Blind Date=10

Blind Date

आकाशच्या त्या अत्यंत हळूवार आणि काळजीयुक्त प्रश्नाने साराच्या हृदयाचा बांध पूर्णपणे फुटला होता...

​तीन वर्षांच्या त्या तुटलेल्या नात्यात, टोमण्यांमध्ये आणि एकाकीपणात तिला फक्त उपेक्षाच मिळाली होती. पण आज, अंधारात असलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या रूपात तिला ते प्रेम आणि सन्मान मिळत होता, ज्याची ती आयुष्यभर भुकेली होती...

​तिच्या डोळ्यातून घळघळा वाहणारे ते उबदार अश्रू आकाशच्या हाताच्या पंजावर पडताच तो क्षणार्धात थांबला. त्याने स्वतःचे शरीर सावरत एका हाताने तिचे मऊ गाल आणि डोळे अत्यंत प्रेमाने पुसले...

​"काय झालं बच्चा? त्रास होतोय का गं तुला? मी थांबवू का?" आकाशच्या आवाजात प्रचंड काळजी आणि व्याकुळता होती...

​साराने अंधारातच मान नकारार्थी हलवली. तिने आकाशचा चेहरा आपल्या दोन्ही ओंजळीत घेतला आणि हुंदका आवरत म्हणाली, "नाही रे... त्रास नाही होतये. एवढं प्रेम... एवढी काळजी... आजवर माझ्यावर कोणीच नाही केली रे! थँक्यू... थँक्यू सो मच जान!"

​तिचे हे शब्द ऐकून आकाशचेही मन भरून आले. त्याने तिच्या कपाळावर एक दीर्घ, उबदार आणि आदरयुक्त चुंबन घेतले.

​"तू खूप खास आहेस मिस-S... आणि तुझी काळजी घेणं, तुझ्या प्रत्येक भावनांचा आदर करणं हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे," आकाश तिच्या कानाजवळ हळूवारपणे पुटपुटला.

​त्या भावनिक क्षणाने दोघांमधील शारीरिक नात्याला एका वेगळ्याच अध्यात्मिक आणि आत्मिक शिखरावर नेऊन ठेवले होते. साराने आपल्या वेदना आणि अश्रू विसरून आकाशला अधिक घट्ट मिठीत आवळले...

​आकाशनेही आता अत्यंत हळूवार, लयबद्ध आणि प्रेमाच्या आवेगाने तिच्यासोबतचा तो प्रवास पुढे सुरू केला. खोलीतल्या त्या अंधारात, दोघांचे श्वास पुन्हा एकदा एकमेकांत मिसळले. आता त्या समागमात फक्त शारीरिक भूक नव्हती, तर दोन दुखावलेल्या आत्म्यांचे एकमेकांना दिलेले प्रेमाचे आणि विश्वासाचे अमूल्य वचन होते..

रात्रीच्या त्या असीम, बेधुंद आणि उत्कट क्षणांनंतर पहाटेचा अस्पष्ट, मंद अंधार हळूहळू खोलीत उतरू लागला होता. हवेत एक छान गारवा होता. दोघांचेही शरीर आणि मन रात्रभराच्या त्या तृप्त मिलनाने पूर्णपणे शांत झाले होते...

​ठरल्याप्रमाणे, सूर्य पूर्णपणे उगवून परस्परांचे चेहरे स्पष्ट दिसण्याआधीच दोघांनी निघण्याचा निर्णय घेतला.

​खोलीतील अंधारातच दोघांनी आपापली वस्त्रे परिधान केली. बाहेर पडताना आकाशने साराचा हात अत्यंत हळूवारपणे आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर एक शेवटचे उबदार चुंबन घेतले...

​"थँक्यू मिस-S... या अद्भूत रात्रीसाठी," आकाश मंद आवाजात म्हणाला.
​"थँक्यू मिस्टर-A... काळजी घे स्वतःची," सारानेही त्याच्या छातीवर हात ठेवत निरोप घेतला...

दोघांनीही बोलताना ऐकमेकांचा उलट्या हातावर  प्रेमाचा वर्षाव करत होते, अन शेवटी ओठांची अटोपती कीस घेतली..

​हॉटेलच्या पार्किंगमध्ये आल्यावर दोघे दोन वेगळ्या दिशांना वळले. आकाश स्वतःच्या बाईकवर स्वार झाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली, तर साराने आधीच बुक करून ठेवलेली कॅब तिथे येऊन पोहोचली होती.

दोघांनी अंधारातच एकमेकांकडे एक शेवटचा नजरकटाक्ष टाकला आणि आपापल्या घराच्या दिशेने निघून गेले.

​दिवसभर... दोन्ही घरांमध्ये एक वेगळीच अस्वस्थता पसरली होती.
​आकाश स्वतःच्या घरात, ऑफीसच्या कामात गुंतण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे लक्ष वारंवार मोबाईलच्या स्क्रीनकडे जात होते.

बाईक चालवताना, चहा पिताना किंवा अगदी शांत बसल्यावरही त्याच्या अंगावर रात्रीच्या त्या हळूवार स्पर्शाची उब पुन्हा जागी व्हायची. तिचा तो नैसर्गिक सुगंध, तिचे ते नाजूक हाक.. आणि "जान..." म्हणतानाचा तो कातर आवाज त्याच्या कानात सतत गुंजत होता.

​दुसऱ्या बाजूला साराचीही तीच अवस्था झाली होती. घरातल्या दैनंदिन कामात तिचे मन अजिबात लागत नव्हते. मानेवर आणि कंबरेवर उमटलेल्या त्या उबदार स्पर्शाच्या पाऊलखुणा तिला पुन्हा पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीची आठवण करून देत होत्या. तीन वर्षांच्या कोरडेपणानंतर मिळालेला तो प्रेमाचा आणि काळजीचा स्पर्श तिच्या मनाला प्रचंड भुरळ घालत होता...

​तिने अनेकदा मोबाईल हातात घेतला... व्हॉट्सॲप ओपन केले. 'मिस्टर-A' चे चॅट समोर होते. एक मेसेज करावासा वाटत होता— "काय करतोयस? आठवण येतेय..."
​पण तिची बोटे तिथेच थांबली.
​कारण दोघांनी 'ब्लॅक डेट'च्या सुरुवातीलाच एक कडक नियम ठरवला होता— "रात्र संपली की खेळ संपला. एकमेकांच्या पर्सनल लाईफमध्ये, नावात किंवा भूतकाळात अजिबात इंटरफेअर करायचे नाही. थेट गोव्याच्या ट्रिपच्या दिवशीच भेटायचे!"
​आकाशनेही मोबाईल हातात धरून कित्येकदा स्क्रीन ऑन-ऑफ केली. त्यालाही 'मिस-S' ला मेसेज करायचा होता. पण त्यानेही स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवला.
​दोघेही दिवसभर एकमेकांच्या आठवणीत तळमळत होते, एकमेकांसाठी व्याकुळ होत होते... पण त्या एका नियमामुळे दोघांमध्ये एक अथांग आणि गूढ मौन पसरले होते. हे मौन त्यांच्या मनातील ती ओढ आणि उत्सुकता गोवा ट्रिपसाठी अजूनच प्रचंड पटीने वाढवत होते!

दोघेही एअरपोर्टवर पोहोचले होते. प्रवासाच्या उत्साहापेक्षा दोघांच्याही मनात एकाच गोष्टीची उत्सुकता होती— आपल्या त्या गूढ आणि खास जोडीदाराला (मिस्टर-A आणि मिस-S) पुन्हा गोव्यात भेटण्याची!
​विमानाचे बोर्डिंग सुरू झाले आणि एअरपोर्टच्या गर्दीत अचानक दोघांची नजर एकमेकांवर पडली. क्षणभर दोघेही अत्यंत अवघडले!
​घटस्फोटानंतर आणि त्या पहाटेच्या निरोपानंतर दोघेही अशा प्रकारे प्रत्यक्ष समोरासमोर येतील अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. काय बोलावं हे दोघांनाही समजत नव्हतं. वातावरणातला तो अवघडलेपणा घालवण्यासाठी आकाशने तिला बघून एक हलकीशी स्माईल केली.
​सारानेही त्याच्याकडे पाहून औपचारिक स्माईल केली आणि विचारलं, "कसा आहेस?"
​"ओके... तू कशी आहेस?" आकाशने आवंढा गिलत विचारलं.
​"हो, ओके... चल, बाय!" असं म्हणून सारा घाईघाईने पुढे निघून गेली.
​दोघेही आपापल्या तिकिटांची अरेंजमेंट करून विमानात शिरले. आकाश आपल्या सीटवर येऊन बसला. मनात भूतकाळाच्या आणि माजी पत्नीला अचानक समोर बघून आलेल्या विचारांचे काहूर माजले होते. तो विचारातच असताना अचानक समोरून सारा हातात तिकीट घेऊन त्याच रांगेत येताना दिसली.
​आकाश मनोमन देवाचा धावा करत प्रार्थना करू लागला— "प्लीज नो... प्लीज नो! हिची जागा माझ्या शेजारी नसावी!"
​साराने तिची सीट पाहिली आणि शेजारच्या सीटवर आकाशला बसलेला बघताच ती क्षणाचाही विलंब न लावता दोन पावले पुढे गेली. ते पाहून आकाशला निश्वास सोडत हायसं वाटलं! पण पुढच्याच क्षणी साराचे शब्द त्याच्या कानावर पडले—
​"मॅम, कॅन यू प्लीज एक्सचेंज माय सीट?"
​आकाश आश्चर्याने आणि हैरानीने तिच्याकडे बघू लागला.
​एअरहोस्टेसने हसून उत्तर दिले, "मॅम, मी चेक करते. तोपर्यंत तुम्ही तुमच्या सीटवर बसून घ्या, जर दुसरी सीट अवेलेबल झाली तर मी तुम्हाला नक्की सांगते."
​साराने नाईलाजाने हलकीशी स्माईल दिली आणि आकाशच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली.
​दोघेही प्रचंड संकोचले होते. शेजारी बसूनही एकमेकांशी काय बोलावे हे दोघांनाही कळत नव्हते. आकाशने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहून हलकीशी स्माईल केली आणि आपला अवघडलेपणा लपवण्यासाठी मोबाईलमध्ये तोंड खुपसले. सारानेही खिडकीच्या बाजूला तोंड करत कानात हेडफोन लावले आणि गाणी ऐकू लागली.
​पण दोघांच्याही मनातील खरी धडधड वेगळीच होती!
​साराच्या मनात गोव्यात उतरून तिच्या 'मिस्टर-A' ला भेटण्याची प्रचंड एक्साईटमेंट होती. काल रात्री ज्या पुरुषाने तिच्या शरीरावर आणि मनावर प्रेमाचा वर्षाव केला होता, त्याला भेटण्यासाठी तिचे मन आतुर झाले होते.
​इकडे आकाशच्या मनातही तीच उत्कटता होती. आपली 'मिस-S' गोव्यात कुठे भेटेल, तिला प्रत्यक्ष पाहिल्यावर काय होईल, याच विचारात तो होता. शेजारी बसलेली स्त्री हीच त्याची 'मिस-S' आहे आणि समोर बसलेला पुरुष हाच तिचा 'मिस्टर-A' आहे, या सत्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेले ते दोघेही एकाच विमानात, एकमेकांच्या शेजारी बसून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होते.
​काही वेळातच पायलटची अनाऊंसमेंट झाली आणि दोघांचे विमान गोव्याच्या धावपट्टीवर उतरण्याची तयारी करू लागले!
एअरपोर्टवरील त्या धक्क्यातून आणि संकोचातून सावरत, दोघांनीही गोव्याला पोहोचण्यासाठी एकच कॅब शेअर करण्याचे ठरवले. प्रवासादरम्यान गाडी वेगाने रिसॉर्टच्या दिशेने चालली होती, पण दोघांच्याही मनात विचारांचे वादळ सुरू होते.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →