Login

अवनी एक प्रवास भाग ११८

परीने तुषारला उभ राहायला लावलेल्या जागेवर नजर टाकली. पण तो तर जरा मागे जाऊन उभा राहीला होता ना. मग तो परीला काही दिसला नव्हता. तसा तिचा चेहरा लगेच जरा नाराज झाला. तिला उघड उघड तर अस दाखवता येणार नव्हत. म्हणून तिने लगेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पण राजला मात्र तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव लागलीच समजून गेले होते.

मागील भागात.

ह्या दोन्ही जोड्या बाकीच्यांसोबत त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागले. कामात असलेल्या परीला ह्या दोन्ही जोड्या एकमेकांसोबत असलेल्या दिसल्या. तस परीच्या चेहऱ्यावर एक समाधानाच हसू पसरलं.

तेजाश्रीच्या ग्रुपच्या डान्स नंतर बरेच डान्स झाले पण त्याची सर काही तेजश्रीच्या ग्रुपच्या डान्ससारखी आली नव्हती. हा, ते एक कला म्हणून उत्तम होते. पण शेवटी तेजश्रीच्या ग्रूपच्या त्या डान्सने एक वेगळीच उंची गाठली होती. जी बाकीच्यांना गाठायला जमतच नव्हती.

अखेर त्या कार्यक्रमाची शेवटची कला तिथे सादर झाली. सगळ्यांना वाटल की आता तो कार्यक्रम संपला. पण तो अजून संपला नव्हता आणि त्या निवेदिकेने पूढे बोलायला सुरवात केली.

“आता अजून एक शेवटचा सरप्राईज पर्फोर्मंस,” निवेदिकेने एक पोज घेतला.

तसे सगळेच तिच्याकडे अधिरतेने बघू लागले.

आता पूढे.

त्यांना तो क्षण आठवला जेव्हा की मिस अवनीच नाव तिथे गुंजल गेल होत.

“बघता काय असे?” निवेदिका उत्साहात येत बोलली. “ज्या डान्सने आपल्या सगळ्यांना वेड लावलं. त्या डान्सच्या कोरीओग्राफरचा डान्स बघायचा होता ना?”

तस त्या जागेमध्ये एक जल्लोषपूर्ण आवाज गुंजला गेला.

“आपली इच्छा आपल्या अवनी मॅमने पूर्ण करायची ठरवली आहे.” निवेदिका "चला तर मग बिग राऊंड ऑफ अप्लॉझ फॉर मिस अवनी."


निवेदिकेच बोलण ऐकून परत तिथे अवनी मॅमच्या नावाने जप सुरु झाला. राजला तरी माहिती होत की परी उत्तम डान्स करते. पण त्यानेही कधी तिला अस नाचताना बघितलं नव्हत. त्यामुळे तो देखील तितकाच उत्सुक होता. तर तुषारची परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्याने तिचा डान्स आधी पाहिलेला होता. पण तेव्हा तिने चेहरा एका मास्कने झाकलेला होता. पण ती आज उघड्या चेहऱ्याने नाचणार होती.

रावी आणि मनालीने तर तेजश्रीच्या ग्रुपचा डान्स बसवताना परीला थोडक्यात नाचताना पाहिलं होत. त्याच परीच्या डान्सची आता पूर्ण पूर्ण झलक बघायला मिळणार म्हणून त्या दोघी जोरजोरात टाळ्या वाजवत होत्या. आताच तर त्यांनी परीने सागीतल्याप्रमाणे तिची तयारी करून दिली होती. जेव्हा शेवटचे दोन डान्स उरले होते तेव्हाच परीने त्या दोघींना बोलावून घेतले होते. तोपर्यत निवेदिकेने तिच्या बोलण्यात सर्वाना गुंतवून ठेवलं होत.

बाकी परीच कुटुंब देखील तितकाच उत्साहात आल होत.

तर परी बंद पडद्याआड जरा नर्व्हस झाली होती. तिला एवढ्या लोकांसमोर डान्स करायचा आहे म्हणून नाही तर ती तिच्या मनातल आज तिच्या डान्स मधून तुषारला सांगणार होती. ते त्याला नीट समजल म्हणजे तिच तिच्या डान्ससाठीची ती ट्रॉफी असणार होती.

स्टेजचा पडदा उघडला गेला आणि गाण्याचं म्युझिक सुरु झाल. तस तिथल्या प्रेक्षकवर्गात एक प्रकारची शांतता पसरली गेली आणि परीने पोपिंग ह्या डान्सच्या स्टाईलने डान्स करायला सुरवात केली.

यहाँ भी होगा, वहां भी होगा
One, Two, Three, Four

यहाँ भी होगा, वहां भी होगा
अब तो सारे जहाँ में होगा
क्या ?
मेरा ही जलवा, मेरा ही जलवा

(ह्या कडव्याला परीने ज्या स्टेप्स केल्या त्याला पूर्ण प्रेक्षकवर्गाकडून प्रचंड प्रमाणात जल्लोषाचा प्रतिसाद मिळाला.)

अर्रे यहाँ भी होगा, वहां भी होगा
अब तो सारे जहाँ में होगा
क्या ?
मेरा ही जलवा मेरा ही जलवा
मेरा ही जलवा मेरा ही जलवा
Alright
To the rhythm and a beat so high
तेरा जलवा जलवा है wide
To the rock n roll some night
Night night night
Alright
To the rhythm and a beat so high
तेरा जलवा जलवा है wide
To the rock n roll some night
Night night night
जलवा just जलवा आहा

आता नहीं है मुझको की
वादे पीछे हैट जाऊं
अर्रे आता नहीं है मुझको की
वादे पीछे हैट जाऊं

मेरे जीने का जीने का ढंग है
मेरा अपना अपना बस एक रंग है
मेरा ही जलवा मेरा ही जलवा
One, Two, Three, Four
Put it down
मेरा ही जलवा
Put it down here here
मेरा ही जलवा जलवा.. जलवा..

जस ह्या गाण्याची म्युझिक संपली तस टाळ्यांचा आवाज कडाडला. सगळ्यांना वाटल की आता संपेल का काय. म्हणून बऱ्याच जणांचा मूड ऑफ झाला. कारण मनाला एखादी गोष्ट आवडली की ती लवकर संपुच नये अस वाटत असत.

पण ह्या गाण्याच्या म्युझिकला लागुनच दुसऱ्या गाण्याच्या म्युझिकला सुरवात झाली. मग काय परत एकदा उत्साहाची लाट आली.

आजूबाजूच्या डान्स करणाऱ्या सह कलाकारांनी परीला आधीच्या गाण्याच्या शेवटी परीला घेराव घातला आणि जस दुसऱ्या गाण्याची म्युझिक वाजली तशी परी तिचे कपडे बदलून पटकन समोर आली होती. हे तिने काही सेकंदात कस केल? हे कोणालाच समजल नव्हत. तुषार पण परीला बघतच राहीला होता.

एवढंच काय? सायली आणि विजय पण परीला बघतच राहिले होते. परीने एका ड्रेस वर एक असे तीन ड्रेस चढवले होते. परीचा आताचा लाल ड्रेसमधला लुक इतका जबरदस्त दिसत होता की तिथल्या प्रत्येकाला वेड लावून गेला होता.

पुढंच गाण सुरु झाल जे रिमिक्स केलेलं होत आणि त्यावर परीने रोबोटिक डान्सवर नाचायला सुरवात केली.

टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई
आग लगी दिल में तो, दिल को तेरी याद आई
तेरी याद आई तो, जल उठा मेरा भीगा बदन,
मेरे बस में नहीं मेरा मन, मैं क्या करूँ

नाम तेरा मेरे लबों पे आया था
तू ने बहाने से मुझे बुलाया था
झूम कर आ गया सावन, मैं क्या करूँ

डूबा दरिया में खड़ा मैं साहिल पर
तू बिजली बनकर गिरी मेरे दिल पर
चली ऐसी पागल पवन, मैं क्या करूँ

टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई
आग लगी दिल में तो, दिल को तेरी याद आई
तेरी याद आई तो, जल उठा मेरा भीगा बदन,
मेरे बस में नहीं मेरा मन, मैं क्या करूँ

परीच्या ह्या डान्सवर तर सर्वांचे श्वास कोंडले गेले होते. ह्या गाण्यानंतर मात्र परी जरा अस्वस्थ झाली. कारण आता विषय तिच्या प्रेमाच्या कबुलीचा आला होता. तो कोणाला कळू ही द्यायचा नव्हता आणि त्याला मात्र ओरडून ओरडून सांगायचा होता. ह्या वेळेस देखील आधीसारखाच तिच्या सहकलाकारांनी तिला घेराव घातला आणि ती तिच्या तिसऱ्या पेहाराव्यामध्ये आली. जो की पांढऱ्या रंगाचा होता.

पुढ गाण सुरु झाल आणि परीने क्लासिकल पद्धतीने नाचायला सुरवात केली. परीच हे तिसर गाण होत तरी तिथला उत्साह हा पहिल्या गाण्यापेक्षा ही जास्तच वाहत होता. परीच्या डान्सने तिथल्या प्रत्येकला वेड लावल होत.

झुम चिकी चिकी झुम
तुम बोलो है वो कौन जो
बार-बार ये दिल खोता है देख के उसको
झुम चिकी चिकी झुम
तुम बोलो है वो कौन जो
बार-बार ये दिल खोता है देख के उसको

(परीने तुषारला उभ राहायला लावलेल्या जागेवर नजर टाकली. पण तो तर जरा मागे जाऊन उभा राहीला होता ना. मग तो परीला काही दिसला नव्हता. तसा तिचा चेहरा लगेच जरा नाराज झाला. तिला उघड उघड तर अस दाखवता येणार नव्हत. म्हणून तिने लगेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पण राजला मात्र तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव लागलीच समजून गेले होते.)

हे हे हे..

पहली बार देखा है ऐसा
अजनबी ना अजनबी कै जैसा
पहली बार देखा है ऐसा
अजनबी ना अजनबी कै जैसा

(आता तुषारला पण त्याची जाणीव व्हायला लागली की हा सगळा उपदव्याप फक्त त्याच्यासाठीच केला गेला होता.)

दुनिया में दोस्तों की वैसे कमी नहीं है यार
होता है फिर भी ना जाने क्यों दिल बेकरार
हाय रे हाय क्या हुआ ना जाने क्यूँ
धड़के है दिल बार-बार

बेगाना है देखो थोड़ा यार वो
हाँ सँभालो-सँभालो ना प्यार हो
अपना बना के देखो दिल ना चुरा ले वो
ऐसा क्यूँ लगे है बोलो ना

झुम चिकी चिकी झुम
तुम बोलो है वो कौन जो
बार-बार ये दिल खोता है देख के उसको

आता शेवटच्या गाण्याची वेळ आली आणि त्याच म्युझिक सुरु झाल. ह्यावेळेस मात्र तिने तिचे कपडे काही बदलले नव्हते. पण तुषारच्या चेहऱ्यावर मात्र गुलाबी रंगाचा साज चढत चालला होता.

सितारों की महफ़िल
में गूंजेगा तराना
के होठों पे आया
है दिल का फ़साना
अरे दिल ने दिल को पुकारा
लो मैं आया मिलने दुबारा
मंज़िल प्यार तुम्हारा
मैं हूँ सागर तुम हो किनारा

सितारों की महफ़िल में गूंजेगा तराना
के होठों पे आया है दिल का फ़साना
अरे दिल ने दिल को पुकारा
लो मैं आया मिलने दुबारा

अजब शाम है ये प्यार की
पहलु में सभके यार है
अजब रात है जज़्बात की
दिन में प्यार ही प्यार है
ये प्यार तुम्हारा
ये प्यार हमारा
है खूब नज़ारा
ज़माना खुशी का
है सारा ज़माना
के जिसने भी सीखा
है प्यार निभाना
अरे दिल ने दिल को पुकारा
लो मैं आया मिलने दुबारा
मंज़िल प्यार तुम्हारा
मैं हूँ सागर तुम हो किनारा

कदम आये है उस मोड़ पे
हम तुम है जहाँ सामने
नज़र से नज़र करने लगी
बातें बड़े ही राज़ से
ये राज़ तुम्हारा
ये नाज़ हमारा
करे है क्या इशारा
निशाने पे दिल है
के दिल पे निशाना
दीवाना है अपनी ही
धुन में दीवाना
अरे दिल ने दिल को पुकारा
लो मैं आया मिलने दुबारा
मंज़िल प्यार तुम्हारा
मैं हूँ सागर तुम हो किनारा

सितारों की महफ़िल
में गूंजेगा तराना
के होठों पे आया
है दिल का फ़साना
सितारों की महफ़िल
में गूंजेगा तराना
के होठों पे आया
है दिल का फ़साना.

लिरीक्स संपले तस परीने समोर बसलेल्या त्या डीजे वाल्याकडून माईक हाती घेतला. ती बरीच दमली होती. तरीही दम टाकत ती बोलायला लागली.

“मग झाली का इच्छा पूर्ण?” परी जोरात बोलली. “की अजून काही?”

“वन्स मोर.”

“वन्स मोर.”

“वन्स मोर.”

असा नारा तिथे गुंजायला लागला.

तर परीला दमलेलं बघून विजयला तिची काळजी वाटून आली. तो काळजीने उठून उभा राहीला आणि परी पुढे बोलली. त्या गाण्याची म्युझिक अजूनही चालूच होती.

“ठीक आहे,” परीने तिच्या उजव्या हाताचे दोन बोट पूढे केली. “शेवटचे दोन मिनिट.” एवढं बोलून परीने तिच्या त्या पांढऱ्या ड्रेसवर पांढऱ्या रंगाचच जकेट घातलं. म्युझिक तर चालूच होत.

दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है

(परीने ह्या गाण्याच्या सिग्नेचर स्टाईलने नाचायला सुरवात केली. तसा समोरचा प्रेक्षक वर्ग अजूनच जोश मध्ये आला.)

कहो ना प्यार है कहो ना प्यार है
हाँ तुम से प्यार है के तुम से प्यार है

इन प्यारी बातों में अन्जाना इकरार है

(आता परी तिने स्टेजवर डाव्या बाजूला लावलेल्या तिच्या त्या अरेंजमेन्टकडे तिच्या स्टेप्स करत निघाली. स्टेज जरी उंच असल तरी परीने त्या स्टेजवर अजून पाच फुट उंच अशी पायऱ्या बनवल्या होत्या आणि त्याच पायऱ्यांवरून परी एक एक पायरी वर चढत तिच्या स्टेप्स करत चालली होती.)

कहो ना प्यार है कहो ना प्यार है

(इथेही परीने ती सिग्नेचर स्टाईल केली.)

कहा ना प्यार है कहा ना प्यार है

ह्या शेवटच्या वाक्यानंतर तिने त्या उंचीवरून स्वतःच्या बॉडीला गोल गोल फ्लिप करत सरळ समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने उडी मारली.

स्टेज आधीच पाच फुटाच्या वर उंचीच होत. त्यावर परीने अजून पाच फुटाची उंची वाढवली होती आणि त्यावरून तिने थेट समोर उडी मारली होती. हा आता ती उंची इतकी पण नव्हती की कोणाचा जीव जाईल. पण इतकी उंच नक्कीच होती की हात पाय सहज मोडले जातील.

परी तिच्या शेवटच्या स्टेप्स करत जशी वर पोहोचली तस तिने त्या जागेकडे पाहिलं जिथे तुषारला उभ राहायला सांगितल गेल होत. पण तो तर तिथे नव्हताच. तरीही परीने तिचे डोळे बंद करून तुषारला मनातच आवाज देत ती शेवटची उडी मारली. आता तिने जे काही होईल ते सगळच नशिबावर सोडलं होत.

सर्वांचे श्वास रोखले गेले. अगदी तिच्या कुटुंबाचा जीव बाहेर यायचा बाकी राहीला होता. विजयच हृदयच जणू आता बंद पडायला लागल होत. ते सगळेच उठून उभे राहिले आणि परीकडे टेन्शनमध्ये बघायला लागले.

परीची बंधू मंडळी तर तिच्याकडे जायला निघालीच होती की ती पुढच्या क्षणाला जागीच थबकली.

परीचे डोळे अजूनही बंद होते आणि ती काही सेकंदानंतर पुटपुटली. “लव्ह यु मिस्टर दगड.” आणि तिने तिचे डोळे उघडले.

ज्या चेहऱ्याची तिला इच्छा होती. तोच चेहरा तिच्या नजरेसमोर आला होता आणि ती त्याच्या विश्वासक हातात विसावली होती.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →