जलद लेखन स्पर्धा मार्च २०२६
विषय: मला आलेला विचित्र अनुभव
विषय: मला आलेला विचित्र अनुभव
भय इथले संपत नाही (अंतिम)
बाहेर एक स्त्री (जिच्या डोक्यावर कुंकू नव्हते पण तिच्या हातात बांगड्या होत्या )आणि तिची साधारण माझ्याच वयाची मुलगी उभी होती.
"ताई, भूक लागली आहे ...काहीतरी खायला मिळेल का? "
ती स्त्री म्हणाली.
ती स्त्री म्हणाली.
तिचा आवाज जरा वेगळाच होता...तिचे डोळे थोडे रोखून पाहणारे भयानक होते.
"माफ करा...आता एवढ्या रात्री काही नाही.."
आईने ताबडतोब दरवाजा बंद केला आणि लाईट बंद केली.
आम्ही दोघीही घाबरलो.
इतक्या रात्री ती आपल्याचकडे अन्न मागायला का आली असावी...नाही नाही ते प्रश्न मनात उभे राहिले.
आम्ही दोघीही एकमेकांशी काही बोललो नाही पण
आमच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती.
आम्ही अंथरूणावर पडलो पण काळीज अजूनही धडधडत होते.
काहीच वेळ गेला असेल इतक्यात आमच्या चाळीच्या पाठीमागच्या रस्त्यावरून कुठल्यातरी स्त्री का कोण... ठाऊक नाही...पण भयाण रडण्याचा आवाज ऐकू आला.
आर्त वेदना होऊन कोणीतरी रडत आहे तसे.....
मी बाजूला झोपलेल्या आईला गच्च मिठी मारली. आईच्या हृदयाची जोराची कंपने मलाही स्पष्ट ऐकू येत होती...
"विभा...आज सर्वपित्री अमावस्या आहे ..."
आई थरथरत्या स्वरात म्हणाली तसे भीतीने माझी गात्रेच गोठली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने चाळीतल्या प्रत्येकाला जाऊन विचारले की रात्री कोणाच्या दाराची कडी वाजली का...पण प्रत्येकाने नकारार्थी मान हलविली. पुढचा प्रसंग सांगण्याचे आईने प्रकर्षाने टाळले कारण आईला कुठल्याही प्रकारची भीती पसरवायची नव्हती.
आईने मागच्या चाळीतल्या ओळखीच्या काही स्त्रियांना विचारले की कुणाला काही आवाज आला का पण तिथेही सर्वांनी नकारच दिला.
"ओह् माय गुडनेस...याचा अर्थ फक्त आपल्याच घराची कडी वाजली आणि तुम्हा दोघींनाच तो आवाज ऐकू आला...आत्या हे सर्व ऐकून माझ्या अंगावर काटा आला."
"त्यावेळेस आमची काय हालत झाली असेल त्याची तू कल्पनाच करू शकत नाहीस. काही दिवसांनी बाबांनी माहिती काढली तेव्हा समजले की आमची चाळ बांधली आहे त्या जागी स्मशानभूमी होती. "
विभा हे सांगत असतानाच दारावरची बेल वाजली.
"आत्या...घड्याळात बघ किती वाजले ते. आज सर्वपित्री अमावस्या आहे. "
पॉपकॉर्नचा बाऊल बाजूला ठेवत विभाला खेटून बसत कनक म्हणाली.
विभाने पाहिले...घड्याळात तीन वाजले होते... कॅलेंडरमध्ये खरोखरच सर्वपित्री अमावस्या होती.
समाप्त
कथा कशी वाटली कमेंट लिहून नक्की सांगा.
कथा कशी वाटली कमेंट लिहून नक्की सांगा.
©® शिल्पा तोरस्कर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा