अंधाऱ्या खोलीत वातावरणात एक असीम शांतता पसरली होती. पहिल्या french kiss आणि उत्साहाच्या त्या उत्कट क्षणांनंतर आता दोघेही बेडवर विसावले होते.
आकाशने साराला अतिशय हळूवारपणे स्वतःच्या मिठीत घेतलं होतं. डिम लाईट्सही बंद असल्यामुळे खोलीत पूर्ण अंधार होता. तो तिच्या मऊ, रेशमी केसांवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवत होता.
"किती मऊ केस आहेत ग हे तुझे..." आकाशच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता.
त्याने अंधारातच तिचा चेहरा आपल्या दोन्ही ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर हळूच स्वतःचे ओठ टेकवले.
"तू शरीराने जेवढी सुंदर आहेस ना, नक्कीच तुझं हे रूप आणि मनसुद्धा तितकेच सुंदर आहे miss-S..."
साराने आकाशच्या दोन्ही हातांवर आपले नाजूक हात ठेवले आणि गलबललेल्या आवाजात म्हणाली, "आणि तू जेवढा निर्मळ मनाचा आहेस, तेवढा बहुधा या जगात कोणीच नसणार! थँक्यू..."
"ऑफ कोर्स!" आकाश मंद हसला, "बाय द वे, आता काय करायचं? आधी डिनर करायचं का?"
सारा अंधारातच चाचपडत त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली, "अंधारात जेवण जायला जाईल का तुला? म्हणजे... मच्छर वगैरे पडतील तर?"
आकाश हसत म्हणाला, "वेडी आहेस का तू? हॉटेलच्या बंद रूममध्ये कुठे आलेत मच्छर?"
"अरे ये! तुला खरच कळत नाही का? अंधारात खरंच मच्छर असतात!" सारा चिडल्याचं नाटक करत म्हणाली.
"ओके ओके..." आकाश हसू आवरत म्हणाला, "तू जेवून आली होतीस का?"
"ऑफ कोर्स!"
आकाश अडखळत म्हणाला, "सॉरी यार... तुझ्यासोबत जेवण्याच्या एक्साईटमेंटमध्ये मी जेवलंच नव्हतं! मी आपल्या दोघांसाठी पिझ्झा आणला होता... तू थोडासा शेअर तरी करशील ना? एखादे-दोन बाईट?"
"ऑब्वियसली!" सारा लगेच तयार झाली.
दोघेही अंधारातच चाचपडत एकमेकांचा हात घट्ट पकडून टेबलजवळ आले. पिझ्झाचा बॉक्स ओपन झाला. अंधार असल्यामुळे अंदाजानेच ते पिझ्झाचा तुकडा सॉसमध्ये बुडवून खाऊ लागले. कधी आकाश साराला भरवत होता, तर कधी सारा त्याला! जेवण संपल्यावर त्यांनी तिथेच बाऊलमध्ये हात धुतले आणि चेहराही पुसून घेतला.
आकाशने तिचा हात पुन्हा घट्ट पकडला आणि म्हणाला, "चला, तुला आपल्या मंजिलपर्यंत पोहोचवतो!"
"आपली मंजिल?" साराने न समजून विचारलं.
"ऑब्वियसली... आपला बेड!" आकाश हसत म्हणाला, आणि दोघेही अंधारात खळखळून हसले.
दोघेही हातात हात घालून पुन्हा बेडवर आडवे झाले. काही क्षण ते तसेच एकमेकांच्या मिठीत रुतून बसले होते. ती मिठीत येताच आकाश पुन्हा तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. मग त्याने हळूच तिच्या ओठांवर स्वतःच्या अंगठ्याने स्पर्श करत विचारलं, "तर... कसं वाटतंय?"
"खरं सांगू?" सारा म्हणाली.
"इथे खोटं सांगायची काहीच गरज नाही," आकाश अतिशय सहजतेने म्हणाला, "कारण आपल्या दोघांचे मत आपण केवळ ऐकणार आहोत, एकमेकांवर लादायला थोडेच आपण पती-पत्नी आहोत!"
पती-पत्नी हा शब्द ऐकताच साराच्या चेहऱ्यावरची हसू पळाली. ती शांत झाली.
आकाशला लगेच जाणवलं, "सॉरी यार! मी तुला दुखावलं का?"
"नाही... तू नाही दुखावलंस," सारा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, "काही गोष्टी असतात ज्या मनात जळत असतात, आणि वर्तमानकाळातील सुखाने त्यावर हळूच फुंकर मारली की ती धगधगती राख आणखी विकारासहित पेटून उठते."
आकाश विचारात पडला, "अच्छा! तुझे हे तत्त्वज्ञानाचे शब्द मला काही समजत नाहीयेत... सोड ते! मला सांग, तुला माझ्यासोबत या डेटिंग ॲपच्या 'ब्लॅक डेट' वर गोव्याला यायला आवडेल का?"
"गोव्याला?!" साराने आश्चर्याने विचारलं, "सॉरी यार... पण माझे आई-वडील परमिशन देतील की नाही, मला माहिती नाही."
"नक्की आई-वडील? की तुझा पती?" आकाशने शंका विचारली.
"नो! केवळ आई-वडील. पण तू जाणार आहेस का?"
"तू जर येत असशील तरच मी जाईन," आकाश प्रामाणिकपणे म्हणाला, "कारण त्या ॲपवर माझी एवढी काही ओळख झाली नाहीये. तिथे नवीन लोक, नवीन वातावरण... मला पटकन कोणावर विश्वास बसत नाही."
सारा आता त्याच्या गालावर स्वतःचा अंगठा हळूवार फिरवत म्हणाली, "पण काही गोष्टींवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? एक्साईटमेंटही वाढते याने!"
"तर मग... असं 'कपल' म्हणून आपण दोघं जायचं का?" आकाशने विचारलं.
सारा काही क्षण विचार करत राहिली. तिच्या मनात घरच्यांची, आई-वडिलांची भीती होती.
आकाश खोडकरपणे म्हणाला, "काय विचार करतेयस? तुझा नवरा नको म्हणत असेल म्हणून विचार करतेयस का?"
साराने अंधारात त्याच्या दिशेने पाहिलं आणि मनाशी ठाम होत म्हणाली, "आता त्याने नकार दिला किंवा हो म्हटलं, तरी मला थोडीच काही फरक पडणार आहे!"
तिने एक मोठा श्वास घेतला आणि चेहऱ्यावर एक बोल्ड स्माईल आणत म्हणाली, "जाऊ दे सगळं... आय एम कमिंग विथ यु टू गोवा!"
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
