लघुकथा लेखन स्पर्धा मे -जून 2026
विषय - रहस्य लघुकथा
विषय - रहस्य लघुकथा
"लवकर झोप नाही तर भोंग्याला बोलावते"अंजली बाळाला थोपटता थोपटता बोलत होती.
बाळ मस्ती करत होते.
"थांब बोलवतेच आता भोंग्याला.ये रे भोंग्या... लवकर...बाळाला..."
अंजलीचे हे शब्द बाजूला उभा
सहा वर्षाचा बालक सोहम ऐकत होता.
आणि आईच्या तोंडावर हात धरत म्हणाला,"अं हं असं बोलायचं नाही.
"नको येऊ रे भोंग्या ,आमचं बाळ शहाणं."
अंजली एकदम शहारुन गेली.

"किती भीती बसलीय त्याच्या बालमनात भोंग्याबद्दल."
"आई नको बोलवूस ना. सांग त्याला नको येवून म्हणून."
सोहम आईला अजीजीने विनवत होता.
थोड्यावेळात बाळाने डोळे लावले. आई सोहमला कुशीत घेऊन झोपली.
तसा सोहमचा प्रश्न ,"आई,भोंग्या कसा असतो?तो कुठे राहतो?
सोहम आईला अजीजीने विनवत होता.
थोड्यावेळात बाळाने डोळे लावले. आई सोहमला कुशीत घेऊन झोपली.
तसा सोहमचा प्रश्न ,"आई,भोंग्या कसा असतो?तो कुठे राहतो?
भोंग्या म्हणजे त्याच्यासाठी रहस्यच होते.
नाना प्रश्न विचारून तो तिला विचारात टाकत होता.
शेवटी तिने त्याला सांगितले,
"मी उद्या तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देईल आता मात्र झोप."
नाना प्रश्न विचारून तो तिला विचारात टाकत होता.
शेवटी तिने त्याला सांगितले,
"मी उद्या तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देईल आता मात्र झोप."
आज्ञाधारक बाळाप्रमाणे त्याने डोळे मिटले .अंजूला वाटले झोपला आता हा.म्हणून ती उठून बाहेर आली.
तो काय सोहम महाशयही मागोमाग तयार.
तोच ओसरीवर खुर्ची टाकून बसलेले आबा खेकसले,
तो काय सोहम महाशयही मागोमाग तयार.
तोच ओसरीवर खुर्ची टाकून बसलेले आबा खेकसले,
"तू कशाला आलास उन्हाचा बाहेर? आत जाऊन झोप लवकर. नाहीतर भोंग्या येईल. बोलावू का त्याला?"
सोहम अगदी कमरेवर हात देऊन आजोबांना म्हणाला,
"बोलवा .मला बघायचं आहे त्याला. "
सोहम अगदी कमरेवर हात देऊन आजोबांना म्हणाला,
"बोलवा .मला बघायचं आहे त्याला. "
अंजूला हसू आले आता मला नको बोलवू म्हणून अजीजी करणारा आता एकदम हमरीतुमरीवर येऊन सांगतोय 'बोलवा'.
"आमच्या बाळाला भीती दाखवतो . बघतोच त्याला आता."
"अच्छा, असं होय. हे कारण आहे तर."
पण अंजू विचारात पडली होती याला जर सांगितले की,
" काही नसतं रे भोंग्या म्हणजे फक्त तुम्ही ऐकावं ,लवकर झोपावं, हट्टीपणा करू नये म्हणून सहज भीती दाखवली जाते"
तर याला कशाचीच भीती उरणार नाही आता कमीत कमी भोंग्याच्या नावाने पटकन कोणतीही गोष्ट पटकन करून तरी घेतो.

आणि नाही सांगितले तर याच्या मनात भीती कायम कोरली जाईल आणि त्याचे दुष्परिणाम...
ती द्विधा अवस्थेत होती .
ती द्विधा अवस्थेत होती .
तोच सोहम त्याच्या आबाला विचारत होता ,
"कुठे आहे भोंग्या? कसा असतो तो? कुठे राहतो?"
"कुठे आहे भोंग्या? कसा असतो तो? कुठे राहतो?"
अंजली बघतच होती आबा काय उत्तर देतात ते.
"ती आपल्या मागील दाराजवळ बारदाण्याची खोली आहे ना तिथे असतो तो. लहान मुलांनी ऐकले नाही की तो त्यांना पकडून तिथे घेऊन जातो आणि शिक्षा करतो."
" आपला शंभू तर तिथेच बारदाना शिवत बसलेला असतो त्याला नाही पकडत का?मोठ्यांना नाही करत का शिक्षा?"
"करतो.
मोठ्यांनी ऐकले नाही की. पण मोठे ऐकतातच ना."
"करतो.
मोठ्यांनी ऐकले नाही की. पण मोठे ऐकतातच ना."
"खोटं बोलायचं नाही काल तर आजी तुम्हाला रागवत होती इथे उन्हाचं खुर्चीवर बसत जाऊ नका म्हणून.तरी तुम्ही ऐकलं नाही. इथेच येऊन बसतात. थांबा त्या भोंग्याला तुमचेही नाव सांगतो."
म्हणत त्याची स्वारी बारदाण्याच्या खोलीकडे वळली.
आजोबा आपले धोतर सावरत त्याच्यामागे धावले म्हणजे गेले.
म्हणत त्याची स्वारी बारदाण्याच्या खोलीकडे वळली.
आजोबा आपले धोतर सावरत त्याच्यामागे धावले म्हणजे गेले.
आज नेमका शंभू नव्हता खोलीला कुलूप होते.
"आजोबा चाव्या तुमच्याकडेच असतात ना उघडा बघू आता."
"आजोबा चाव्या तुमच्याकडेच असतात ना उघडा बघू आता."
आजोबांनी एक सेकंद विचार केला आणि कमरेच्या चाव्या काढून खोली उघडणार तेवढ्यात शंभू आला.
शंभूच्या कानात आबांनी काहीतरी सांगितले त्याला चाव्या दिल्या आणि कुलूप उघडले.
शंभूच्या कानात आबांनी काहीतरी सांगितले त्याला चाव्या दिल्या आणि कुलूप उघडले.
बाळ राजांचा हुरुप शिगेला होता.
भोंग्या बघायचा होता ना.
तोच पहिले आत गेला. नंतर शंभू आणि आजोबा गेले आजोबांनी त्याला हळूच सांगितले,
भोंग्या बघायचा होता ना.
तोच पहिले आत गेला. नंतर शंभू आणि आजोबा गेले आजोबांनी त्याला हळूच सांगितले,
"बाळ भोंग्या दिसत नसतो तो अदृश्य असतो त्याचा फक्त आवाज ऐकू येतो."
शंभू बारदानाच्या एका थप्पीच्या मागे लपून वेगवेगळे आवाज काढू लागला ते त्या खोलीत घुमत होते.
सोहमला भीती वाटण्याऐवजी कुतूहल निर्माण झाले.
तोही वेगवेगळे आवाज काढू लागला त्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येऊ लागला.
त्याचा जणू खेळच सुरू झाला.
त्याचा जणू खेळच सुरू झाला.
पण इकडे आजोबांची अवस्था मात्र 'तुमचा खेळ होतो आमचा जीव जातो' अशी झाली.
एक बारदानाच्या विशिष्ट थप्पीच्या खालून त्यांना खरोखरच विचित्र विचित्र आवाज ऐकू यायला लागले.
त्यांना माहीत होते त्याखाली लादनी आहे त्या लादनीच्या दारावरच ती बारदाण्याची थप्पी होती.
त्यांना घाम सुटला ते घाबरून गेले.
त्यांना माहीत होते त्याखाली लादनी आहे त्या लादनीच्या दारावरच ती बारदाण्याची थप्पी होती.
त्यांना घाम सुटला ते घाबरून गेले.
जणू काही शंभूच्या आणि सोहमच्या वेगवेगळ्या आवाजांनी ती अदृश्य शक्ती जागृत झाली होती.
ती लादनी सुरुवातीला वापरात होती पूर्वज उन्हाळ्यात तिथे थंड वाटते म्हणून जाऊन बसायचे आणि काम करायचे.पण नंतर जवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्याने त्यात ओल पकडली.
जीव जंतूंची उत्पत्ती व्हायला लागली कारण सूर्यप्रकाश येत नव्हता म्हणून ती लादनी बंद करून टाकली.
जीव जंतूंची उत्पत्ती व्हायला लागली कारण सूर्यप्रकाश येत नव्हता म्हणून ती लादनी बंद करून टाकली.
आता त्या गोष्टीला कितीतरी वर्ष उलटलीत.
आता हे काय नवीनच त्यातून चित्रविचित्र आवाज येत होते. आणि ते फक्त आजोबांनाच ऐकू येत होते शंभू आणि सोहमला नाही.
आता हे काय नवीनच त्यातून चित्रविचित्र आवाज येत होते. आणि ते फक्त आजोबांनाच ऐकू येत होते शंभू आणि सोहमला नाही.
त्यामुळे आजोबा घाबरून गेले.
त्यांना जुनं सगळं काही आठवायला लागले .
त्यांना जुनं सगळं काही आठवायला लागले .
त्यांची आजी त्यांना गोष्टी गोष्टीत सांगायची त्या भागात आपल्या पूर्वजांनी धन पुरून ठेवलेलं आहे. तिकडे भर दुपारी खेळायला जात जाऊ नका. संध्याकाळच्या वेळी जात जाऊ नका.
खूप दिवसांपूर्वी मंदाची पोरगी फेऱ्यात आली होती.तिला तिथे हंडे दिसायचे आणि मोठा नाग.
खूप दिवसांपूर्वी मंदाची पोरगी फेऱ्यात आली होती.तिला तिथे हंडे दिसायचे आणि मोठा नाग.
तेव्हापासून ती लादनी बंद करून टाकली.
त्या वयात आजीच्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा वाटायच्या.
त्या वयात आजीच्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा वाटायच्या.
पण आता आजोबांनी घड्याळ पाहिले नेमके बारा वाजले होते. त्यांना घाम फुटला. त्यांनी ओरडून शंभूला आणि सोहमला आवाज दिला.
ते थरथर कापत होते .
सोहम आजोबांना म्हणाला, "आजोबा तुम्ही किती घाबरता.
अहो काही नाही. आम्ही चिखलदर्याला गेलो होतो ना तिथे सुद्धा असा प्रतिध्वनी ऐकू येत होता.
मला तर मजा वाटली बा."
ते थरथर कापत होते .
सोहम आजोबांना म्हणाला, "आजोबा तुम्ही किती घाबरता.
अहो काही नाही. आम्ही चिखलदर्याला गेलो होतो ना तिथे सुद्धा असा प्रतिध्वनी ऐकू येत होता.
मला तर मजा वाटली बा."
सोहमने रहस्य एन्जॉय केलं होतं पण एका नवीनच रहस्याचं उद्घाटन होऊन आबा मात्र पार घाबरून गेले होते.
अंजलीने आता पदराने तोंड झाकून भोंग्या बाऊ करणे सुद्धा बंद केले होते.
©®शरयू महाजन
अंजलीने आता पदराने तोंड झाकून भोंग्या बाऊ करणे सुद्धा बंद केले होते.
©®शरयू महाजन
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने