Login

अवनी एक प्रवास भाग १२२

थोडा वेळ शांतता पसरली आणि काही वेळातच तिथे बंधू मंडळी येऊन पोहोचली. शशांकने गोळी चालाव्ल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मिडियावर पसरली होती. त्यात शशांकला पाहून अकेडमीवर जात असलेली ही बंधू मंडळी थेट रावीच्या घरी येऊन पोहोचली. त्या व्हिडीओमध्ये परी पण दिसली असल्याने ह्या बंधू मंडळीच्या मागे तुषार देखील घाईघाईत आला.

मागील भागात.

“ही खोट बोलत आहे.” राकेश काही त्याचा हेका सोडायला मागत नव्हता. “आता एक पोलीस ऑफिसर भेटला आहे म्हणून ती मला सोडत आहे.”

रावी परत राकेशला काही बोलाणार तोच शशांक बोलू लागला. “तुझ्या पास्टशी मला काही देण घेण नाही. आता मला एवढच सांग की त्याचा आणि तुझा आता काही संबंध आहे का? ते ही माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग.” शशांक रावीच्या डोळ्यात डोळे घालून बोलला.

तशी रावी शशांकच्या डोळ्यात हरवली. “त्याचा आणि माझा आता काहीच संबध नाहीये. जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलं आणि तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार केला आहे.”

रावीच्या ह्या वाक्यानंतर तिथे एकापाठोपाठ दोन आवाज गुंजले.

आता पूढे.

त्या दोन आवाजापैकी तक आवाज म्हणजे बंदुकीतली गोळी चालल्याचा आणि त्याच्या दुसऱ्याच सेकंदाला राकेशच्या जोरात किंचाळण्याचा.

ते जे काही एका क्षणार्धात घडलं ते बघून सर्वांची बोबडीच वळली. कारण शशांकला जे अपेक्षित होत तेच रावीच्या तोंडून ऐकायला आल्यावर त्याने त्याच्या सर्व्हिस बंदुकीतून राकेशच्या थेट गुडघ्यावर गोळी मारली होती.

ते बघून राज सोडून बाकी तिघींच्या तोंडवर त्यांचे हात आले. त्या तिघींना झालेली घटना बघून खूपच मोठा धक्का बसला.

“साल्या त्या करेक्टरलेस मुलीसाठी..” शशांक पुढे काही बोलणार तोच त्याच्या पायात दुसरी गोळी शिरली.

“अरे.” सोनाली घाबरून बोलली. “काय करत आहात?”

“तुला काय वाटल?” आता राजने बोलायला सुरवात केली. “तुझ्या बोलण्याला भुलून तो इथे आला आहे?” राजच्या चेहऱ्यावर आसुरी स्मित आल.

आता बाकी तिघी राजकडे बघू लागल्या.

“परवा जसे तू फोटो पाठवले ना त्याला तसा तो काल इकडे आला,” राज “जिथले फोटो होते तिथले सीसीटीव्ही तपासले. जिथे तू हे व्हिडीओ आणि फोटो बनवले तिथे जाऊन तुझ्या त्या मित्रांना पण त्यांच्या योग्य जागी पोहोचवल. त्यांनी तुझ्या नावासकट सगळ काही दोन मिनिटात कबुल केल आणि मग त्याने मला तुझ्याशी बोलायला लावलं.”

“मला तर फक्त तिच्या मनातल जाणून घ्यायचं होत,” शशांक “आता आमची भेट फक्त एकदाच झाली होती. त्यात तर लगेच कोणी त्याच आयुष्य सांगून मोकळ होत नसत. इथे आल्यावर जेव्हा ती मला भेटायला धावत आली होती ना तेव्हा माझ्या विश्वासाला जे समाधान मिळाल ना तेव्हाच मला उड्या माराव्याशा वाटत होत्या. पण काय करू? राग दाखवला नसता तर तू इथे आला नसता ना.”

“त्याला काय माहित की राग दाखवला की नाही ते?” सोनाली गोंधळून विचारू लागली.

“त्याने एक माईक इथे घरात लावून ठेवला होता,” शशांक “त्यावरून तो इथे काय चालू होत ते सगळचं ऐकत होता.”

आता सोनालीचे डोळे परत विस्फारले गेले. “हा कधी माईक लावून गेला?”

“इंटरनेट वाला टेस्टिंगसाठी आला होता तेव्हा,” रावी काहीतरी आठवत बोलली. “तरीच म्हटलं काहीच कम्प्लेंट न करता कस काय कोणी आल?”

“तो ह्याचाच मित्र होता.” शशांक

“प्लीज हेल्प मी.” राकेश कळवळत बोलला. “प्लीज कॉल द अँमब्युलस.”

तसा शशांक जमिनीवर पडलेल्या राकेशजवळ गेला. “हेल्प? आं? माझ्या बायकोविरुद्ध माझे कान भरवतोस? तिच्या सोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो? घरात माईक लावून त्यांचे खाजगी गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करतोस आणि मी तुला हेल्प करू?” शशांक तिरकस हसला.

शशांकच ते तिरकस हसण बघून सोनालीला थेट रुद्रचा राग आठवला. त्याचाही राग असाच भयानक होता. पण तो जे काही करायचा ते फक्त गुन्हेरांसमोर करायचा. त्याला अनुभवाची जोड आल्याने रुद्रने त्याच्या रागावर बऱ्याच वर्षापूर्वी नियंत्रण मिळवलं होत. पण शशांक मात्र त्यापेक्षा जास्तच तापट जाणवला. आता तो रुद्रचा विद्यार्थी होता. त्याने रुद्रचे बरेच इंटरव्ह्यू, त्याने सोडवलेल्या केसेसचा अभ्यास केला होता. मग त्याचा प्रभाव तर शशांकवर पडणारच होता. त्यात शशांकच अति वेगाने धावणार डोक साथीला होतचं.

राकेश त्याचा पाय धरून जमिनीवर इकडून तिकडून लोळत होता. आता परी आणि सोनालीला त्याची दया आली. परीने सरळ फोन लावून रुग्णवाहिका बोलावून घेतली. शशांकने देखील तिथले पोलीस ऑफिसर बोलावून घेतले.

गोळी चालवल्याचा आवाज घुमला असल्याने तिथे आता त्या बिल्डींगचे बाकी रहिवासी देखील जमा झाले. राकेशचा लाल रंगाने माखलेला पाय बघून सगळेच घाबरून गेले. जमा झालेली माणस बघून त्या तिघींना आता टेन्शन यायला लागल. कारण ही बातमी आता राकेशच्या आई वडिलांना देखील मिळाली असल्याने त्या तिघींना समजून गेले.

आता राकेशची आई देखील तिथे पोहोचली आणि राकेशला धरून आसव गाळू लागली. सोबतच बाजूला उभ्या असणाऱ्या शशांकला खूप भांडत होती. शशांकने त्याच्या हातातली बंदूक अजूनही त्याच्या हातात जी ठेवली होती.

“आता भांडून काय उपयोग?” शशांक कडक आवाजात बोलला. “आधीच त्याच्या दोन कानाखाली मारल्या असत्या तर आता ही वेळच आली नसती. त्याच्या मित्राच्या सोबतीने त्याने माझ्या बायकोला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. मला चुकीचे व्हिडीओ पाठवून माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नवरा बायकोच्या नात तोडण्याचा प्रयत्न केला. घरात गपचूप माईक लावून त्यांच्या खाजगी गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला. आताही त्याच्या मागच्या खिशात बघा त्याने तिथे त्याने चाकू लपवला आहे. तोच चाकू तो बाहेर काढत होता. म्हणून आमच्या सेफ्टीसाठी मला त्याच्या पायावर गोळी चालवावी लागली. नाहीतर राग काढायचा असता तर थेट त्याच्या दोन भुवयांच्या मध्ये चालवली असती.”

मग राकेशची आई शशांकला भांडायची बंद झाली. तोपर्यंत रुग्णवाहिका आणि पोलीस दोन्ही तिथे येऊन पोहोचले. शशांकने राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिल आणि त्यांनी राकेशला बघून रुग्णवाहिकेमध्ये घातलं आणि त्याला तिथून घेऊन गेले.

सोनाली, रावी आणि परी तर शशांकच्या वाक्यांना ऐकून त्याला बघतच राहिले.

“दहा डोक्याचा रावण आहे तो,” राज हळूच बोलला. “लवकर कोणाला त्याची प्लनिंग समजून येत नाही.”

तिघींनी राजकडे पाहिलं. आता त्या जरा झालेल्या घटनेतून सावरल्या आणि रावीच्या कपाळवर आठ्या जमा झाल्या. कारण त्याला सगळ माहिती असून त्याने मुद्दाम तिला टोमणे मारले होते ते तिला आता समजल.

“त्याचे दहा डोके आता त्याच्याजवळच ठेवायला लाव,” रावी चिडून बोलली. “मला बोलायची आणि भेटायची काहीच गरज नाही. चला गं.” रावी शशांकवर कडक नजर टाकून परी आणि सोनालीला तिथून घेऊन जाऊ लागली.

“अरे यार,” राजने डोक्याला हात लावला. “त्याने तस का केल? ते पण तर सांगितलं ना. त्याशिवाय का तो इथे आला असता?”

“माझ्या मते पोलिसांना कोणाला शोधायला वेळ लागत नाही," रावी रागात बोलली. “माझ्या डॅडचा स्टुडन्ट म्हणतो ना तो स्वतःला. पण माझ्या डॅडला कोणाला शोधायला इतका वेळ लागतच नाही. सो गुड बाय.” आणि रावी सोनालीच्या हाताला पकडून तिला तिथून घेऊ जाऊ लागली.

आता राजने परीकडे पाहिलं. तर तिनेही तिचे खांदे उडविले. एवढा वेळ त्या पोलीसासोबत बोलणारा शशांक आता तो गेल्यावर राजकडे वळला. तर त्याला तिथे राज एकटाच दिसला. परी पण रावी आणि सोनालीच्या मागे निघून गेली.

“कुठे गेल्या त्या?” शशांक गोंधळून विचारू लागला.

“खूप हौस होती ना अस थ्रिलिंग सरप्राईज द्यायची,” राज पण जरा वैतागून बोलला. “गेली ती आत चिडून. आता बस बोंबलत.”

“मी काय केल?” शशांक “जे काही केल ते तिच्यासाठी केल ना.”

“आता हेच तिला समजावून सांगत बस.” राजने कपाळाला हात लावला. “तरी मी सांगत होतो की आधी रावीसोबत बोलून घे. पण नाही, तुला तर हिरो बनायची हौस होती ना. थेट सगळ काही घरच्यांसमोर करायचं होत तुला.”

आता शशांकने त्याच्या कपाळाला हात लावला. राजवर नजर टाकली आणि ते दोघे रावीच्या घरी जायला निघाले.

रावी तिच्या घरी सोनालीच्या कुशीत जाऊन बसली होती. तर सोनाली तिला शशांकची बाजू समजावत होती.

“तू माझी मॉम आहेस की त्याची?” शेवटी रावीने वैतागून विचारलेच. “जी एवढी त्याची बाजू घेऊ लागलीस.”

“अरे बच्चा असा नाही ना,” सोनाली तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत बोलली. “तुझीच आहे ना मी.”

“मग त्या घुबडाची बाजू घेण बंद कर.” रावी तिचे गाल फुगवत बोलली.

“घुबड?” सोनालीचे डोळे विस्फारले गेले. तर परीला पण हसू आल.

“घुबड नाही तर काय?” रावी “चेहरा तर त्याचा घुबडासारखाच आहे. काय तर म्हणे दहा डोक्याचा. पण त्यात ब्रेन नावाचा प्रकारच टाकला नाहीये देवाने.”

“ठीक आहे तू आधी शांत हो.” परी तिला समजावत बोलली.

तेवढयातच राज आणि शशांक घरी येऊन पोहोचले.

“रावी तू ठीक आहेस ना?” राजने काळजीने विचारलं.

तस रावीच लक्ष आलेल्या त्या दोघांकडे गेल आणि रावीला तिचा राग अनावर झाला.

“आधी त्याला बाहेर जायला सांग,” रावी सोनालीकडे बघत बोलली. “मला त्याच्याशी बोलायचं पण नाहीये.”

“आधी ऐकून तर घे ना. “राज तिला समजावत बोलला. “त्याला तुझ्यावर कधीच शंका नव्हती. ते तू जे झाल तर कोणालाच सांगितल नाहीस म्हणून त्याला जरा वाईट..” राज बोलता बोलता थांबला. कारण रावी त्यालाही आता रागात बघायला लागली.

“त्याने तरी मला काही विचारलं का?” रावी शशांकवर तिरकी नजर टाकत बोलली. “गेले दोन दिवस मी त्याला फोन करते, मेसेज करते. एकदा तरी त्याला रिप्लाय केला? नाही ना? मग मी काय विचार करायला हवा होता त्याच्याबद्दल? फक्त कामात असेल एवढाच काय तो विचार माझ्या मनात आला आणि आम्ही अस भेटलोच किती वेळा की मी त्याला माझ्यासोबत काय झाल ते लगेच सांगू? काल दिवसभर इकडेच होता ना? मग एका शब्दाने बोलता नाही आल का?”

बोलता बोलता रावीचा गळा भरून आला. तस परीने तिला तिच्या जवळ घेतलं. मोठ मोठ्या गुन्हेगारांना घाम फोडणारा शशांक तर गरीब गायीसारखा बारीक तोंड करून उभा होता. त्याने विचार काय केला होता आणि आता त्याच्यासमोर घडत काय होत?

थोडा वेळ शांतता पसरली आणि काही वेळातच तिथे बंधू मंडळी येऊन पोहोचली. शशांकने गोळी चालाव्ल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मिडियावर पसरली होती. त्यात शशांकला पाहून ॲकेडेमीवर जात असलेली ही बंधू मंडळी थेट रावीच्या घरी येऊन पोहोचली. त्या व्हिडीओमध्ये परी पण दिसली असल्याने ह्या बंधू मंडळीच्या मागे तुषार देखील घाईघाईत आला.

एवढ्या सगळ्यांना आलेलं बघून राज आणि शशांक जरा टेन्शनमधेच आले. त्यात तुषारला बघून शशांकच टेन्शन अजूनच वाढल. परीच्या गावी त्याने तुषारकडून चांगलाच मार जो खाल्ला होता.

“तुमच काय आहे इथे?” सोनाली त्यांना बघून बोलली. “राकेश पुन्हा रावीला त्रास द्यायला आला होता. त्याने शशांकला मेसेज आणि कॉल केले होते. तर त्याला त्याच्या पद्धतीने ह्या दोघांनी धडा शिकवला. त्याला पोलीस घेऊन पण गेले आहेत हॉस्पिटलमध्ये.’ सोनालीने हॉस्पिटल या शब्दावर खूपच जोर दिला. कारण ह्या बंधू मंडळींनी देखील त्याला हॉस्पिटलमधेच पोहोचवलं असत.

सोनालीला शशांकची बाजू घेताना बघून रावी तिला चिडून बघू लागली. ती काही बोलायला जाणार तोच परीने तिला तिच्या खोलीकडे नेल.

“दी सोड मला...” रावी फक्त जागीच उभी राहिली.

रावीच्या तब्येतीपुढे परी कुठे पुढे जात होती. तस परीने तिच्यावर डोळे वटारले. जागीच थांबलेली रावी परत परीच्या मागे गपचूप चालू लागली.

“आलेच आहात तर बसा.” सोनाली सर्वांवर नजर टाकत बोलली.

पण शशांक कुठे बसत होता? त्याला तर रावीच टेन्शन आल होत. त्याची इच्छा होती की राकेशला रावीच्या समोर शिक्षा द्यावी. जेणे करून तो नेहमीच तिच्या सोबत उभा रहाणार अस सिद्ध करणार होता. पण झाल उलटच, हेच त्याच्या अंगाशी आल होत.

राजला प्रश्न पडला की आता ह्या बंधू मंडळींना काय सांगू? कारण त्याने जरी थोड वेगळ सांगितल तरी नंतर रावी त्यांना काय ते खर सांगणारच होती ना. आता सगळ काही परीवर होत. तिचं आता रावी आणि बाकी बंधू मंडळींना सांभाळून घेऊ शकणार होती. नाहीतर त्याच्या मित्राची ही प्रेम कहाणी इथेच संपणार होती. राजने काहीतरी विचार केला आणि परीला मेसेज केला.

आतमध्ये परी रावीला समजावून सांगायला लागली. “हे बघ रावी, त्याने तुझ्यावर शंका नाही घेतली. नाहीतर तो इतक्या लांब आलाच नसता ना. त्याला काय गरज होती इतक्या लांब येऊन पूर्ण दिवस सगळ काही शोधात बसायची?”

“तू पण आता त्याचीच बाजू घेऊ लागलीस ना?” रावी कपाळाला आठ्या पाडून बघू लागली. “पण मग एक मेसेज केला असता. नसत काही सांगायचं तर दुसर काही तरी मेसेज केला असता. साधा गुड मॉर्निग पण काही केल.”

“त्यालाही बघायचं असेल की तू किती डीस्परेट होशील त्याला बघण्यासाठी?” परी “तो बोललाच ना की तो आल्या आल्या तू कशी त्याला पटकन भेटायला आलीस.”

“पण एकदा बोलला असता ना माझ्याशी,” रावी “पहिले मला तर विचारायला हव होत ना.”

“कारण मला ते विचारायची गरज वाटली नाही.” दोघींना मागून आवाज आला.

दारात शशांकला बघून रावी परत चिडायला लागली. बाहेर बसलेल्या शशांकला राहवलं गेल नाही आणि कोणाचीही परवनगी न घेता तो थेट रावीच्या खोलीकडे आला होता.

सुजय त्याला अडवायला उठला होता पण सोनालीने त्याला शांत राहायला सांगितलं.

“हेच हेच,” रावी “मला नाही आवडलं. तू मला काहीच न विचारता माझ्यावर शंका घेतलीस.”

“मला विचारायची गरज वाटली नाही कारण मला तुझ्यावर विश्वास होता,” शशांक “त्याने तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला तुझ्यासमोर शिक्षा व्हावी म्हणून हे सगळ केल. तुझे मेसेज आणि कॉल बघून इच्छा तर माझी पण व्हायची की तुझ्याशी बोलावं. पण तुला माझ्या आयुष्यात आणण्याआधी तुझ्या रस्त्यातले काटे मला दूर सारायचे होते. जेणेकरून तुला नंतर त्याचा काहीच त्रास होता कामा नये.”

“त्या पापडाची काय हिम्मत मला त्रास द्यायची?” रावी तिचं तोंड वाकड करत बोलली.

“हो,” शशांक “सॉरी, अब बच्चे की जान लोगी क्या?” शशांकने त्याचे कान पकडले.

“काय तर म्हणे बच्चा,” रावीच तोंड अजूनही वाकडच होत. “घुबड आहेस तू. घूबड”

“घुबड?” शशांकचा चेहराच बिघडला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका. शशांकच बारस कस वाटल?
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →