Login

अवनी एक प्रवास भाग ११३

तिकडे तुषारच्या डोक्यातून परीचे ते फोटो काही जातच नव्हते. त्यात ती आता डान्स करणार असल्याचे फिक्स झाल होत. आता ती कोणत्या गाण्यावर डान्स करणार जो दिल्लीला केला होता त्यावरच तर करणार नाही ना? हे त्याच्या डोक्यात फिरू लागलं. कारण त्या गाण्यावर ज्या काही शेवटच्या स्टेप्स झाल्या होत्या त्यासाठी कोण असणार? तिथे दुसरा कोणी मुलगा आला तर? हा विचार करून तुषारला जेलस फील व्हायला लागल.
मागील भागात.

“मला विसरले ना,” रावी “आता तुमच्या त्या नवऱ्यांना सांगा माझ्याशी फक्त बोलायला या.”

एवढं बोलून तिने फोन सरळ कट केला.

“शिट शिट शिट,” मनाली टेन्शनमध्ये आली. रावीचा अबोला तर ती सहनच करू शकत नव्हती. तिने आरुषकडे पाहिलं. “सगळ तुमच्यामुळे झाल.””

“मी काय केल आता?” आरुष “आणि ती काय बोलली?”

“काय बोलणार?” मनाली अस्वस्थ होत बोलली. “फक्त बोलायला या म्हणाली.”

तसे बाकी तिघे पण टेन्शनमध्ये आले.

तर इकडे शशांक गालातच हसणाऱ्या रावीकडे गोंधळून बघत राहीला. ‘किती नौटंकी आहे यार ही. आता रडवेली होऊन बोलली की बोलणार नाही म्हणून आणि आता फोन कट केल्यावर गालात हसत आहे?’

आता पूढे.

फोन कट केल्यावर रावीला जरा हसूच आलं. तस तर त्या दोघींना विसरली तर ती पण होती. पण आता स्वतःवर आलेलं दुसऱ्यावर ढकलणारी ती अस सहज थोडीच काही ऐकून घेणार होती. आता तर तिला शशांकसोबत वेळ घालवयाचा होता. त्या दोघींना तर आरुष आणि सुजयसोबत चांगलाच वेळ मिळाला होता. पण शशांक तर आत्ताशी आला होता ना. आता जर ती त्या दोघींकडे गेली असती तर तिला शशांकसोबत वेळ घालवता आला नसता. म्हणून हा सगळा खटाटोप तिने केला होता.

आपल्याकडे शशांक रोखून बघत असलायचे समजताच रावीने हळूच त्याला ही गोष्ट सांगितली.

‘काय ॲन्टीक पीस आहे यार.’ शशांकला मनातच खूप हसू आल. ‘नको तिथे बरोबर डोक लावते.’

“माझ्यावर हसत आहात?” शशांकला गालात हसताना बघून रावी त्याला बारीक डोळे करून विचारू लागली.

तसा शशांक परत शांत झाला. ते बघून रावी परत गालात खुदकन हसली. नंतर दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. त्यात तिची आवड, त्याची आवड, भविष्यातली स्वप्ने यावर चर्चा झाली.

रावीच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकून त्याला तिच्याकडून एक सकारात्मक संकेत मिळाले होते. तस तर त्याला एक शांत आणि समजूतदार मुलगी हवी होती. जिला स्वतःचे स्वप्न, विचार, प्रगती, करिअर अश्या गोष्टीमध्ये रुची हवी होती. एक शांत आणि समजूतदारपण सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी रावीमध्ये असेलल्या शशांकला जाणवल्या होत्या. त्यामुळे त्याने रावीचा तो अवखळपणा आणि खोडकरपणा स्वीकारायचे ठरवले होते. असही प्रेमात काहीतरी ॲडजस्टमेन्ट करावीच लागत असते. त्यामुळे त्याच्या ह्या शांत आयुष्यात रावी नावाच गोड वादळ आल होत. ज्याच त्याने मनापासून स्वागत केल होत.

तिकडे राज काही त्याच्या खोलीतून बाहेर यायला मागत नव्हता. नेहमी जेवणाची वेळ झाली की राजची स्वारी किचनकडे जास्त फेऱ्या मारायची. पण आज तो काही बाहेर आलाच नव्हता. आता राधिका आणि प्राजक्ता दोघींना त्याच टेन्शन यायला लागल.

“आजवर त्याच परीसोबत वागण आपण हलक्यात घेत होतो,” राधिकाने बोलायला सुरवात केली. “पण आजची गोष्ट पहिली तर ती खूपच गंभीर असल्यासारखी वाटत आहे.”

“हो गं,” प्राजक्ता पण विचार करत बोलली. “पण आज त्याच्या लग्नाचा विषय काढला होता. नाहीतर परीच्या लग्नाविषयी तो कधीच इतका गंभीर झाला नव्हता.”

“कारण दादाने तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा आजवर विचारच केला नव्हता.” मागून ताराचा आवाज आला.

तश्या दोघी जणी ताराकडे चमकून बघू लागल्या.

“तू लहान आहेस,” प्राजक्ता जरा चिडून बोलली. “ह्यात पडू नकोस.”

“इतकी पण लहान नाही की दादाच्या मनातली गोष्ट मला समजू शकणार नाही.” तारा जरा हळवी झाली. “इतके वर्ष झाली त्याने आजवर परी दी सोडून एकाही मुलीच नाव घेतलेलं आठवत का?”

आता दोघी जणी विचार करू लागल्या.

“आजवर त्याची एकही मैत्रीण आपल्या घरात आली नाही,” तारा “प्रसाद दादाचा समजू शकतो की तो आधीपासूनच मुलींपासून लांब राहत होता. पण राज दादा? तो तर मुलींशी बोलत होता ना. पण मैत्रीण म्हणून एकही मुलगी त्याने ओळख करून दिली होती का?”

प्राजक्ता आणि राधिका एकमेकींकडे बघू लागल्या.

“प्रोब्लेम हा नाही की परी दीच दुसऱ्या मुलासोबत लग्न होईल,” तारा “तो तर दीसाठी खूप खुश आहे. पण तो स्वतःसाठी विचार करणच विसरला होता. तेच आता त्याला जाणवलं आहे.”

“मग आता?” राधिका टेन्शनमध्ये येत बोलली.

“आता काय?” तारा “परी दी लाच बोलवा आणि राज दादाचे कान ओढायला सांगा.”

“ते तर आपण पण त्याला समजावून सांगू शकतो ना?” प्राजक्ता

“तो तुमच बोलण कधीच टाळणार नाही,” तारा “तुम्ही म्हणाल त्या मुलीसोबत लग्न करेल. पण त्याच्या मनाच काय?”

“ते काम फक्त मैत्रीच करू शकेल.” राजेश पण किचनमध्ये येत बोलला. “तू बोलावून घे परीला.” राजेश राधिकाकडे बघत बोलला.

“ह्या वेळेला?” संकेत सुद्धा आतल्या चालू असलेल्या मिटिंगला बघून किचनमध्ये आला. “आता जर फोन केला ना, तर परीच्या आधी त्याची मामी इथे येऊन पोहोचेल. कारण थेट परीला बोलवत आहात म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर झाल्याचे सायलीला वाटेल.”

“पण मग तो बाहेर पण येत नाहीये ना.” प्राजक्ता

“तू जा गं,” राजेश ताराकडे बघून बोलला. “तुला तो नाही म्हणणार नाही.” मग तो राधिकाकडे ब्बघू लागला. “परी उद्या कॉलेजवरून सुटली की तिला घरी यायला लाव.”

“पण दादा घरात नाही थांबणार,” तारा “तो उद्या सकाळीच त्याच्या जॉबवर निघून जाईल.”

“थांबेल तो." संकेत प्राजक्ताकडे बघून डोळे मिचकावत बोलला.

तस त्या चौघांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आल. ते बघून तारा तिच्या दादाला बोलवायला निघून गेली. प्रसाद तर मालासोबत बोलण्यात व्यस्त होता. त्यामुळे घरात काय झाल? तेच त्याला माहिती झाल नव्हत.

तर तिकडे मार्केटच्या त्या कॅफेच्या गेटवर रावी टेन्शनमध्ये येत उगाच हसून दाखवत होती. तर तिला अस बघून शशांकला खूपच हसू येत होत.

रावी जशी मनालीला फोनवर चिडून बोलली होती. त्यामुळे मनाली खूपच टेन्शनमध्ये आली होती आणि ती रावीला शोधायला लागली होती. आता एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये रावी तर सहज सापडणार नव्हती. मग आरुषने त्याच थोडसं डोक लावलं. हरवलेला मोबाईलच लोकेशन सांगणारी सिस्टीम आरुषने त्याच्या मोबाईलमध्ये चालू केली. त्यात रावीच अकाऊन्ट ओपन केल. तिथून रावीच लोकेशन त्याने शोधून काढलं आणि मग पोहोचले की थेट त्या कॅफेमध्ये. जेव्हा की रावी शशांकला घेऊन तिथून बाहेर पडत होती.

इतक्या कमी वेळात तिला शोधून काढलं जाईल याची तिला कल्पनाच नव्हती. त्या चौघांना समोर बघून रावी पटकन शशांकच्या मागे लपली. तिचं ते वागण बघून शशांकला तिचं मन समजून गेल.

“ती वाट बघत होती तुमची,” शशांक थोडा कडक आवाजात बोलला. “मी इकडे आलो होतो तर ती मला दिसली. आता तिच्या घरी तर तिच्यासोबत बोलण झाल नव्हत. म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो.”

काहीही न बोलता त्याने आपली सांभळून घेतलेली बाजू बघून रावीला खूपच भरून आल. काही क्षणापुर्वीची भेट होती तरी त्याने तिचं इतक मन वाचलं. याच्या कल्पनेने रावीच्या पोटात परत फुलपाखर नाचू लागली. तिने स्वतःच्या पोटावर हात ठेवला.

‘काय आहे तुमच?’ रावी मनातच बोलू लागली. ‘जरा वेळ द्याना मला. काही झाल की आले पोटात पार्टी करायला.’रावीच्या गालावर लागलीच लाज चढली.

“तिने तस सांगायचं ना,” आरुष “ती काहीच बोलली नाही.”

“आय थिंक तिने मनालीला फोन पण केला होता.” शशांक मनाली आणि नयन दोघींकडे बघून बोलला. कारण त्याला त्या दोघींमध्ये मनाली कोण आणि नयन कोण हेच माहिती नव्हत.

“तेव्हा मी पेयमेन्ट करत होती.” मनाली बारीक आवाजात बोलली.

“झाल तर मग,” शशांक “आता ती भेटलीच आहे तर तुमच चालू द्या. मी निघतो.”

एवढं बोलून शशांकने त्याच्या पाठीमागे लपलेल्या रावीला समोर आणल. तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. तिच्या कपाळवर हलकेसे ओठ टेकवले. “चल बाय. नंतर फोन करतो.”

आणि तो निघून देखील गेला. तर बाकी सगळे शशांकच्या ह्या कृतीमुळे स्तब्ध झाले होते. हे सगळ इतक्या कमी वेळात झाल की कोणालाही काहीही प्रतिक्रिया द्यायलाच वेळच मिळाला नाही. रावी तर तोंड वासून जाणाऱ्या शशांकला बघत राहिली होती.

तर मनाली आणि नयनला काही वेळाने जे झाल त्याची जशी जाणीव झाली तस त्यांना तर रावीला चिडवायला उत्साहाचा पूर यायला लागला. त्या दोघीं पटकन रावीजवळ गेल्या.

“रावे काय होत हे?” नयनने रावीच्या एका हाताला पकडून विचारलं.

“बेबी आता काय झाल हे?” दुसरा हात मनालीने पकडला. “पहिल्याच भेटीत हग आणि कीस? वॉव, हाऊ रोमॅन्टिक ना.”

रावीने तिच्या आश्चर्याने भरलेल्या चेहऱ्याने मनालीला पाहिलं.

“पहिल्याच हगमध्ये इतका मोठा झटका?” आरुष हसतच बोलला.

“अरे यार फोटो काढायला हवा होता.” सूजय

“रावे.” मनालीने रावीच्या हाताला चिमटा काढला.

“आऊच.” रावी आता भानावर आली आणि चिडून मनालीला बघू लागली. “काय आहे? इतक्या जोरात चिमटा का काढला?”

“आता तू तुझ्या अहोंच्या स्वप्नातून बाहेर यायला मागतच नव्हती," मनाली “मग काहीतरी कराव तर लागेल ना.” मनालीचा सूर चिडवण्याचा होता.

ते ऐकून रावीला आता काय झाल याची जाणीव झाली आणि ती तिचा झरकन लाजेने भरलेला चेहरा इकडे तिकडे फिरवत लपवू लागली.

“अरे वा,” नयन “मॅडमला लाजता पण येत का?”

तिच्यानंतर सुजय आणि आरुष पण तिला चिडवायला लागले.

“जा यार,” रावी लटक्या रागात तिथून जाऊ लागली. “एकतर तुमच्यामुळे मला त्यांच्याशी बोलता आल नाही. तुम्ही काय? तुमच तुमच फिरून घेतलं आणि मला ठेवलं एकटीलाच.”

“मग एवढा वेळ काय करत होते कॅफेमध्ये?” नयन रावीच्या खांद्याला धक्का देत बोलली.

“जाऊ दे मी जातेच.” रावी गाल फुगवून जाऊ लागली.

“दो दिल मिल रहे है.” मनालीने सूर धरला.

“मगर खुलके खुलके.” नयनने पण वेगळाच सूर पकडला.

“खुलके?” सुजय त्याच डोक खाजवत बोलला.

“चुपके आहे ना तिथे.” आरुष पण विचार करत बोलला.

“पण ह्यांनी तर खुलकेच प्रेम केल ना,” नयन खट्याळ होत बोलली. “ते ही आपल्या सगळ्यांसमोर.”

तशी जाणारी रावी जागीच थांवली आणि नयनकडे आठ्या पाडून बघू लागली.

“मग एकटे असल्यावर..” नयन पुढे बोलणारच होती की रावी तिच्यामागे धावत सुटली.

“डीस्पेन्सरी,” रावी “तुझ्यातर आता.”

रावीच्या मोठमोठ्या पावलांनी नयन लगेच तिच्या पकडीत आली. रावीने तिला पाठीमागून पकडून घेतलं “आता बोल.”

“सॉरी ना नणंद बाई.” नयन निरागस होऊन बोलली.

“बाई?” रावीच्या कपाळवर अजूनच आठ्या चढल्या.

“डॉटर इन लॉ,” नयनने तिच्या गालावर प्रेमाने थोपटले. “मेरी जान.”

तशी रावी खुदकन हसली.

“अय ती फक्त माझी जान आहे.” तिकडून मनाली दोघींजवळ येऊन बोलली.

“तिचा जान आता तिला सापडला आहे बाबा.” आरुष

ते सगळेच हसू लागले.

“अरे,” आरुष “तू बोलली असती ना की शशांक आला आहे तर आम्हाला टेन्शन आल नसत. उलट तुम्हाला अजून थोडा वेळ दिला असता.”

“तुम्ही पण मला विसरले हे पण तितकच खरं आहे.” रावी मानेला झटका देत बोलली.

“बरं आधी सोड तर मला,” नयन दम टाकत बोलली. “नाहीतर तुझ्या मिठीत मी पिचकून जाईल.”

मग रावीने तिला सोडलं.

“आता ही मिठी फक्त त्यांचीच हं.” मनाली हसतच बोलली.

तस रावीने तीईचा चेहरा लाजेने झाकून घेतला. तसे बाकीचे अजूनच हसू लागले आणि थोडावेळ राहिलेली खरेदी करून घरी निघून गेले.

तिकडे तुषारच्या डोक्यातून परीचे ते फोटो काही जातच नव्हते. त्यात ती आता डान्स करणार असल्याचे फिक्स झाल होत. आता ती कोणत्या गाण्यावर डान्स करणार? जो दिल्लीला केला होता त्यावरच तर करणार नाही ना? हे त्याच्या डोक्यात फिरू लागलं. कारण त्या गाण्यावर ज्या काही शेवटच्या स्टेप्स झाल्या होत्या त्यासाठी कोण असणार? तिथे दुसरा कोणी मुलगा आला तर? हा विचार करून तुषारला जेलस फील व्हायला लागल.

एकतर ती तो डान्स फक्त त्याच्यासाठी करणार होती आणि त्याला तिचा तो दिल्लीमध्ये केलेला डान्स खूप आवडला होता. त्यामुळे त्याच मन सांगत होत की परी त्याच गाण्यावर डान्स करणार. तो अस्वस्थ होऊन त्याच्या खोलीत येर झारा मारत होता. मग त्याला त्याची बहिण आठवली. तसा तो लागलीच तिच्या खोलीत गेला.

तेजश्री अजूनही तिच्या खोलीत तिच्या डान्सची प्रॅक्टिस करत होती. तुषार तिच्या खोलीत पोहोचला आणि त्याने पहिले तिच्या खोलीतली म्युझिक सिस्टीम बंद केली.

अचानक गाण बंद झाल्याने तेजश्री पहिले तर गोंधळली. नंतर तृषारला बघून ती अजूनच गोंधळली.

“काय आहे?” तेजश्री “प्रॅक्टिस करत होती ना मी.”

“माहिती आहे,” तुषार “मला काही विचारायचं आहे.” तुषार त्याची नजर चोरत बोलला.

त्याच हे अस नजर चोरण बघून तेजश्रीला जर शंका आली. ‘नक्कीच मॅम बद्दल विचारायचं असेल.’ तिला मनातच हसू आल. “मग विचार ना. त्यासाठी गाण का बंद केल? एकतर दोन दिवसातच फंक्शन आहे.”

“त.. ते ती..” तुषारची ततपप चालू झाली.”

“ओह गॉड,” तेजश्री आणि तिची ती नाटक. “दादा आता मला बाराखडी शिकवणार आहेस का?”

“ऐकून तर घे ना.” तुषार जरा चिडून बोलला.

“त्यासाठी तू बोलला पाहिजे ना,” तेजश्री “बोलायचं आहे ते दिल सोडून आणि ततपप करत बसला आहेस.”

“तुझी ती मॅम कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे?” तुषार एका दमात बोलून मोकळा झाला.

“का?” तेजश्रीच्या कपाळवर आठ्या जमा झाल्या. “तू तर त्यांचा विषय पण काढणार नव्हतास ना.”

“जेवढं विचारलं तेवढचं सांग.” तुषार

“नाही सांगत जा,” तेजश्री ठसक्यात बोलली. “असही माहिती असत तरी नसत सांगितलं.”

“तू आधी माझी बहिण आहेस.” तुषार

“मग?” तेजश्री तिचे खांदे उडवत बोलली.

“मग काय मग?” तुषार

“तो बाथरूममध्ये असतो.” तुषारच वाक्य पूर्ण होण्याआधी तेजश्री बोलली.

“बाथरूम?” तुषार गोंधळून गेला. “त्याचा काय संबंध?”

“मग बाथरूममधेच असतो ना?” तेजश्री आता हसतच बोलली.

“मग हुसू का आता?” तुषार त्याच तोंड वाकड करत बोलला. “लवकर सांग आणि तुझ्या मॅमच बाजू घ्यायची गरज नाहीये.”

“मी कशाला त्यांची बाजू घेऊ ?” तेजश्रीने आज तुषारला चांगलच तरसवायच ठरवलं होत.

“तेजे,” तुषार आता चिडू लागला. “खूप मार खाशील.” तुषार तेजश्रीच्या जवळ जात बोलला.

“मी तुझ नाव वहिनीला सांगून देईल हं.” तेजश्री स्वतःच्या कमरेवर हात ठेवत तुषारला खुन्नस देत बोलली.

“तिचं कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे? ते विचारत आहे ना मी.” तुषार

“अरे ते त्यांनी कोणालाच सांगितल नाहीये,” तेजश्री पण त्याच सुरात बोलली. “ते पण सांगितलं ना मी.”

दोघांना आता दम लागला होता. तेजश्रीने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस फुक मारत उडविले.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.


राजसाठी सेपरेट पर्व लिहू की या कथेत थोडक्यात लग्न आटपून टाकू? काय म्हणणं आहे वाचक मंडळी? ही कथा तर आता शेवटाकडे आली आहे.
राजसाठी सेपरेट पर्व काढू की यातच थोडक्यात
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →