टून्स तसेच चित्रांनी सजवलेले होते.
त्याला घरात शिरलेलं पाहून निकिता उत्साहाने काहीतरी बोलणार इतक्यात विजय म्हणाला, निकिता प्लीज आता तू बालवाडी सुरू करणार असं म्हणू नकोस हा.
निकिता - बालवाडी नाही रे. पाळणाघर म्हण. आज दुपारी सावंत वहिनींच्या आईंची तब्येत बिघडली म्हणून छोट्या विहानला माझ्याकडे सोपवून त्या हॉस्पिटलला गेल्या. मस्त खेळला, मग पोटभर जेवून झोपला तो . म्हणून मी पाळणाघर सुरु करणार आहे म्हणजे काही टेन्शनचं नाही.
तिने सांगितल्याप्रमाणे खरोखर दोनचं दिवसात आसपासच्या ओळखीतली ५-६ मुलं आली. आठवडाभर चांगला गेला मग मात्र मुलांची जशी गट्टी जमली तशी अधिकच ती दंगामस्ती करू लागली. यामुळे त्यांच्या
खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, त्यांनी केलेला पसारा आवरण, अपुरी झोप , थकवा ही कारणं देत निकिताने हा ही व्यवसाय महिनाभरात बंद केला.
खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, त्यांनी केलेला पसारा आवरण, अपुरी झोप , थकवा ही कारणं देत निकिताने हा ही व्यवसाय महिनाभरात बंद केला.
सलग आलेल्या अपयशामुळे निकिता फार खचली . विजयने तिची मनस्थिती ओळखून तिचे सांत्वन केले तसे निकिताला रडूच कोसळले.
मी इतकी मेहनत घेतली पण काहीच जमले नाही. माझंच नशीब फुटकं.
असे म्हणत तिने विजयला नीलमचे उदाहरण दिले.
मी इतकी मेहनत घेतली पण काहीच जमले नाही. माझंच नशीब फुटकं.
असे म्हणत तिने विजयला नीलमचे उदाहरण दिले.
आता मात्र विजयने कपाळाला हात मारला.
निकिता तू मेहनत जरूर घेतलीस पण व्यवसाय करणं ही तुझी गरज कधीच नव्हती.
एकप्रकारे आवड किंवा टाईमपास हा तुझ्या व्यवसायाचा उद्देश झाला होता.
एकप्रकारे आवड किंवा टाईमपास हा तुझ्या व्यवसायाचा उद्देश झाला होता.
निकिता - म्हणजे ?
विजय तिला जवळ घेत म्हणाला, म्हणजे एखादा व्यवसाय लगेच नावारूपाला नाही येत. त्यासाठी लोकांचा विश्वास, गुणवत्ता , चांगला नफा आणि महत्त्वाचे म्हणजे नियोजन याची गरज असते जे की तू कधीच केले नाहीस.
वेळ घालवायला, झटपट लाईक्स मिळवायला किंवा दुसरे करतात म्हणून करायला एका पाठोपाठ एक व्यवसाय सुरू करत बसलीस.
वेळ घालवायला, झटपट लाईक्स मिळवायला किंवा दुसरे करतात म्हणून करायला एका पाठोपाठ एक व्यवसाय सुरू करत बसलीस.
आणि याउलट नीलमचं उदाहरण घे. तिने नवऱ्याची नोकरी गेल्यामुळे घराला हातभार लागावा म्हणून वाळवणाची कामं सुरू केली . तिच्यापुढे पर्याय नव्हता. ते कामचं तिची गरज होती म्हणून ती टिकली.
तुला जर खरंच गरज असती तर पहिल्यांदा जेव्हा तुझा केकचा प्रयोग फसला तेव्हाच तू सुधारणा केली असतीस पण तसं झालं नाही कारण तुला खरी गरजचं नव्हती.
तुला जर खरंच गरज असती तर पहिल्यांदा जेव्हा तुझा केकचा प्रयोग फसला तेव्हाच तू सुधारणा केली असतीस पण तसं झालं नाही कारण तुला खरी गरजचं नव्हती.
विजयचे बोलणे निकिताला पटले आणि तिला जाणीव झाली की
आपल्यासाठी हा फक्त पुढे जाण्याचा प्रयोग होता पण नीलम आणि अशा इतर लोकांचा हा जगण्याच्या मार्ग आहे त्यामुळेच ते या व्यवसायात टिकून आहेत.
आपल्यासाठी हा फक्त पुढे जाण्याचा प्रयोग होता पण नीलम आणि अशा इतर लोकांचा हा जगण्याच्या मार्ग आहे त्यामुळेच ते या व्यवसायात टिकून आहेत.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने