Login

अवनी एक प्रवास भाग ११७

एका मागे एक कला सदर होत राहिल्या. एखाद रोमटीक गाण लागल की तिथे असलेले ते लव्ह बर्ड्स एकमेकांना हळूच बघायचे. तो बंधू मंडळीचा ग्रुप एकत्र जो बसला होता. त्यामुळे मनाली तरी रावीजवळ होती. संधी बघून आरुष हळूच तिच्याजवळ सरकला आणि हळूच तिचे हात आपल्या हातात घेतले. असा अचानक कोणीतरी हात पकडला म्हणून मनाली दचकली आणि तिने बाजूला पाहिलं.

मागील भागात.

आरुष ही आल्या आल्या लागलीच मनालीला शोधू लागला. पण रावी आणि मनाली तर परीला तयार करत होत्या. पूर्ण दिवस कामात असल्याने परीला तयारी करायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून ती आत दोघींच्या मदतीने तयारी करत होती. त्यात तिला तिच्या शेवटच्या डान्ससाठी वेगळी तयारी करायची होती. त्याची माहिती देखील परीने दोघींना आताच देऊन ठेवली. जेणेकरून परीला पटकन तयार होता येईल.

अखेर कार्यक्रमाला सुरवात झाली ती गणेश वंदनाने. नंतर सरस्वती पूजन झाल. नटेश्वरच्या मूर्तिची पूजा झाली. यानंतर लगेच पाहुण्याचे स्वागत आणि भाषण आटपून घेण्यात आले.

अखेर ज्या कार्यक्रमाची उत्सुकता होती तो वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. ती पूर्ण जागा विद्युत रोशानाईने झगमगून निघाली होती. एक नवीन चैतन्य तिथे पसरलं गेल.

आणि तिथे एक जयघोष तिथे गुंजला...

आता पूढे.

“गणपती बाप्पा मोरया.”
“मंगलमूर्ती मोरया.”

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच गोड गळाच्या एका मुलीच्या आवाजाने गाण्याला सुरवात झाली.

गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥

गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने ।
गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे ।
गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने ।
गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे ।
गुरुदैत्यगलच्छेत्रे गुरुधर्मसदाराध्याय ।
गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय ।
गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि ।
गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥

ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने ।
गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे ।
गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते ।
गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणयवते ।
गौरीस्तनन्धयाय गौरीहृदयनन्दनाय ।
गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय ।
गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि ।
गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥

त्या मुलीच गाण संपलच होत की एक मुलगा पुढे आला आणि त्याने चालू असलेल्या म्युझिकवर गाण गायला सुरवात केली. त्याच्या मागे दोन मुली आणि एक मुलगा अस कोरस साठी उभे राहिले.

देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा

ज्वाला सी जलती है आँखो मे जिसके भी
दिल मे तेरा नाम है,
परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है
और कैसा परिणाम है,

धरती अंबर सितारे, उसकी नज़रे उतारे
डर भी उससे डरा रे, जिसकी रखवालिया रे
करता साया तेरा,
हे देवा श्री गणेशा

देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा

हो तेरी भक्ति तो वरदान है,
जो कमाए वो धनवान है,
बिन किनारे की कश्ती है वो,
देवा तुझसे जो अन्जान है,
यूँ तो मूषक सवारी तेरी,
सब पे है पहरेदारी तेरी,
पाप की आँधिया लाख हो,
कभी ज्योती ना हारी तेरी,
अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे,
भूल के ये जहां रे,
जिस किसी ने यहाँ रे,
साथ पाया तेरा,हे देवा श्री गणेशा

देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा

तेरी धूलि का टीका किए,
देवा जो भक्त तेरा जिए,
उसे अमृत का है मोह क्या,
हँस के विष का वो प्याला पिए,
तेरी महिमा की छाया तले,
काल के रथ का पहिया चले,
एक चिंगारी प्रतिशोध से,
खड़ी रावण की लंका जले,
शत्रुओं की कतारें, इक अकेले से हारे,
कण भी परबत हुआ रे,
श्लोक बन के जहाँ रे,
नाम आया तेरा हे देवा श्री गणेशा,
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा

गणपति बप्पा मोरया..

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

अश्या प्रकारे गणपती बाप्पाच्या नावाने कार्यक्रमाला सुरवात झाली. पूर्ण वातावरण तिथल भक्तिमय झाल. ह्या गाण्याच्या मागे परत एक भक्तीगीतावर डान्स झाला आणि नंतर हळू हळू एक एक कला सदर व्हायला सुरवात झाली. त्यांच्या कॉलेजची ती निवेदिका तिच्यातली शंभर टक्के कला त्या निवेदनात ओतत होती आणि एक एक कला त्या मंचावर सादर होत चालली होती.

अंधाराने त्याच साम्राज्य चांगलच पसरलेलं असताना वेळ आली ती तेजश्री आणि तिच्या ग्रुपच्या डान्सची. आतापर्यंत सादर झालेली कला देखील अतिशय उत्तम होत्या. पण हा, त्या कलेपैकी परीने बसवलेला हा एकमेव डान्स होता. जी बघायची उत्सुकता त्या कॉलेजच्या प्रत्येकाला होती. त्याची झलक तर काहींनी प्रॅक्टिसच्या वेळीस बघितलीच होती. पण अस डान्ससाठीच्या पूर्ण पेहेराव्यामध्ये तो डान्स बघण ती मजाच वेगळीच असते.

हिप हॉप आणि क्लासिकल या दोन्ही डान्स प्रकाराला एकत्र करून त्याला दोन ते तीन गाण्यात मिक्स फ्युजन तयार केल होत. त्याची सुरवात तेजश्रीने तिला दिलेल्या स्टेप्सने कडक एन्ट्री मारून केली होती. तिच्यापाठी दोघी जणींनी तिला जॉईन केल. त्या गाण्याच्या दुसऱ्या कडव्याला सुजाताने एन्ट्री मारली. सुजाताला क्लासिकल डान्सच्या स्टेप्स दिल्या होत्या. तिच्यापाठी देखील दोन मुली आल्या होत्या.

परीने दोन्ही डान्स प्रकराला एकत्र करून जो डान्स बसवला होता त्याला डीजे वाल्याने बिट्स देऊन त्याला अजूनच रंग चढवला होता. त्याने तिथला पूर्ण प्रेक्षक वर्ग जागेवर उठून ताल धरू लागला होता. आताचे गाण वाजताना अजून काही बिट्स एक्स्ट्रा वाजत असल्याचे तेजश्रीला जावाणले. तस तिने तिच्या पूर्ण ग्रुपकडे बघून इशारा केला. जो त्या सर्वाना समजून गेला होता. मग काय? वाढलेल्या त्या एक्स्ट्रा बिट्सवर त्यांनी त्यांचे स्टेप्स बरोबर जुळवले. नंतर त्या डान्सला जी काही रंगत चढली होती त्याने तिथल वातावरण पूर्ण जोश मध्ये आल होत. त्यात तेजश्रीची ती होप हॉप करायची स्टाईल आणि सुजाताच्या क्लासिकल स्टेप्स तिथल्या सर्व मुलांना वेड लावून गेल्या होत्या.

पूर्ण गाण संपेपर्यंत तुषार तेजश्रीने सांगितलेल्या जागी उभा होता. तो देखील डोळे फाडून त्याच्या बहिणीचा डान्स बघत राहीला होता. घरात डान्स दाखवताना तिने ह्यातलं बरच काही केल देखील नव्हत. मग तिने तो डान्स सारखा सारखा मला का बघायला भाग पाडला? हा प्रश्न तुषारला पडला. पण सध्या तो त्याच्या बहिणीचा डान्स बघण्यात इतका गुंग होऊन गेला की त्याला त्या प्रश्नाचा नंतर विसरच पडला.

पुढचे पाच मिनिट सर्वाना नाचायला भाग पाडून तेजश्रीच्या ग्रुपचा डान्स संपला. त्यांच्या डान्सला प्रचंड मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कला ह्या डान्स समोर फिक्या पडल्या होत्या. इतकचं काय? ह्या पुढे कला सादर करण्यासाठी येणाऱ्या त्या कलाकारांना देखील टेन्शन यायला लागलं. कारण त्यांचे डान्स इतके काही खास बसवले गेले नव्हते. अस त्यांना आता वाटायला लागल होत.

डान्स संपल्यावर तेजश्रीने मोठ्या अभिमानाने परीचे मोठ्या आवाजात आभार मानले. जणू काही डान्सच्या प्रॅक्टिसच्या सुरवातीला ज्यांनी ज्यांनी त्यांना परीवरून चिडवलं होत त्यांना ती एक चपराक मारत होती.

तर तेजश्रीच्या त्या वागण्यावरून परीने डोक्यालाच हात लावला होता. कारण तिने कधीही कोणाशीही स्पर्धा केली नव्हती. ती फक्त कलेची पूजा करत होती. तेजश्रीने तर परीला स्टेजवर बोलावणार असल्याचे देखील सांगितले होते. पण परीने तेव्हा त्यासाठी मनाई केली होती.

'मॅम तर स्टेजवर येणार नाही ना? पण आपण त्यांच नाव तर घेऊ शकतो ना?’ ही सुजाताची कल्पना तेजश्रीला खूप आवडली. मग काय? जसा डान्स संपला तस तेजश्री आणि तिचा तो ग्रुप परीच्या नावाने जोरात ओरडला होता.

“अवनी मॅम,” तेजश्री मोठ्याने बोलली. “हा दिवस फक्त तुमच्यामुळे आम्ही बघत आहोत. थँक्स अलोट मॅम. सो थ्री चिअर्स फॉर अवनी मॅम.”

“हिप हिप..” सुजाता

“हुर्रे.” प्रेक्षक

“हिप हिप..” सुजाता

“हुर्रे.” प्रेक्षक

“हिप हिप..” सुजाता

“हुर्रे.” प्रेक्षक

तर परी तिच्या कमरेवर हात ठेवून तिच्या ह्या विद्यार्थ्यांना लटक्या रागात बघत राहिली. ‘एकदम तिच्या दादावर गेली आहे.’ परी मनातच बडबड करू लागली. ‘जे करायला सांगत नाही तेच करते.’

तर तिच्या आजूबाजूला असलेल्या बाकी स्टाफ तिचं कौतुक करू लागले होते. तर परी चेहऱ्यावर उगाच हसू आणून त्याचं कौतुक स्वीकारत होती.

“आय विश,” निवेदिका भावनेच्या भरात बोलून गेली. “की आपल्या कॉलेज मधल्या ह्या कोरीओग्राफरचा डान्स आम्हाला पण बघायला मिळाला असता.”

तस त्या कॉलेजचे सगळे विद्यार्थी अवनी मॅम नावाचा जप करू लागले होते. आता तर परीच तोंडच उघड पडलं. त्या निवेदिकेने परीकडे पाहिलं तर परी तिला रागातच बघत होती. तर ती निवेदिकेने हलकेच हसत तिचे खांदे उडविले होते.

“ठीक आहे,” निवेदिका “आपण त्यांना करूयात विनंती.”

इकडे परीने तिला काहीतरी फेकून मारायची ॲक्शन केली.

“पण आधी बाकीच्या पर्फोर्मंसकडे वळूयात.” निवेदिका “तुमच्या मॅमला मनवायला जरा वेळ लागेल ना.”

तसा पूर्ण प्रेक्षकवर्ग अजूनच उत्साहात आला. तेजश्रीची नजर परीवर गेली. जी तिलाच रागात बघत होती. तर सुजाता परीला आत्ताच स्टेजवर बोलावण्यासाठी तेजश्रीला खुणावत होती. तेजश्रीने सुजाताकडे बघून परीकडे इशारा केला. तसा त्यांचा पूर्ण ग्रुप स्टेजवरून दुसऱ्या बाजूने खाली उतरला आणि परी पासून लांब जाऊन थांबला.

मग निवेदिकेने पुढचे पर्फोर्मंस चालू केले.

तेजश्रीचा डान्स संपल्यावर तुषार देखील परीला बघता याव म्हणून त्याला सांगितलेल्या जागेवरून जरा लांब जाऊन उभा राहीला. कारण परी स्टेजच्या एका विंगेच्या आत उभी होती. त्यामुळे तुषार जरा मागे झाला आणि तिथून त्याच्या ह्या चार फुटला बघू लागला. तिचं ते रागात बघण, डोळे वटारण तुषारला खूप आवडून गेल होत.

तिथे उपस्थित सर्व जण या कार्यक्रमाचा आंनद घेत होते. पण रावी मात्र तिचा मोबाईल सारखा चाळत होती. कितीही कामात का असेना? दिवसातून एकदातरी शशांक तिला फोन करत होता. पण आज पूर्ण दिवस संपून आता रात्र झाली होती. तरीही त्याचा साधा एक मेसेज पण आला नव्हता. म्हणून ती जरा काळजीत पडली होती. काहीतरी विचित्र फिलिंग तिला येत होती. तिने पाठवलेले मेसेज तर त्याने वाचलेले होते. पण त्याने त्यावर देखील काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे तिला ह्या कार्यक्रमाचा काही आनंद घेता येत नव्हता.
रावीची सारखी चाललेली चुळबुळ मनालीच्या लक्षात आली. तिने याच कारण रावीला विचारलं. रावीने तिच्या मनातली ती विचित्र भावनेविषयी तिला सांगितले.

“अगं सकाळपासून एकही मेसेज आला नाही म्हणून मन नाराज झाल असेल तुझ,” मनाली तिच्या परीने रावीची समजून काढू लागली. “त्यामुळे अस वाटत कधी कधी. ते पोलीस आहेत. काहीतरी अर्जंट काम आल असेल. जसे फ्री होतील तसा पहिले तुला फोन करतील.”

“आय होप सो.” रावी पण हलकेच हसत बोलली आणि ती त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागली.

एका मागे एक कला सदर होत राहिल्या. एखाद रोमँटीक गाण लागल की तिथे असलेले ते लव्ह बर्ड्स एकमेकांना हळूच बघायचे. तो बंधू मंडळीचा ग्रुप एकत्र जो बसला होता. त्यामुळे मनाली तरी रावीजवळ होती. संधी बघून आरुष हळूच तिच्याजवळ सरकला आणि हळूच तिचे हात आपल्या हातात घेतले.

अस अचानक कोणीतरी हात पकडला म्हणून मनाली दचकली आणि तिने बाजूला पाहिलं. तशी ती घाबरली आणि डोळे मोठे करून ती जोरात बोलणारच होती की आरुषने तिच्या ओठांवर त्याच एक बोट ठेवलं. मग मनाली जरा शांत झाली. तिने तिच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या रावीकडे पाहिलं जी समोर चालू असेलला कार्यक्रम बघत होती.

“नको माझ्याकडे बघूस,” रावी हळूच मनालीला बोलली. “मी नाही बघत तुमच्याकडे. चालू द्या तुमच.”

आता मात्र मनाली खूपच ओशाळली गेली आणि तिने आरुषच्या हाताला पटकन चिमटा काढला.

तसा आरुष चमकून मनालीकडे बघू लागला.

“कळल तिला.’ मनाली चिडून बोलली. “काय गरज आहे का अस काही करायची?”

“हो मग,” आरुष तोऱ्यात बोलला. “आपल्याला पण घरातून परवानगी आहे. इथे उभे आहोत म्हणून फक्त हात हातात घेतला आहे. एकटा असतो तर तू माझ्या मिठीत असती.”

आरुषच्या शब्दांनी मनालीच्या पोटात खोल खड्डा पडला. “तुमच ना काहीही असत.” मनाली लटक्या रागात बोलली आणि रावीच्या दुसऱ्या बाजूला जायला निघाली.

पण रावी शेवटी रावी होती. तिने लागलीच तिच्या हाताला पकडून ती उभी होती तिथेच तिला परत उभ केल.

“माझ्या दादा पासून लांब जातेस?” रावी

“तुम्ही बहिण भाऊ डोक्यावर पडले होते का?” मनाली तोंड वाकड करत बोलली.

तशी दोघांनी एकत्रच होकारात मान हलवली आणि पुढच्याच क्षणाला आरुषने मनालीचा हात परत आपल्या हातात घट्ट पकडून घेतला. ह्यावेळेस मात्र मनालीने कुठलाही विरोध केला नाही आणि विरोध करून काही उपयोग देखील नव्हता.

तिकडे नयन मात्र आराध्या आणि सायलीसोबत बसली होती. त्यामुळे सुजयला तिच्या फक्त लांबूनच नजरेने बोलाव लागत होत. ते बघून रावीला आपल्या दुसऱ्या दादाची देखील कीव आली. तिने तिचा मोबाईल काढला आणि नयनला फोन लावला.

नयनने फोन तर उचलला पण तिथे येणाऱ्या डीजेच्या आवाजांमुळे नयनला रावीच बोलन काही नीट ऐकू येत नव्हत. शेवटी नयन इकडे तिकडे बघू लागली. जशी रावी तिच्या नजरेला आली तस रावीने तिला इशारातच त्यांच्याजवळ यायला सांगितलं.

‘गर्दी आहे.’ नयन इशारातच बोलली.

तस रावीने तिला आठ्या पाडून पाहिलं आणि सुजयकडे इशारा केला. तस नयनने पटकन तिची नजर फिरवली.

‘काय डेंजर नणंद दिली आहे देवाने,’ नयन मनातच बोलली. ‘कस काय तिला सगळ समजून जात काय माहित?’

नयन ऐकत नसलेली बघून रावीने थेट सायलीला फोन लावला आणि नयनला त्यांच्याकडे पाठवायला लावलं. मग सायलीनेच नयनला रावीकडे जायला लावलं.

मग मात्र नयनचा नाईलाज झाला आणि ती गर्दीतून कशीबशी वाट काढत रावीजवळ पोहोचली. नयनला तिथे आलेलं बघून सुजयची कळी खुलली. नयनने ते देखील पाहिलं.

“तुम्ही दोघे बहिण भाऊ डोक्यावर पडले आहात का?” नयनने पण तोच प्रश्न विचारलेला बघून त्या बंधू मंडळीच्या गोट्यात हास्याचा फव्वारा उडाला. पण डीजेच्या आवाजापुढे तो जास्ती कोणाला ऐकू आला नव्हता.

आता सुजय नयनच्या बाजूला येऊन थांबला. “किती लबाड ना?” नयन लटक्या रागात बोलली.

“तुझ्याचसाठी.” सुजय प्रेमाने बोलला.

आणि ह्या दोन्ही जोड्या बाकीच्यांसोबत त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागले. कामात असलेल्या परीला ह्या दोन्ही जोड्या एकमेकांसोबत असलेल्या दिसल्या. तस परीच्या चेहऱ्यावर एक समाधानाच हसू पसरलं.

तेजाश्रीच्या ग्रुपच्या डान्स नंतर बरेच डान्स झाले पण त्याची सर काही तेजश्रीच्या ग्रुपच्या डान्ससारखी आली नव्हती. हा, ते एक कला म्हणून उत्तम होते. पण शेवटी तेजश्रीच्या ग्रूपच्या त्या डान्सने एक वेगळीच उंची गाठली होती. जी बाकीच्यांना गाठायला जमतच नव्हती.

अखेर त्या कार्यक्रमाची शेवटची कला तिथे सादर झाली. सगळ्यांना वाटल की आता तो कार्यक्रम संपला. पण तो अजून संपला नव्हता आणि त्या निवेदिकेने पूढे बोलायला सुरवात केली.

“आता अजून एक शेवटचा सरप्राईज पर्फोर्मंस,” निवेदिकेने एक पोज घेतला.

तसे सगळेच तिच्याकडे अधिरतेने बघू लागले.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →