"बाप : मायेची ढाल" भाग - ७
आयसियूच्या त्या त्या बेडवर माया शांत पडून होती. तिच्या कानांना अजूनही अर्जुनचा बाथरूम मधला रडण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि सिनिअर इन्स्पेक्टर भोसले आत आले.
भोसलेंचा चेहरा गंभीर होता, पण डोळ्यांत एका भावाची काळजी होती. त्यांनी दरवाजा आतुन बंद केला आणि मायाजवळ आले.
"माया, कशी आहे?" भोसले साहेबांनी काळजीने विचारले.
"माया हळूच त्यांच्याकडे बघून बोलते, "ठीक आहे." आणि हलकेसे खोटे हसू चेहऱ्यावर आणते.
"माया, एक पोलिसवाला म्हणून नाही विचारत तर एक भाऊ म्हणून विचारतोय. काय झालं? तू नदीत पडली की तू उडी मारली? मला आशा आहे तू खरं उत्तर देशील." भोसले बोलतात.
मायाच्या काळजात धस्स झालं. भोसले साहेबांसमोर सत्य सांगणे म्हणजे विक्रमचे नाव घेणे. विक्रमचे नाव घेतले त्याचे फार वाईट परिणाम होतील. विनाकारण अर्जुनला त्रास होईल. शिवाय हे प्रकरण वाढले तर समाजात बदनामी होईल.
माया शांतपणे विचार करत होती. भोसले साहेब तिला पुन्हा विचारतात, "माया तू शांत का आहेस? घरी काही...? किंवा मग अर्जुन...?"
"नाही साहेब, माझा नवरा तर देवमाणूस आहे. माझ्या सासू-सासऱ्यांनी तर मला आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिले. मी नदीकिनारी उभी होते. आणि मी चक्कर येऊन पडले. एवढेच बाकी काही नाही." माया भोसलेंना सांगते.
"मग मला सांग तू एवढ्या सकाळी सकाळी नदीवर कशाला गेली होती. तीपण एकटीच."
माया गडबडून जाते.
"ते मी उपवास धरला होता. त्याची छोटी पूजा केली होती. त्या पूजेचे सामान, फुलं आणि बाकीच्या गोष्टी नदीत टाकायला गेले होते.
मायाच्या बोलण्यातली गडबड एका चाणाक्ष पोलिसाच्या नजरेतून लपली नाही. पण भोसले साहेब मायाला जास्त काही विचारत नाही.
"ठीक आहे माया. माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण एक लक्षात ठेव. काहीही लागले तर मी आहे तुझ्यासाठी." भोसले साहेब असे बोलून बाहेर जातात.
"आत माया काय बोलेल?" याचा विचार करून अर्जुन बाहेर अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होता. बाहेर आल्यावर भोसले साहेबांनी अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "अर्जुन माया म्हणते की तिला चक्कर आली होती आणि ती नदीत पडली."
अर्जुनच्या जीवात जीव येतो. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव क्षणात नाहीसा होतो.
"बघा साहेब, मी बोलतच होतो." अर्जुन बोलतो.
"ठीक आहे. आम्ही जातो आणि काळजी घे मायाची. तिला तुझी गरज आहे." असे बोलू शिंदे आणि भोसले साहेब तिथून निघून जातात.
ते गेल्यावर अर्जुन जड पावलांनी आयसीयूच्या खोलीत जातो. दरवाजाचा आवाज आल्यावर मायाचे लक्ष लगेच तिकडे गेले पण अर्जुनला बघताच मायाने झटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. ती त्याला नजर देऊ शकत नव्हती.
अर्जुन तिच्या बेडशेजारी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला.
दोघांमध्येही एक भयानक शांतता होती. अर्जुनला वाटत होते आत्तातरी मायाने त्याला सर्वकाही सांगावे.
दोघांमध्येही एक भयानक शांतता होती. अर्जुनला वाटत होते आत्तातरी मायाने त्याला सर्वकाही सांगावे.
पण अर्जुनला माहीत नव्हते की त्याला माया आणि विक्रमबद्दल कळले आहे, हे मायाला माहित आहे. अर्जुनच्या मनात खूप सारे प्रश्न होते. ते त्याला मायाला विचारायचे होते.
"तू असं का केलंस?"
"तुला एकदाही माझा विचार करावासा नाही वाटला का?"
"त्या विक्रमचे आणि तुझे नेमके काय संबंध आहे?"
"मी कुठे कमी पडलो?"
"तुला एकदाही माझा विचार करावासा नाही वाटला का?"
"त्या विक्रमचे आणि तुझे नेमके काय संबंध आहे?"
"मी कुठे कमी पडलो?"
असे कितीतरी प्रश्न अर्जुनच्या मनात होते. पण कुठून आणि कशी सर्वात करावी, हेच त्याला कळत नव्हते.
मायाही भिंतीकडे एकटक बघत होती, पण तिचे हुंदके तिला आवरता येत नव्हते. तो मौनाचा संवाद शब्दांपेक्षाही जात वेदनादायी होता.
डॉक्टर येऊन मायाला आयसीयू मधून बाहेर काढतात आणि जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करतात. अर्जुन तिथे मायाजवळ बसलेला असतो.
थोड्या वेळातच हॉस्पीटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळीचा आवाज आला. सावित्री, गजानन, आणि मुलं हॉस्पिटल मध्ये धापा टाकत आले होते.
सर्वांच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी होती. आईला त्या अवस्थेत बघून परी आणि कार्तिक रडू लागतात आणि आईला जाऊन मिठी मारतात. स्नेहाने आईजवळ जाऊन तिचा हात हातात घेतला होता आणि एकटक आईकडे बघत होती.
"अगं माया, हे काय झालं? अशी कशी तू नदीत पडली?" सावत्री रडत रडत मायाला विचारते. अर्जुनचे वडील बाजूलाच उभे राहून काळजीने बघत होते.
अर्जुन लगेच खुर्चीवर उठला. त्याने परिस्थिती सावरली.
"आई, बाबा, शांत व्हा. मायाला काही नाही झाले. मुलांनो रडू नका. नाहीतर आईला त्रास होईल. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला आहे. चला सगळे शांत रहा." अर्जुन परी आणि कार्तिकला जवळ घेतो.
अर्जुन अत्यंत संयमाने सर्वांना शांत करतो. मायाला स्वतःची लाज वाटत होती. आज फक्त तिच्यामुळे संपूर्ण कुटूंब रडत होते. तिच्या मुलांच्या डोळ्यात पाणी होते. मायाच्या मनात खूप मोठे वादळ सुरू होते पण ती बाहेरून एकदम शांत होती.
मायाला माहित होते जर तिने आता या क्षणाला अश्रू काढले तर संपूर्ण कुटूंब तुटून जाईल. जे सत्य ती लपवण्याच्या प्रयत्न करत आहे तेच अश्रुंद्वारे बाहेर येईल.
थोड्यावेळाने सावित्री आणि गजानन मुलांना घेऊन घरी जातात. अर्जुन वॉर्डच्या बाहेर एकटाच उभा राहून विचार करत होता. मायाचे लक्ष अर्जुनकडे होते. मात्र बाहेरून अर्जुनने तिच्याकडे बघितले का तिची नजर ती झटकन दुसरीकडे फिरवायची.
डॉक्टरांनी मायाच्या सर्व तपासण्या करून घेतल्या. आणि अर्जुनला सांगितले की, "मायाला घरी नेले तरी चालेल."
अर्जुनने डिस्चार्जची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. आणि मायाला घरी घेऊन निघाला. अर्जुनच्या दुकानातील कामगार अर्जुनची गाडी घेऊन निघाला आणि अर्जुन आणि माया रिक्षात निघाले.
हॉस्पिटल ते घर संपूर्ण रस्त्यात दोघेही शांत होते. दोघेही नजर चोरीने एकमेकांकडे बघायचे आणि पुन्हा नजर फिरवायचे. असे करत दोघेही घरी पोहचतात. सावित्री मायाची दृष्ट काढून टाकते. घरात आल्या आल्या अर्जुन कोणाशीही न बोलता खोलीत निघून जातो.
"माया, आज तू आराम कर. सर्व स्वयंपाक मी करते." सावित्री मायाला सांगते.
"आई, एवढे काही नाहीये. उगाच तुमचे हातपाय दुखतील."
"काही होत नाही माझ्या हातापायांना. आणि मी काहीही ऐकणार नाही." सासूबाईंनी कडक शब्दात सांगितले.
रात्रीचे जेवण आटोपले. जेवताना पूर्ण शांतता होती. सासूबाईंनी मायाला औषधे दिली. आणि आराम करायला सांगितला. माया खोलीत झोपायला गेली.
घरातील सर्व कामं आटोपल्यावर सर्वजण झोपायला गेली. अर्जुन एकटाच हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. माया खोलीत बसली होती. अर्जुन आहे तिथेच सोप्यावर पडून घेतो आणि छताकडे एकटक बघत असतो.
बराच वेळ झाला आणि अर्जुन आला नव्हता, म्हणून माया खोलीच्या बाहेर येते. तिची नजर अर्जुनवर पडते. अर्जुनही मायाकडे बघतो. यावेळेला माया मात्र अर्जुनकडे बघतच राहते. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्या अश्रूंनी माया जणू अर्जुनला सांगत होती की मला तुझी गरज आहे.
मायाचे अश्रू अर्जुनच्या नजरेस येतात. माया आहे तशीच खोलीत येते. मायाला क्षणभर वाटते, "तिने अर्जुनला कायमचे गमावले तर नाहीना." पण माया दुसऱ्याच क्षणाला विचार करते की, "तिला अर्जुनला गमवायचे नाहीये. आज स्पष्टपणे यांच्याशी बोलले पाहिजे" असे ठरवून, डोळे पुसून माया खोलीच्या बाहेर येते.
अर्जुन आता उठून बसला होता. माया तडक जाऊन त्याला मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते.
"मला माफ करा... मी माती खाल्ली... तुम्हांला फसवण्या अगोदर मला मरण का नाही आले. तुम्हांला काल रात्री बाथरूममध्ये रडताना ऐकले आणि मी पूर्ण तुटून गेले आणि मी..." माया रडत होती.
अर्जुनच्या लक्षात आले माया आणि विक्रमबद्दल आपल्याला समजले हे मायाला कळले आहे. अपराधीपणाच्या जाणीवेमुळेच मायाने टोकाचे पाऊल उचलले.
अर्जुनने मायाला स्वतःपासून दूर केले आणि विचारले, "का? मी कुठे कमी पडलो का? माझे प्रेम कमी पडले का?"
"तुम्ही कुठेही कमी पडला नाही! तुम्ही तर भरभरून प्रेम दिले मला. पण मीच बहुतेक तुमच्या प्रेमाच्या योग्यतेची नव्हती. मला तुम्हांला सगळे सांगायचे होते, पण हिंमत होत नव्हती." माया बोलते.
"मग आता सांग. जे काही असेल ते खरं, आणि सत्य सांग. माझी ऐकायची तयारी आहे." असे बोलून अर्जुन मायाला खोलीत घेऊन जातो.
माया तिच्या आणि विक्रमबद्दल सांगायला सुरूवात करते...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा