Login

अवनी एक प्रवास भाग १०९

तर शशांक जरा गोंधळला होता. ह्या तिघींच काय चालू होत तेच त्याला समजत नव्हत. रावीने तिथला आरातारा पहिला आणि रागातच उठली आणि पाय आपटत तिच्या खोलीकडे निघून गेली. तिला तिच्या खोलीत पोहोचलेल दोघींनी पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्या दोघी खळखळून हसू लागल्या. तर शशांक अजूनच गोंधळून गेला.
मागील भागात.

ते रावीच्या घरी येऊन पोहोचले. परीने दारची बेल वाजवताच सोनालीने दार उघडल. समोर परीला बघतच सोनालीने एक सुस्कारा सोडला.

“शेवटी बोलावलंच ना तुला.” सोनाली कमरेवर हात ठेवत बोलली.

तशी परी हसू लागली. मग सोनालीच लक्ष परीच्या मागे उभ्या असलेल्या त्या मुलाकडे गेल.

“शशांक.” परीने त्याची ओळख करून दिली.

तस सोनालीने मंद स्मित करत त्याला आदराने घरात बोलावले. तसे ते दोघे घरात येऊन बसले.

आतमध्ये रावीच्या डोक्यात तर वेगळच चालू होत. आलेल्या मुलाला कस घाबरवून पळवून लावायचं? याचा ती विचार करत होती.

आता पूढे.

‘पण डॅडला तर तो आवडला आहे ना,’ रावी मनातच बडबड करू लागली. ‘आणि मी त्याला अस घाबरवून पळवून लावलेलं डॅडला समजल तर?’

ह्या विचारातच तिचं मन काहीच काम करत नव्हत. अस नव्हत की तिला लग्न करायचं नव्हत. पण राकेशने जे काही केल होत त्यावरून तिचं प्रेमावरून मन उडाल होत आणि तिला आता थेट लग्न करायला उभ केल जाणार होत.

ती तिच्याच विचारात असताना तिच्या खोलीच दार उघडल गेल. रावीने वळून पाहिलं तर तिला परी दिसली. तस तिच्या जीवात जीव आला.

“बरं झाल दी तू आलीस,” रावी पटकन परीजवळ आली. “बघ ना यार. डॅडला पण तो आवडला आहे.”

“तुला लग्न करायचं नाहीये का?” परी रावीचा चेहरा वाचत बोलली.

“तस नाही गं दी,” रावी परीचे हात आपल्या हातात घेत बोलली. “आधी तुझ.”

“आता माझ तर तुला सगळच माहिती आहे ना.” परी तोऱ्यात बोलली.

“आणि तुझा दगड तुझ्यावर रुसून बसला आहे तो?” रावी डोळे बारीक करून विचारू लागली.

“अय,” परी जरा चिडून बोलली “तू नाही हं त्यांना दगड बोलायचं. तो फक्त माझा अधिकार आहे. नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही.”

आता रावीच तोंड आश्चर्याने वासल गेल. “काय बोलली दी तू?” तिला खरचं वाटत नव्हत की परीने तुषारची बाजू घेतली होती. “माय गॉड, सिरीअसली?”

रावी आता फक्त आनंदाने नाचायची बाकी होती. तुषार परीच्या मागे वेडा होता हे रावीला माहिती होत आणि आता परी सुद्धा त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती ते ही माहिती होत. पण तिची ही दी अशी प्रेमात पडून तिच्या प्रेमाची बाजू घेईल अस तिने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता.

रावीच्या बोलण्याने परीने तिचा चेहरा लाजून हाताने झाकून घेतला. “रावी यार बस ना आता.”

“व्हॉट?” रावी आता वेडी व्हायची बाकी होती. “दी, तू आमची भाषा बोलायला लागली?”

“मग?” परीने तिच्या चेहऱ्यावरचा हात काढला आणि स्वताच्या कमरेवर ठेवला. “विसरलीस का ही अवनी आहे ते.”

“लव्ह यु अवनी दी.” रावीने परीला घट्ट मिठी मारली.

“बस झाल,” परी “आता बाहेर चल. नाही तुझ्या डोळ्यांचे पारणे फिटले ना बघ.” परी रावीकडे तिचे डोळे मिचकावत बोलली.

“आय हाय,” रावीने खूप मोठा दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःच्या छातीवर हात ठेवला. “दी यार. काश मी मुलगा असती तर आज सरांना खूप भारी पडल असत.”

“शट अप,” परी रावीवर डोळे वटारत बोलली. “चल आता.”

तेव्हा कुठे त्या दोघी बाहेर आल्या होत्या. बाहेर सोनालीने शशांकला चहा दिला होता. दुपारची वेळ झाली होती तर त्याला जेवणासाठी देखील आग्रह केला जात होता.

परी आणि रावी हॉलमध्ये आल्या. सोबत रावी परीची खूपच छेड काढत होती. तुषारवरून तिला खूपच चिडवत होती. शशांकची नजर तिच्यावर गेली. त्याने आधी तर फक्त फोटोमध्ये तिला पाहिलं होत. पण आता प्रत्यक्षात पाहून तो तिला बघतच राहीला. त्याला इतक पण भान नव्हत की त्याच्यासमोर तिची आई उभी होती.

शशांकला आपल्या मुलीकडे अस टक लावून बघताना पाहून सोनालीला जरा ऑकवर्ड वाटलं. त्यात ती घरातल्या शोर्ट पँन्टवर होती. त्यामुळे सोनालीला वाटल की तो तिच्या कपड्यांकडे बघत होता.

पण तो तर तिच्या खोडकर चेहऱ्याकडे बघत होता. “सरांच्या चेहऱ्यावरचं चेहरा गेला आहे ना हिचा.” शशांक भावनेच्या भरात बोलून गेला. “अगदी सरांसारखीच स्माईल आणि गालावरची ती खळी तर एकदम सेम.”

त्याच्या ह्या वाक्यावर सोनालीच्या जीवात जीव आला. नाहीतर हा पण फक्त तिच्या सुंदर शरीराला पाहून लग्न करतो की काय? अस तिला काही क्षण वाटून गेल होत.

“तू पाहिलं आहेस का हिच्या वडिलांना?” सोनालीने मुद्दाम जरा मोठ्याने विचारलं.

सोनालीच्या आवाजाने शशांक भानावर आला आणि त्याला समोर रावीची आई उभी असलेली जाणवली. नंतर त्याने समोर पाहिलं तर रावी किचनकडे गेली होती.

‘यार माती खाल्ली,” शशांक मनातच बोलू लागला. ‘तिच्या आईसमोर तू तिला बघत राहीला. वरून सुंदर दिसते पण बोलून गेलास.’

“बोल ना,” परी शशांकच्या बाजूला बसत बोलली. “तू पाहिलं आहे का मामांना?”

“हो,” शशांक स्वतःला सावरत बोलला. “त्यांच्या एकाच लेक्चरमधून मला इतक काही शिकायला मिळाल ना की आता मी जे काही करत आहे त्यात त्यांचा खूप मोठा हात आहे.”

आपल्या नवऱ्याबद्दल ऐकून सोनालीचा उर अभिमानाने भरून आला. तर परी पण त्याला बघत राहिली. ती त्याचा चेहरा वाचत होती. त्यावरून तो नक्कीच मामांना भेटला असल्याचे परीला समजून गेल होत. वरून तो राजचा देखील खास मित्र होता आणि राज रावीला अस चुकीच्या मुलाच्या हाती तर आज्जीबतच जाऊ देणार नव्हता.

हा सगळा विचार करून परीने रावीकडे पाहिलं आणि तिचे डोळे रावीला बघतच विस्फारले गेले. कारण रावी तोच तोंड वासून शशांकला बघत होती.

‘ह्याने रावीसमोर काही माती नाही खाल्ली ना?’ रावीचा तो चेहरा बघून परीच्या मनात हा पहिला प्रश्न उभा राहीला. कारण तिचा असा चेहरा असाच व्हायचा जेव्हा कधी कोणी तिच्या वाटेला जायचा आणि असा अचानक समोर यायचा.

तर रावी परीसोबत हॉलमध्ये आली आणि ती किचनमध्ये गेली. परी तर शशांकसोबत जाऊन बसली होती. तर रावी किचनमधून पाणी पिऊन बाहेर आली. आता तिची नजर शशांकवर गेली आणि ती त्याला बघतच राहिली.

एक क्षण तर तिला अस वाटल की तिचे वडीलच तिथे बसलेले आहेत. तशीच उंची, चेहऱ्यावर तसाच आत्मविश्वास, बोलण्यात शांतपणा आणि तेवढाच करारीपणा.

आजवर कितीतरी मुल तिच्या आजूबाजूला भरकटली असतील, काही मुलांनी तर तिला प्रपोज देखील केल होत. एक दोन मुल अशी होती की त्यांच्या कॉलेजमधल्या बऱ्याचश्या मुली त्यांच्याशी बोलायला तरसायच्या. अश्या मुलांकडे देखील तिने सरळ दुर्लक्ष केल होत. पण शशांकसारख तेज तिला कोणत्याही मुलाकडे दिसलं नव्हत. तिला आता तिच्या डॅडची, दीची पसंत आवडून गेली होती.

इतर मुलांसमोर बेधडक बोलणारी रावीची जीभ आज तिला साथ देत नव्हती. त्याला फक्त बघण्याने तिचं मन आतून हललं गेल होत. त्याला कस पळवायच? हा विचार करणारी रावी आता तिथे जाऊन कशी बसू? हा विचार करू लागली. ती जागीच स्थिजली होती.

“अगं ये इथे बस,” परीनेच शेवटी तिला आवाज दिला. तिला रावीचं आताच्या मनाची कल्पना आली होती. म्हणून तिने मंद स्मित करत तिला आवाज दिला होता. “तिथे काय करत आहेस? हा मामांचा स्टुडेंट आहे.”

आता रावी पटकन परीच्या बाजूला येऊन बसली. रावीचा तो उजळलेला चेहरा बघून सोनालीला देखील जरा बरं वाटल.

आता सोनाली, परी आणि शशांकच्या गप्पा सुरु झाल्या. पहिले तर रावी उत्साहात बसली होती. तिला वाटल होत की शशांकसोबत काहीतरी बोलण होईल. पण सोनाली आणि परी त्याचाशी गप्पा मारण्यात इतक्या व्यस्त झाल्या होत्या की त्याचं रावीकडे लक्षच नव्हत. मग रावी वैतागू लागली. ती आळीपाळीने एकदा सोनाली आणि एकदा परीकडे बघू लागली. तरी तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही बघून तिच्या कपाळवर आठ्या चढू लागल्या आणि ती हळू हळू चिडू लागली. पण समोर शशांक असल्याने तिने स्वतःवर कसातरी संयम ठेवला होता. तिला आता त्याच्यासमोर तिची प्रतिमा चांगली जी करायची होती.

आता रावी मुद्दाम मधेच बोलू बघत होती. पण तिला रिप्लाय पण तसाच मिळत होता. तिला जस एकट टाकल गेल होत. मग ती परीला चिमटे काढू लागली.

“काय गं?” परी वैतागून बोलली. “चिमटे का काढत आहेस?”

“म म.. मी नाही.” रावी दचकून बोलली. परी अशी अचानक मोठ्याने बोलेल याची तिला काहीच कल्पना नव्हती. “क.. ह.. हा... ते मुंगी, हा मुंगीच चावली असेल.”

“इथे कुठे मुंगी?” परी इकडे तिकडे बघत बोलली. “काहीही काय. जास्त आगाऊपणा करू नकोस.”

“जाऊदे तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस.” सोनाली

“तू बोल...” सोनालीने जीभ चावली. “तुम्ही बोला ओ.”

इकडे रावीचे गाल फुगले गेले. ‘अरे ते मला बघायला आले आहेत आणि मलाच बोलू देत नाहीये.’

तर शशांक जरा गोंधळला होता. ह्या तिघींच काय चालू होत? तेच त्याला समजत नव्हत. रावीने तिथला आरातारा पहिला आणि रागातच उठली आणि पाय आपटत तिच्या खोलीकडे निघून गेली. तिला तिच्या खोलीत पोहोचलेलं दोघींनी पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्या दोघी खळखळून हसू लागल्या. तर शशांक ह्या दोघींना अस हसताना बघून अजूनच गोंधळून गेला.

खर तर त्याला पण रावीसोबत बोलायचं होत. रावीला पण त्याच्याशी बोलायचं होत हे त्याला पण समजून गेल होत. आता समोर तिची आई आणि तिची मोठी बहिण असल्याने त्याला थेट अस बोलताचं येत नव्हत. त्यामुळे तो पण ह्या दोघींसोबत गप्पा मारत बसला. आता अचानक त्यांना अस हसताना बघून तर तो अजूनच गोंधळला आणि तो ह्या दोघींना विचित्र नजरेने बघू लागला.

शशांक आपल्याकडे अस बघतोय म्हटल्यावर त्या दोघी जरा शांत झाल्या.

“अम्म सॉरी,” परी अजूनही जरा हसतच होती. “ते आमच असच चालू असत.”

रावीला शशांककडे बघत राहिलेलं सोनालीने पाहिलं आणि तिने हळूच परीला चिमटा काढला. परीने सोनालीकडे पाहिलं तर सोनालीचा इशारा परीला समजून गेला. आताची ही अवनी असल्याने तिनेही सोनालीला मिक्स झाली आणि त्यांनी रावीची मजा घ्यायला सुरवात केली.

तिची बोलण्यासाठी चालू असलेली धडपड दोघींना समजून आली होती. पण या आधी लग्नाचा विषय काढलेला असताना रावी जे काही नाटक करायची, बडबड करायची, त्याचा बदला म्हणून दोघी तिला अस छळत होत्या. शशांक तिला आवडला आहे हे दोघींना समजून गेल होत. म्हणून तिला थोड अजून त्रास द्यायचं काम चालू होत.

इकडे रावी तिच्या खोलीत आली आणि इकडे तिकडे फिरत फिरत बडबड करू लागली. “काय समजतात यार मला? ते आज काय आले तर लगेच त्यांना घेरून बसले. अरे ते मला बघायाला आले आहेत ना. तर मला बोलू देत. पण मॉम तर मॉम ती दी पण त्यांच्याशी बोलत बसली आणि मी? मी बसलीये त्यांची तोंड बघत. माहिती आहे मला की त्या दोघी मुद्दाम करत आहेत. आता तर दी च न्यू रूप बाहेर आल आहे. काय तर म्हणे अवनी दी, पण दी च आहे ना ती आमची. तर तिने तर माझ मन समजून घ्यायला हवं ना? पण नाही.”

“काय समजून घ्यायला हवं मी?” मागून परीचा आवाज आला.

तस रावीने मागे वळून पाहिलं आणि ती अजून रागाला आली. “तू का आली इथे? जा ना जा, त्यांच्याशीच बोलत बस. माझ काय? मी बसते इथे एकटीच.”

“पण तुला कोणी तिथे एकटी बसायला लावलं?” परी जाणून कळ काढत बोलली. “तू पण तर तिथे बसून बोलू शकतेस ना?”

“हो का?” रावी चिडून बोलली. “मला बोलू तरी दिल का त्यांच्याशी?”

“व्हॉट” परी चिडवण्याच्या सुरात आली. “त्यांना?” परीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उभ राहील. “आणि तुला त्यांच्याशी बोलायचं आहे.”

परीच्या वाक्याने रावीने तिची जीभ चावली. भावनेच्या भरात तिने थेट शशांकला ‘त्यांना’ अस संबोधल होत.

रावीच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव बघून परीने तिच्या खांद्याला धक्का मारला. “अगं बोल. तुला बोलायचं आहे का?”

आता रावीने तिचा चेहरा लाजेने झाकून घेतला.

“ठीक आहे मग नाही सांगते त्याला.” परी एवढ बोलून तिथून जायला निघाली.

“दी यार.” रावीने तिचे ओठ बाहेर काढले.

“पहिले मामांना भेटू दे.” परी “नंतर तुझ्या भेटीची पण सोय करते.”

तशी रावी लहान मुलीसारखी उड्या मारत परीजवळ आली आणि तिला घट्ट मिठी मारली. “थांक्यू दी. यु आर द बेस्ट.”

परीने रावीच्या गालावर कीस केल. “लव्ह यु डीअर.” परी हसतच बोलली आणि तिच्या खोलीतून बाहेर आली.

रावी जशी तिच्या खोलीत गेली त्याच्या पाच मिनिटात रुद्र घरी येऊन पोहोचला होता. त्याला आधी त्याच्या लेकीला भेटायचं होत. पण शशांक तर आधीच येऊन पोहोचला होता. म्हणून आता पहिले शशांकला भेटाव लागणार होत. आल्या आल्या तो फ्रेश व्हायला त्याच्या खोलीत गेला. तर परी त्याला आलेलं बघून रावीच्या खोलीत गेली होती.

रुद्र फ्रेश होऊन येईपर्यंत सोनालीने त्याच्यासाठी चहा बनवून आणला होता. तिकडे रावीला तर रुद्र आल्याचे माहिती देखील नव्हते. पण आता परी बाहेर आल्याने ती देखील आली. तेव्हा रुद्र फ्रेश व्हायला त्याच्या खोलीत होता.

आता परी आणि रावी परत शशांक बसलेल्या सोफ्याला लागून असणाऱ्या सोफ्यावर येऊन बसल्या. त्यामुळे आता ते एका लाईनमध्ये आले होते. पण आता ती तिची शोर्ट पँन्ट बदलून जरा चांगले कपडे घालून आली होती. पण शशांकला तर तिच्या त्या कपड्यांशी काही देण घेण नव्हत. तो तर आपला तिच्या चेहऱ्यावरच फिदा झालेला होता.

आता ही तो रावीचा चेहरा बघायचा प्रयत्न करत होता. पण बाजूला परी असल्याने तिचा चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता. तर रावी पण इकडे तिकडे हलण्याचा नादात तिची तिरकी नजर शशांकवर टाकायचा प्रयन्त करत होती. पण मध्ये तर परी होती जी अवनीच्या रुपात रुपांतरीत झाली होती. ती कसली दोघांना एकमेकांना बघू देत होती.

नेहमी किचनमध्ये मदत करायला येणारी परी आज का आली नाही ते बघायला सोनाली बाहेर आली. तर ह्या तिघांना अस एका लाईनीत बसलेलं बघून परीकडे डोळे मिचकावत ती परत किचनमध्ये निघून गेली.

काही वेळातच रुद्र फ्रेश होऊन बाहेर आला. रुद्रला आलेलं बघून रावी ताडकन उभी राहिली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →