Login

अवनी एक प्रवास भाग १०८

आता तर तेजश्री जाणीवेच्या पलीकडेच गेली. आजवर तिने फक्त रावीचेच गाल ओढताना परीला पाहिलं होत आणि आता त्यांच्या त्याच लाडक्या मॅमने तिचे गाल ओढले होते. ते बघून तेजश्रीची तर खूप इच्छा झाली की परीला तिथेच मिठी मारावी. पण आपला कॉलेजमध्ये आहोत हे परीच वाक्य तिला आठवलं. पण तिचा चेहरा मात्र चांगलंच उजळला होता.
मागील भागात.

“एवढी मोठी झालीस,” राधिकाने आधीचाच सूर पकडला. “आता जावई येईल तुला. तरी तू अशी बावचळली? पुढे कस व्हायचं?” तिने एक नजर शशांकवर टाकली. पण तो तर कांदा भजी खाण्यात व्यस्त होता. राधिकाला रावीच्या आईचा फोन आला होता हे देखील माहिती नव्हत.

“काय गं ताई तू पण ना?” सोनालीने सुटकेचा श्वास सोडला. कारण राधिका तिची मस्करी करत होती ते तिला समजून गेल होत.

तशी राधिका अजूनच हसायला लागली. “बर काय बोलायचं होत माझ्या लेकाशी?”

“तेच ते राज विचारत होता ना की त्याला भेटायचं आहे ह्यांना,” सोनाली “तर ह्यांनी दिली आहे परमिशन त्याला आज भेटायची.”

“अच्छा थेट सासऱ्यांजवळ वशिला?” राधिका

“आता ते काही माला माहित नाही,” सोनाली “राज बोलला होता की ह्यांच नाव ऐकल आणि त्याने ह्यांना भेटायचा हट्टच धरल म्हणे.”

“ठीक आहे,” राधिका “मी सांगते त्याला.”

“अम्म ताई.” सोनाली जरा चाचरत बोलली.

आता पूढे.

“बोल ना.” राधिका

“तुझ्या भरोश्यावर करत आहे सगळ.” सोनाली आता जरा भावूक झाली.

“मग कशाला टेन्शन घेतेस?” राधिका “छान घर आहे. तो एक मुलगा म्हणून पण छान आहे. हा, थोडेफार रावीसारखे पण गुण आहे त्याच्यात बरं का?”

“म्हणजे घरात महाभारत नाही होणार का?” सोनाली टेन्शनमध्ये येत विचारू लागली.

“नाही होणार,” राधिका “जशी रावीच्या आजोबांना मुलींची हौस होती. तशीच शशांकच्या वडिलांना घेखील मुलीची हौस आहे. तुला कधी काही त्रास झाला का तिथे?”

इकडे आपल्या सासऱ्यांच्या आठवणीने सोनालीच मन भरून आल. त्यांनी शेवटपर्यंत सोनालीला त्यांच्या सख्ख्या मुलीसारखा जीव लावला होता आणि तिनेही शेवटपर्यंत तिच्या सासऱ्यांची खूप काळजी घेतली होती.

“त्यांच्यासारखे सासरे मिळण्यासाठी नशीब लागत.” सोनालीचा आवाज जड झाला.

“मग समज तसच नशीब आपल्या रावीच पण लिहील गेलेलं आहे.” राधिका हलकीच हसत बोलली.

आता मात्र सोनाली खूपच निवांत झाली.

“मग पाठवू ना तुझ्या होणाऱ्या जावयाला घरी?” राधिका खट्याळ होत बोलली.

“पाठव की,” सोनाली पण त्याच सूरात बोलली. “बघुदेत आम्हाला आमचा जावई. कोण आहे तो? ज्याला बायकोपेक्षा सासऱ्याला भेटायची उत्सुकता जास्त आहे.”

“बघ, नीट बघून घे हो,” राधिका “आपल्या रावीला पण नक्कीच आवडेल. तुमच्या बिल्डींग मधल्या त्या परदेशातून हाकलून दिलेल्या कार्टूनपेक्षा लाख पटीने चांगला आहे.” राधिका मस्करी करत बोलली.

“इव्ह,” सोनालीने तिचं तोंड वाकड गेल. “त्याच नाव पण नको घेउस. रावीला अजूनच त्याचा राग आलेला आहे. राकेशचा 'र' जरी ऐकला तरी ती काय करेल याचा भरोसा नाही.” सोनाली हसतच बोलली.

अजून थोड्याफार गप्पा मारून त्यांनी फोन ठेवला. राधिकाने शशांकला सोनालीचा निरोप पोहोचवला. मग तो देखील लागलीच तिथून रावीच्या घरी जायला निघाला.

तिकडे तुषार देखील त्याच्या जिमवरून घरी जायला निघाला. त्याची बाईक चालवता चालवता त्याला परीने जे काही केल ते सारख सारखं आठवत होत. ते आठवून त्याला हसू पण येत होत आणि तिच्याशी अस वाईट वागताना त्याला वाईट देखील वाटत होत. पण तिने ही त्याला त्या शब्दांनी घायाळ जे केल होत ना. त्यामुळे तिला अस सहज माफ करण तुषारला जमतच नव्हत.

जेव्हा तिच्या अंगावर ते जड वजन कलायला लागल होत तेव्हा त्याच हृदय किती जोरात धडधड करत होत ते त्यालाच माहिती होत. त्यावरून त्यला एक मात्र मक्की समजल होत की परी त्याला नक्कीच मनवू शकणार होती.

तो याच्याच विचारात घरी पोहोचला. घरात फक्त त्याची आई होती. त्याचे वडील बाहेर गेले होते आणि तेजश्री तर कॉलेजला होती. तुषार त्याच्या खोलीत न जाता थेट किचनमध्ये पोहोचला. त्याला पहिले पाणी प्यायचं होत. सोबत परीचे विचार मनात असल्याने त्याच्या गालावर ते खट्याळ हसू होतच.

तुषारला अस गालात हसत येताना बघून तुषारच्या आईला तुषारची गंमत करायची लहर आली.

“तुषार.” तुषारची आई गंभीर व्हायचं नाटक करत बोलली.

आईच्या आवाजाने तुषार परीच्या विचारातून बाहेर आला आणि आईकडे बघू लागला.

“ते लग्नाबद्दल काय ठरवलं आहेस?” तुषारची आई

तश्या तुषारच्या कपाळावर आठ्या पडल्या. “मी नाही बोललो ना.”

“अरे पण गावाकडचे हात धुवून मागे लागले आहेत.” तुषारची आई

“गावाकडचे?” तुषार वैतागून बोलला. “कोण बोलत आहे? सांग तर बरं मला. माझ लग्न मी बघेल ना.”

“तुझ लग्न?” तुषारची आई प्रश्नार्थक बघत बोलली.

आता तुषार गोंधळून गेला.

“अरे आपल्या तेजू बद्दल बोलत आहे.” तुषारची आई “गावाकडचे विचारात आहेत तिला.”

“यावर आधीच बोलण झाल होत ना?” तुषार अजून चिडत बोलला. “तिला ते घरात ठेवतील ते मला चालणार नाही.”

“बघ बाबा.” तुषारची आई भावूक झाली. “तुझ नाही तर किमान तिचं लग्न तरी आम्हाला बघायला मिळू दे.”

आपल्या आईची सगळी नाटक माहिती असलेल्या त्याने त्याचे डोळे फिरवले आणि पाणी पिऊन पटकन तिथून निघून गेला.

‘माझ्या लग्नाचा विषय खरचं सोडला का काय ह्यांनी?’ तुषारच्या मनात विचार चमकला. तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि बाथरूममध्ये गेला. दुपारी जरा आराम करून तो परत जिमवर जाणार होता.

इकडे कॉलेजमध्ये परी तेजश्रीला भेटली. जी घरी जायच्या तयारीत होती. पण अचानक परीने तिला थांबायला लावलेलं बघून ती जरा विचारात पडली. नंतर तिला जस जाणवलं की आता तर ती तिची होणारी वहिनी आहे. मग ती जरा निवांत झाली. पण तिचा तो निवांतपणा जास्त वेळ टिकला नाही. कारण तिला रावी आठवली. ती तर तिची बहिण होती तरी रावीला कुठलीही सवलत तिने दिली नव्हती. उलट तिला तर जास्त शिक्षा देत होती.

‘मग आता का बोलावलं असेल?’ हा विचार करून तेजश्री गोंधळात पडली.

ती तिच्याच विचारात असताना सुजाताने तिला घरी जाण्याबद्दल विचारले. अचानक सुजाताचा आवाज आल्याने तेजश्री पहिले तर दचकलीच. नंतर सुजाताला बघून लागलीच सावरली. त्यांच्या मॅमने थांबायला सांगितलेलं आहे अस जेव्हा तिने सुजाताला सांगितल तशी ती पण तेजश्रीसोबत थांबली.

आता ती तिची जिवाभावाची मैत्रीण असल्याने तेजश्री तिला थांबू नको अस बोलू शकत नव्हती आणि परी नेमक्या कोणत्या विषयावर बोलणार आहे? हे तेजश्रीला माहिती नव्हत. तस तर तुषारच्या मनाची कल्पना तिला होती पण आता परीच्या मनाची कल्पना सुजाताला नव्हती आणि ते तिला सांगीतलेले परीला आवडेल की नाही हे तेजश्रीला माहिती नव्हत. बरं आज ना उद्या सुजाताला समजणारच होत. तेव्हा ‘तुला माहिती असून मला सांगितल नाही.’ म्हणून ती नक्कीच तेजश्रीवर रुसून बसणार होती.

काही वेळातच परी आली. तिने तेजश्री सोबत सुजाताला पाहिलं. “तुझ काही काम आहे का?” तिने सुजाताकडे बघून विचारलं.

तस सुजाताने नकारार्थी मान हलवली. “अस काय करता ओ मॅम, ती माझी मैत्रीण ना.”

“मग काय लग्न झाल्यावर पण सोबतच फिरणार का?” परी कपाळावर आठ्या आणत विचारू लागली.

परीची ही प्रतिक्रिया बघून तेजश्री आणि सुजाता दोघी परीला बघतच राहिल्या. आजवर परीने त्यांना अशी कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्या दोघींना आपल्याकडे अस बघत राहिलेलं बघून परीने एक उसासा टाकला.

“ती परी होती,” परी “आताची ही अवनी आहे. त्यामुळे तुझ काही काम असेल तर तू जाऊ शकतेस.” परीला सध्या तिच्या मनात चालू असलेल्या गोष्टी कोणालाच सांगायच्या नव्हत्या.

आता तर दोघींचं तोंडच वासल गेल.

“तिच्याकडे थोड पर्सनल काम आहे,” परी “हवं तर तू बाहेर तिची वाट बघू शकतेस.”

आता मात्र सुजाताचा नाईलाज झाला आणि ती तिथून चालली गेली. तेजश्री अजूनही ह्या नव्या अवनीला बघत राहिली होती.

“मी फक्त तुला थांबायला सांगितलं होत,” परी तेजश्रीला रोखून बघत बोलली. “तिला का थांबू दिल?”

“मी नाही तिचं थांबली.” तेजश्री

“कॉमन सेन्स आहे,” परी “मी तुला आता थांबायला सांगितलं म्हणजे विषय माझा आणि तुझ्या दादाचा असेल ना.”

“ते मला सांगितल्याशिवाय कस समजणार?” तेजश्री

“ऐक ना,” परी तिचे डोळे फिरवत बोलली. “तू त्या दगडाची बहिण आहेस हे मला माहिती आहे. अस दाखवून ते सिध्द नको करूस ना.”

“मॅम.” तेजश्री परत चिडून बोलणार तोच परी बोलली.

“मॅम काय? आवाज खाली,” परी “तुला परत एकदा सांगते आतची ही अवनी आहे, ती तुझी मॅम पण आहे आणि होणारी वहिनी पण आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये माझ्याशी अस आवाज चढवून बोलायचं नाही. कॉलेजमध्ये वेगळ आणि घरी वेगळ. हवं तर रावीला विचार कस करते ते मी.”

‘शप्पथ,’ तेजश्री मनातच बोलली. ‘ह्या तर आत्तापासून खडूस वहिनीमध्ये नाही घुसल्या ना?’

“तुझ मनात बोलून झाल असेल तर मी काय सांगत ते ऐक.” परी

ह्यावर तेजश्रीने फक्त तिची मान डोलावली. मग परीने तिला तिची कल्पना सांगितली. तेजश्रीला कल्पना तर खूप आवडली होती. पण आपल्या प्रतिक्रियेवर परी कशी प्रतिक्रिया देईल हे तेजश्रीला माहितीच नसल्याने तिने परीला फक्त हसून दाखवलं.

“अस तोंड पाडून हसायची गरज नाहीये,” परी तोऱ्यात बोलली. कॉलेजमध्ये आहोत म्हणून कडक वागाव लागत. नाहीतर रावीसोबत तू पण माझ्या डोक्यावर मि-या वाटशील.”

“अस काही नाही मॅम.” तेजश्री लागलीच बोलून मोकळी झाली.

“आणि एक,” परी जाणारच होती की तिने परत तेजश्रीकडे वळून पाहिलं. “मी इतकी पण खडूस नाही वागणार.” एवढ बोलून तिने तेजश्रीचे प्रेमाने गाल ओढले.

आता तर तेजश्री जाणीवेच्या पलीकडेच गेली. आजवर तिने फक्त रावीचेच गाल ओढताना परीला पाहिलं होत आणि आता त्यांच्या त्याच लाडक्या मॅमने तिचे गाल ओढले होते. ते बघून तेजश्रीची तर खूप इच्छा झाली की परीला तिथेच मिठी मारावी. पण आपला कॉलेजमध्ये आहोत हे परीच वाक्य तिला आठवलं. पण तिचा चेहरा मात्र चांगलंच उजळला होता.

तेजश्रीचे गाल ओढून झाल्यावर परीने इकडे तिकडे पाहिलं. कारण रावीला सोडून परीने अस दुसऱ्या कोणाचे गाल ओढलेले तिला समजल तर ती परीवर चांगलीच रुसून बसणार होती. तिच्या मते परीने कॉलेजमध्ये असे गाल ओढायचा अधिकार फक्त रावीचा होता.

पण तिथे कोणीच दिसलं नाही बघून परीने सुस्कारा सोडला. पण ती बातमी तर कधीच रावी पर्यंत पोहोचवली गेली होती. परीवर लक्ष ठेवणारे तिचे खबरी होते की तिथे, हा प्रसंग पाहून त्यांनी लगेच रावीला तो निरोप पोहोचवला होता.

तो निरोप मिळताच रावी कॉलेजला यायला निघाली होती. पण तिथे आता शशांक येणार होता. त्यात रुद्र तर कधीही तिथे येऊन पोहोचणार होता. त्यामुळे सोनालीने रावीला काही तिथून जाऊ दिले नव्हते. पण तिची ती जेलसी बघून सोनाली खूपच हसत होती.

रावी तर मनातच धुसफुसत राहिली. मग तिला आठवल की मुलगा आला की तिला व्यवस्थित तयार केल जात. तशी रावी लगेच सोनालीजवळ गेली आणि तिला तयार करायला परीला बोलवायला सांगितल.

रावीच ते बोलण ऐकून सोनाली अजूनच हसायला लागली. “बावळट, तो फक्त तुझ्या डॅडला भेटायला येणार आहे. तुला बघायला त्याची फॅमिली नंतर येणार आहे. तेव्हा आपण तुझ्या दीला बोलावू.”

तशी रावी तिचे पाय आपटतच तिच्या खोलीकडे गेली. तिला काही करून आज परीला भेटायचं होत. मग तिने तिचा मोबाईल उचलला आणि परीला फोन लावला.

तिकडे परी तेजश्री सोबत बोलून घरी जायला निघाली होती. तोच तिला रावीचा फोन आला.

“मी जर ह्या मुलाला होकार द्यावा अस तिला वाटत असेल तर तू आत्ताच्या आता घरी येशील.” रावीने एवढं सांगितल आणि तिने सरळ फोन कट केला.

“अरे.” परी तिचा मोबाईल बघत बोलली. “आता हिला काय झाल?”

मग ती रावीकडे जायला निघाली.

शशांक आणि परी रावीच्या बिल्डींगमध्ये पोहोचण्याची वेळ एकच झाली. परी तिची स्कुटी लावत होती तोच शशांक कॅबमधून उतरत होता. त्याने लांबूनच परीला पाहिलं आणि त्याने पटकन कॅबच बिल दिल.

परी लिफ्टमध्ये जाणार तोच शशांकने तिला आवाज दिला. आलेल्या आवाजाच्या दिशेने परीने पाहिलं तर तिला शशांक दिसला. त्याला बघून परी पण थांबली. दोघांनी एकमेकांना बघून स्मित केल.

“खूपच घाई झाली वाटत होणाऱ्या बायकोला भेटायला?” परी मस्करी करत बोलली.

तस शशांकने परीकडे चमकून पाहिलं. “तस नाही.” लगेच स्वतःला सावरत तो बोलला. “ॲकच्युली तिच्या वडिलांना मला भेटायचं आहे.”

आता चमकून बघायची पाळी परीची होती. आपण काहीतरी वेगळ ऐकल का? अस तिला वाटून गेल. तिचा तो प्रश्नार्थक चेहरा बघून शशांकने त्याच्या मनातली ती गोष्ट सांगितली. ते ऐकून परीला जरा आश्चर्यच वाटल.

“इम्प्रेसिव्ह.” परीने त्याला दाद दिली.

“पण मला माझ्या मित्रासाठी वाईट वाटतय.” शशांक परीकडे बघत बोलला.

“नॉट अगेन यार.” परी पण तिचे ओठ बाहेर काढत बोलली.

तसा शशांक हसू लागला. परी पुढे काही बोलणार तेवढ्यातच लिफ्ट आली आणि तिचा दरवाजा उघडला. तर त्यातून एक मुलगा घाईघाईत बाहेर पडला. त्याला बघून परीचा राग वाढू लागला. त्यानेही परीला तुसडेपणाने पाहिलं. तो दुसरा तिसरा कोणी नसून रावीचा पहिला बॉयफ्रेंड राकेश होता. जो त्याच्या आई वडिलांना भेटायला आला होता. समोर परीला पाहून त्याला रावी आठवली. त्यांनीच तर त्याची तिथून हकालपट्टी केली होती. तोच राग आता त्याचा उफाळून आला होता.

“तुही तिच्यासारखीच ना,” राकेश तिरकस हसत बोलला. “बऱ्याच मुलांना फिरवते...” यापुढे तो काहीच बोलू शकला नाही.

कारण त्याच ते वाक्य ऐकूनच शशांकने त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा लगावला होता. तसा राकेश चार फुट लांब जाऊन पडला. पुढचे तीन मिनिट तो जाणीवेच्या पलीकडे गेला होता. पण ते ही बघायाला परी तिथे थांबली नाही आणि शशांकला घेऊन पटकन लिफ्टमध्ये शिरली. उगाच रावीचा भूतकाळ त्याच्यासमोर वेगळ्या पद्धतीने परीला आणायचा नव्हता. तो फक्त रावीनेच त्याला सांगाव अस परीला वाटत होत.

शशांक पण शेवटी पोलीस होता. त्याच्या त्या पारखी नजरेने काहीतरी बिघडलं असल्याच त्याला सांगितल होत. पण परीने विषय बदलला म्हणून त्याने परत काही तिला विचारलं नव्हत. हिच्या जागी जर राज असता तर त्याने राजकडून खोदून खोदून माहिती काढली असती. पण त्याची आणि तिची एवढी पण ओळख नव्हती ना.

ह्याच विचारात ते रावीच्या घरी येऊन पोहोचले. परीने दारची बेल वाजवताच सोनालीने दार उघडल. समोर परीला बघतच सोनालीने एक सुस्कारा सोडला.

“शेवटी बोलावलंच ना तुला.” सोनाली कमरेवर हात ठेवत बोलली.

तशी परी हसू लागली. मग सोनालीच लक्ष परीच्या मागे उभ्या असलेल्या त्या मुलाकडे गेल.

“शशांक.” परीने त्याची ओळख करून दिली.

तस सोनालीने मंद स्मित करत त्याला आदराने घरात बोलावले. तसे ते दोघे घरात येऊन बसले.

आतमध्ये रावीच्या डोक्यात तर वेगळच चालू होत. आलेल्या मुलाला कस घाबरवून पळवून लावायचं? याचा ती विचार करत होती.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

काय करेल रावी बरं? कशी होईल त्यांची पहीली भेट?
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →