"बाप : मायेची ढाल" भाग - २
मायाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. तो मायाला ब्लॅकमेल करत होता. माया त्याच्यासोबत फोनवर बोलत असताना मागे वळून बघते तर दरवाजात अर्जुन उभा होता.
अर्जुनला बघताच मायाचा श्वास गळ्याशी अडकला होता. तिचे डोळे विस्फारलेले होते. अर्जुनाच्या नजरेत एक तीक्ष्णपणा होता. मायाला वाटते अर्जुनने सर्व ऐकले आहे.
मोबाईल हातातून गळून जमिनीवर पडलेला होता. स्क्रीन अजूनही चालू होती.
मोबाईल हातातून गळून जमिनीवर पडलेला होता. स्क्रीन अजूनही चालू होती.
मायाला वाटते आता अर्जुन ओरडेल, जाब विचारेल, किंवा रागाच्या भरात काहीतरी करेल.
अर्जुन सावकाश तिच्या जवळ आला. त्याने खाली वाकून मोबाईल उचलला. मायाने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. तिला वाटत आता सर्व संपले.
"माया, काय झालं? एवढी का घाबरली आहे? कोणाचा फोन होता?" अर्जुन शांतपणे मायाला विचारतो.
मायाच्या लक्षात की अर्जुनने काही ऐकले नाही. अर्जुन नुकताच खोलीच्या बाहेर आला होता. ती लगेच डोळे उघडते आणि एक दीर्घ श्वास घेते.
"हं... अहो... तोच राँग नंबर होता. जो त्यादिवशी पण आला होता. घाणेरडा माणूस कोणीतरी... काहीही विचित्र बोलत होता. म्हणून मी घाबरले आणि फोन हातातून पडला." माया खोटे बोलते.
अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो, "एवढं काय घाबरायचं त्यात? ब्लॉक करून टाक नंबर. नाहीतर मला दे मी लगेच पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांकडून नंबर ट्रेस करून घेतो. तुला माहितीये आपल्या किती ओळखी आहे पोलिस स्टेशनला."
पोलीस हे नाव ऐकताच मायाच्या पोटात गोळा येतो.
"नको पोलीस वैगेरे. उगाच कशाला राईचा पर्वत करायचा. मी ब्लॉक करते त्याला. चला झोपून घेते." माया अर्जुन पासून नजर चोरत बोलते.
माया घाईघाईत बेडवर जाऊन पडली. माया त्याच्यापासून नजर चोरत आहे हे लगेच अर्जुनाच्या लक्षात येते. तो काहीक्षण तसाच उभा राहतो.
मायाने डोळे मिटलेले असतात. अर्जुनही डोळे मिटून घेतो पण त्याला झोप येत नव्हती. थोड्यावेळाने माया हळूच वळून बघते अर्जुन झोपला आहे का. आणि तिची खात्री होते अर्जुन गाढ झोपला आहे. मायाच्या मोबाईल सारखे मेसेज येत होते. तो ब्लॅकमेलर मायाला सारखा मेसेज करत होते.
माया मोबाईल घेते. त्या ब्लॅकमेलरचा मेसेज आला होता, "उद्या दुपारी तीन वाजता, हॉटेल मध्ये भेटायचे. त्याने हॉटेलचा पत्ता पाठवला होता."
"मला जमणार नाही." माया त्याला उत्तर देते.
"मग दुपारी तीन वाजता आपले फोटो, व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला दाखवतो." मायाला मेसेज येतो. आणि त्यांची चॅटिंग सुरू राहते.
माया चॅटिंग करतही होती, आणि तिच्या डोळ्यातून अश्रू देखील येत होते. तितक्यात अर्जुन त्याची कुस बदलतो. माया लगेच तोंडावर पांघरुण घेते. मायाला वाटते अर्जुन झोपलेला आहे पण अर्जुन झोपलेला नसतो.
माया रडत आहे आणि चॅटिंग करत आहे हे त्याच्या लक्षात आले होते. पण त्याला हेही माहीत होते की माया त्याच्यापासून हे लपवते म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. आणि आत्ता तिला कितीही विचारले तरी सांगणार नाही. म्हणून अर्जुन त्याच्या पद्धतीने शोधायचे ठरवतो.
दुसऱ्या दिवशीची सकाळ अर्जुनाच्या घरात नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. आईवडील देवळात गेले होते. मुले शाळेत जाण्याची तयारी करत होते. पण अर्जुनचे लक्ष मायाच्या वागण्याकडे होते. मायाचे कशातच लक्ष नाहीये हा मायाच्या वागण्यातला बदल अर्जुनने लगेच हेरला.
गॅसवर ठेवलेले दूध ऊतू चाललं होतं, तरी मायाला भान नव्हतं. स्नेहा दुधाचा गॅस बंद करत बोलते, "आई दूध खाली चालले होते."
"अगं आई, माझं दप्तर कुठे आहे? मला शाळेला उशीर होतोय!" बाहेर हॉल मध्ये कार्तिक आरडाओरडा करत होता.
रात्रीच्या जागरणामुळे आणि सततच्या तणावाने, भीतीने मायाचा संयम संपला होता. ती रागात बाहेर आली आणि कार्तिकवर जोरात ओरडली, "स्वतःच स्वतःला आवरता नाही येत का? हातपाय तुटले का तुमचे? सारखं आई... आई... आई! जरा मला शांत बसून देती नाही. मी आयुष्यभर पुरणार आहे का तुम्हांला."
मायाला रागावलेले बघून कार्तिक, परी दोघेही घाबरतात. स्नेहा बाबांकडे बघते. अर्जुन सोप्यावर बसून हे सर्व बघत होता. हे सर्व मायाला होणाऱ्या त्रासामुळे होत आहे हे अर्जुनाच्या लक्षात येते. नाहीतर माया मुलांना असे कधीच ओरडत नाही.
मुले शाळेत जातात. आता घरात अर्जुन आणि माया दोघेच होते. अर्जुन मायाचा हात धरून तिला सोप्यावर बसवतो.
त्याने तिचा हात हातात घेतला.
त्याने तिचा हात हातात घेतला.
"माया... काय झाले? गेल्या काही दिवसांपासून मी बघतोय. तुझे वागणे जरा बदलले आहे. तुझी चिडचिड होत आहे. तू सतत कोणत्यातरी भीतीखाली आहे असे वाटते." अर्जुन एकदम शांतपणे बोलतो.
"काही... काही नाही ओ. तुम्हांला उगाच असं वाटतंय." माया सावरासावर करण्याचा प्रयत्न करते. आणि खाली बघते.
अर्जुन तिची हनुवटी धरून तिची मान वर करून बोलतो, "मला माहितीये तुला कसलातरी त्रास होत आहे. पण तू सांगत नाही. तुझे फक्त डोळे बघून मी सांगू शकतो तू त्रासात आहे की नाही. आणि आता मला तुझे डोळे सांगताय, तू मोठ्या अडचणीत आहे."
"माया चेहऱ्यावर खोटे हसू आणून बोलते, "तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झाला आहे. माझी कामं बाकी आहे मला जाऊद्या." असे बोलून उठते.
अर्जुन मायाचा हात पकडतो आणि तोही उभा राहतो. तिच्या गालांवर हात ठेवून बोलतो, "माया मला माहित आहे तू खोटं बोलतेय. तुला नसेल सांगायचे तर नको सांगू. पण लग्नात अग्निला साक्ष मानून आपण शपथ घेतली होती की एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहू. माया मी जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर. आणि तुझ्यासाठी सगळं जग
इकडचं तिकडं करायची माझी तयारी. तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू माझं काळीज चिरून टाकतो."
इकडचं तिकडं करायची माझी तयारी. तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू माझं काळीज चिरून टाकतो."
अर्जुन बोलत असताना त्याचे डोळे पाणावतात. माया अर्जुनच्या नजरेला नजर देते. अर्जुनचे पाणावलेले डोळे बघून मायाचा बांध फुटायला येतो. तिला सरळ सगळे अर्जुनला सांगावे वाटते पण पुढच्या क्षणाला तिच्या डोळ्या समोर ब्लॅकमेलरचा चेहरा येतो. आणि माया शांत राहते.
माया अर्जुनच्या डोळ्यात प्रेम, आदर बघत होती. पण सत्य कळल्यावर या प्रेमाचं रूपांतर तिरस्कारात होईल का? हे मला सोडून देतील का? असे प्रश्न मायाला पडले होते.
मायाला शांत बघून अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याचा जेवणाचा डबा उचलून दुकानात जायला निघतो. दरवाजातून त्याने एकदा पाठीमागे वळून मायाकडे बघितले. तिच्या चेहऱ्यावर खोटे हसू होते. ते अर्जुनाच्या लक्षातपण येते. अर्जुन दुकानात जायला निघतो.
अर्जुन गेल्यावर माया दरवाजा बंद करते. मायाचा संयम सुटतो. ती धावत बेडरूम जाते आणि बेडवर पडून रडायला लागते. शेजारीच अर्जुनचा फोटो असतो. तो घेऊन छातीला लावते.
"मला माफ करा. मी तुमच्या विश्वासाला तडा दिला. मी तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाहीये. मी वाईट आहे... मी पापी आहे." माया स्वतःलाच दोष देत होती.
इकडे दुकानात अर्जुन खुर्चीवर बसला होता. पण आज त्याचं लक्ष दुकानात नव्हतं. तो मायाच्या वागण्याचा विचार करत होता.
"तिला त्रास देणारी व्यक्ती ती राँग नंबरवाली तर नसेलना"
"माया रात्री कोणाबरोबर चॅट करत असेल"
"माया रात्री कोणाबरोबर चॅट करत असेल"
असे विचार अर्जुनाच्या डोक्यात येत होते. इकडे माया दुपारी ठरल्याप्रमाणे त्या ब्लॅकमेलरला भेटायला गेली होती. माया त्याला खूप विनवणी करते की, "मला सोडून दे... माझ्या संसारात विष कालवू नको..." पण तो काहीच ऐकत नाही. मायामध्ये आणि त्याच्यामध्ये वादपण होतात.
रात्र झाली होती. अर्जुनाची घरी जाण्याची वेळ झाली होती. अर्जुन दुकान बंद करतो आणि घरी जातो. आज रात्री घरात जेवणाच्या वेळेस दररोजच्या सारखी गंमतजंमत नव्हती. माया आणि अर्जुन दोघेही शांत होते. आणि ते शांत असल्यामुळे मुलंही शांत होते.
जेवण झाल्यावर सर्वजण झोपायला जातात. अर्जुन झोपल्याचे नाटकं करतो. मायाला जेव्हा वाटते अर्जुन झोपला आहे तेव्हा ती पुन्हा मोबाईल काढून चॅट करू लागते आणि पुन्हा तिच्या डोळ्यात अश्रू येतात.
अर्जुन हे सर्व बघतो पण तो मायाला काहीच बोलत नाही. या सगळ्यांचा अर्जुन त्याच्या पद्धतीने शोध लावायचा ठरवतो...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा