भाग २
दिवस पुढे सरकत होता…
ना टोमणे…
ना तुलना…
ना “आमच्या वेळेला आम्ही असं करायचो…”
फक्त माया…
कौतुक…
आणि आपलेपणा…
सायलीला खरंच वाटत होते,
देवा… हेच का स्वर्ग?
देवा… हेच का स्वर्ग?
हातात गरम चहाचा कप…
कानात सासूबाईंचे प्रेमाचे शब्द…
तिचे मन अगदी हलके झालेले..
कानात सासूबाईंचे प्रेमाचे शब्द…
तिचे मन अगदी हलके झालेले..
ती सोफ्यावर रेलून बसली होती. समोर सासूबाई हसत हसत म्हणत होत्या,
“उद्या सुट्टी आहे ना? जरा उशिरा उठ… रोज खूप दमतेस गं.”
“उद्या सुट्टी आहे ना? जरा उशिरा उठ… रोज खूप दमतेस गं.”
हे ऐकून सायलीच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आले,
“बस, आता यापुढे काही मागायचंच नाही आयुष्यात..” ती मनात म्हणाली.
“बस, आता यापुढे काही मागायचंच नाही आयुष्यात..” ती मनात म्हणाली.
आणि तेवढ्यात…
ट्रिन… ट्रिन… ट्रिन… ट्रिन…!!
अलार्म असा वाजायला लागला जणू घरात फायर ड्रिल सुरू झाली होती.
सायली घाबरून एकदम उठली आणि “धडामऽऽ!”
ट्रिन… ट्रिन… ट्रिन… ट्रिन…!!
अलार्म असा वाजायला लागला जणू घरात फायर ड्रिल सुरू झाली होती.
सायली घाबरून एकदम उठली आणि “धडामऽऽ!”
ती थेट बेडवरून खाली पडली.
“आई गंऽऽ!” तिच्या तोंडून आपसूक आवाज बाहेर पडला.
“आई गंऽऽ!” तिच्या तोंडून आपसूक आवाज बाहेर पडला.
“सायलीऽऽ!” अभिजित धावत खोलीत आला.
समोरचे दृश्य बघून तो दोन सेकंद जागच्या जागीच थांबला.
समोरचे दृश्य बघून तो दोन सेकंद जागच्या जागीच थांबला.
त्याची बायको जमिनीवर बसलेली, केस पूर्ण विस्कटलेले, एक उशी डोक्यावर, पांघरूण अर्धं बेडवर, अर्धं तिच्या पायात गुंतलेले आणि मॅडम मोठ्ठे डोळे करून छताकडे बघत बसलेल्या.
अभिजितने दोनदा पापण्या लवल्या आणि तिच्याजवळ येत म्हणाला,
“ही काय नवीन कसरत आहे?”
“ही काय नवीन कसरत आहे?”
सायली काहीच बोलली नाही.
“लहान मुलांसारखी बेडवरून पडतेस? की आता जिमनॅस्टिक सुरू केलंयस?”
“लहान मुलांसारखी बेडवरून पडतेस? की आता जिमनॅस्टिक सुरू केलंयस?”
तरीही तिच्याकडून उत्तर नाही.
अभिजितने हात हलवून तिच्या डोळ्यासमोर बोटं हलवली.
“हॅलो… पृथ्वीवर परत या, मॅडम…”
“हॅलो… पृथ्वीवर परत या, मॅडम…”
सायलीने हळूच त्याच्याकडे पाहिले.
तिचे डोळे अजूनही त्या स्वप्नात अडकलेले…
हातात गरम चहा…
सासूबाईंचं कौतुक…
माहेरच्यांचा सन्मान…
“जा गं, आज उशिरा उठ…” म्हणणारा आवाज…
ती अजूनही त्या स्वर्गातून बाहेरच पडली नव्हती.
हातात गरम चहा…
सासूबाईंचं कौतुक…
माहेरच्यांचा सन्मान…
“जा गं, आज उशिरा उठ…” म्हणणारा आवाज…
ती अजूनही त्या स्वर्गातून बाहेरच पडली नव्हती.
तिने समोरच्या टेबलावर ठेवलेल्या घड्याळाकडे पाहिले. चार वाजले होते.
ती हळूच अभिजितकडे पाहत म्हणाली,
“अहो…”
“अहो…”
“हं?”
“पहाटेची स्वप्नं खरी होतात ना?”
अभिजित दोन सेकंद तिच्याकडे निर्विकार चेहऱ्याने बघत राहिला, मग कपाळावर हात मारला.
“पहाट?”
तो घड्याळ उचलून तिच्या तोंडासमोर धरत म्हणाला—
“मॅडम… पहाट गेली… सकाळ गेली… दुपार पण गेली…”
आणि मुद्दाम थांबून म्हणाला,
“दुपारचे चार वाजलेत.”
“पहाट?”
तो घड्याळ उचलून तिच्या तोंडासमोर धरत म्हणाला—
“मॅडम… पहाट गेली… सकाळ गेली… दुपार पण गेली…”
आणि मुद्दाम थांबून म्हणाला,
“दुपारचे चार वाजलेत.”
सायलीचे डोळे आणखी मोठे झाले.
“कायऽऽ?”
“कायऽऽ?”
ती झटकन उभी राहायला गेली…
पण पाय अजून पांघरुणात अडकलेला…
आणि “धप्प!”
दुसऱ्यांदा खाली. अभिजितला हसू आवरेना.
पण पाय अजून पांघरुणात अडकलेला…
आणि “धप्प!”
दुसऱ्यांदा खाली. अभिजितला हसू आवरेना.
“बस, आज ग्राविटीला तुझ्यावर फार प्रेम आलंय.”
सायलीने रागाने त्याच्याकडे पाहिलं.
“हसू नका!”
“हसू नका!”
तेवढ्यात बाहेरून ओळखीचा आवाज घुमला—
“सायलीऽऽ!”
दोघेही थबकले.
“सायलीऽऽ!”
दोघेही थबकले.
पुन्हा आवाज आला,
“चहा कुठे आहे अजून?”
“चहा कुठे आहे अजून?”
दुसऱ्याच सेकंदाला दुसरा बॉम्ब,
“आणि कपडे मशीनमध्ये टाकलेस का नाही?”
“आणि कपडे मशीनमध्ये टाकलेस का नाही?”
सायलीने डोळे बंद केले. एक खोल श्वास घेतला. छताकडे पाहिले आणि मनात म्हणाली,
“देवा, निदान उद्या तरी सिक्वल दाखव…”
“देवा, निदान उद्या तरी सिक्वल दाखव…”
तेवढ्यात पुन्हा बाहेरून आवाज,
“ऐकू येत नाही का गं?”
सायली उठली, ओठांवर हलकीशी स्मितरेषा आली आणि ती स्वतःशीच पुटपुटली,
“स्वप्न मोडलंय… पण आशा अजून जिवंत आहे…”
“ऐकू येत नाही का गं?”
सायली उठली, ओठांवर हलकीशी स्मितरेषा आली आणि ती स्वतःशीच पुटपुटली,
“स्वप्न मोडलंय… पण आशा अजून जिवंत आहे…”
