Login

अवनी एक प्रवास भाग १११

आता त्या दोघीं ह्या दोघांसोबत बोलण्यात जरा व्यस्त झाल्या. रावीने ते पाहिलं आणि तिला आज एकटी असल्याचे वाटू लागले. मग तिला आठवलं की आता तिच्या आयुष्यातही कोणीतरी येऊ पाहत आहे आणि तो तर घरी पोहोचला होता. पण ते दोघे अजूनही बोलले काय भेटलेही नव्हते . तसा रावीने तिचा फोन काढला आणि सरळ राजला फोन लावला.
मागील भागात.

आता गाण कुठल निवडायच? हा प्रश्न तिला पडला. तो ही लगेच सुटला गेला आणि तिने ते गाण मोबाईलवर शोधून लावलं. त्यावर तिने तिच्या त्या स्टेप्स करायला सुरात केली. पण मोबाईलचा आवाज जर बारीक असल्याने परीला डान्स करताना तो भाव येत नव्हता. तिने जरा विचार केला आणि सरळ सुजयची खोली गाठली.

सुजयच्या खोलीत एक सेपरेट म्युझिक सिस्टीम होती. तिने ती उचलली आणि स्वतःच्या खोलीत आणली. ती आणताना तिने सुजयला काही विचारलं नव्हत. नाहीतर तो त्याच्या ॲकेडेमीवरून थेट घरी पोहोचला असता आणि येताना बाकीची वानरसेना पण घेऊन आला असता. कारण तिने म्युझिक सिस्टीम आणली म्हणजे ती नक्कीच डान्स करणार हे त्याला समजून जाणार होत.

परीने तिच्या खोलीच दार लावून घेतलं आणि ती म्युझिक सिस्टीम तिच्या मोबाईलला जोडली. मग तिने तिचं ते गाण लावलं. त्या सिस्टीमवर ते गाण इतक भारी वाजायला लागलं की परीचे पाय आपोआप थिरकायला लागले. तीन तीन गाणे निवडले आणि त्याचे रिमिक्स करून त्यावर प्रक्टिस करायला सुरवात केली.

आता पूढे.

कॉलेजमधून निघतानाच परीने ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि निवेदक यांची भेट घेतली होती. सोबतच तिने बांधण्यात येणाऱ्या स्टेजवर देखील नजर टाकली होती. त्यात ही तिने सरळ ऑर्डर सोडत एक दोन बदल देखील करायला सांगितले होते. पहिले तर ठरलेल्या पद्धतीनुसार बांधायला घेतलेल्या त्या माणसांनी परीचे हे ऐन वेळेसचे बदल करायला नकार दिला होता. तर तिने सरळ तिच्या मोहिते आजोबांची धमकी त्यांना दिली होती. आता ती त्यांची नात असल्याचे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे त्या माणसांनी पहिले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नंतर प्रिन्सिपल सर यांची परवानगी घेतली आणि तिने सांगीतलेले बदल करायला घेतले.

‘आधी डान्स साठी सरळ नकार देणारी ही आता हिला अचानक काय झाल?’ प्रिन्सिपल सर विचार करून हैराण झाले होते. पण मोहिते साहेबांची नात म्हणून त्यांनी ती परवानगी दिली होती.

डान्सची प्रॅक्टिस करताना तिच्यासमोर फक्त तुषार फिरत होता. त्याचाच विचार करून ती तिचा डान्स करत होती. तो करता करता तिला काहीतरी आठवलं आणि तिने तिची प्रक्टिस थांबवून तेजश्रीला कॉल केला.

कॉलवरच बोलण ऐकून तेजश्रीने डोक्यालाच हात लावला. “मॅम, अजून दोन दिवस आहेत त्याला. तुम्ही आतापासून का सांगत आहात?”

“जेवढ सांगते आहे तेवढ कर,” परी पण तितक्याच तोऱ्यात बोलली. “तू तुझ्या डान्सच्या गडबडीत विसरशील. मला माहिती आहे आणि तेव्हा मला काही झाल ना तर पहिले मी तुझ नाव घेईल. मंग तू आणि तुझा दादा काय ते बघून घ्यायचं.”

“अरे, ह्याला काय अर्थ आहे?,” तेजश्री टेन्शनमध्ये येत बोलली. “मला का बळीचा बकरा बनवत आहात?”

“ह्या वर्षी देखील त्या दिल्लीच्या स्पर्धेसाठी मी तुझ नाव रेकमेंड करेल.” परी

“प्रॉमिस?” तेजश्री लगेच खुश होत बोलली.

“पिंकी प्रॉमिस.” परी हसतच बोलली.

“मग तुम्ही पण तिथे सोबत हव्या.” तेजश्री “तिथली कॉम्पिटिशन तर तुम्हाला चांगलीच माहिती आहे.”

“बघू मला परमिशन मिळाली तर.” परी “आता तर परमिशन देणाऱ्यांची संख्या वाढली आहे ना बाबा.”

“त्याची काळजी तुम्ही नका करू.” तेजश्री खुश होत बोलली.

“हम्म,” परी “आत जेवढ सांगितल आहे तेवढ कर.”
एवढं बोलून परीने सरळ फोन ठेवून दिला.

“मॅम पण प्रेमात पूर्ण आपटल्या आहेत वाटत.” तेजश्री हसतच बोलली आणि तिच्या कामाला लागली.

बंधू मंडळी तर त्यांच्या ॲकेडेमीवर होती. तर वरिष्ठ मंडळी त्यांच्या कामावर होती. शशांक देखील राजच्या घरी जाऊन पोहोचला. राज आणि प्रसाद तर त्यांच्या कामावर गेले होते. घरी फक्त तारा होती. बाकी राधिका आणि प्राजक्ता संकेत आणि राजेश हे देखील त्यांच्या कामावर होते. आता हे दोघेच घरी होते.

“काय मग झाली का भेट होणाऱ्या बायकोची?” तारा चिडवण्याच्या सुरात बोलली.

“मी तिच्या वडिलांना भेटायला गेलो होतो.” शशांक “ज्यांना आयडॉल मानल आहे त्यांचीच मुलगी नशिबात आली. आता तर त्यांच्याकडून अजून बरचं काही शिकायला मिळेल.” शशांकच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होत. “नशीब लागत ना यासाठी.”

“तुला आनंद नेमकी कुठला आहे?” तारा जरा विचारत पडली. “तुला आवडणारी मुलगी तुझ्या नशिबात आली याचा की तुला तुझे सर मिळाले याचा?”

“दोन्ही,” शशांक “ते बोलतात ना जेव्हा आपल्याला काही मिळणार असत तेव्हा खूप काही मिळत असत. माझे मॉम डड पण सरांना भेटायला उत्सुक आहेत.”

“अजूनही सर?” तारा

“हो,” शशांक “कारण नात अजून फिक्स केल नाही ना.” शशांक जरा तोंड पाडून बोलला.

“मग राज दादाला सांग.” तारा “तो सगळच नीट करेल ते ही अगदी फास्ट.”

“त्याला नको बाबा,” शशांकने थेट हातच जोडले. “त्याच्यावर त्याच्या मामांची सावली पडली आहे. जे काही करतो ते शॉक देऊन करतो.”

ते ऐकून तारा खळखळून हसू लागली. आता राज होताच तसा, त्यात आता परीसोबत जे काही झाल त्यावेळेस त्याने थेट मोहिते साहेबांपासून सगळ्यांनाच कामाला लावलं होत. आज शशांक मुक्काम होता तिथे. तो उद्या त्याच्या घरी जाणार होता.

दुपारी चांगलीच झोप काढून झाल्यावर रावीने मनालीला फोन लावला. आज दोघींची भेटच झाली नव्हती. त्यात तिने रावीला एक फोन देखील केला नव्हता. आता मनालीने काही फोन केला नाही म्हणून रावीनेच तिला फोन लावला.

त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमासाठी नवीन कपडे घायचे होते. मनाली पण घरीच असल्याने तिने ही लगेच फोन उचलला आणि त्या दोघींनी संध्याकाळी भेटण्याचे ठरवले. मग मनालीला नयनची आठवण आली. तस तिने रावीला विचारलं तर तिने नयनला पण सोबत घेऊन यायला सांगितलं.

इकडे परी तिची डान्सची प्रॅक्टिस करून खूपच दमली होती. तिचं पूर्ण शरीर घामाने डबडबल होत. कपाळावरून निघालेल्या घामाच्या धारा गालावरून ओघळून थेट तिच्या गळ्यावर येत होत्या. त्यामुळे गळा आणि खांदा पूर्ण घामाने भिजलेला होता. गळ्यावरून खाली उतरलेल्या त्या घामच्या धारांनी तिचे कपडे देखील भिजवून टाकले होते. त्यामुळे ते तिच्या शरीराला घट्ट चिपकून बसले होते.

परीने स्वतःला आरश्यात पाहिलं आणि तिला खट्याळपणा सुचला. ‘माझ्यापासून लांब पळता काय? आता बघा मी तुम्हाला कुठे कुठे दिसते ते?’ परी मनातच बोलली.

तिने तिचे बांधलेले केस पूर्ण मोकळे सोडले. त्या केसातून सुटलेल्या त्या खट्याळ बटा तिच्या गालावर येऊन खेळू लागल्या. मग काय? परीच ते खुलून आलेलं सौदर्य अजूनच उठून दिसायला लागल. तिने तिचा मोबाईल उचलला आणि त्याचा कॅमेरा चालू केला.

परीने परत आरश्यात पाहिलं केस अजूनच मोकळे करून चेहऱ्यावर आणले. त्या कॅमेराकडे पाहिलं आणि सेल्फीची पोज दिली. नंतर तो फोटो पाहिला. खूपच सुंदर आला होता. मग तिने अश्या तीन ते चार पोज देत तिचे फोटो काढले. ते सगळेच फोटो पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते खट्याळ हसू अजूनच उमलले. तिने तुषारचा व्हॉटस ॲप उघडलं आणि त्यावर तिचे हे फोटो पाठवून दिले.

तुषार त्याच्या जिममध्ये होता. त्याच्या क्लाएन्टच वर्कआउट घेत होता. त्याचा मोबाईल तिथल्या ऑफिसमध्ये होता. त्यामुळे त्याच त्याच्या मोबाईलकडे काही लक्षच नव्हत. जस त्या क्लाएन्टच सेशन संपल तसा तो ऑफिसमध्ये गेला. रुमालाने आलेला घाम पुसला आणि खुर्चीवर बसत त्याने त्याचा मोबाईल चाळायला घेतला.

त्याच्या मोबाईलवर बरेचसे नोटिफिकेशन आलेले होते. त्यात त्याने परीच्या नंबरवरून आलेले नोटिफिकेशन पहिले उघडले. त्यात काही फोटो आलेले दिसले. जसे ते मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले आणि तुषारला दिसले. तसा तुषारचा श्वासच घश्यात अडकला. दमलेली असूनही घामाने ओलचिंब झालेलं तिचं ते सौंदर्य बघून तुषार जाणीवेच्या पलीकडे निघून गेला. त्याच्या पोटात झरकन खोल खड्डा पडला. त्याने तिच्या फोटोवरून त्याची ती लांबसडक बोट फिरवली.

‘नक्कीच तू खूपच सुंदर आहेस,’ तुषार मनातच बोलू लागला. ‘पण मी तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम केल आहे गं वेडे.’ आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज चढली. ‘पण तू अस करशील तर तुझ्यावर मला राग तरी कसा धरता येईल?’ तुषार मंद स्मित करत खुर्चीला रेलून बसला. त्याला मनवण्यासाठी तिने ते फोटो मुद्दाम पाठवले असल्याचे समजून गेल होत.

‘तू तुमच्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये डान्स करणार आहेस तर,’ तुषार ‘ तुझे हे प्रयत्न बघून तुझ्यावर अजूनच प्रेम येत आहे. बोललो होतो ना, हाच हात मिळवण्यासाठी तू नंतर धावत माझ्याकडे येशील.’ तुषारच्या चेहऱ्यावरच ते ते खोडकर हसू काही कमी व्हायचं नाव घेत नव्हत. बराच वेळ तो ते फोटो बघत राहीला.

संध्याकाळ झाली होती. रावी, मनाली आणि नयन मार्केटला जाऊन पोहोचले. नेहमीप्रमाणे पहिले त्यांनी पाणी पुरी खाल्ली. पोटात थोडी भर पडल्यावर त्यांना फिरण्याठी जरा जोर आला. त्यांनी त्या मार्केटच एक एक दुकान पालथ घालायला सुरवात केली. त्यात ते दुकानात देखील गेल्या होत्या जय दुकानात परीचा किस्सा झाला होता. त्यांनी तर रावीला लगेच ओळखल होत. त्या तिघी घुसल्यावर तिथला स्टाफ अजून मागे बघू लागले.

“आज दी नाही आली आहे.” रावीने हलकेच हसत सांगितलं.

तेव्हा ते ह्या तिघींना ते सांगतील ते सामान काढून देऊ लागले. अस करता करता बराच वेळ गेला. काही वेळाने आरुषचा मनालीला फोन आला. तस तिने त्यालाही तिथे बोलावून घेतले. आता मनालीने आरुषला बोलावलं म्हणून नयनने देखील सुजयला फोन करून बोलावून घेतले. हे दोघ आल्याचे रावीला तेव्हा समजले जेव्हा ते दोघ ह्या दोघींजवळ येऊन पोहोचले होते.

आता त्या दोघीं ह्या दोघांसोबत बोलण्यात जरा व्यस्त झाल्या. रावीने ते पाहिलं आणि तिला आज एकटी असल्याचे वाटू लागले. मग तिला आठवलं की आता तिच्या आयुष्यातही कोणीतरी येऊ पाहत आहे आणि तो तर घरी पोहोचला होता. पण ते दोघे अजूनही बोलले काय भेटलेही नव्हते. तसा रावीने तिचा फोन काढला आणि सरळ राजला फोन लावला. शशांक आज त्याच्या घरी मुक्काम थांबणार असल्याचे तिला माहिती होत.

शशांकच्या बाकी कुटुंबासोबत गप्पा चालू होत्या. राजच बाकी कुटुंब देखील आता घरी आल होत. बऱ्याच दिवसांनी आपल्या शेजारी राहणारा मुलगा आज भेटला तर त्यांच्याही गप्पांना उधाण आल होत. त्यामुळे राजच त्याच्या मोबाईलकडे काही लक्ष नव्हत.

आता राज काही फोन उचलत नाही म्हटल्यावर रावीने राधिकाला फोन लावला. राधिकाचा फोन तिच्या जवळच होता. त्यामुळे तिने तो उचलला.

“कुठे कडमडला तुझा लेक?” राधिका हेलो बोलण्याआधीच रावी चिडून बोलली. कारण तिने तीन ते चार वेळा फोन केला होता. तरीही त्याने काही तो उचलला नव्हता. “आता दी चा फोन असता तर पहिल्या रिंग मध्ये उचलला असता.”

परीच नाव ऐकून राधिकाला जरा वाईटच वाटल. आपल्या मुलाच मन तिला चांगलाच महिती होत. “कारण तुमच्यात आणि तिच्यात फरक आहे.”

राधिकाचा बदलेला सूर रावीच्या लक्षात आला. “अम्म सॉरी. ते दादा फोन उचलत नव्हता ना.”

“आता काय बाबा त्याचा तो मित्र आला आहे ना,” राधिका आता हसून बोलली. “मग चालू आहेत गप्पा.”

“त्यासाठीच मला त्याच्याशी बोलायचं आहे.” रावी “दे तर त्याला फोन. अर्जंट आहे.”

तश्या राधीकाच्या भुवया उंचावल्या गेल्या. “आज चक्क दी सोडून दादाला फोन.”

“आता त्या दादानेच मला कामाला लावलं तर त्यालाच विचारेल ना मी.” रावी

“अच्छा तस होय,” राधिकाला समजून गेल की तिला शशांक विषयी बोलायचं होत ते. “थांब देते हं.” एवढं बोलून राधिकाने तिचा फोन राजला दिला.

राज देखील अचानक समोर मोबाईल बघून दचकलाच. नंतर राधिकाने रावीचा फोन असल्याचे सांगून त्याला तो घ्यायला लावला.

“हा बोल गं.” राज

“दादा ते कामात आहेस का?” रावीला कुठून सुरवात करावी तेच समजत नव्हत.

“ते आताच मॉम बोलली असेल ना की आमच्या गप्पा चालू आहेत ते.” राज जरा गोंधळला.

“अरे हो की.” रावी उगाच हसून दाखवत बोलली. आता तिला समजत नव्हत की शशांकचा विषय कसा काढावा?

“बोल काय बोलत होतीस?” रावी काहीच बोलत नसलेली बघून राजने परत विचारलं.

तस राधिकाने राजकडे पाहिलं आणि शशांककडे इशारा केला. मग काय? राजला तर फक्त निमित्त हवं होत जे आता त्याला भेटलं होत. त्याच खट्याळ आणि असुरी डोक धावायला लागल.

“अम्म ते कोण कोण आहे तिथे?” रावीने जरा चाचरत विचारलं.

“सगळेच आहेत.” राज

“जरा बाजूला येना.” रावी तिचे नख खात बोलली.

“का गं रावी?” राज उगाच भाव खात बोलला. “काही पर्सनल बोलायचं होत का?”

रावीच नाव ऐकून शशांकचे कान टवकारले गेले.

“जरा दम धर ना,” रावी जरा चिडून बोलली. “बाजूला ये म्हणजे बोलायचं असेल ना मला काहीतरी महत्वाच.”

“ठीक आहे,” राज जरा वेळ थांबला आणि बसल्या जागीच बोलला. “अम्म बोल आता. इथे कोणीही नाहीये.” राजने बाकीच्याकडे बघत शांत राहायचा इशारा केला.

“सुधार रे जरा.” संकेत हसतच बोलला. तसे बाकीचे घरातले देखील हळूच हसले होते,

‘हे सगळेच डोक्यावर पडले होते का?’ शशांक ह्या सगळ्यांचा तो गोंधळ बघून मनातच बोलला.

“तुझ्या त्या मित्राला काही समजत की नाही रे?” राजला एकट असलेल समजून रावी आता बोलत सुटली. “एखादी मुलगी आवडली तर पहिले मुलीला भेटायचं असत ना? ठीक आहे माझे डॅड त्यांचे टीचर होते. पण त्यांची भेट तर माझ्यामुळे झाली ना, समजा त्यांनी मला पाहिलाच नसत तर त्यांची भेट झाली असती का?”

“हम्म बरोबर आहे तुझ.” राज त्याच हसू दाबत बोलला.

“मग,” रावी परत चिडून बोलली. “बरं डॅडला भेटले. पण त्यांना भेटून झाल्यानंतर मी पण तिथेच होते ना? माझ्याकडे, ह्या रावी द ग्रेट ...” रावी स्वतःला कोणती पदवी देऊ हा विचार करू लागली. “हा, रावी द ग्रेट रायडरकडे पण पाहिलं नाही आणि ते बोलतात की मी त्यांना आवडले? अस थोडीच असत यार.”

“हम्म.” राजला रावीची ती पदवी ऐकून खूपच हसू येत होत.

“आता तूच मला सांग,” रावी “त्यांना मी खरचं आवडली आहे का?”

“म्हणून तर तो त्याची ड्युटी सोडून इकडे आला ना.” राज

“आता ते तुझे मित्र आहेत तर तू तुझ्या मनापासून सांग,” रावी जरा भावूक झाली. “माझ्यासाठी चांगला मुलगा आहे ना?”

“तू प्रसादला पाहिलं आहेस ना?” राज शशांककडे बघत बोलला.

“हो.” रावी

“बराचसा त्याच्यासारखा आहे,” राज “बाकी त्याच डोक तर भयानक चालत. ते तुला परीच्या गावी झालेली कंडीशन एकून समजल असेलच.”

“हम्म.” रावी “मग मलाही त्यांना भेटायचं आहे. पण एक ते आहेत की डॅडला भेटून लगेचच निघून गेले.” रावी लहान मुलीसारखी बोलली.

“मग आता काय म्हणण आहे तुझ.” राज

“बोलली ना,” रावी “मला भेटायचं आहे त्यांना.”

“ठीक आहे त्याच्याशीच बोल.” राज

“आता सगळ्यांसमोर नको बोलूस,” रावी “त्यांना तुझ्याकडे बोलाव.”

“का?” राज “आज ना उद्या तर लग्न करणारच आहात ना?”

“हो रे,” रावी “पण आज नको कोणाला काही सांगू.”

“बरं मग कुठे पाठवू तुझ्या त्यांना?” राज मस्करी करत बोलला.

“मार्केट मध्ये आहे मी.” रावी

“बरं,” राज “त्या कॅफेमध्ये यायला सांगतो.”

रावीने ओके बोलून फोन ठेवला आणि तिच्या मनाला जो आनंद झाला त्याला काय नाव द्यायचं हा ती विचार करत बसली.

तर तिकडे सर्वांनी शशांकची मजा घ्यायला सुरवात केली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →