मागील भागात.
आता परी आणि रावी परत शशांक बसलेल्या सोफ्याला लागून असणाऱ्या सोफ्यावर येऊन बसल्या. त्यामुळे आता ते एका लाईनमध्ये आले होते. पण आता ती तिची शोर्ट पँन्ट बदलून जरा चांगले कपडे घालून आली होती. पण शशांकला तर तिच्या त्या कपड्यांशी काही देण घेण नव्हत. तो तर आपला तिच्या चेहऱ्यावरच फिदा झालेला होता.
आता ही तो रावीचा चेहरा बघायचा प्रयत्न करत होता. पण बाजूला परी असल्याने तिचा चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता. तर रावी पण इकडे तिकडे हलण्याचा नादात तिची तिरकी नजर शशांकवर टाकायचा प्रयन्त करत होती. पण मध्ये तर परी होती जी अवनीच्या रुपात रुपांतरीत झाली होती. ती कसली दोघांना एकमेकांना बघू देत होती.
नेहमी किचनमध्ये मदत करायला येणारी परी आज का आली नाही ते बघायला सोनाली बाहेर आली. तर ह्या तिघांना अस एका लाईनीत बसलेलं बघून परीकडे डोळे मिचकावत ती परत किचनमध्ये निघून गेली.
काही वेळातच रुद्र फ्रेश होऊन बाहेर आला. रुद्रला आलेलं बघून रावी ताडकन उभी राहिली.
आता पूढे.
“डॅड तू कधी आला?” एवढं बोलून ती नेहमीसारखं लहान मुलीसारखं त्याच्याकडे जायला निघाली. नंतर लागलीच तिला तिथे शशांक असल्याचे आठवले आणि ती अगदी संस्कारी मुलीसारखी तिच्या वडिलांजवळ गेली आणि रुद्रला मिठी मारली.
‘अरे,’ परी मनातच रावीच आताच वागण बघून बोलली. ‘पोरगी इतक्या फास्ट सुधारली.’ आणि ती मनातच हसू लागली.
“काय गं?” रुद्र रावीला त्याच्या कवेत घेत बोलला. “आज नेहमीसारखी नाही आलीस? मी आलो ते आवडलं नाही का?”
“अस काय करतो रे डॅड?” रावी लगेच गाल फुगवून बोलली. “तुझीच तर वाट बघत असते ना मी नेहमी.”
आताच हे रावीच गोड निरागस रूप शशांकला भावून गेल. आता तो असल्यानेच ती अशी गेली हे त्याला समजूनच गेल होत. मग आपण उगाच लवकर आलो याच त्याला जरा वाईट वाटल.
तोपर्यंत दोघे बाप लेक हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसले. सोनाली रुद्र साठी चहा घेऊन आली आणि ती पण त्यांच्या सोबत बसली.
रुद्रने शशांककडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होत. जणू काही शशांक त्याला ओळखत होता.
“आपण कधी भेटलो आहोत का?” रुद्र त्याचा चेहरा वाचत बोलला.
“गुन्हेगराचा तपास करताना डोक ही गुन्हेगारासारखं वापरायच.” शशांक
“अरे तू.” आता रुद्रने त्याला ओळखल होत. “देहरादून २०** बॅचचा टोपर.”
तसा शशांक उठला आणि रुद्रच्या पाया पडला. “आज जे काही काम करतोय त्यात तुमचा वाटा खूप आहे.”
“तुझी सगळी फाईल मी चाळली आहे.” रुद्र शशांकच्या खांद्यावर हात ठेवत बोलला.
“तरी मला विसरलात?” शशांक लटक्या रागात बोलला.
“वय झाल रे आता.” रुद्र परत सोफ्यावर बसत बोलला.
त्याला बसलेल बघून शशांकने पण बसून घेतलं. तेव्हापासून त्यांच्या ड्युटीच्या ज्या गप्पा सुरु झाल्या. त्या काही थांबायचं नावच घेत नव्हत्या. त्यांच्या बाजूला बसलेल्या त्या तिघी आता ह्या दोघांचे चेहरे बघत बसल्या. चांगल्या दीड तास गप्पा झाल्या. मग मात्र रावीच्या संयम सुटला.
“डॅड.” रावी जरा चिडून बोलली.
मग रुद्रचा रावीकडे लक्ष गेल. “एक पाच मिनिट बेटा.” आणि रुद्र परत शशांकच्या कामाची चौकशी करू लागला.
जस जसा वेळ होत चालला होता तस तस रावीच्या चेहऱ्यावर आता राग चढायला लागला. घरी आल्यावर पहिले तिच्याशी बोलणारे तिचे वडील आज तिच्याकडे बघत पण नव्हते.
आता बापाची काळजी आहे मुलाची चौकशी तर होणारच ना. मग काय? रावीमधली पझेसिव्ह मुलगी आता बाहेर येऊ लागली.
पुढच्या काही क्षणातच रावी खाडकन उठली आणि तिने समोरच्या टेबलावरच फ्लॉवरपॉट जोरात ढकलून दिल. त्याच्या आवजाने सगळ्यांनी रावीकडे पाहिलं. रुद्रने तिला पाहिलं तर तिचे डोळे भरून आले होते. तिने रुद्रवर नजर टाकली आणि तिच्या खोलीकडे पाय आपटत झरझर निघून गेली.
रावीच्या डोळ्यात पाणी बघून रुद्रच्या काळजात चर्र झाल. तो पण लगेच उठला आणि रावीच्या मागे मागे तिच्या खोलीकडे गेला.
इकडे परी आणि सोनालीने एक दीर्घ श्वास घेतला.
“अम्म सॉरी.” शशांक स्वतःच बोलू लागला. “माझी यायची वेळ चुकली वाटत.”
“तस काही नाही.” सोनाली मंद स्मित करत बोलली. “होईल सगळ नीट. नका काळजी करू.”
“मी येऊ नंतर?” शशांक
“थांबा ना जेवण करूनच जा.” सोनाली
“ती जेऊ देईल?” रावीचा अवतार बघून शशांक जरा चाचरत बोलला.
तशी सोनाली हसली. “मी आहे की.”
“काही नाही होणार.” परी पण मधेच बोलली.
तिकडे रुद्रने रावीच्या खोलीचा दार वाजवल.
“जा त्याच्याशीच बोल.” रावी हुंदके देत बोलली. "आता मला नाही बोलायचं.'
“बेटा अस काय करतेस?” रुद्र हळव्या आवाजात बोलला. “शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. चौकशी तर करावी लागेल ना.”
“हो,” रावी “पण पहिले माझ्याशी बोलायचं ना.”
“आधी दार तर उघड.” रुद्र अस्वस्थ होत बोलला.
“मी नाही दार लॉक करत कधी.” रावी "माहीती आहे तरी."
रुद्रने त्याच डोक खाजवलं. टेन्शन मूळे त्याला ये समजलचं नाही. मग तो तिच्या खोलीत आला आणि बेडवर पसरलेल्या रावीच्या बाजूला बसून तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागला. तशी ती तिच्या वडिलांच्या मांडीवर सरकली.
“बाकी सगळ बाजूला तू नाही माझ्याकडे दुर्लक्ष करायचं.” रावी
तिचं प्रेम बघून रुद्रला हसूच आल. “चल आता बाहेर. नाहीतर जावईबापूंना काय वाटेल?”
रुद्रच्या तोंडातून जावई बापू ऐकून रावी रुद्रला चमकून बघू लागली.
“आवडला ना?” रुद्र हलकेच हसत बोलला.
तशी रावी खुदकन हसत त्याच्या कुशीत लपली. रुद्रला त्याच उत्तर मिळाल.
“आता तरी बाहेर येते ना?” रुद्र “नाहीतर त्याला काय वाटेल? खूपच बिघडलेली मुलगी आहे आणि त्याने नकार दिला तर.”
तशी रावी रुद्रला आठ्या पाडून बघू लागली. “तस तर तस, आधी तू मग बाकीचे.” रावी अजूनच लाडात येत अजूनच त्याच्या कुशीत शिरली.
तस रुद्रला अजूनच हसू आल. “चल बाहेर.”
मग दोघे बाप लेक हॉलममध्ये आले. डोळे भरलेला चेहरा बघून अपराधी वाटून घेतलेला शशांक आता हसणाऱ्या रावीला बघून लगेच खुलला होता.
“बरं तुमचे आई वडील कधी येणार आहेत?” सोनाली “म्हणजे तशी बोलणी करायला?”
आता शशांकने रावीकडे पाहिलं जी तिच्या आईला रोखून बघत होती. “ते आधी तिच्या दी चं लग्न करायचं म्हणते ना ती.”
तस रावीने चमकून शशांककडे पाहिलं. तिने न बोलताच तो तिच्या मनातल बोलून गेला होता आणि ते तिला भावून गेल होत.
“माझ पण ठरल्यात जमा आहे.” परी रावीकडे बघत बोलली.
“आधी आमच्या सरांना तर मनव, मग बघू.” रावी पण परीला रोखून बघत बोलली.
“ते तर आपल्या फंक्शनच्या दिवशी बघ.” परी पण तितक्याच ठसक्यात बोलली.
“झाल की मग,” सोनाली उत्साहात येत बोलली. “जस फंक्शन झाल तस आपणा बोलावून घेऊ.”
“आधी ती तयार आहे का बघा,” शशांक “उगाच मला तिला फोर्स करायचं नाहीये. तिच्या मनाची तयारी असेल तरच आपण पुढच बोलूयात.”
‘एकच मन आहे यार.’ शशांकच्या वाक्याने रावी अजूनच प्रभावित झाली. ‘किती वेळा जिंकाल?’’
रावीला शांत बसलेल बघून परीच्या आतली अवनी जागी झाली. “ठीक आहे, रावी काही मला तयार दिसत नाही. मग राहूद्या.” परीने शशांककडे पाहिलं. “तुषार यांची बहिण पण लग्नाची आहे. तिथे शब्द टाकू का? ते तुला बघून नकार देणारच नाहीत.”
परीच्या वाक्याने शशांक परीकडे विचित्र नजरेने बघू लागला. तर सोनाली आणि रावी गोंधळून गेल्या होत्या. एकट्या रुद्रला परीने लावलेलं डोक समजून गेल होत.
“मी नकार दिला का?” रावी लागलीच चिडून बोलली. “चालली लगेच त्यांना घेऊन चालली. काय काट कोट करायचं आहे का तूमचं?”
आता सगळेच रावीकडे विचित्र नजरेने बघू लागले.
“काय करायचं आहे?” परीने गोंधळून तिला परत विचारलं.
“ते करतात ना,” रावी तिच्या पद्धतीने समजावून सांगू लागली. “ते नाही का? त्या घराची मुलगी लग्न करून आणतात आणि ह्या घराची मुलगी लग्न करून त्या घरात पाठवतात.”
एक क्षण सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं.
“विचार करा,” सोनाली शशांककडे बघून बोलली. “अजूनही हे मंद बदक पाहिजे का तुम्हाला?”
आणि जोरजोरात सगळे हसू लागले. त्यात शशांकला अजूनच हसताना बघून रावी त्याच्याकडे रागात बघू लागली.
“तुम्ही पण त्यांच्या बाजूने झालात ना तर मी तुमच्याशी लग्नच करणार नाही.” रावीने तिचं बोट शशांकला दाखवत सरळ धमकी दिली.
अजून लग्नही झाल नव्हत तरी शशांक त्याच्या होणाऱ्या बायकोची आज्ञा मानून लगेच गप्प बसला. पण मनात मात्र खूपच हसत होता.
“अगं वेडाबाई,” रुद्रने तिला परत जवळ घेतल. “त्याला काटकोट नाही तर साट-लोट म्हणतात.”
“हा मग त्याला काय झाल?” रावी परत तिच्याच तोऱ्यात बोलली. “थोडेसे शब्द इकडे तिकडे होतात. तर काय इतक हसायचं?”
“थोडेसे?” परी तिचे डोळे फिरवत बोलली.
मग बाकी जण जरा शांत झाले. जेवण तयार असल्याने ते सगळेच जेवायला बसले.
तिकडे तुषार परत त्याच्या जिमवर पोहोचला. त्याच्या जिमच्या केबिनमध्ये असलेल्या टेबलावर त्याला एक गुलाबच्या फुलांचा गुच्छ दिसला. तुषारने त्याला जवळून पाहिलं तर तो परीने पाठवला असल्याच त्याला लगेच समजल. तो गुलाबाच्या फुलांचा गुच्छ बघून तुषारच्या चेहऱ्यावर एक सुंदर अस हसू उमललं.
“अरे वा,” केदार तिथे येत बोलला. “ब्लशिंग हं.”
केदारच्या आवाजाने तुषार जरा दचकलाच. नंतर लगेचच सावरत बोलू लागला. “तू कशाला आला परत? तुझी वेळ संपली आहे ना?”
“ते वहिनींनी दिलेलं काम पूर्ण करायचं आहे ना,” अमित पण तुषार जवळ येत बोलला. “हे धर. त्यांनीच दिल आहे.”
त्या दोघांना तिथे बघून तुषारच्या कपाळावर आठ्या आल्या. “पहिले तर तुम्ही माझे मित्र आहात आणि दुसर तिला वहिनी बोलण बंद करा.”
“आता वहिनीला वहिनी नाही बोलणार तर काय बोलणार?” केदार विचार करायचं नाटक करत बोलला.
“तुम्ही जाता की तुम्हाला हाकलू?” तुषार चिडून बोलला.
“तू हात तर लाव,” केदार तोऱ्यात बोलला. “लगेच घरी निरोप पोहोचवू.”
तशी तुषारने नकारार्थी मान हलवली आणि तो गुलाबच्या फुलांचा गुच्छ परत होता तिथेच ठेवला आणि जाऊ लागला.
“ते ग्रीटिंग कार्ड तुझ्या वहिनीलाच परत दे.” तुषार भावनेच्या भरात बोलून गेला.
“ॲटलिस्ट आमची वहिनी हे नाव तर कबुल केल.” अमित केदारला टाळी देत बोलला.
“गो टू हेल.” तुषार चिडून बोलला.
“मी तर अस पण ऐकल आहे की वहिनी डान्स पण खूप छान करते.” केदार तुषारला अजूनच छेडू लागला.
“मी तर जाणार आहे बाबा,” अमित “वहिनीचा डान्स बघायला.”
त्यांच बोलण ऐकून जाणारा तुषार परत दोघांजवळ आला. “तुम्ही आणि ती काय करायचं आहे ते करा.” तुषारने दोघांसमोर हात जोडले. “पण मला त्रास दिलात तर बघा.”
“तुला काय प्रोब्लेम आहे?” केदार “आम्ही आमच बोलत होतो. तू कशाला आलास परत?”
तस तुषारने ह्या दोघांना वैतागून पाहिलं आणि परत जिमच्या आत जाउ लागला. ‘तिला पण हेच दोघे नमुने बरं भेटले.’ तुषार मनातच भांडत त्याच्या जिममधल्या आलेल्या लोकांना ट्रेनिंग द्यायची तयारी करू लागला. मग त्याला काहीतरी आठवल.
‘वहिनीचा डान्स बघायला जाणार आहे?’ तुषारचे काम करणारे हात थांबले. ‘ती डान्स करणार आहे? कुठे करणार आहे? आणि मला बोलली पण नाही. नाही तेव्हा तिचं एवढूस तोंड सतत चालू असत.’ तुषार बराच वेळ परीच्या डान्सचा विचार करत बसला. मग त्याला आठवलं की दोन दिवसात त्यांच्या कॉलेजच वार्षिक स्नेहसंमेलन होणार होत.
परी डान्स करणार हे ऐकूनच तुषारच्या चेहऱ्यावर चमक आली. तिचा तो डान्स बघणे हे तर त्याच कधीपासूनच स्वप्न होत. त्याला आनंद झालाच होता की त्याच्या मनात परीचे शब्द घुमायला लागले. तसा तो लगेच स्वतःला थांबवू लागला. ‘तुषार असल्या मोहाला बळी पडू नकोस. तेच तर तिला हवं आहे. आज ना उद्या तिला आपल्या डोक्यावर मिर्या वाटायला बसवायचं आहे. पण त्याला अजून थोडा वेळ आहे.’
तुषार आतमध्ये त्याच्याच विचारात असताना बाहेर केदारने परीला फोन करून आता जे काही झाल ते सांगून दिल होत. ते ऐकून परी मात्र खळखळून हसली होती. तिला हसताना बघून रावी आणि सोनाली तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होती.
त्यांच जस जेवण झाल तस शशांक तर निघून गेला होता. तर रुद्रला परत त्याच्या कामावरून फोन आल्याने तो परत त्याच्या ड्युटीला निघून गेला होता. तर बाकी तिघी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या. त्यातच केदारचा तिला फोन आला होता.
“काय गं?” सोनाली “अशी काय हसत आहेस?”
मग परीला त्या दोघींची आठवण आली. “काही नाही. चला मी जाते.”
एवढं बोलून परी जायला उठली.
“आता का?” उठलेल्या परीचा रावीने हात पकडून घेतला. “आता तुझ्यावर वेळ आली तर लगेच जायचं आहे हा?”
“मला खरच उशीर होत आहे.” परी
“आता घरीच जाशील ना?” सोनाली “घरची काम तर त्या मावशींनी करून ठेवली असतील आणि आता कॉलेज पण नाहीये. मग काय काम आहे?”
“आहे जरा काम,” परी तोऱ्यात बोलली. “ते आता नाही फंक्शनला समजेल.” परी रावीचे समोरचे केस विस्कटत बोलली.
“सरप्राईज का?” रावी
तशी परीने तिची मान डोलावली आणि ती तिथून बाहेर पडली. काही वेळातच ती घरी जाऊन पोहोचली. घरी पोहोचाल्यावर ती पहिले फ्रेश झाली आणि जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर ती तिच्या खोलीत गेली. तिने तिची बॅग उघडली आणि डान्सच्या प्रॅक्टिससाठी सूट होतील असे घेतलेले कपडे तिने बाहेर काढले. तिने ते नीट पाहिले आणि अंगावरचे कपडे काढून ते कपडे घातले. आरश्यासमोर उभी राहिली आणि स्वतःला त्यात बघू लागली.
आजवर ती कधी अशी आरश्यात स्वतःला निरखून बघत नव्हती. पण आता प्रेमात आहे ना तर आपण कसे दिसतो हे तर बघितलच पाहिजे. तो ड्रेस तिच्यावर खूप छान उठून दिसत होता. तिची इच्छा तर होती की ह्या ड्रेसवर सेल्फी काढून ती तुषारला पाठवावी. पण नंतर तिने तो विचार रद्द केला.
आता गाण कुठल निवडायच? हा प्रश्न तिला पडला. तो ही लगेच सुटला गेला आणि तिने ते गाण मोबाईलवर शोधून लावलं. त्यावर तिने तिच्या त्या स्टेप्स करायला सुरात केली. पण मोबाईलचा आवाज जर बारीक असल्याने परीला डान्स करताना तो भाव येत नव्हता. तिने जरा विचार केला आणि सरळ सुजयची खोली गाठली.
सुजयच्या खोलीत एक सेपरेट म्युझिक सिस्टीम होती. तिने ती उचलली आणि स्वतःच्या खोलीत आणली. ती आणताना तिने सुजयला काही विचारलं नव्हत. नाहीतर तो त्याच्या ॲकेडेमीवरून थेट घरी पोहोचला असता आणि येताना बाकीची वानरसेना पण घेऊन आला असता. कारण तिने म्युझिक सिस्टीम आणली म्हणजे ती नक्कीच डान्स करणार हे त्याला समजून जाणार होत.
परीने तिच्या खोलीच दार लावून घेतलं आणि ती म्युझिक सिस्टीम तिच्या मोबाईलला जोडली. मग तिने तिचं ते गाण लावलं. त्या सिस्टीमवर ते गाण इतक भारी वाजायला लागलं की परीचे पाय आपोआप थिरकायला लागले. तीन तीन गाणे निवडले आणि त्याचे रिमिक्स करून त्यावर प्रक्टिस करायला सुरवात केली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
