मागील भागात.
अश्या प्रकारे त्यांची पहिली ऑफिशियल डेट पार पडली. घरी जाताना मात्र त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. ते दोघे जरी नव्याने प्रेमात पडले असले तरी त्याच्यांत एक समजूतदारपणा होता. काही वेळातच ते परीच्या घरी जाऊन पोहोचले.
परीला आताचा प्रवास हा खूप लवकर संपल्यासारखा वाटला. तिने तुषारवर नजर टाकली. तुषारने देखील परीला पाहिलं.
“तुम्ही माझ्या प्रश्नाच उत्तर नाही दिल.” परी
"कोणत्या?” तुषार
“कोणत्या?” परी लगेच गाल फुगवून विचारू लागली.
आता पूढे.
"तूम्ही ना खरचं दगड आहात." परी आता जरा चिडून बोलली.
"ए चार फूट..." तूषार पूढे काही बोलणार तोच परीने त्याच्या पायावर तिचा पाय मारला.
"जे विचारलं त्याचं उत्तर द्या." परी तूषारला तिच बोट दाखवत बोलली.
"बोललो ना तूझ्या डान्समध्ये आणि शेवटच्या त्या पराक्रमामध्ये मी बाकी सगळच विसरलो." तूषार पण आता कडक आवाजात बोलला.
मग परी जरा शांत झाली.
“तुमच्यासाठी मी एवढा डान्स केला आणि शेवटी तुम्हाला बोलली पण ना की आय...” आता मात्र परी लाजली आणि शांत झाली.
“पुढे काय?” तुषार त्याची एक भूवई उंचावत विचारू लागला.
“सगळ माहिती आहे ना तरी उगाच छळायचं काम.” परी बारीक तोंड करून बोलली.
“अस तुमच्या बिडिंगच्या आवारात सर्वांसमोर मी उत्तर देऊ?” तुषार खट्याळ होत बोलला.
“उत्तर तोंडाने द्यायचं आहे मिस्टर दगड.” परी तोऱ्यात बोलली.
“दगड?” तुषार कपाळाला आठ्या पाडत बोलला.
“आता एवढ करूनही तुम्ही एवढे भाव खात आहात तर मी तरी त्याला काय करणार?” परी
तुषारने एक सुस्कारा सोडला आणि त्याने आजूबाजूला नजर टाकली. ते दोघे त्यांच्या विंगच्या जवळ उभे होते. आसपास कोणीच नाही बघून तुषारने परीला काही समजायच्या आता त्या विंगच्या आत ओढले. आता तिथे जरा अंधार असल्याने तिथल्या कॅमेऱ्यात पण ते काही नीट दिसणार नव्हते.
परी तर लागलीच भांबावून गेली आणि बावरलेल्या नजरेने तुषारला बघू लागली. कारण ती आता तुषारच्या मिठीत होती.
“उत्तर हवं आहे ना?” तुषारने परीच्या गालावरून प्रेमाने त्याची बोट फिरवली.
तशी परी शहारली गेली. परी त्याला काहीच प्रतिकार करत नव्हती. तिलाही माहिती होत की तुषार त्याची मर्यादा कधीच ओलांडणार नाही. त्याला जागेच आणि वेळेच भान नेहमीच असत.
“मी वाट बघतेय.” परी पण प्रेमाने बोलली.
“ठीक आहे,’ तुषारने तिला त्याच्या मिठीतून लागलीच सोडलं. ज्याची कल्पना परीला होतीच. “फक्त उद्या पर्यंत वाट बघ.”
“लव्ह यु.” परी परत हलकेच त्याला मिठी मारली.
“बाय.” तुषारने देखील तिच्या पाठीवर हात ठेवला आणी परी त्याच्यावर नजर टाकून लिफ्टकडे चालली गेली.
परी लिफ्टमध्ये शिरल्यावरच तुषार तिथून त्याच्या घराकडे निघून गेला. परी पण जरा खुशीतच तिच्या घरात पोहोचली.
घरात तर ते तिघेही तिचीच वाट बघत जागे होते. त्यांना अस हॉलमध्ये बसलेले बघून परी जरा थबकली.
“अम्म सॉरी ते जरा उशीर झाला.” परी बारीक तोंड करून बोलली.
तस बाकी तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि परत परीवर नजर टाकली. त्यांची ती रोखून धरलेली नजर बघून परीला जरा ऑकवर्ड वाटू लागल. आपण आज जरा जास्तच आपल्यासाठी वेळ दिला का? अस तिला वाटायला लागलं. तिच्यामुळे परत सगळे टेन्शनमध्ये आलेले तिला जाणवले.
“माहिती आहे मला की उशीर झाला आहे सॉरी ना.” परी काकुळतीला येत बोलली.
“तस नाही,” सुजय घड्याळात बघत बोलला, “आम्हाला वाटल तुला यायला बारा तरी वाजतील, पण तू तर पावणे अकरा वाजताच घरी आलीस.”
आता परी त्या तिघांकडे गोंधळून बघत राहिली.
“मला का उशीर होईल ते ही इतका?” परी त्याला कपाळाला आठ्या पाडत बोलली.
“नवीन नवीन नात आहे तर म्हटलं गप्पा काही लवकर संपणार नाहीत ना.” सुजय
“मी काय तुमच्यासारखी आहे का? बाबू शोना जादू टोना करायला.” परी तिचे डोळे फिरवत बोलली.
तसे सायली आणि विजय हसू लागले. तर सुजयने त्याच तोंड वाकड केल. त्याला तर परीला चिडवायच होत. कारण परी आज पहिल्यांदाच अशी डेटवर गेली होती ना. पण त्याला चिडवण जमलंच नाही आणि तो वेगळच काहीतरी बोलू लागला.
“तू नको त्याच्या मागे लागू,” सायली परीला जवळ बोलावत बोलली. “त्यांच्या घरी कधी बोलणी करायला जायची याचा विचार चालू होता आणि तू अचानक आलीस म्हणून तो तुला चिडवायला बघत होता.”
आता परीने त्याला जीभ दाखवून वाकुल्या केल्या. “तुम्हाला जस सोयीस्कर वाटेल तस.” परी एवढं बोलली आणि पटकन उठून तिथून तिच्या खोलीकडे पळून गेली. तिला अस पळत जाताना बघून बाकी तिघे खळखळून हसले.
इकडे तुषार देखील रात्री त्याच्या घरी जरा उशीराच पोहोचला. त्याच्या आई वडीलांनी देखील त्याला परीला पकडताना पाहीलं होत. त्यांना ही वाटल होत की तो किमान आता तरी परीसोबत बोलेल. पण तो काहीच बोलला नाही ते बघून त्याचे आई वडील नाखूशीनेच तिथून घरी निघून आले होते. ते तूषारवर जरा नाराजच होते.
जशी तेजश्री घरी पोहोचली तस तिने नंतर काय घडलं ते त्या दोघांना सांगून दाखवलं. तेव्हा कूठे त्यांच्या ही जीवात जीव आला होता. पण ते तूषारला असेच थोडी सोडणार होते? ते फक्त त्याच्या घरी यायची वाट बघत होते.
तूषारने जसा घरात पाय ठेवला तस त्याच्या त्याची आई दिसली जी त्याला रोखून बघत होती. त्याचे वडीलही त्याच्यावर नाराज असलेले दिसले. तसा तो विचार करू लागला आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने त्याचे डोळे घट्ट मिटले.
“आई बाबा, आता सगळच क्लिअर झाल आहे.” तुषारने थेट मुद्याला हात घातला. “आता तूम्ही कधीही तिच्यापर्यंत घरी बोलणी करायला जाऊ शकता.”
“आम्हाला तर काहीच दिसल नाही क्लिअर झालेल.” तूषारची आई तोंड वाकड करत बोलली. “तिने तुझ्यासाठी एवढा छान डान्स केला आणि तू तिच्याशी काहीच न बोलता निघून गेलास? काय वाटल असेल तिला?”
“आई उगाच नाटक करू नकोस,” तूषार सुस्कारा सोडत बोलला. “तेजश्रीने आल्या आल्या तूम्हाला सगळच काही सांगीतल आहे ते मला माहीती आहे. कारण तिच्या पोटात काहीच रहात नाही.”
तस त्यांनी तेजश्रीकडे पाहील आणि दूस-या च क्षणाला ते सगळेच हसू लागले.
“ठीक आहे मग,’ तुषारचे वडील “परवा जाऊ त्यांच्याकडे. तस त्यांना सांगून ठेवाव लागेल ना.” त्यांनी तुषारच्या आईकडे नजर टाकली.
तस त्यांनीही मूक संमती दिली.
तस त्यांनीही मूक संमती दिली.
मग त्यांनीही झोपायची तयारी केली.
आजची रात्र परी त्याच्या त्या स्वप्नातल्या राजकुमारच्या स्वप्नात फिरू लागली. तर तुषार देखील त्याच्या परीच्या आजच्या डान्सच्या स्वप्नात बेडवर इकडून तिकडून लोळायला लागला. आता उद्यापासून त्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरवात होणार होती. त्याच स्वप्नात कधी रात्रीची सकाळ झाली हे त्यांनाही समजल नव्हत.
रात्री आनंदाने झोपलेल्या परीला सकाळी उठल्या उठल्या तिला धक्काच बसला होता. तिला सकाळीच रावीचा फोन आला होता जी खूपच रडवेली झाली होती. तिने परीला ताबडतोब तिच्या घरी बोलवलं होत.
परी तर असा सकाळीच आलेला फोन बघून गोंधळून गेली होती. कारण ती काहीच व्यवस्थित सांगत नव्हती. शेवटी परी उठली आणि तिचं पटापट आवरून रावीच्या घरी जाऊन पोहोचली.
विजय आणि सायलीने परीला अस घाईघाईत जायचं कारण देखील विचारल होत पण परीलाच ते माहिती नव्हत मग ती तरी काय सांगणार होती. म्हणून तिने लगेच आली अस दोघांना सांगून दिल आणि घरातून बाहेर पडली.
तिकडे रावी सकाळपासून फक्त रडत होती. तिच्या घरी सोनाली ती आणि शशांक येऊन बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर खूपच राग होता. एवढच काय सोनाली देखील खूप चिडलेली होती. शशांकने इथे येण्याआधी राजला फोन केला होता तर रावीने शशांक आल्यावर परीला फोन लावला होता.
शशांक आज सकाळीच रावीच्या घरी आला. काल उशिरा झोपल्यामुळे रावी काही लवकर उठली नव्हती. त्यात शशांकचा एकही कॉल आणि मेसेज आला नव्हता. तो रावीचा फोन देखील उचलत नव्हता. त्यामुळे रावी टेन्शनमधेच खूपच उशिरापर्यंत जागी राहिली होती आणि आता मात्र पसरून झोपलेली होती. दाराची बेल वाजवल्यावर सोनालीने ते दार उघडल होत.
आता एवढ्या सकाळी कोण आल म्हणून तिने ही जरा विचार करतच दार उघडल. दारात शशांकला बघून तिला आनंद झाला.
“अरे तुम्ही यांना आत.” सोनाली हसून बोलली.
शशांकच्या चेहऱ्यावर मात्र रागच होता. ते बघून सोनालीला जरा वेगळच वाटलं. त्यानेही आत आल्या आल्या पहिले रावीला उठवायला लावलं. त्याचा तो कडक आवाज ऐकून सोनाली पण टेन्शनमध्ये आली. तिने त्याबद्दल शशांकला विचारून पाहिलं. पण त्याने रावी उठल्यावरच बोलायचं आहे इतकच सोनालीला सांगितलं.
तशी सोनाली उठली आणि तिच्याच विचारात रावीला उठवायला चालली. तिच्या खोलीकडे जाता जाता रुद्रला फोन करून सांगाव का? हा विचार तिच्या मनात आला. पण पहिले विषय काय आहे? ते जाणून घेऊन मग त्याला फोन करायचं सोनालीने ठरवलं.
शशांक आल्याचे समजताच रावी टुणकन उडी मारत बेडवरून उतरून खाली आणि हॉलकडे उत्सहात धावत सुटली. सोनाली तर तिच्या लेकीला बघतच राहिली.
जवळपास दोन दिवसानंतर तो तिला भेटायला आला होता. त्यामुळे रावी पटकन हॉलकडे आली आणि समोर बसलेल्या शशांकला आनंदाने बघू लागली. ती काही बोलायला जाणार तोच त्याने त्याचा हातच पंजा दाखवत तिला थांबवले.
रावीने आता शशांकचा चेहरा नीट पहिला तर त्यावर तिलाही राग दिसला.
“काही झाल आहे का?” रावी टेन्शनमध्ये येत विचारू लागली.
“ते तू मला सांगायला हव होत ना.” शशांक गंभीर होऊन बोलला.
“म्हणजे मला समजल नाही.’ रावी गोंधळून बोलली.
सोनाली पण रावीच्या बाजूला येऊन उभी राहिली. “नक्की काय झाल आहे?” सोनालीचा आवाज देखील आता कडक झाला.
तसा शशांकने त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर त्याला आलेले फोटो दोघींना दाखवले. जे की राकेश आणि रावीच्या मिठीतले होते. ते बघून सोनाली रावीकडे रागात बघायला लागली. तर रावी विचार करू लागली.
“काय आहे हे रावी?” सोनाली
“तिचं जर आधीच कोणावर प्रेम होत तर तस मला सांगायला हव होत ना.” शशांक
“तस काही नाहीये.” सोनाली मधेच बोलली.
“ते तिला बोलू द्याना.” शशांक रावीकडे बघत राहीला.
कारण रावी तर स्तब्ध होऊन गेली होती.
“रावी बोल.’ सोनाली आवाज चढवत बोलली.
“म्हणजे हे फोटो खरे आहेत तर.” रावीला गप्पच उभ राहिलेलं बघून शशांक तिरकस हसत बोलला.
“रावी.” सोनाली आतता कडाडली.
तशी विचारात हरवलेली रावी दचकून तिच्या विचारातून बाहेर आली. “त.. ते.. त.. म्ह.. तो..”
“नीट आणि स्पष्ट बोल.” शशांक “खरे आहेत ना? ते ही तीन चार दिवसापुर्वीचे
“तस नाहीये ते,’ रावीला कस बोलव तेच समजत नव्हत. “तो अचानक भेटला मला.”
तशी उभी असणारी सोनाली मटकन बाजूच्या सोफ्यावर बसली.
शाशंक पुढे काही बोलणार तोच रावी सोनालीच्या पायाशी बसली. “हे बघ मॉम, हे तर मला आता भेटले आहेत. पण तू तर मला आधीपासून ओळखतेस ना? माझ म्हणण तर आधी ऐकून तर घे.”
“फोटो तर खोट बोलत नाही ना,” सोनाली रावीच्या डोळ्यात बघत बोलली. “पण तू मात्र खरं सांगशील.”
“खरं बोलायचं असत तर तिने आपल्याला सगळ काही आधीच खरं सांगितल असत ना.” शशांक टोमणा मारत बोलला.
“हे बघा शशांक,” रावी आता खवळून उठली “मी जे काही करते ते मॉम आणि डॅडला सांगूनच करते. आता जे काही झाल तर अचानक झाल होत. मध्ये दीचा प्रोग्राम होता म्हणून मी काही बोलली नव्हती. आता तो झाल्यावर आज ना उद्या सांगणारच होती.”
रावीला अस खवळलेल बघून शशांक तिला बघतच राहीला. “नवीन नात सुरु करताना काही गोष्टी क्लीअर करायच्या असतात. नाहीतर नंतर संशय उभा राहतो.”
“त्यासाठी विश्वास ठेवून आधी ऐकून पण घ्यायच्या असतात.” परी तिथे पोहोचली आणि चिडून बोलली. “अस थेट आरोप करणे एवढ्या मोठ्या पोलीस ऑफिसरला शोभत नाही.”
रावी शशांकला बोलत असताना परी तिथे पोहोचली होती तिच बोलण ऐकून परीला थोडासा अंदाज आला आणि ती सरळ आत येत बोलून गेली. परीच्या बोलण्याने शशांक पण गप्प झाला.
“म्हणजे काय झाल तर तुलाही माहिती आहे.” सोनाली परीला रोखून बघत बोलली.
परीने हलकेच तिची मान खाली वर केली. आता तिथे राज पण येऊन पोहोचला आणि तो सर्वांना घेऊन त्यांच्या बिल्डींगच्या खालच्या आवारात आला. तिथे त्याचं लक्ष एका मुलाकडे गेल आणि रावीच्या रागाचा कडेलोट झाला. त्याला राज घेऊन आला होता. ती तशीच त्याच्या जवळ गेली आणि सटासट राकेशच्या कानाखाली मारू लागली. तर राकेश तिला खिजवत निर्लज्जपणे हसत होता.
“काय तू?” राकेश अजूनही तोऱ्यात बोलला. “आपल नात तू काही त्याला सांगितल नाहीस म्हणून म्हटलं मीच थेट दाखवून देतो.”
“तिला जबरदस्ती मिठीत घेऊन ना?” परी पण रागात बोलली.
“आता कुठला चोर बोलतो का की मी चोरी केली ते?” राकेशचा चेहरा अजूनही गुर्मीत होता. त्याला जी आग लावायची होती ती लागली होती.
तशी रावीने त्याच्या दोन्ही मांड्याच्या मध्ये जोरात लाथ मारली. तसा तो कळवळून खालीच बसला.
“साल्या,” रावी रागात फणकारत बोलली. “स्वतःच्या आयुष्याची वाट लावली तर लावली आता माझ्या आयुष्याची पण वाट लावायला निघालास?”
नंतर ती शशांकडे वळली. “त्या दिवशी हा मला मधेच भेटला. परत पॅचअप करूया का विचारू लागला. मी त्याला नाही म्हटली तर त्याने मला अचानक त्याच्या मिठीत ओढल. तेव्हाच त्याने हे फोटो काढलेत. हो आधी होती मी ह्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये. पण नंतर त्याची नियत समजल्यावर मी त्याला सोडून दिल होत.”
“ही खोट बोलत आहे.” राकेश काही त्याचा हेका सोडायला मागत नव्हता. “आता एक पोलीस ऑफिसर भेटला आहे म्हणून ती मला सोडत आहे.”
रावी परत राकेशला काही बोलाणार तोच शशांक बोलू लागला. “तुझ्या पास्टशी मला काही देण घेण नाही. आता मला एवढच सांग की त्याचा आणि तुझा आता काही संबंध आहे का? ते ही माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग.” शशांक रावीच्या डोळ्यात डोळे घालून बोलला.
तशी रावी शशांकच्या डोळ्यात हरवली. “त्याचा आणि माझा आता काहीच संबध नाहीये. जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलं आणि तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार केला आहे.”
रावीच्या ह्या वाक्यानंतर तिथे एकापाठोपाठ दोन आवाज गुंजले.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका. अरे यार !परी आणि तूषारला रोमान्स करायला संधीच देत नाहीयेत ही माणस... कोणीही कधीही मध्येच उठून येत आहेत..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
