#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५
विषय:- ननंदबाई येती घरा
शीर्षक:- बेसन लाडू
भाग:-२
ईश्वरीने पाठीमागे वळून पाहिले. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते.
"ताई, तुम्ही?" तिला पाहून दिव्याला आश्चर्य वाटले. ती थोडी गोंधळली पण तिला तिचे असे अचानक येणे आवडले नव्हते. त्यात तिचे ते कपडे आणि घामाने डबडबलेले अंग पाहून तिने किळसवाणे तोंड केले.
"हो मीच." ती तिच्या जवळ येत म्हणाली.
" हो, पण असे अचानक कसे काय येणे केलेत? आधी कळवलेही नाहीत तुम्ही? आणि तुम्हाला पत्ता कसा माहिती? " दिव्या तोंड वाकडे करत दोन पावलं मागे सरकत प्रश्नांवर प्रश्न विचारत होती.
"मागे एकदा मी फोन केला होता तेव्हा तनुने या नवीन घराबद्दल सांगितले होते. कधी यायचं म्हटलं तर पत्ता माहिती असावा म्हणून त्याने दिला होता." तिने स्पष्टीकरण दिले.
ईश्वरी तन्मयची मोठी बहीण होती. ती शिकलेली होती पण गावाकडे राहत असल्याने तिचे कपडे आणि राहणीमान गावंढळ होते. त्यांच्या आईवडिलांचा तन्मय शिकत असताना अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हा ईश्वरी आणि तिच्या नवऱ्याने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्याला चांगले शिक्षण दिले. तो शहरातच शिकला आणि इकडेच त्याला चांगल्या पगाराची नोकरीही लागल्याने त्याने शहराच स्थायिक व्हायचे निर्णय घेतला. त्या दोघांनी त्याला पाठिंबा दिला.
नंतर त्याचे लग्न दिव्यासोबत झाले. दिव्याला फक्त राजाराणीचा संसार हवा होता, त्यात कोणाची लुडबुड नको होती. तिचा स्वभावही तुसडा आणि तिरसट होता. कोणत्याही गोष्टीत खोट काढायची तिला सवय होती. तिला तन्मयचे ईश्वरीशी बोलणे आवडतं नव्हते. पण त्याला बहिणीच्या उपकाराची जाणीव होती. तो तिला कधीच अंतर देत नव्हता.
दर राखी पौर्णिमा आणि भाऊबीज सणाला तो ईश्वरीकडे जायचा. तिच्या हातचे साजूक तुपातले बेसन लाडू त्याला फार आवडायचे. त्यामुळे जेव्हा कधी तो यायचा म्हटल्यावर ती आवडीने बेसन लाडू करायची. ते खाताना त्याचं चेहऱ्यावरच हसू पाहून तिला समाधान वाटायचे.
आधी तन्मय दुसऱ्या ठिकाणी राहत होता.
नंतर तो या ठिकाणी राहायला आला होता. ते त्याने तिला फोनवर सांगितले होते. त्याचे प्रमोशन झाल्याने त्याला राखी पौर्णिमा आणि भाऊबीज सणाला जाणे जमलेच नाही. त्यामुळे त्याला भेटण्याच्या निमित्ताने ती त्याच्या आवडीचे बेसन लाडू आणि बाकी तिच्या शेतातील धान्य घेऊन आली होती.
नंतर तो या ठिकाणी राहायला आला होता. ते त्याने तिला फोनवर सांगितले होते. त्याचे प्रमोशन झाल्याने त्याला राखी पौर्णिमा आणि भाऊबीज सणाला जाणे जमलेच नाही. त्यामुळे त्याला भेटण्याच्या निमित्ताने ती त्याच्या आवडीचे बेसन लाडू आणि बाकी तिच्या शेतातील धान्य घेऊन आली होती.
ईश्वरीच्या बोलण्यावर दिव्या तिला म्हणाली,"अहो पण कधी कळवले असते ते हे घरी थांबले असते ना. आता ते एका कामासाठी चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेत. ते कधी येतील काय माहिती?"
दिव्याला तिला कटावायचे होते म्हणून तिने तिला खोटेच सांगितले.
"बरं, हे त्याच्यासाठी लाडू आणलेत त्याला दे. मी जाईन मग." ईश्वरी लाडवाचा डब्बा तिच्यासमोर धरत म्हणाली.
"मावशी, जरा ईकडे या, हा डब्बा घेऊन जा." दिव्या त्या तेलकट डब्याकडे पाहत मावशीला आवाज दिला.
मावशी येऊन तो डब्बा घेऊन गेल्या.
ईश्वरी उन्हातून आल्याने तिला खूप तहान लागली होती. पण दिव्याने न तिला बसायला सांगितले ना की पाणी विचारले.
"दिव्या, घशाला कोरड पडली जरा देशील का? " शेवटी ईश्वरीच काकुळतीने तिला म्हणाली.
"हं, आणते. थांबा." मानेला झटका देत दिव्या तिला म्हणाली आणि आत निघून गेली.
क्रमशः
काय होईल पुढे?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
