Login

अवनी एक प्रवास भाग ११२

मनाली आणि नयन तर आरुष आणि सुजयला विचारून त्यांची खरेदी करत होती. तर रावी ह्या चौघांना बघून स्वतःला शशांकसोबत कल्पना करत होती. याच्यासोबत काय बोलायचं? कस वागायचं? याचा विचार करत होती. मध्ये मध्ये तर शशांक अजून का आला नाही? याचा विचार करत होती.
मागील भागात.

“बोलली ना,” रावी “मला भेटायचं आहे त्यांना.”

“ठीक आहे त्याच्याशीच बोल.” राज

“आता सगळ्यांसमोर नको बोलूस,” रावी “त्यांना तुझ्याकडे बोलाव.”

“का?” राज “आज ना उद्या तर लग्न करणारच आहात ना?”

“हो रे,” रावी “पण आज नको कोणाला काही सांगू.”

“बरं मग कुठे पाठवू तुझ्या त्यांना?” राज मस्करी करत बोलला.

“मार्केट मध्ये आहे मी.” रावी

“बरं,” राज “त्या कॅफेमध्ये यायला सांगतो.”

रावीने ओके बोलून फोन ठेवला आणि तिच्या मनाला जो आनंद झाला त्याला काय नाव द्यायचं हा ती विचार करत बसली.

तर तिकडे सर्वांनी शशांकची मजा घ्यायला सुरवात केली.

आता पूढे.

“आता काय बाबा,” ताराने सुरवात केली. “थेट होणाऱ्या बायकोकडून इनव्हीटेशन आल आहे. जाव तर लागेल ना?”

“मग काय तर?” राज “ते ही धमकीच दिली डायरेक्ट. अस कोणी एवढ्या सुंदर मुलीला न बघता येत का?”

“पण हे चुकीच आहे हं.” राधिका राजकडे डोळे वटारून बघत बोलली.

तसा शशांकने सुटकेचा श्वास सोडला. जो काही क्षणातच त्यांना परत रोखून धरावा लागला होता.

“तिचं ठीक आहे ती थोडी अल्लड आहे,” राधिका “पण ह्याला अक्कल नको का? जस त्याच्या मोठ्या भावाला चार गोष्टी शिकवल्या तश्या ह्या मित्राला पण शिकवायच्या ना.” राधिकाने शशांककडे पाहिलं “एवढे मोठे गुन्हेगार पकडणारा तू, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे ते समजून घेणारा तू, तुला एका मुलीच्या मनातल समजू नये? ते ही जी तुला आवडली आहे तिच्याच?”

शशांक आता राधिकाकडे गोंधळून बघू लागला. ती त्याची मस्करी करत आहे की राजला काही बोलत आहे की त्यालाच ती सुनावत आहे. हेच त्याला समजून येत नव्हत.

“मग मंद बदक कोणाला बोलायचं?” राधिका तिच्या कमरेवर हात ठेवत बोलली.

आता शशांकला समजल की त्यालाच सुनावलं जात होत. “मग मी जाऊ आता?” तो भाबडेपणाने बोलून गेला.

“बघ बाबा,” प्राजक्ता “एकतर तिने राजला आम्हाला काही सांगायाला मनाई केली आहे.” तिने राधिकाकडे बघून तिचे डोळे मिचकावले.

“कस व्हायचं रे देवा यांच?” राधिका वर बघत बोलली. नंतर तिने शशांकवर नजर टाकली. कारण तो अजूनही निवांत बसलेला होता.” उठतो का आता?” शशांक जेव्हा लहान होता तेव्हा जशी त्याला ओरडायची तशीच ती आता त्यांना ओरडली.

तिचा आवाज ऐकून शशांक झटक्यात उठला आणि जायची तयारी करू लागला. तर राधिकाने तिचा मोबाईल उचलला आणि राजकडे पाहिलं.

आपल्या आईच अस बघणं त्याला काहीतरी धोक्याची घंटा असल्याच सांगून गेल. राधिकाने सरळ परीला फोन लावला होता. रिंग वाजेपर्यंत राधिका राजकडे रोखूनच बघत होती. मग तर राजला त्याची शंका खात्रीत बदलताना दिसली.

परी तिच्या डान्सची प्रॅक्टिस करून इतकी दमली होती की ती दुपारी जे झोपली ते संध्याकाळीच उठली. तेही राधिकाने केलेल्या फोनमुळे तिला जाग आली होती.

“अम्म बोल ना आतु.” परी आळसावलेल्या आवाजात बोलली.

“तू अजूनही झोपून आहेस?” राधिकाला जरा आश्चर्यच वाटल.

“हम्म,’ परी तिच्याच तंद्रीत बोलू लागली. “ते डान्सची प्रॅक्टिस जरा जास्तच झाली ना.”

“कुठला डान्स?” राधिका अजूनच गोंधळली.

“अम्म,” परी “ते कॉलेजच्या फंक्शनमध्ये करत आहे ना माझ्या दगडासाठी डान्स.”

“दगडासाठी?” राधिका “तुझा कोणता दगड? अगं बाई नीट उठून बोल.” राधिका आता जरा मोठ्याने बोलली.

तशी स्वतःच्या तंद्रीत असणारी परी खाडकन जागी झाली. तिने तिचा मोबाईल नीट पहिला तर राधिकाचा फोन होता. ‘शिट शिट शिट, परे काय करत होतीस तू?’ परी मनातच स्वतःला भांडू लागली.

“अगं बोल,” राधिका “बरी आहेस ना तू?”

‘दगड?’ राज राधिकाच बोलण ऐकून विचार करू लागला? ‘म्हणजे परीला फोन लावला?’

“अम्म हो,” परी अडखळत बोलली. “काय ते जरा जास्तच झोप लागली होती ना म्हणून. बोल ना काय बोलत होतीस?”

“ते राजला एक मुलगी सांगून आली आली तर तो ऐकतच नाहीये.” राधिका बोलून मोकळी झाली.

तसे इकडे राजचे डोळेच मोठे झाले. ‘माझ्यासाठी कधी मुलगी सांगून आली? आणि मलाच माहिती नाही?’

“अय्या हो का?” परी आनंदाने बोलली. “कोण आहे? कुठली आहे? आणि तो का नकार देत आहे? दे तर त्याच्याकडे फोन.”

आता राधिका जरा विचारात पडली. कारण तिने तर राजला काही सांगितलाच नव्हत आणि ते परीला समजल तर परी तिला भांडायला देखील कमी करणार नाही हे पण तिला चांगलच माहिती होत.

“अस नाही,” राधिका “इकडे ये. मग बोलू.”

“ठीक आहे आलीच उद्या.” परी उत्साहात बोलली.

राधिकाने पटकन फोन ठेवून दिला.

“अगं पूर्ण तरी सांगायचं ना तिला,” राज जरा चिडून बोलला. “की मला तर काहीच सांगितलं नव्हत म्हणून.”

“सांगितलं की.” प्राजक्ता

“कधी?” राजने चिडून पण हसत पाहिलं.

“हे काय आता सांगत आहे.” राजेशने सांगायाला सुरवात केली. त्याने राजसाठी आलेल्या स्थळाची माहिती सांगायला सुरवात केली.

राजच्या आत्याने ते स्थळ आणल होत. मुलगी तिच्या आई वडिलांसोबत मुंबईमधेच राहत होती. पण त्यांच गाव राजच्या आत्याच्या सासरकडच्या गावाजवळच होत. त्यामुळे आत्याने तिच्या भावाजवळ म्हणजेच संकेतजवळ ह्या बद्दल सांगितलं आणि आता राजेश त्याला त्याबद्दल सांगत होता. तस राजच्या कपाळावर आठ्या चढू लागल्या.

“मला सध्या लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये.” राज राजेशच बोलण तोडत गंभीर होऊन बोलला. “मी जातो.” नंतर तो शशांककडे वळाला. जो नुकताच तयारी करून आला होता. “तू गेला नाहीस अजून. जा लवकर.” एवढ बोलून तो त्याच्या खोलीकडे निघून गेला.

“ह्याला काय झाल आता?” शशांक गोंधळून गेला.

“काही नाही तू जा बरं,” राधिका “आणि लवकर ये. त्यांना पण जास्त उशीर करू देऊ नकोस. नाहीतर त्यांना फक्त भटकायला पाहिजे.”

शशांकने होकारात मान हलवली आणि तो बाहेर निघून गेला. तर घरात सर्वाना राजच टेन्शन आल. कारण तो सहसा असा गंभीर होत नव्हता आणि जर झालाच तर त्याला त्यातून काढण खूप कठीण व्हायचं. आता तर विषय त्याच्या मनाचा होता. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं.

“जेवणापर्यंत वाट बघू.” प्राजक्ता काळजीने बोलली.

तस बाकीच्यांना ते पटल आणि ज्याच्या त्याच्या कामाला लागले.

राज त्याच्या खोलीत आला होता पण प्रचंड अस्वस्थ झाला होता. आजवर त्याने परी सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार देखील केला नव्हता. तिने जरी त्याला मित्र म्हणून वागवल होत तरी ह्याने मात्र तिच्यावर मनापासून प्रेम केल होत. त्याने तिच्या मनाचा मान राखत तिच्याशी फक्त एक बेस्ट फ्रेंड म्हणून वागला होता.

तुषार जेव्हा परीच्या आयुष्यात आला तेव्हा देखील त्याला वाईट वाटल होत. पण आता मात्र त्याला त्यापेक्षा जास्त अस्वस्थ वाटायला लागलं होत. तिच्या आयुष्याचा विचार करता करता त्याने स्वतःचा कधी विचारच केला नव्हता. आता अस अचानक समोर आल्यावर त्याला कस वागाव तेच समजत नव्हत. त्याचा विचार करून करून तो खूपच टेन्शनमध्ये यायला लागला.

तिकडे शशांक राजची बाईक घेऊन गेला होता. त्याला सांगितलेल्या कॅफेच लोकेशन त्याने त्याच्या मोबाईलमध्ये टाकल होत. त्या दिशेने तो खूपच वेगात बाईक चालवत निघाला होता.

मनाली आणि नयन तर आरुष आणि सुजयला विचारून त्यांची खरेदी करत होती. तर रावी ह्या चौघांना बघून स्वतःला शशांकसोबत कल्पना करत होती. त्याच्यासोबत काय बोलायचं? कस वागायचं? याचा विचार करत होती. मध्ये मध्ये तर शशांक अजून का आला नाही? याचा विचार करत होती.

‘अरे यार,’ रावी ‘त्यांचा नंबर पण नाही घेतला मी. आता त्या कॅफेत लवकर जाव लागेल. हे काय बसतील त्यांची खरेदी करत.’ रावीने मनातच चिचार केला आणि त्यांच्यावर नजर टाकून पटकन तिथून सटकली. त्या कॅफेकडे जाता जाता राजला शशांकचा नंबर पाठण्यासाठी मेसेज देखील करून दिला.

पुढच्या काही वेळातच रावी त्या कॅफेमध्ये जाऊन पोहोचली. तो अजून काही अजून तिथे पोहोचला नव्हता. तसा रावीने एक दीर्घ श्वास घेतला. तो येईपर्यत तिने तिची कॉल्ड कॉफी मागवली होती. त्या कॉफीचे एक ते दोन घोट घेऊन झालेच होते की शशांक तिथे जाऊन पोहोचला.

जशी त्याचा तिथे प्रवेश झाला तस तिथल्या बऱ्याच मुलींची नजर शशांकवर गेली. त्याच ते कसदार शरीर, पोलीसी रुबाब, त्याच व्यक्तिमत्व बघून बऱ्याच मुली लगेचचं त्याच्यावर तिथल्या तिथे फिदा झाल्या होत्या.

रावीने ते पाहिलं आणि रावीच्या मनात लगेच मत्सर उभा राहीला. जो येत आहे तो आता फक्त माझा होणार आहे. त्याच्याकडे अस दुसऱ्या मुलींनी बघण रावीला आतापासूनच सहन झाल नाही.

“बेबी,” रावी जाणून मोठ्याने बोलली. “मी इथे आहे.” तो येत आहे तो फक्त माझा आहे हे तिने तिच्या एका वाक्याने सर्वाना सांगितले होते.

तर शशांकने तिच्याकडे चमकून पाहिलं. तर त्या कॅफेमधल्या बऱ्याच मुली रावीकडे आयुसेने बघू लागल्या. तर रावी तोऱ्यात उभी राहून शशांककडे बघत होती.

ते बघून शशांकच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला तिथली सगळी परिस्थिती समजून गेली. तस त्याच्या चेहऱ्यावर देखील एक मंद स्मित झळकल. तो त्याची ती मोठमोठी पावलं टाकत रावीजवळ पोहोचला.

“अम्म सॉरी जरा वेळ झाला.” शशांक

“ते ठीक आहे,” रावी परत खुर्चीवर बसत बोलली. “पण मग माझ्याशी न बोलता घरी का निघून गेलात?”

“त्याच म्हणशील तर आमचे सर तिथेच होते,” शशांक “आणि मी त्यांना भेटायची परवानगी मागितली होती. राहिली गोष्ट तुझी तर मी तुला त्याबद्दल काहीच विचारलं नव्हत आणि एखाद्या मुलीला तिच्या परवानगी शिवाय कस थेट बोलू ना? अस पण नव्हत की आपल्या बघण्याचा प्रोग्राम होता. त्यामुळे अस डायरेक्ट तुझ्याशी बोलण ते बरोबर वाटत नव्हत.”

शशांकच्या ह्या वाक्यावर रावी त्याला बघतच राहिली. तिला राजचे शब्द आठवले. ‘तो थोडाफार प्रसाद सारखा आहे.’

“हेलो.” रावी काहीच न बोलता फक्त बघत आहे अहून शशांकने तिच्यासमोर त्याचे हात फिरवले.

तशी विचारात हरवलेली रावी तिच्या विचारातून बाहेर आली. “काही नाही. काही हवं आहे का तुम्हाला?”

“अम्म नको,” शशांक “मी खाऊनच बाहेर पडलो. राधिका मावशी आणि प्राजक्ता मावशी मला खायला दिल्याशिवाय बाहेरच जाऊ देत नाही.”

“ते तर आहेच.” रावी तिच्या मूळ रुपात आली. “चला बाहेर, मला खरेदी करायची आहे. माझी खरेदी पण होईल, आपल बोलण पण होईल आणि आपल्या आवडी निवडी पण समजतील.”

“हुशार आहेस,” शशांक “तुला उगाच मंद बदक बोलतात.” शशांक हलकेच हसत बोलला.

तस रावी त्याला आठ्या पडून बघू लागली.

“आता हा शब्द तुझ्या घरूनच मला समजला आहे.” शशांक त्याचे खांदे उडवत बोलला.

“मग जा एखादी दुसरी हुशार शोधा.” रावीने हातची घडी घातली आणि रागात बोलली.

आता तिच्या प्रेमात पडलेल्या त्याला तिचं हे रागातल रूप पण खूपच गोंडस वाटलं. “पण मला तर हे मंद बदकच आवडलं ना.” बोलता बोलता शशांकने बाजूच्या एका फुलदाणी मधलं फुल घेतलं आणि रावीसमोर जात गुढघ्यावर बसला.

“हेय कलरफुल,” शशांक रोमांटिक आवाजात बोलला. तिने आज मल्टी कलरचा टोप घातला होता आणि तिचे ते विविध रूपाचे रंग बघून तो तिच्यावर भाळला देखील होता. “तुझ्या डॅडप्रमाणेच तुला आयुष्यभर जपेल. त्याबदल्यात माझ्या या आयुष्यात तुझ्या प्रेमाचे रंग उधळशील?”

हे सगळ शशांक बोलत असताना रावीला तर जरा झटकाच बसला होता. तिला कल्पना पण नव्हती की शशांक अस काही करेल. पण तो गुढघ्यावर बसून काय बोलला ते मात्र तिच्या डोक्यावरून गेल होत. तिला इतकच समजल होत की तो तिला तिच्या वडिलांप्रमाणे जपणार होता आणि तिच्यासाठी ते पण खूप होत. बाकी वाक्याचा अर्थ विचारून तिथे स्वतःचा तिला पोपट करून घ्यायचा नव्हता. आधीच तिच्या पोटात फुलपाखरांनी धुमाकूळ घातला होता.

तिने तिच्या समोर आलेलं ते फुल लागलीच स्वतःच्या हातात घेतलं आणि शशांकचे प्रेमाने गाल ओढले.

“लव्ह यु बेबी.” रावी हसतच बोलली.

तसा शशांक उठला आणि परत खुर्चीवर बसला. “बरं आता सांग काय खाणार?”

“माझ तर पोट भारल.” रावी हातातल्या फुलाला बघत बोलली. “आता फक्त एक कॉफी.” तिने कॉफीच्या कपाला हात लावला आणि त्याच्यासाठी कॉफी मागवली.

दोघे कॉफी पितच होते की रावीचा फोन वाजला. तिने पाहिलं तर मनाली तिला फोन करत होती. शशांकच्या गडबडीत ती त्या दोघींना विसरूनच गेली होती. तिचा फोन आल्यावर तिला मनाली आणि नयनची आठवण आली. तसा तिने लागलीच तो फोन उचलला.

“कुठे गेलीस गं मला काहीच न सांगता?” मनाली जरा चिडून बोलली.

“आली का आठवण फ्रेंडची.” रावी पण तितकीच चिडून बोलली. “ते ही इतक्या लवकर नाही का?”

“अम्म सॉरी ना बेबी.” मनाली लगेच नरमाईने बोलली. शेवटी ती पण तर रावीला विसरली होती ना. “ते खरेदी मध्ये..”

“त्याच खरेदीसाठी माझ्यासोबत आली होतीस तू.” रावी अजूनच चिडून बोलली. “आणि स्वतःचा होणारा नवरा काय आला तर सरळ मैत्रिणीला विसरून गेली.”

“तस नाही ना बेबी.” मनाली टेन्शनमध्ये येत बोलली. “ते तुझ्याच दादामुळे झाल. त्यांनीच मला सांगितलं की तुला नंतर बोलावू म्हणून.”

तसा आरुष मनालीकडे चमकून बघू लागला. ‘मला का अडकवतेस?’ असे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव होते.

“त्याच तू नको सांगू मला,” रावी “तो मला कधीच विसरणार नाही आणि ती दुसरी कुठे आहे? ती डीस्पेन्सरी. तू तर तू, ती पण विसरली का मला?”

मनालीने नयनकडे पाहिलं. तशी नयन सुजयच्या पाठी लपली गेली. ते बघून मनालीने एक उसासा टाकला.

“मला विसरले ना,” रावी “आता तुमच्या त्या नवऱ्यांना सांगा माझ्याशी फक्त बोलायला या.”

एवढं बोलून तिने फोन सरळ कट केला.

“शिट शिट शिट,” मनाली टेन्शनमध्ये आली. रावीचा अबोला तर ती सहनच करू शकत नव्हती. तिने आरुषकडे पाहिलं. “सगळ तुमच्यामुळे झाल.””

“मी काय केल आता?” आरुष “आणि ती काय बोलली?”

“काय बोलणार?” मनाली अस्वस्थ होत बोलली. “फक्त बोलायला या म्हणाली.”

तसे बाकी तिघे पण टेन्शनमध्ये आले.

तर इकडे शशांक गालातच हसणाऱ्या रावीकडे गोंधळून बघत राहीला. ‘किती नौटंकी आहे यार ही. आता रडवेली होऊन बोलली की बोलणार नाही म्हणून आणि आता फोन कट केल्यावर गालात हसत आहे?’

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →