Login

गोडवा नात्यातला

गोडवा नात्यातला
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय:- लेकी बोले सुने लागे

"वसुधा... अग आज सोनल येणार आहे तर जेवनात गोड धोड कर काहीतरी, आणि हो तिला आवडतात तशी मिरची भजी पण बनव..."
कांताबाई सकाळी सकाळी त्यांच्या सुनेला सांगत बोलल्या.

"हो आई करते, हा घ्या तुमचा चहा..."म्हणत वसुधा ने तिच्या हातात चहाचा कप दिला. व ती स्वंयपाकघरात निघून गेली.

सकाळची दुपार झाली ती किचन मध्येच होती.
"वसुधा अग तिने काही फोन बिन केला होता का ग अजून कशी काय आली नाही..? "कांताबाई विचार करत बोलल्या

"नाही आई मला तर नाही केल्या फोन ताईने.." म्हणत ती किचन मधून बाहेर आली व ती तिच्या रुममध्ये जातच बोलली.

"मी बघते करते त्यांना कॉल..." म्हणून ती रूममध्ये गेली.
तेवढ्यात सोनल दारात येऊन उभी होती.

"आई..." तिने हाक मारली..

"अग आलीस तू मी कधीची तुझी वाट बघतेय.... मी आत्ताच वसुधा ला तुला फोन कर म्हणून सांगत होते..ये आत ये.. "म्हणत कांताबाई तिला हसून बोलु लागल्या.

"हो का पण मला तर फोन आलाच नाही.. खरच मला फोन करणार होती का ती कि असच तुला बोलली.." सोनल बोलली

"अग काही काय ती तुला फोन करायलाच गेलीय... वसुधा... अग ये बाहेर सोनल आली बघ..." म्हणत कांताबाई ने तिला आवाज दिला.

तशी वसुधा ही तिचे केस विंचरून बाहेर आली..

"ताई आलात या पाय धुवा ना..." वसुधा बोलली

"नाही नको धुतले मी मला येऊन ही वेळ झाला पण काय ग तू काय मेकप करत हैतीस कि काय.?"सोनल तिला टोमणा मारत बोलली.

"अहो नाही ताई ते केस धुतले होते ना सकाळी तर ते मोकळेच होते म्हणून ते जरा विंचरत होते. "वसुधा बोलली

"बर..बर... मग आई. काय म्हणतेय तुझी तब्येत..." म्हणत सोनल ने वसुधा कडे दुर्लक्ष केले व ती तिच्या आईशी बोलू लागली... तशी वसुधा ही लगेच स्वयंपाक घरात निघून गेली.

"ताई चहा घ्या..."म्हणत वसुधा ने तिच्यासाठी चहा बनवून आणला..

"चहा!!!मला काय चहा पाजवून लगेच पाठवणार आहेस कि काय ..?"सोनल बोलली..

तसा वसुधा चा चेहरा पडला.
"अहो नाही ते स्वंयपाक केला आहे, पण आल्या आल्या चहा करावा म्हणून केला, नको असेल तर असू द्या मी ताट वाढते जेवन करा मग..." वसुधा कांताबाई कडे पाहत बोलली.

"नाही नको आता केलाच आहेस तर पिते मी उगाच तुमच दूध, साखर अन चहा पत्ती वेस्ट कशाला.." सोनल बोलली व तिने चहा पिला..

वसुधा स्वंयपाकघरात जाऊन तिने त्या दोघीसाठी ताट लावले स्वतः साठी ही घेत होती पण परत तिची ननंद काहीतरी बोलेल म्हणून तीने स्वतः च ताट बाजूला ठेवल..

"आई..... ही काय काम करते कि तुलाच लावते ग... तसही मी तुला सांगत होते माझ्या ननंदेसोबत त्याच लग्न कर पण नाही तुला तर तुझ्या मुलाची आवड पसंद पडली होती, आता बघ ही कशी करते ते सगळ काही तुला लावून ती मस्त आराम करत असेल..." सोनल हळूहळू आवाजात बोलली.

"तसे काही नाही तीच करतेय सगळ मी काहीच करत नाही... " कांताबाई बोलल्या.

"आई.. ताई.. या जेवन वाढलेय... "म्हणत वसुधा ने त्या दोघी ला आवाज दिला..

"बघ आता ती सांगणार का या म्हणून इथे ही ती आणू शकली असती कि.. "सोनल बोलली

"अग काय तू इथे कुठे बसणार.. चल उठ आण तो कप इकडे... " कांता बाई जागेवरून उठत बोलल्या


"कशाला राहू दे ती नेईल कि येऊन.. "म्हणत सोनल परत तिच्या हातातला कप तिथेच ठेवून स्वंयपाकघरात निघून गेली.

"ताई या बसा .."म्हणत वसुधा ने तिच्यासाठी आसन टाकले...
सकाळपासून राबुन तिने तिच्या ननंदेसाठी पुरणपोळीचा स्वंयपाक केला होता.
ते पाहून सोनल ने नाक मुरडले.

"आई काय हे मला वाटले होते काहीतरी छान बनवल असेल पण हे काय पुरणपोळी.. " सोनल बोलली

"का ताई तुम्हाला नाही आवडत का ते मागे एकदा आई बोलल्या होत्या की तुम्हाला पुरणपोळी आवडते म्हणून.. म्हणून मी बनवली... "वसुधा बोलली

"आवडत होती पण आता नाही आवडत... पण आता तु बनवली आहेत म्हणून खाते तसही मी गोड खायच बंद केलेय... अन आता दुसर तरी लगेच काय बनवणार आहे..." सोनल बोलली व त्या दोघी जेवन करू लागल्या.

"वसुधा तुही घे ही सोबतच .."कांताबाई बोलल्या

"अग आई नंतर जेवेल कि ती आपल्याला काही हव नको ते बघायला लागेल कि..." सोनल लगेच बोलली

"हो आई तुम्ही जेवा मी नंतर जेवन करते.."म्हणत वसुधा हसून बोलली.

त्या दोघीची जेवन झाली तशा त्या दोघीही हात धुवून उठल्या..
वसुधा तिच्यासाठी ताट घेत होती....

"अग हे काय ही मुसरी भांडी अशीच ठेवून जेवन करणार आहेस का आता ?"सोनल तिच्याकडे पाहत बोलली.

"नाही ताई ते मी.. घासते.. "म्हणत ती जागेवरून उठत होती..

"वसुधा बस तू जेवन कर आधी नंतर घासता येईल ती भांडी, नाही लागणार भांडी आता कोणी नाही जेवायच.."म्हणत कांताबाई बोलल्या

"पण आई. ते मी... "म्हणत वसुधा बोलत होतीच कि..

"तू बस जेवन कर आधी सकाळपासून काहीच खाल्ल नाहीस तीन वाजून गेलेत बस खाली कर जेवन तू... मी वाढते.." कांताबाई बोलल्या.

"आई अग तू का वाढतेय तिच ती घेईल कि तिच्या हाताने..." म्हणत सोनल बोलली

"हो आई मी घेते तुम्ही जा ताईसोबत बसा... मी जेवन करून येते लगेच.." वसुधा हसून बोलली

"बर निवांत जेव.. "म्हणत कांताबाई बाहेर निघून गेल्या.

"आई काय चाललेय तुझे.. तु का तिची हांजी हांजी करतेय... ती तुझी सून आहे, तु तिची सून नाही... सासू सारख राह कि जरा..." सोनल तिच्या आईला सांगत लागली..

"सासू सारख म्हणजे कस ग.. ?
जशी तु माझी मुलगी तशी ती ही कोणाची तरी मुलगी आहे ना... जर तुझी सासू तुला तशी वागवत असेल जशी तु मला वागायला सांगते तर तुला काय वाटेल तू कशी राहशील त्या घरात.? सतत स्वतः चा विचार करायचा का ग.?

कधीतरी तु तुझ्या सासू च्या बाजूने ही विचार केला आहेस का? कि त्यांना काय वाटतेय... जसे तु मला सांगतेय आराम करत जा वेळच्या वेळी जेवन करत जा तसेच तू तुझ्या सासूला सांगते का.? त्यांची काळजी घेते का.? हे बघ सोनल मला माहीत आहे तुला तुझी वहिणी म्हणून तुझ्या ननंदेला या घरात आणायच होत पण जे नशीबात असत, ज्याची जोडी बांधली गेली त्याच्याशीच लग्न होत असत... तुझी ननंद तुझी वहिणी झाली नाही म्हणून तू हिच्याशी अशी वागणार का.?
अग ती तू येणार म्हणून सकाळपासून तुझ्यासाठी तुझ्या आवडी निवडी जपत आहे अन तू आहेस कि तिला एक शब्द सरळ बोलत नाहीस..

अन काय ग तू काय आमच्या दोघीत भांडण लावायला आली आहेस का. ? हे बघ कोणतेही नाते दोन्ही बाजूने जपले तरच ते निभावत,
नाही तर त्यात अंतर पडत ,मन दुरावतात अन ते कधी तुटेल हे सांगता येत नाही. "कांताबाई तिला समजावून सांगत होत्या.

"आई पण मी तर तुझ्याचसाठी सांगत होते.. " सोनल बोलली

"हो मान्य आहे पण ते सांगण्याची ही काहीतरी पद्धत असते ज्याप्रमाणे तू बोलतेयस त्याने आम्हा सासू सूनेमध्ये प्रेम नाही तर राग अन तिरस्कार वाढेल... अन तुझ्याप्रती तिच्या व माझ्या मनात ही राग निर्माण होईल... तू या घरची पाहुणी आहेस.
अन पाहुणी आले कि घर आनंदाने भराव पण जर तू अशी बोलत राहिली तर आनंद तर दिसणार नाहीत उलट कलह वाढतील..
तुझ्या मनातला तिच्या बद्दलचा जो राग आहे तो काढ अन तिला मोठ्या मनाने स्विकार कर...." कांता बाई बोलल्या.. तशी ती फक्त शांत बसून ऐकत होती.


"ताई..... हे घ्या तुमच्यासाठी ,मी अन हे बाहेर गेलो होतो तेव्हा ही साडी आणली होती..." म्हणत वसुधा ने सोनल च्या हातात साडीची एक बॅग दिली...
सोनल तिच्याकडे पाहतच राहिली.

"काय झाले ताई आवडली नाही का...? "वसुधा विचारू लागली.

"नाही छान आहे... सॉरी... वसुधा..." सोनल गहिवरून बोलली

"ताई अहो काय झाले तुम्ही का सॉरी बोलताय माझ काही चुकल का तुमच्या डोळ्यात पाणी का आलेय.?"म्हणत वसुधा तिला विचारू लागली.

"अग नाही तुझ काही चुकल नाही उलट माझच चुकल, मी तुझ्यावर विनाकारण राग काढत होते तुझी काहिच चूक नसताना पण तरी तू माझा मान ठेवत राहिलीस..... "सोनल तिच्या कडे पाहत बोलली

"ताई अहो काही काय मोठ्याने आशिर्वाद द्यायचे असतात माफी मागायची नसते... "म्हणत ती हसून बोलली

"बघ बघितलेस का माझी सून कीती समजदार आहे ते..." म्हणत कांता बाई ही हसून बोलल्या.... व त्या तिघीमध्ये एक मैत्रीचे नाते विणले गेले.
✍️स्वागंधरा



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →