Login

अवनी एक प्रवास भाग ११४

तारा राजच्या खोलीकडे पोहोचली. तिने दाराला हात लावला तर ते दार लॉक होत. राज असा कधीच त्याच्या खोलीला लॉक करत नव्हता. आज अस लॉक केलेलं दार बघून ताराला जरा टेन्शनच आल. तिने घाईघाईने ते दार वाजवायला घेतलं.
मागील भागात.

“मग हुसू का आता?” तुषार त्याच तोंड वाकड करत बोलला. “लवकर सांग आणि तुझ्या मॅमच बाजू घ्यायची गरज नाहीये.”

“मी कशाला त्यांची बाजू घेऊ ?” तेजश्रीने आज तुषारला चांगलच तरसवायच ठरवलं होत.

“तेजे,” तुषार आता चिडू लागला. “खूप मार खाशील.” तुषार तेजश्रीच्या जवळ जात बोलला.

“मी तुझ नाव वहिनीला सांगून देईल हं.” तेजश्री स्वतःच्या कमरेवर हात ठेवत तुषारला खुन्नस देत बोलली.

“तिचं कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे? ते विचारत आहे ना मी.” तुषार

“अरे ते त्यांनी कोणालाच सांगितल नाहीये,” तेजश्री पण त्याच सुरात बोलली. “ते पण सांगितलं ना मी.”

दोघांना आता दम लागला होता. तेजश्रीने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस फुक मारत उडविले.

आता पूढे.

‘हिच्याशी रागात बोलून काहीच फायदा नाहीये.’ तुषारने मनातच विचार केला. “तुझ्या वहिनीच्या काळजीपोटी विचारत आहे बाळा.” तुषार आता प्रेमाने बोलला.

“ओह्ह किती काळजी ना माझ्या वहिनीची.” तेजश्री पण तितक्याच नाटकी आवाजात बोलली.

तुषार तर त्याच्या ह्या लहान्या बहिणीला बघतचं राहीला. आधी तुषारच्या फक्त रागात बघण्याने तेजश्री घाबरून जायची आणि त्याच सगळ काही ऐकायची. पण आज मात्र तिने तुषारच्या सर्व गोष्टी धुडकारून लावल्या होत्या आणि ती का लावणार नाही? शेवटी परी तिच्या बाजूने जी होती.

“तुला अस नाही का वाटत की तू जरा जास्तच वहिनी वहिनी करायला लागली.” तुषार तेजश्रीला रोखून बघत बोलला.

“का?” तेजश्री पण त्याला रोखून बघत बोलली. “तू जळतोस ना माझ्यावर. वहिनी तुझ्यापेक्षा माझ्याशी जास्त बोलते म्हणून.”

“जळतो आणि मी?” तुषार तोऱ्यात बोलला. “माय फुट. त्या चार फुट चार इंचसाठी मी का जळू?”

“परफेक्ट,” तेजश्रीने त्याच्यासमोर मोबाईल धरला होता तो ती बघत बोलली. “एकदम परफेक्ट टाईमला तू काय डायलॉग मारला आहेस.” तेजश्री हसतच बोलली.

“त.. तू रेकोर्ड केलस?” तुषार आता जरा घाबरून बोलला.

“ह.. ह.. हो.” तेजश्री पण त्याची नक्कल करत बोलली. “का? घाबरलास ना तुझ्या चार फुट ला?”

एवढं बोलून तेजश्री तिच्या खोलीतून सरळ पसार झाली.

“तेजू.” तुषार पण तिच्या मागे मागे धावत निघाला.

बऱ्याच दिवसानंतर घरात दोघांची मस्ती खेळत होती. त्यांच घर आज खुलून आल होत. घरातलं किचन, हॉल, सर्व बेडरूम्स, एवढचं काय तर घराच्या समोरच आंगण देखील दोघांनी सोडलं नव्हत. तुषारच्या मानाने तेजश्री खूपच चपळ झाली होती. आता तुषार वेट लिफ्टिंग चॅम्पियन असल्याने त्याला त्याच वजन मेंटेन ठेवायला लागत होत आणि तेजश्री तब्येतीने बारीक होती. त्यामुळे ती काही तुषारच्या हाती येतच नव्हती. शेवटी तो दमला आणि हॉलमधल्या सोफ्यावर पसरून बसला.

“दादा म्हातारा झाला.” तेजश्री अजूनच खिदळत बोलली. तिचा मोबाईल अजूनही त्याच्या समोर होता आणि तुषार जे दम टाकत बसला होता ते पण तिने रेकोर्ड करून घेतलं होत.

“आई तेजूला सांग हं.” तुषार चिडून बोलला. “नंतर बोलू नको तिला मी मारलं तर.”

“त्याआधी पकडायला लागत.” तेजश्री आज काही तुषारला सोडायला मागत नव्हती.

तिची आई पण तेजश्रीच हे नाव रूप बघून आश्चर्यचकितच झाली.

“आई तिला संग,” तुषार रागाला येत बोलला. “तिने हे व्हिडीओ जर त्या चार फुट चार इंचला पाठवले तर बघ.”

“चार फुट चार इंच?” तुषारची आई गोंधळून गेली.

तर तेजश्री अजुनच हसू लागली. “अगं तुझ्या होणाऱ्या सूनेच त्याने हे नाव ठेवलं आहे.”

“तुषार काय आहे हे?” तुषारची आई रागात बोलली.

“काय आहे म्हणजे?” तुषार “ती पण मला दगड बोलते.”

तुषार भावनेच्या भरात बोलून गेला. तुषारची आई दोन सेकंद त्याला बघत राहिली आणि तिसऱ्या सेकंदाला हसत सुटली.

“बरोबर आहे तिचं,” तुषारची आई “एवढं आड दांड शरीर बनवून ठेवलं आहेस. मग तर ती बोलणारचं ना.”

“त्याला फिटनेस बोलतात आई.” तुषार चिडून बोलला. “तिची तर उंचीच लहान आहे.”

“मग तिला व्हिडीओ पाठवायला का घाबरतोस मग?” तेजश्री पुन्हा चिडवण्याच्या सुरात बोलली.

“एकदा नाही सांगितल ना.” तुषार

“सॉरी दादा,” तेजश्री तिचे खांदे उडवत बोलली. “त्याला आता उशीर झाला आहे.”

“तेजाडे..” तुषार किंचाळला आणि परत तेजश्रीच्या मागे लागला.

पुन्हा घरभर पकडापकडीचा खेळ सुरु झाला. तो पळतच होता की त्याचा मोबाईल वाजला. त्याने थांबून मोबाईल पहिला तर त्यावर चार फुट नाव झळकत होत. जे की त्यानेच रागात सेव्ह केलेलं होत. त्याला समजून चुकल की परीने ते व्हिडीओ पाहिला होता.

तुषारने तेजश्रीवर नजर टाकून आलेला फोन उचलला. “हेल्लो..”

“तूम्ही सर्वांसमोर मला चार फुट बोललात?” तुषारच बोलण तोडत परीने बोलायला सुरवात केली. “मी त्यांच्यासमोर तुम्हाला कधी दगड बोलले? नाही ना? मग अस बोलतात होणाऱ्या बायकोसोबत?”

“होणारी बायको?” तुषार “मी लग्नाला होणार नाही दिला अजून.”

“मी पण तुमच्या होकाराची वाट बघत नाहीये,” परी पण तितक्याच ठसक्यात बोलली. “नाही बोललात तर सरळ माझ्या वानरसेनेला सांगून तुम्हाला उचलून आणायला लावेल.”

तस तुषारच तोंडच पडलं. त्याला जरा धक्काच बसला. “त्यांची मला हात लावायची हिम्मत तरी होईल का?”

“अच्छा मग ट्राय करायचं आहे का?” परी

परीच्या ह्या वाक्याने तर तुषारला जरा भीतीच वाटली. कारण परीची ती वानरसेना त्यांच्या दीची ऑर्डर पूर्ण करायला काय करतील? याचा काहीच भरोसा नव्हता आणि याची त्याला पूर्ण कल्पना होती.

“नाही ना,” परी जिंकल्याच्या अविर्भावात बोलली. “आणि एक माझ्या नणंदला काहीच त्रास द्यायचा नाही.”

“नणंद?” तुषार “ती आधी माझी बहिण आहे.”

“हो आहे ना,” परी “आता माझी नणंद पण आहे आणि ही माझी ऑर्डर आहे.”

परीच अस हक्काने बोलण बघून तुषारला हलकसं हसू आल. तिने किती मनापासून त्याच्या घरच्यांना आपल मानल होत हे त्यातून तुषारला स्पष्ट दिसलं होत. त्याच्या चेहऱ्यावरच ते हसू बघून तेजश्री पण त्याच्या बाजूला येऊन बसली.

“थांक्यू वहिनी.” ती तुषारच्या मोबाईल जवळ जात मोठ्याने बोलली.

तुषारने त्याच्या बहिणीवर नजर टाकली. तेजश्रीने त्याला पाहिलं तर त्याच्या गालवर हलकीशी लाज चढली होती.

“ब्लशिंग हं?” तेजश्री खट्याळ होत बोलली. “मग अस लग्नाला होकार का दिला नाही? असा का भाव खात आहेस?”

“ते तुला नाही समजणार.” तुषार हलकेच हसत बोलला. त्याने तेजश्रीचे केस विस्कटले आणि त्याच्या खोलीकडे निघून गेला.

परीने तुषारचा फोन ठेवला आणि ती तिच्या कामात व्यस्त होणारच होती की तिचा मोबाईल परत वाजला. तिने पाहिलं तर राधीकाचा फोन होता. राधीकाने तिला उद्या सकाळीच घरी बोलावलेले बघून ती पहीले तर जरा टेन्शनमध्ये आली. पण राधीकाने इतकं काही गंभीर नसल्याचे सांगून तिला आश्वस्त केल होत.

तिकडे तारा राजच्या खोलीकडे पोहोचली. तिने दाराला हात लावला तर ते दार लॉक होत. राज असा कधीच त्याच्या खोलीला लॉक करत नव्हता. आज अस लॉक केलेलं दार बघून ताराला जरा टेन्शनच आल. तस तिने घाईघाईने ते दार वाजवायला घेतलं.

“दादा.” तारा जरा घाबरतच दार वाजवू लागली. “उघड ना. लॉक का केल आहेस?”

तरीही पुढचे पाच मिनिट ते दार काही उघडल गेल नव्हत. मग मात्र ताराच मन घाबरू लागलं. ती अजून जोर जोरात ते दार वाजवू लागली.

"दादा," ताराचा आवाज घाबराघुबरा झाला. "उघडं ना दार, दादा."

ताराचा तो आवाज ऐकून हॉलमध्ये असणारा संकेत आणि राजेश देखील राजच्या खोलीकडे आले. ताराला अस घाबरून जोर जोरात दार वाजवताना बघून त्या दोघांना देखील खूप टेन्शन आल. मग त्या दोघांनी देखील दार वाजवायला घेतलं.

अजूनही दार उघडत नसलेलं बघून संकेतने त्यांच्याकडील दुसरी चावी आणायला ताराला जायला सांगितलं. तारा जायला वळलीच होती की राजच्या खोलीच दार उघडलं.

“अरे यार नीट पोट पण साफ करू देत नाहीत.” राज वैतागलेल्या सुरात बोलला.

तसे त्या तिघांचे चेहरे गोंधळून गेले.

“मग दार का लॉक केल होत?” तारा चिडून बोलली.

“ते हवेने लॉक झाल.” राज त्याच्या खोलीत परत जाता जाता बोलला.

त्याच्या मागे बाकी तिघे देखील आत आले. तर राज त्याची नजर चोरत होता.

“पण आम्ही टेन्शन मध्ये आलो ना.” संकेत

“तुम्ही का तिच्या मागे लागता?” राजचा सूर आज वेगळाच होता.

“पण तू का इतकी चिडचिड करत आहेस?” राजेश

“तस काही नाही,’ राज लगेच स्वतःला सावरत बोलला. "ते दार वाजवल्यामुळे काम अर्धवट टाकून आलो आहे.”

तसे संकेत आणि राजेश हलकेच हसले.

“ठीक आहे.” राजेश “फ्रेश हो आणि जेवायला ये.”

“तुम्ही चला पुढे मी आलोच.” राज

राजच्या बोलण्याला हुंकार देत ते दोघे तर बाहेर पडले. पण तारा मात्र तिथेच उभी राहिली. जसे ते दोघे रूमच्या बाहेर गेले तस तिने पटकन खोलीच दार लावून घेतलं.

“आता खर बोलायचं,” तारा “तुला परी दी ची शप्पथ आहे.”

राज आता तिच्या ह्या लहान बहिणीला चमकून बघू लागला.

“तू त्यांना तुझ्या शब्दांनी गुंडाळू शकतोस मला नाही.” तारा कपाळवर आठ्या आणत बोलली.

“हम्म,” राजने एक सुस्कारा सोडला. “काय सांगू? तुला तर सगळच माहिती आहे.”

“दी शिवाय दुसऱ्या मुलीचा विचारच केला नव्हतास ना?” तारा राजला बेडवर बसवत बोलली. “आणि आता एकदम लग्नाचा विषय आला तर काही सुचतच नाहीये ना?”

राजने ताराकडे पाहिलं आणि तिच्या खांद्यावर हात टाकला. “बघता बघता किती मोठी झाली ना तू?”

“हे बघ दादा,” तारा “तू असा वागलास तर दीला पण तेआवडणार नाही आणि आज ना उद्या तर तुला लग्न तर करावच लागेल ना. भले आता नको करूस. पण नंतर तर कोणालातरी तुझी वेसण बांधायला आणावच लागेल ना.”

“तुला माझी काळजी आहे की तु मला घाबरवत आहेस?” राज बारीक डोळे करून तिला बघू लागला.

“अस काही नाहीये,” तारा “जस दीच्या आयुष्यात तिचा जोडीदार आला तसाच तुझ्या आयुष्यात पण कोणीतरी नक्कीच येईल. जी तुला पण शब्दात बांधून टाकेल.”

“ते तर अज्जिबात शक्य नाही.” राज तोऱ्यात बोलला.

“म्हणजे तू मुलगी बघायला तयार झालास.” तारा पटकन उठली आणि दाराकडे धावू लागली.

“दादा रेडी आहे.” तारा किंचाळतच खाली चालली गेली.

तसा राज पण तिच्या मागे मागे धावू लागला. “काहीही बोंबलू नकोस. मी अजून होकार दिला नाहीये.”

आता इथेही घरात पकडापकडीचा खेळ सुरु झाला. आता तर प्रसाद आणि शशांक पण घरी येऊन पोहोचले होते. प्रसादला तर ते नेहमीच होत पण शशांक त्याला डोळे विस्फारून बघत राहीला.

नंतर अशीच हसत खेळत त्यांची जेवण आटोपली.

दुसऱ्या दिवशी परी तिच्या कॉलेजला जाता जाता राजला त्याच्या घरी जाऊन भेटली. तिथे तिने पहिले राधिकासोबत बोलून घेतलं आणि नंतर ती राजसोबत बोलली. सध्या राजची लग्नाची इच्छा नसल्याने परीने देखील राधिका आणि बाकीच्यांना राजच्या लग्नाला तात्पुरती स्थगिती द्यायला लावली.

राधिका तर परीला बघतच राहिली. “मी तुला त्याला समजवायला लावलं होत आणि तू पण त्याच्या बाजूने झालीस.”

“जर तोच खुश नसेल तर हे घर खुश राहील?” परी “बाकी तो लग्न नक्कीच करेल. कोणीतरी असेल ना त्याच्यासाठी जी बनली असेल. एकदा का ती आली की तो नक्कीच लग्नाला तयार होईल.”

“पण ती आलीच नाही तर आणि आली तरी त्याला आवडली नाही तर?” प्राजक्ता

“मग आपण कशासाठी आहोत?” परी हलकेच हसत बोलली.

त्यांच्याशी अजून थोड्याफार गप्पा मारून परी तिच्या कॉलेजला निघून गेली. काही वेळाने शशांक देखील त्याच आवरून त्याच्या घरी निघून गेला.

हे दोन दिवस सगळेच आपआपल्या कामात व्यस्त राहिले. परी मात्र तिचे वेगवेगळे पोजमधले फोटो तुषारला पाठवायला विसरली नव्हती.

शेवटी त्यांच्या कॉलेजच फंक्शन उद्यावर येऊन ठेपल. कॉलेजमध्ये उद्याच्या कार्यक्रमाची रुपरेषेवर पुन्हा नजर टाकली गेली. कुठे कसली कमी तर राहिली नाही ना? याची तपासणी केली गेली. त्या कॉलेजचा पूर्ण स्टाफ तयारीला लागला होता. परी देखील आज तिच्या कामात खूपच व्यस्त होती. त्या कार्यक्रमाच्या काही जबाबदाऱ्या परीवर देखील होत्या. त्यामुळे तिने तिचा डान्स हा सर्वात शेवटी ठेवला होता आणि तिच्या मनात देखील हीच इच्छा होती की तिचा डान्स सर्वात शेवटी असावा.

त्या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या अनेक कलाकारांपैकी ज्यांची कला निवडली गेली होती त्या सर्वाना त्यांच्या त्यांच्या क्रमांकाप्रमाणे तयार राहायला सांगितल गेल. त्यांना त्याच्या कलेसाठी वेळेच बंधन घालून दिल गेल. त्यात तेजश्री आणि तिच्या ग्रुपचा डान्स देखील निवडला गेला होता.

स्टेजकडची जबाबदारी परीने स्वतः तिच्याकडे घेतली होती. शेवटी तिला तिच्या शेवटच्या डान्ससाठी काहीतरी वेगळ जे करायचं होत.

आज भरपूर काम असल्याने परी तिच्या घरी जरा उशीराच गेली. ती आज खूप दमली होती. त्यामुळे सायलीने आधीच परीसाठी चहा नाश्ता तयार करून ठेवला. परी घरी आल्या आल्या पहिले अंघोळ करून फ्रेश झाली. अंघोळ केल्यावर तिला जरा बरं वाटल आणि ती हॉलमध्ये आली.

हॉलमध्ये तिच्यासाठी चहा नाश्ता तिची वाटच बघत होता. त्यासोबत सायली देखील होती.

“मग कशी चालू आहे उद्याची तयारी?” सायली

“खूपच मस्त.” परी चहाचा घोट घेत बोलली.

“चला आम्हाला आमच्या परीचा डान्स बघायला मिळणार.” सायली “ते ही पहिल्यांदाच.” आता ती टोमण्याच्या सुरात बोलली.

“नको ना आई परत परत.” परी भावनेच्या भरात बोलून गेली.

“परत आई वर आलीस?” सायली बारीक डोळे करून विचारू लागली.

“हो,” परी “कारण आई या शब्दाची माया त्या मॉम शब्दाला मला तरी येत नाही.”

“मग तुझ्या बाकी वानरसेनेला त्याबद्दल काही बोलत नाहीस.” सायली

“त्यांना सांगून सांगून थकली मी,” परी तिचे डोळे फिरवत बोलली. “मग मी पण तो विषय सोडून दिला.”

“बरं,” सायली “अजून एक विचारायचं होत.” सायली जरा चाचरतच बोलली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →