Login

अवनी एक प्रवास भाग ११९

“तुमच्यामुळेच केल मी.” परी लहान मुलीसारखी बोलली. “तुम्हालाच माझा दिल्ली वाला डान्स बघायचा होता ना.” मग परी विचार करू लागली .”वेट, मी डान्स करायला लागली तेव्हा तर तुम्हाला समजल असेल ना की मी कधी आणि कुठे उडी मारणार होती ते. म्हणजे तुम्ही विसरला होता ना माझा डान्स? की दुसऱ्या कोणत्या मुलीला बघत बसला होता?”
मागील भागात.

परी तिच्या शेवटच्या स्टेप्स करत जशी वर पोहोचली तस तिने त्या जागेकडे पाहिलं जिथे तुषारला उभ राहायला सांगितल गेल होत. पण तो तर तिथे नव्हताच. तरीही परीने तिचे डोळे बंद करून तुषारला मनातच आवाज देत ती शेवटची उडी मारली. आता तिने जे काही होईल ते सगळच नशिबावर सोडलं होत.

सर्वांचे श्वास रोखले गेले. अगदी तिच्या कुटुंबाचा जीव बाहेर यायचा बाकी राहीला होता. विजयच हृदयच जणू आता बंद पडायला लागल होत. ते सगळेच उठून उभे राहिले आणि परीकडे टेन्शनमध्ये बघायला लागले.

परीची बंधू मंडळी तर तिच्याकडे जायला निघालीच होती की ती पुढच्या क्षणाला जागीच थबकली.

परीचे डोळे अजूनही बंद होते आणि ती काही सेकंदानंतर पुटपुटली. “लव्ह यु मिस्टर दगड.” आणि तिने तिचे डोळे उघडले.

ज्या चेहऱ्याची तिला इच्छा होती. तोच चेहरा तिच्या नजरेसमोर आला होता आणि ती त्याच्या विश्वासक हातात विसावली होती.

आता पूढे.

परी जस जशी तिच्या त्या शेवटच्या स्टेप्सकडे येत होती तस तस तुषारला परीचा तो दिल्लीमध्ये केलेला डान्स आठवू लागला. त्याला आता कल्पना आली की परी कुठे उडी मारणार होती. त्याने त्या दिशेकडे पाहिलं तर तिथे कोणीही उभ नव्हत.

आता तुषारला तेजश्रीच बोलणं आठवलं की तिने का त्याला त्या जागी उभं राहायला लावल होत. पण तोपर्यंत परी उडी मारायला लागली होती. तुषारने एका क्षणाचा देखील विलंब लावला नाही आणि तो चपळाईने त्या जागेवर पोहोचला आणि उडी मारत वरून येणारी त्याची ती परी त्याने हलकेच त्याच्या हातात झेलली.

परीचे डोळे बंद असून देखील तुषारचा तो स्पर्श समजून गेला होता आणि तिने डोळे उघडण्याआधीच तिचं प्रेम कबुल केल. परीने जसे डोळे उघडले तस तिला तुषारचे डोळे दिसले जे भरून आले होते. आज पहिल्यांदाच तिने तुषारच्या डोळ्यात पाणी पाहिलं होत.

‘तिला काही झाल असत तर.’ या विचाराने त्याचा जीव कासावीस झाला होता. तुषारने परीला हळूच खाली सोडलं आणि ती तिथून सरळ निघून गेला.

परीला वाटलं होत की तो आता तरी त्याचा राग सोडून काहीतरी बोलेल. पण तो काहीच न बोललेला बघून परीला आता मात्र काळजी वाटू लागली. ती जाणाऱ्या तुषारला बघतच राहिली. तर तिचे बाकी विद्यार्थी तिच्या अवती भोवती जमा होऊन परीच अभिनंदन करत होती. पण परीला त्या अभिनंदनाच काहीच कौतुक वाटल नाही. कारण ज्याने तिचं कौतुक कराव तो तर काहीच न बोलता निघून गेला होता ना. मग परीचे डोळे लागलीच भरून आले.

राज तिच्यापासून खूप लांब उभा होता. तरी तो तिचं मन वाचून गेला आणि तो देखील बाहेर सरसर निघून गेला.

इकडे गेले पंधरा मिनिट स्टेजवर नुसताच धुमाकूळ घातलेल्या परीच टाळ्यांच्या गजरात कौतुक चालू होत. अगदी बाहेरून मागवलेले कोरीओग्राफर पण आता परीकडे शिकवणीसाठी मागणी करू लागले होते.

परी कशीतरी सर्वाना सांरत स्टेजच्या मागच्या बाजूला गेली आणि निवेदिकेने परीच तोंडभरून कौतुक करत तो कार्यक्रम तिथेच संपल्याचे जाहीर केले.

कार्यक्रम संपल्याचे जाहीर होताच ते प्रेक्षक हळू हळू जाऊ लागले. बाकी सहभागी विद्यार्थ्यांना आधीच जायची परवानगी दिली होती. कारण परीचा डान्स शेवटचा होता. बाकी जरी जाऊ लागले तरी परीच कुटुंब तिची वाट बघत होता तिथेच उभं राहील.

तर त्या कॉलेजच्या बाहेरच्या आवारात राज तुषारला रोखून बघत उभा होता.

“तुझ्यासाठी तिने एवढ सगळ केल आणि तू काय केलस?” राज जरा चिडून बोलला. “सरळ निघून आलास?”

“तिने काय केल तर पाहिलस ना?” तुषार पण तितकचं चिडून बोलला. “तिला काही झाल असत म्हणजे?”

“यासाठीच तिने तुझ्या बहिणीला सांगून तुला तिथे उभ राहायला लावल होत ना.” राज

“हो,” तुषार “पण मग कशासाठी ते नाही सांगितलं ना,” तुषार

“मग सरप्राईज तरी कस राहील असत?” राज

“बरोबर आहे,” तुषार तिरकस हसत बोलला. “तू पण तिचाच मित्र ना. तूलाही तिचचं बरोबर वाटणार. मनापासून सांग, तिने जेव्हा ती उडी मारली तेव्हा तुला काहीच वाटल नाही का?”

तुषारच्या ह्या प्रश्नाच उत्तर राजकडे नव्हत. कारण तेव्हा जीव तर त्याचा ही बाहेर यायच्या मार्गावर होता.

“मला इतकच माहिती आहे की तिने हे सगळ तुझ्यासाठी केल,” राज “आणि त्याच तुला काहीच वाटल नाही?”

“वाटल म्हणून बाहेर आलो,” तुषार “नाहीतर तिथे पूर्ण कॉलेजसमोर तिला आय लव्ह..” तुषार बोलता बोलता थांबला.

“अस नाही म्हणत मी.” राज पण जरा ओशाळला. “पण निदान कौतुक थोडस?”

आता मात्र तुषारला हसू आल. “मला वाटल त्याच्यांत तू तरी समजदार वाटायचा. पण आता तुला बघून मात्र..” एवढ बोलून तो हलकासा हसला.

“काय करू?” राज “एकतर मामाची मुलगी आहे आणि माझी एकुलती एक बेस्ट फ्रेंड. मग फ्रेंडशिप मध्ये इतक तर चालतच.”

“प्रेम करतोस ना तिच्यावर?” तुषारने अचानक बोंब टाकला.

तसा राज चपापलाच. “अस काही नाही.” राजने पटकन त्याची मान फिरवून घेतली.

तस तुषार हलकासा परत हसला. “तरी माझी समजूत काढायला इथे आलास?”

“कारण तिचं पाहिलं प्रेम तू आहेस,” राज मंद स्मित करत बोलला. “प्रेम हे सुख देण्याच नाव आहे आणि तिचं सुख तुझ्यात आहे. तिचं सुख तेच माझ सुख. म्हणून बोलत आहे, लवकर जा आणि तिच्यासमोर कन्फेस कर. तिचा आताचा पडलेला चेहरा ती स्वतःला हरलेली दाखवू लागली आहे.”

आता तुषार त्याच्याकडे चमकून बघू लागला आणि तो तसाच पळत निघाला. त्याला अस पळताना बघून राजने एक सुस्कारा सोडला.

"चला आपल काम इथेच संपल.” राजच्या डोळ्यात हलकी आसव दाटली आणि तो तिथून जाऊं लागला.

तिकडे परीच्या मनात मात्र दुःखाची एक कळ उठली होती. तिने इतक करूनही तुषार तिच्याशी बोलला नव्हता. ते आठवून तिला आता रडू यायला लागल होत. ती फ्रेशरूममध्ये जाऊन उभी राहिली आणि चेहऱ्यावर नुसतच पाणी मारत होती. तिला तिचा तो रडका चेहरा तिच्या घरच्यांसमोर आणायचा नव्हता.

परीची वाट बघत बाकी सगळे जरी त्या स्टेजच्या समोरच उभे असले तरी तुषार मात्र त्याची मोठमोठी पावले टाकत थेट त्या फ्रेशरूममध्ये पोहोचला होता. आता त्याला ती तिथे आहे हे कस समजल? ते त्यालाही समजल नव्हत.

“अय चार फुट,” तुषार त्याच्या शैलीत बोलला. “काय वी....” तुषारला पुढे काही बोलल गेल नाही.

कारण तुषारला आलेलं बघून परीने बाजूला उभी असलेली काठी थेट त्याला फेकून मारली होती. नंतर आजूबाजूला काहीच दिसलं नाही म्हणून त्याच्या जवळ धावत जात त्याला ती हाताने मारू लागली.

“खूप वाईट आहात तुम्ही.” परी रडतच बोलू लागली. “जा आय हेट यु.”

तस तर तुषारला तिचा हात काहीच लागत नव्हता. पण तिचे ते भरून वहाणारे डोळे मात्र त्याला चांगलेच टोचत होते. परी त्याला हाताने मारत होती आणि तो हळू हळू मागे जायला लागला. परी आता थांबायचं नावच घेत नसलेली बघून तुषारने तिला पटकन त्याच्या मिठीत घेतलं.

“काही गरज नाही माझ्या जवळ यायची.” परी झटापट करत त्याच्या मिठीतून सुटायला बघत होती.

पण त्याच्या मजबूत हाताच्या विळख्यातून ती सुटणार तरी कशी होती? तिने तिची मान वर केली आणि तिचे ते टपोरे डोळे वरच्या पापण्यांना टेकले. जे बघायला तुषारला खूप आवडत होत. मग काय? तुषार तिला नुसताच बघत राहीला होता. ते बघून परीने त्याच्या चेहऱ्यावर तिचा हात ठेवला.

“सोडा मला.” परीच रडण काही थांबत नव्हत. पण तिने प्रतिकार कारण थांबवलं होत. नंतर तिने त्याच्या चेहऱ्यावरचा हात काढून त्याच्या खांद्यावर दोन तीन फटके मारले आणि त्याच्या कमरेला हातांचा विळखा मारत त्याला घट्ट मिठी मारली.

“आय हेट यु.” परी सतत हेच बोलत राहिली.

“बरं यु हेट मी.” तुषार हलकेच हसत बोलला. “बट आय लव्ह यु.”

पुढचे पाच ते दहा मिनिट परी त्याच्या मिठीत होती. त्याच्या शर्टाचा छातीकडचा भाग परीच्या अश्रूंनी भरला गेला. दहा मिनिटानंतर परी त्याच्या मिठीतून बाहेर आली. तुषारने तिच्याकडे प्रेमाने बघितलं.

“झाल की अजून काही बाकी आहे?” तुषार

तश्या परीच्या कपाळावर आठ्या चढल्या. “तुम्हाला ना माझी किंमतच नाही.” परी इतक बोलून तिथून जायला निघाली.

ती तुषारला ओलांडून पुढे चाललीच होती की तिच्या हाताला परत तुषारची पकड बसली. परी पुढे जायची थांबली. तुषार तिच्या पाठी आला आणि तिच्या पोटावर हात ठेवत तिला पाठीमागून मिठी मारली.

तुषारचा पोटावर आलेला हात बघून परीच्या अंगावर शहारा आला.

“सॉरी मिस अवनी.” तुषार परीच्या कानाजवळ येत बोलला. “पण पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही. जीव घश्यात आला होता माझा.”

“तुम्हाला तिथून जायला कोणी सांगितलं होत?” परी तिच्या तोऱ्यात बोलली. “तेजश्रीने सांगितलं होत ना तिथे थांबायला.”

“आता मला काय माहित की तूच तिथे थांबायला लावलं आहेस.” तुषार “माहिती असत तर नसतो गेलो. पण डान्स पर्यंत ठीक आहे एवढ सगळ करायची काय गरज होती?”

“तुमच्यामुळेच केल मी.” परी लहान मुलीसारखी बोलली. “तुम्हालाच माझा दिल्ली वाला डान्स बघायचा होता ना.” मग परी विचार करू लागली .”वेट, मी डान्स करायला लागली तेव्हा तर तुम्हाला समजल असेल ना की मी कधी आणि कुठे उडी मारणार होती ते. म्हणजे तुम्ही विसरला होता ना माझा डान्स? की दुसऱ्या कोणत्या मुलीला बघत बसला होता?”

आता परी एकदम टिपिकल गर्लफ्रेंडसारखी पझेसिव्ह होत बोलली.

“त्यावेळेस तुझ्या स्टेप्स वेगळ्या होत्या मिस अवनी,” तुषार एक मोठा श्वास घेतत बोलला. “त्यावेळेस तू एकाच गाण्यावर डान्स केलास आणि आज एकदम चार गाणी निवडलीस.”

“पण शेवटचं गाण तर सेम होत ना,” परी त्याच्या मिठीतून बाहेर येत बोलली. “मग का आला नाही तिथे?”

“आलो ना तिथे,” तुषार “म्हणून तर तू माझ्या हातावर होतीस ना.”

तसा परीने तिचं तोंड वाकड केल.

“आता काय?” तुषार मनातच वैतागला.

“तुम्ही माझ कौतुक पण नाही केल.” परी इतक बोलून सरळ त्या फ्रेशरूम मधून बाहेर जायला निघाली.

“तुझ्या त्याच डान्समध्ये तर हरवलो होतो,” तुषार हाताची घडी घालत बोलला. “म्हणून तर जरा दुसर आठवायला मला उशीर झाला.”

“व्हॉटएव्हर..." परी तिच्या मानेला झटका देत तिथून बाहेर पडली.

इकडे आता तुषारने त्याचे डोळे फिरवले. परी गेल्यावर तुषार तिथून बाहेर जायला निघाला. त्याने त्या फ्रेशरूमचा दरवाजा उघडला होता की समोर एक मुलगी उभी असलेली त्याला दिसली. जी मोबाईलमध्ये डोक घालून त्या उघडलेल्या दरवाजाच्या आत येत होती.

“थांक्यू.” त्या मुलीने तुषारकडे नजर टाकली आणि बोलली. दुसऱ्याच क्षणाला तिला काहीतरी जाणवलं आणि ती चिडून तुषारकडे बघू लागली.

त्या मुलीला बघून तुषारला पण टेन्शन आल होत. कारण तो थेट लेडीज फ्रेशरूममध्ये घुसलेला होता.

“तू काय करत होतास लेडीज रूममध्ये?” ती मुलगी चिडून बोलली.

आता तुषारची बोलतीच बंद झाली.

“मुलींना लपून बघायला आला होता ना? की आतमध्ये कॅमेरा तर नाही लावला ना?” ती मुलगी खूप रागात बोलू लागली. “तुमच्यासारख्या मुलांमुळे मुली मोकळेपणाने फिरू शकत नाही. शेमलेस नाहीतर.”

“अय गप्प.” तुषार खवळून बोलला.

त्याचा तो रागातला अवतार बघून ती मुलगी अजूनच घाबरून गेली. “मी पोलिसांना बोलावेल. मग तुला कळेल की मुलींची छेड काढल्यावर काय होत ते.”

“बोललो ना एकदम गप्प,” तुषार आता शांतपणे बोलला. पण पुढे काय बोलाव तेच त्याला सुचत नव्हत. “ते काय झाल?..”

“मी बोलवलं होत त्यांना.” परी परत तिथे येत बोलली.

परीला आलेलं बघून तुषारच्या जीवात जीव आला.

“मॅम तुम्ही?” ती मुलगी गोंधळून बोलली. “पण का?”

“ते आतल्या बाथरूमचा दरवाजा लॉक झाला होता,” परी “आता तर सगळेच बाहेर होते. हेच जवळ होते म्हणून त्यांना बोलवलं.”

“अम्म सॉरी,” ती मुलगी “ते इथे त्यांच्याशिवाय दुसर कोणीही दिसलं नाही म्हणून जरा मिसअंडरस्टँडिंग झाली.”

“ठीक आहे तू जाऊ शकतेस.” परी

तशी ती मुलगी फ्रेशरूममध्ये निघून गेली.

“आणि तुम्ही,” परीने तिचा मोर्चा तुषारकडे वळवला. “मी इथून निघून गेलेली असताना इथे काय करत होता?”

“फ्रेशरूममधल्या लावलेल्या टाईल्स मोजत होतो.” तुषार पण कपाळावर आठ्या पाडून बोलला.

तशी परी त्याला चिडून बघू लागली.

“तुझ्याच मागे येत होतो,” तुषार “तेव्हा ती मुलगी मध्ये आली. तुला आवाज देणार तोपर्यत तू मागे न बघता निघून देखील गेलीस.”

“अं मी पण सॉरी.” परी लहान ,मुलीसारखी बोलली आणि त्याच्याकडे एक प्रेमळ नजर टाकत तिथून चालली गेली.

तिची ही अदा बघून तुषारने लाजतच केसात हात फिरवला आणि पटकन तिच्या मागे मागे जाऊ लागला.

तर बाहेर बाजूलाच्या बाजूला परी अजून का आली नाही? म्हणून रावी फ्रेशरूमकडे यायला निघाली होती. तेवढ्यातच परी तिला येताना दिसली. तशी चालणारी रावी थांबून तिच्या जवळ येण्याची वाट बघू लागली.

रावीने परीकडे पाहिलं तर ती तिच्याच धुंदीत येत होती. समोर रावी उभी आहे हे देखील तिला समजून आल नव्हत. रावीने तिला बघून तिचे हात हलवले. तरी परी फक्त गालात हसत चालत येत होती.

रावी आवाज देणार तोच रावीला परीच्या मागून तुषार येताना दिसला. तेव्हा कुठे रावीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि रावीचं चेहऱ्यावर खट्याळ हसू पसरू लागल.

परी तिच्याच तंद्रीत रावीजवळ येऊन पोहोचली. पण रावी फक्त हाताची घडी घालून गंमत बघत उभी राहिली.

अचानक कोणीतरी समोर आल म्हणून परी दचकलीच. समोर रावीला बघून पहिले तर ती गोंधळलीच. परीने रावीचा चेहरा पाहिला तर त्यावर खट्याळपणा नाचत होता. मग परीला त्याची जाणीव झाली आणि तिने हलकेच मागे नजर टाकली. तर तुषार पण जागीच थांबला होता. तस परीने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.

“दी,” रावीचा खट्याळपणा चालू झाला. “तिकडे आम्ही बाहेर तुझी वाट बघत आहोत आणि तू आतमध्ये सरांसोबत..” रावी पुढे बोलणार तोच परीने तिच्या दंडावर चापट मारली.

“शट अप.” परीने तिचे डोळे मोठे केले.

“गप्पा मारत होते अस विचारायचं होत मला.” रावी तिचे शब्द फिरवत बोलली.

“राहू दे,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “तुझे तोंडावरचे आणि मनातले प्रश्न मला काही समजत नाही का? इथल जर बाहेर कोणाला सांगितलस ना तर बघ. तुझ्या...”

“तुझ्या काय?” रावी तोऱ्यात बोलली. “द्यायची सगळी माहिती तू मॉमला दिली आहेस. आता ती धमकी त्यायची गरज नाही.”

परीने स्वतःच्या कपाळाला हात लावला.

क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →