"बाप : मायेची ढाल" भाग - ३
सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून येणारी सूर्यकिरणं अर्जुनच्या डोळ्यांवर पडली, पण त्याच्या मनातला अंधार काही केल्या हटत नव्हता. रात्रभर तो जागाच होता.
"माया कोणासोबत रात्री बोलत असणार?"
"ती कोणत्या अडचणीत तर नसणार?"
"माया त्याच्यापासून काय लपवत आहे?" असे प्रश्न अर्जुनला पडले होते. आणि आत्ताही त्याच्या मनात तोच गोंधळ चालू होता.
"ती कोणत्या अडचणीत तर नसणार?"
"माया त्याच्यापासून काय लपवत आहे?" असे प्रश्न अर्जुनला पडले होते. आणि आत्ताही त्याच्या मनात तोच गोंधळ चालू होता.
अर्जुन रोजच्या सारखा तयार होऊन दुकानात निघाला. पण दुपारच्या जेवणाचा टिफीन घेऊन जाण्याचे तो विसरला. दुकानात आल्यावर शटर उघडले, देवाला उदबत्ती लावली आणि खुर्चीवर बसला पण त्याचे लक्ष कशातच नव्हतं.
घरी माया घरातील कामं आटपत असताना तिच्या लक्षात आले की अर्जुन टिफीन विसरून गेला आहे. ती लगेच तो टिफीन घेऊन अर्जुनला देण्यासाठी निघते.
अर्जुन दुकानात बसलेला असतो. तेवढ्यात माया दुकानात येते. मायाला अचानक दुकानात आलेले बघून अर्जुनला आश्चर्य वाटते.
"माया, तू इथे. अशी अचानक फोन न करता आली?" अर्जुन मायाला विचारतो.
"अहो, तुम्ही टिफीन विसरला. तो घेऊन आली होते." माया बोलते.
मग अर्जुनच्या लक्षात येते की तो टिफीन विसरला आहे. माया दुकानात टेबलावर टिफीन ठेवते. अर्जुनला वाटते ही माया बरोबर बोलण्याची योग्य वेळ आहे. दुकानात पण कोण नाहीये. अर्जुन मायाच्या नजरेला नजर देतो. पण माया मात्र तिची नजर चोरून दुकानातील पुस्तकांवरील धूळ पुसू लागते.
अर्जुन मायाबरोबर बोलणार तोच, "काय अर्जुन, काय करतो? असे बोलत हेड कॉन्स्टेबल शिंदें दुकानात येतात. त्यांच्या हातात काठी आणि चेहऱ्यावर घाम होता.
अर्जुनने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. "आज काय काम मग?" अर्जुन शिंदेंना विचारतो.
"नेहमीचाच आपला बंदोबस्त. हा बंदोबस्त, आणि वरतून उन्हाचा ताप. जीवाची नुसती लाहीलाही झाली आहे." शिंदेच्या बोलण्यात एक प्रकारचा थकवा होता.
"कशाचा बंदोबस्त आहे?" अर्जुन विचारतो.
"आरे निवडणुका आल्यात जवळ. त्याच्यामुळे त्या अण्णासाहेब गायकवाडांची रॅली आहे. स्वतः अण्णासाहेब आणि त्यांचा मुलगा विक्रम येणार आहे."
विक्रम हे नाव शिंदे यांच्याकडून ऐकताच मायाच्या हातातलं पुस्तक खाली पडते. पुस्तकाचा आवाज झाल्यावर अर्जुन आणि शिंदे लगेच तिकडे बघतात. मायाचा चेहरा पांढराफटक
पडला होता. तिने घाईघाईने पुस्तक उचलले. "चुकून पडले" असे माया बोलते.
पडला होता. तिने घाईघाईने पुस्तक उचलले. "चुकून पडले" असे माया बोलते.
शिंदे पाणी पिऊन दुकानातून निघून जातात. दुकानात काही गिऱ्हाईक आलेले असतात. निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांच्या तोंडीही राजकारणाचीच चर्चा चालू होती.
एक गिऱ्हाईक म्हणाला, " हे राजकारणी लोक म्हणजे एकदम स्वार्थी. त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतात. त्या विक्रमबद्दल तर मी काय काय ऐकलंय. एकदम बेकार माणूस आहे आहे तो."
दुसरा म्हणाला, "अहो पाहुणे, मोठ्या लोकांचे मोठे शौक. आपल्या सारख्या लोकांनी त्यांच्यापासून लांबच राहावं."
अर्जुन शांतपणे त्यांचे ऐकून बोलतो, "दादा, बरोबर आहे तुमचं. आपण सामान्य माणसं आहोत. आपली दुनिया म्हणजे आपलं कुटुंब. आपण राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून लांब राहिलेलेच बरे."
दुपार झाली होती. माया दुकानातच थांबली होती. बाहेरून लांबून राजकीय घोषणांचा हलकासा आवाज येत होता. माया एका कोपऱ्यात जुनी कादंबरी वाचत होती. तिला राहवत नाही. तिला अर्जुनच्या मनातले जाणून घ्यायचे होते. तिने एक धाडस केले.
"अहो..." मायाने हलक्या आवाजात हाक मारली.
"हं?" अर्जुनने हिशोबाची वही बाजूला ठेवली आणि मायाकडे बघितले.
"हं?" अर्जुनने हिशोबाची वही बाजूला ठेवली आणि मायाकडे बघितले.
"मी हे पुस्तक वाचतेय... यात एक गोष्ट आहे. यातल्या नायिकेकडून लग्नानंतर एक चूक होते. म्हणजे... तिच्याकडून तिच्या नकळत चूक घडते. तिचे नवऱ्यावर खूप प्रेम आहे. आणि नवऱ्याचे देखील तिच्यावर खूप प्रेम आहे. तिच्याकडून घडलेली चूक तिला नवऱ्याला सांगायची होती. पण तिला भीती वाटत होती की नवरा तिला माफ करेल का? तिने सांगितले पाहिजे का नवऱ्याला? नवरा माफ करेल का तिला? तुम्हांला काय वाटते?" माया हिंमत करून बोलते.
अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला. मायाकडे काहीक्षण तो बघतो आणि बोलतो, "माया, पुस्तक वाचून किंवा ऐकून माफ करावे की नाही असा सल्ला देणे खूप सोपे असते. पण वास्तवात असे घडल्यावर कोण कसा वागेल? हे सांगणे कठिण आहे. खऱ्या आयुष्याचे म्हणशील तर विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा त्याला तडा दिला की तो जोडला तरी तो डाग हा राहतोच."
हे ऐकून मायाचं काळीज हललं. तिला वाटते, "अर्जुनला सत्य कळल्यावर तो तिला कधीच माफ करणार नाहीतर. त्या क्षणाला मायाला सर्व संपल्यासारखे वाटत होते. देवाने मला जीवापाड जपणारा, त्याच्या अगोदर माझा विचार करणारा जोडीदार दिला पण मला त्याला जपता आले नाही. मी का माती खाल्ली? असा विचार करून माया स्वतःलाच दोष देत होती. तिने मान खाली घातली होती.
अर्जुन मायाकडे बघत होता. तिने मान खाली घातलेली बघून अर्जुन बोलतो, "पण... प्रेम खरे असेल आणि चूक सुधारण्याची प्रामाणिक इच्छा असेल, तर माणूस काचेचा तुकडा सुद्धा प्रेमाने जपून ठेवू शकतो. शेवटी प्रेम आणि त्यातील भावना महत्वाच्या असतात."
मायाने चटकन वर पाहिलं. तिचे डोळे अलगद पाणावले. तिने अर्जुनला मिठी मारली. "मी खरंच खूप नशिबवान आहे, मला तुमच्या सारखा इतका समजदार, प्रेमळ जोडीदार मिळाला आहे." माया प्रेमाने बोलते.
माया प्रेमाने बोलत होती पण त्याचवेळेला अर्जुन मात्र हादरला होता.
"पुस्तकाच्या नावाखाली मायाने मला असे का विचारले असेल?"
"मी पहिले जे बोललो त्यावेळेस मायाने मान खाली का घातली असेल? तिच्या डोळ्यात अश्रू का आले असेल?"
"मी नंतर जे बोललो त्यावेळेस मायाने मला मिठी का मारली असेल?"
"गेल्या काही दिवसांपासून मायाच्या वागण्याचा आणि याचा काही संबंध तर नसेल?" असे प्रश्न अर्जुनच्या मनात येत होते.
"पुस्तकाच्या नावाखाली मायाने मला असे का विचारले असेल?"
"मी पहिले जे बोललो त्यावेळेस मायाने मान खाली का घातली असेल? तिच्या डोळ्यात अश्रू का आले असेल?"
"मी नंतर जे बोललो त्यावेळेस मायाने मला मिठी का मारली असेल?"
"गेल्या काही दिवसांपासून मायाच्या वागण्याचा आणि याचा काही संबंध तर नसेल?" असे प्रश्न अर्जुनच्या मनात येत होते.
तितक्यात अण्णासाहेबांचा विजय असो..., भैय्यासाहेबांचा विजय असो... अशा घोषणा कानावर पडल्या. गर्दीच्या आवाजाने रस्ता दुमदुमला होता. रस्ता पूर्ण जाम झाला होता.
रॅली अर्जुनच्या दुकानासमोर येऊन थांबते. एका महागड्या गाडीतून एक तरुण खाली उतरतो. दाढी वाढलेली, गळयात चैनी, पांढरा शुभ्र सदरा, डोळ्यात एक उर्मी दिसत होती. विक्रम गायकवाड अण्णासाहेबांचा मुलगा. वडिलांचा पैसा, आणि सत्तेचा माज स्पष्टपणे डोळ्यात दिसत होता. अण्णासाहेब राज्यातील मोठ्या नेत्यांपैकी एक होते.
विक्रम सरळ गाडीतून उतरून अर्जुनच्या दुकानात येतो. त्याच्यासोबत दोन बॉडीगार्ड होते. विक्रमाची नजर दुकानात सगळीकडे फिरत होती. तेवढ्यात त्याची नजर मायावर पडते.
दुकानात विक्रम मायासाठीच आला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होते.
विक्रमला बघून मायाचा थरकाप होत होता. तिची नजर जमिनीकडे होते. मायाने पदराने तोंड झाकले होते.
"साहेब, काय पाहिजे तुम्हांला?" अर्जुन विनम्रपणे बोलतो.
"मला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकाल?" विक्रम मायाकडे बघून अर्जुनला उत्तर देतो. मायाची नजर मात्र जमिनीकडे होते.
"सर, आपल्या शहरात पुस्तक भेटण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सावित्री बुक डेपो. असे कोणतेच पुस्तक नाहीये जे आपल्या दुकानात नाही भेटणार. आणि जर समजा आपल्या दुकानात नाही भेटले तर शहरात कुठेच नाही भेटणार." अर्जुन बोलतो.
"छान दुकान आहे तुमचं. तुम्ही नशिबवान आहात. देवाने तुमच्या नशिबात सुंदर माणसं दिली आहे." विक्रम बोलतो.
"माफ करा साहेब, पण तुम्ही काय बोलतय ते लक्षात नाही आले." अर्जुन बोलतो.
"माझ्याकडे काही फोटो, आणि व्हिडिओ आहे. ते तुम्हांला दाखवायचे आहे." विक्रम असे बोलताच माया वर बघते. तिच्या कपाळातून घामाची धार वाहू लागली. डोळ्यामध्ये एक अनामिक भीती होती.
"साहेब कोणते फोटो, व्हिडिओ?" अर्जुन विचारतो.
"नाही ओ कोणते नाही. मी मस्करी करत होतो. हे घ्या माझे कार्ड. आणि कधीही आवश्यकता पडली तर थेट माझ्याकडे यायचे. किंवा डायरेक्ट मला फोन करायचा. कसलाही विचार करायचा नाही." असे बोलून विक्रम निघून जातो.
अर्जुनला मात्र विक्रमचे बोलणे कोड्यात टाकून गेले. गाड्यांचा ताफा निघून गेला. दुकानात भयाण शांतता पसरलेली होती.
कोपऱ्यात उभी असलेली माया जिवंतपणी मेलीच होती. तिला ब्लॅकमेल करणारा विक्रम आता थेट तिच्या घरच्या उंबरठ्यावर आला होता...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा