भाग १
“अगं, आधी चहा घे… मग बाकी कामं.”
स्वयंपाकघरातून आलेल्या त्या मऊ, प्रेमळ आवाजाने सायलीने मागे वळून पाहिले आणि क्षणभर तिचा स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसला नाही.
स्वयंपाकघरातून आलेल्या त्या मऊ, प्रेमळ आवाजाने सायलीने मागे वळून पाहिले आणि क्षणभर तिचा स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसला नाही.
समोर तिच्या सासूबाई उभ्या होत्या, हातात गरमागरम वाफाळत्या आल्याचा चहाचा कप, चेहऱ्यावर मायेचं हसू.
“आई… तुम्ही?” सायलीने आश्चर्याने विचारले.
“मग काय? दिवसभर ऑफिस करून आलीस. थकली असशील ना? जा, आधी निवांत बस.” सायलीने कप हातात घेतला, कपासोबत जणू मायेची ऊबच हातात उतरली.
ती फ्रेश होऊन बाहेर आली, तर समोरचे दृश्य बघून अक्षरशः जागीच थांबली.
टेबलावर स्वच्छ ट्रे ठेवलेला होता. त्यात गरम पोहेचे घास आणि छोट्याशा वाटीत चटणी.
टेबलावर स्वच्छ ट्रे ठेवलेला होता. त्यात गरम पोहेचे घास आणि छोट्याशा वाटीत चटणी.
सासूबाई स्वतः तिची वाट बघत बसल्या होत्या.
“ये… बस.”
“ये… बस.”
सायली अजूनही स्तब्ध होती.
“हे घे… दोन घास खाऊन घे आधी.”
सायली फक्त बघतच राहिली.
आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? तिने मनातच विचारले.
सायली फक्त बघतच राहिली.
आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? तिने मनातच विचारले.
ती छान सोफ्यात जाऊन बसली. हातात पोह्यांची प्लेट घेतली. पहिला घास घेताच तिचे डोळे नकळत मिटले.
“वा, अगदी आई करते तसे..”
हे शब्द तिच्या तोंडून नकळत बाहेर पडले.
क्षणभर तिला वाटले आता काहीतरी टोमणा येईल,
“मग माहेरीच राहायला जायचं होतं…”
पण तसे काहीच झाले नाही.
हे शब्द तिच्या तोंडून नकळत बाहेर पडले.
क्षणभर तिला वाटले आता काहीतरी टोमणा येईल,
“मग माहेरीच राहायला जायचं होतं…”
पण तसे काहीच झाले नाही.
उलट सासूबाई हलकंसं हसल्या.
“तुझ्या आईकडूनच शिकले गं, मागच्या वेळी त्या आल्या होत्या ना, तेव्हा रेसिपी घेतली.”
“तुझ्या आईकडूनच शिकले गं, मागच्या वेळी त्या आल्या होत्या ना, तेव्हा रेसिपी घेतली.”
सायलीचा घास हातातच थांबला.
“क… काय?”
“हो आणि खरंच सांगते, तुझ्या आईने खूप छान संस्कार केलेत तुला. खरंच भाग्य आहे आमचं.”
“हो आणि खरंच सांगते, तुझ्या आईने खूप छान संस्कार केलेत तुला. खरंच भाग्य आहे आमचं.”
सायली फक्त त्यांच्याकडे बघत राहिली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी माहेरचे कौतुक तिच्या सासरी करत होते.
तिच्या डोळ्यांत नकळत पाणी आले.
“अगं वेडी, रडतेस कशाला?” सासूबाई प्रेमाने म्हणाल्या.
सायलीने हसत डोळे पुसले.
“अगं वेडी, रडतेस कशाला?” सासूबाई प्रेमाने म्हणाल्या.
सायलीने हसत डोळे पुसले.
“आई, ते आपल्याला वन्स ताईंकडे वास्तुला जायचे आहे, तर काय काय आणायचे मला सांगून द्याल. उद्या घेऊन येईल.”
“अगं तुझ्या आवडीने आण, आता तुला सगळंच माहिती आहे. अभिजीतला सोबत घेऊन जा. आणि वसंत आहेच सोबत तर तुझ्यासाठी छानशी साडी घेऊन घे, किती दिवस झालेत काही घेतलेच नाहीस तू स्वतःसाठी..” सासूबाई.
आता मात्र तिला पोहे घशाखाली जाईना, तिला मोठा धक्का बसला होता. तिने डोके हलवले.
थोड्या वेळाने ती स्वयंपाकघरात गेली, तर तिथे अजून एक धक्का तिची वाट बघत होता. भाजी धुऊन, चिरून तयार, कणीक मळून ठेवलेली, डाळ कुकरमध्ये शिजलेली होती. सासूबाई निवांत खुर्चीत बसून माळ जपत होत्या.
सायली अवाक् झाली.
सायली अवाक् झाली.
“आई… हे सगळं?”
सासूबाईंनी हसत तिच्याकडे पाहिले.
सासूबाईंनी हसत तिच्याकडे पाहिले.
“अगं, सगळं करून ठेवलंय. तुझ्या हातची फोडणी सगळ्यांना आवडते… तेवढी दे.”
सायली अजून सावरत नव्हती, तोच सासूबाई पुढे म्हणाल्या,
“आणि हो…” सासूबाई पुन्हा म्हणाल्या, “तुझे कपडे घडी करून ठेवलेत, कपाटात ठेवून दे.”
हे ऐकताच सायलीच्या हातातला चमचा खाली पडला.
हे खरं आहे का? की मी अजून जिवंत आहे?
हे खरं आहे का? की मी अजून जिवंत आहे?
दिवस पुढे सरकत होता..
ना टोमणे… ना तुलना… ना “आमच्या वेळेला…”
फक्त माया… कौतुक… आणि आपलेपणा.
सायलीला वाटत होते,
देवा, हेच का स्वर्ग?
ना टोमणे… ना तुलना… ना “आमच्या वेळेला…”
फक्त माया… कौतुक… आणि आपलेपणा.
सायलीला वाटत होते,
देवा, हेच का स्वर्ग?