Blind Date=13

Blind Date

आकाशने तिच्या कानाच्या पाळीजवळ ओठ नेले आणि हळूवारपणे दातांनी तिथे स्पर्श केला. "आजही तुझा हा उसासा आणि तुझ्या शरीराचा हा सुगंध... मला बेधुंद करतोय!"

​साराचा संयम आता पूर्णपणे सुटत चालला होता. ती खुर्चीवरून उठली आणि थेट आकाशच्या छातीवर टेकली. तिने अंधारातच त्याचे दोन्ही व्हाईट जॅकेटचे कॉलर पकडले आणि त्याला स्वतःकडे ओढले.
​"तुम्ही खूप वलगर आहात, मिस्टर-A..." ती त्याच्या अगदी जवळ जात म्हणाली. दोघांच्या ओठांमधील अंतर आता अवघ्या एका इंचाचे उरले होते.

​"आणि तू खूप रोमँटिक आहेस, मिस-S..." आकाशने तिच्या कंबरेभोवती दोन्ही हात टाकले आणि तिला स्वतःमध्ये घट्ट आवळून घेतले.

​दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्शले. तो केवळ एक किस नव्हता, तर प्रवासात साचलेला संकोच, दिवसभराची तडप आणि अंधारातील तो थरार यांचा एक स्फोट होता!
आकाशने तिला  उचलून तिला त्या लाकडी टेबलच्या कडेवर बसवले.
साराने आपले दोन्ही पाय त्याच्यात घट्ट गुंफले...

​अंधारात, समुद्राच्या मंद वाऱ्यात आणि मेणबत्तीच्या विझणाऱ्या प्रकाशात... व्हाईट सूटमधील आकाश आणि रेड ड्रेसमधील सारा एकमेकांच्या बाहुपाशात पूर्णपणे विलीन झाले होते.

​आकाशचे हात तिच्या रेड ड्रेसच्या झिपवर   सरकत होते, तर सारा त्याच्या  जॅकेटची बटणे एकामागून एक उघडत होती...

​"चला माझ्या रूमवर... आता हा अंधार मला इथे अपुरा पडतोय!" सारा त्याच्या गालावर किस करत, अडखळत्या श्वासाने कानात पुटपुटली.

​आकाशने तिला तसंच उचलून घेतलं. तिचे पाय त्याच्या पायाला आवळलेले होते. तो त्या अंधाऱ्या बीचवरून, कोणाच्याही नजरेस न पडता, वेगाने आपल्या रिसॉर्टच्या रूमकडे (Room No. 303) पावले टाकू लागला.

त्या हलक्या गुलाबी प्रकाशात खोलीतील वातावरण अधिकच उत्कट, कामुक आणि रहस्यमय झाले होते. अस्पष्ट दृश्यांमध्ये दोघांचे चेहरे अजूनही धूसर दिसत होते, पण एकमेकांच्या शरीराची उष्णता आणि श्वासांचा वेग मात्र स्पष्ट जाणवत होता.

​सोफ्यावर बसलेल्या आकाशने तिचा हात घट्ट पकडून स्वतःकडे खेचताच, सारा थेट त्याच्या मिठीत कोसळली. तिचा तो लालभडक ड्रेस त्याच्या पांढऱ्या कपड्यांवर पसरला. दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी काही इंचांच्या अंतरावर आले.

​आकाशने तिच्या पाठीवर आपले दोन्ही भक्कम हात ठेवले आणि तिला स्वतःवर घट्ट आवळून घेतले. गुलाबी प्रकाशात तिच्या ओठांची लालस चमक पाहून त्याच्यातील संयम पूर्णपणे सुटत चालला होता.
आकाश," आज wild करायचंय?

​"वाईल्ड म्हणजे... नक्की काय करणार आहेस तू?" साराने त्याच्या छातीवर हात ठेवत, किंचित धडधडत्या हृदयाने आणि श्वास सावरत विचारले.
​आकाशने एक मंद, कामुक हास्य केले. त्याने तिचा एक हात हातात घेतला आणि तिच्या बोटांना आपल्या ओठांनी चुमले. मग तो तिच्या कानाजवळ झुकला. त्याच्या गरम श्वासाने साराच्या अंगावर पुन्हा एकदा शहारा आला.
​"वाईल्ड म्हणजे... कोणताही विचार न करता, भूतकाळ किंवा भविष्याची भीती न बाळगता, फक्त आणि फक्त या क्षणात, या गुलाबी अंधारात एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून जाणे..." आकाश कानात पुटपुटला.

​असं म्हणताच, आकाशने  झिप एकाच झटक्यात खाली सरकवली. तो मऊ कपडा तिच्या खांद्यांवरून खाली घसरला. साराच्या तोंडून एक लहानसा स्वर बाहेर पडला.

तिनेही क्षणाचाही विलंब न लावता बटणे आवेगाने उघडायला सुरुवात केली.

​आकाशने तिला सोफ्याच्या पाठीला टेकवले आणि तिच्या गळ्यापासून ते तिच्या कॉलरबोनपर्यंत आपल्या ओठांचा आक्रमक, पण अत्यंत सुखावणारा स्पर्श दिला. त्याच्या ओठांचा आणि दातांचा तो हलकासा दंश अनुभवताना साराने आपले डोळे मिटून घेतले आणि तिचे हात आकाशच्या केसांत घट्ट रुतले.
​"उफ... मिस्टर-A!" सारा बेधुंद होऊन पुटपुटली.

​आकाशने त्या सुंदर उभारावर आपल्या प्रेमाचा आणि आक्रमक स्पर्शाचा वर्षाव सुरू केला. गुलाबी प्रकाशात दोघांची शरीरे एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झाली होती...

​तिचा प्रत्येक स्वर आणि तिची प्रत्येक हालचाल आकाशला अधिकच आक्रमक बनवत होती.

साराने त्याच्या दंडावर नखे रोवत त्याला अजून जवळ ओढले. त्या सोफ्यावर, त्या अस्पष्ट गुलाबी अंधारात, दोघांमधील तो थरारक,  आणि 'वाईल्ड' रोमान्स आता सर्व सीमा ओलांडून एका बेधुंद शिखराकडे सरकत होता!


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →