आई किं बायको - भाग -1

बायको किं आई
आई किं बायको  - भाग -1


मालतीताई सकाळ सकाळ किचनमध्ये भांडी आपटत होत्या, श्रावणी त्यांची सून भांड्याचा आवाज ऐकून बाहेर आली आणी म्हणाली, आई कांय झालं, कशाला आदळाआपट करताय अहो.



"श्रावणी, अगं हे काय, रात्रीची खरकटी भांडी तशीच सिंक मध्येच ठेवलीस? मी सांगितलं होतं ना, आपल्या घरात रात्रीचं खरकटं ठेवायचं नसतं." मालतीताई चिडून म्हणाल्या.


श्रावणीचा चेहरा उतरला, ती म्हणाली, "आई, काल माझं प्रेझेंटेशन होतं, रात्री बारा वाजले सगळं आटपेपर्यंत, मी अमोलला सांगून ठेवलं होतं किं मी सकाळी भांडी घासेन असं, तुम्ही उठवलं असतं तर मी भांडी घासली असती नां, कां चिडचिड करताय अहो...


"प्रेझेंटेशन होतं म्हणून, घराकडे दुर्लक्ष करायचं का? आमच्या वेळी मी नोकरी, घर सगळं सांभाळलंचं ना, मालतीताई म्हणाल्या.


"आई, तुमच्या वेळी वेगळं होतं, आता कामाचं प्रेशर वेगळं आहे." श्रावणी म्हणाली.


दोघींचा आवाज वाढलेला ऐकून अमोल बाथरूममधून बाहेर आला.

त्याने दोघींकडे पाहिलं आणि म्हणाला."आई, तू पण श्रावूला सारखे टोमणे मारू नकोस ना, तिला ऑफिसचं काम असतं अगं.

आणि एवढंच निमित्त झालं आणी मालतताईच्या डोळ्यात पाणी आलं, त्या काहीचं नं बोलता आतल्या खोलीत निघून गेल्या.

श्रावणीला वाटलं मी जिंकले, कारणं आज अमोल तिच्या बाजूने बोलला होता.


अमोलचे बाबा सदानंद हॉलमध्ये पेपर वाचत होते,  तें अमोलला म्हणाले,

"अमोल, इकडे ये जरा."

"हां बाबा," अमोल बोलला.

"बाळा, एक सांगू? आम्ही इथे तुझ्यावर ओझं व्हायला आलो नाही, पण तुझ्या आईला असं वाटतंय, तुला पण असंचं वाटतं असेल तर आम्ही उद्या निघून जाऊ." सदानंदराव बोलले.


"बाबा असं काय बोलता?" अमोल शांतपणे बोलला.


"तू तुझ्या बायकोसमोर सकाळी आईला बोललासं, मला वाईट नाही वाटलं, पण तुझ्या आईला वाटलं, बायकोसमोर आईची किंमत कमी करणारा मुलगा झालायं अमोल... असं ती रडतं मला म्हणाली.


अमोलला त्या रात्री बाबांचे शब्द ऐकून झोपच आली नाही,


दुसऱ्या दिवशी श्रावणी ऑफिसवरून दमून आली होती. मालतीताई तिला म्हणाल्या, , "श्रावणी, आज शेजारच्या काकू येणार आहेत, जरा तें तुझे रोजचे पॅन्ट टीशर्ट सोडून तो पंजाबी ड्रेस घाल."


श्रावणीचा पारा चढला ती ओरडून म्हणाली . "आई, मला कशात कम्फर्टेबल वाटतं हे मी ठरवीन नां , मी काही लहान मुलगी नाही.


मालतीताई गप्प झाल्या, पण अमोल तिथेच होता, त्याने श्रावणीला म्हटलं,

"श्रावणी, आई सांगतेय तर ऐक ना. एवढा काय हट्ट? घरात चार लोक येणार असतील तर जरा व्यवस्थित राहावं."

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - श्रावणी आणि आईच्या भांडणात अमोल कसा त्रासतो.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →