Login

अवनी एक प्रवास भाग १०७

परी तिच्या कॉलेजला जात असताना तुषारला कस मनवायच? याचा विचार करत होती. त्याच्या त्या दुखऱ्या मनावर प्रेमाची फुंकर घालायची होती. पण तुषार तिला त्याच्या जवळ पण येऊन देत नव्हता. स्कुटी चालवता चालवता तिला त्यांच्या कॉलेजच्या गेटवर त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमाचा मोठा फ्लेक्स दिसला.
मागील भागात.

“ऐक ना, मावशी” राज “शशांकला रावीच्या वडिलांना भेटायचं आहे.”

तसा सोनालीने तिच्या कानावरचा मोबाईल काढला आणि त्याकडे एकदा बघून तो परत कानाला लावला. “त्याला रावीला भेटायचं आहे का?”

“मलाही आधी तेच वाटल होत,” राज दीर्घ श्वास घेत बोलला. “पण त्याला रावीच्या वडिलांनाच भेटायचं आहे.”

“का?” सोनाली गोंधळून बोलली.

“काय माहित?” राज उसासा टाकत बोलला.

“ठीक आहे,” सोनाली “आज ते येणार आहेत घरी त्यांच्या लेकीला भेटायला. आता काय मुलाची चौकशी करून झाली आहे. तर साहेब खुश आहेत.”

“त्याला आज बोलावू का मग?” राज

“आधी विचारते त्यांना,” सोनाली “आजचा वेळ लेकीला दिला आहे ना त्यात मग दुसर कोणीच चालत नाही.” सोनाली नाटकी आवाजात बोलली.

“आणि तू तस चालवून घेतेस ना?” राज खट्याळ होत बोलला.

“ठेवू फोन?” सोनाली नाटकी चिडत बोलली.

तिकडे राज खळखळून हसला आणि त्याने फोन ठेवला.

आता पूढे.

इकडे नयन सुजयच्या घरी जाऊन पोहोचली. तिला घरात सायली, विजय आणि सुजय व्यतिरिक्त अजून माणस असलेली दिसली. मग तिने सध्या स्वतःवर ताबा ठेवला. नाहीतर आता सायली आणि विजयसमोर ती सुजयला भांडणार होती. तिथे मनालीला बघून तिला जरा हायस वाटलं आणि ती सरळ तिच्या बाजूला जाऊन बसली.

“काय गं सकाळीच?” विजयने मस्करीच्या सुरात विचारलं.

“अम्म हो ते सहज.” नयन आजूबाजूच्या माणसांना बघत बोलली.

“त्याच आवरून झाल आहे,” सायली “येईलच तो थोड्यावेळात बाहेर.”

‘बाहेर आला तर काय करू?’ नयन मनातच बोलली. ‘रूममध्ये भेटला तर त्याला चांगलच भांडता येईल ना मला.’

“मला पण तेच करायचं आहे.” मनाली हळूच नयनच्या कानात बोलली.

तस नयनने तिच्याकडे चमकून पाहिलं. यावर तिने तिचे डोळे मिचकावले. तर नयनचा आवाज ऐकून बाहेर येणारा सुजय परत त्याच्या खोलीत गेला होता.

काही वेळातच परी तिच्या घरी जाऊन पोहोचली. तिच्या पाठी आरुष, जय आणि आदेश देखील जाऊन पोहोचले.

परीला बघताच कैलास आणि त्याची बायको परत उठले. परीला ते बघून जरा ऑकवर्ड वाटल.

“ते अस सारख सारख उभ नका रहात जाऊ,” परी “मी लहान आहे.”

“तरी आमच्या मालकांच्या वंशाच्या आहात,” कैलास “तुमचीच वाट बघत होतो आता घरी जायला मोकळ.”

“लेकीला भेटले ना नीट?” परी मनालीकडे बघत बोलली.

तशी कैलास आणि त्याच्या बायकोने होकारात मान हलवली.

“आता दर वर्षी ह्याच्या हातावर राखी बांधायची आहे,” मनाली पण कैलासच्या मुलाकडे बघत बोलली. “असा दम दिला आहे त्याला.”

यावर सगळे हलकेच हसले आणि कैलास त्याच्या कुटुंबासोबत घरी जायला निघाले. त्यांना सोडायला सगळेच खाली उतरून आले होते. त्यात सूजयलाही याव लागल होत.

इकडे यांच्या गप्पा चालू होत्या तर दुसरीकडे मनाली आणि नयन डोळ्यांनीच आरुष आणि सुजयला भांडत होत्या.

‘मी आलेली असून सुद्धा तू बाहेर आला नाहीस ना?’ असा नयन सुजयला दम देत होती.

तर मनाली पण आरुषने काल फोन का उचलला नाही? अस डोळ्यांनीच त्याला भांडत होती. हे सगळ बघून सुजय आणि आरुषने एकमेकांकडे तोंड पाडून पाहिले. आता त्यांच्या सुटकेच ठिकाण एकाच होत ते म्हणजे त्यांची दी. ती पण सध्या कैलास आणि त्याच्या कुटुंबाला निरोप देण्यात व्यस्त होती.

कैलास आणि त्याच कुटुंब निघून गेल्यावर मनाली आणि तिच्या आई वडिलांनी देखील निघायची तयारी केली. अनायसे ते खाली उतरून आलेच होते त्यामुळे परत वर जाऊन खाली उतरण्यापेक्षा इथूनच जायचं त्यांनी ठरवलं होत.

ते ऐकून मनालीच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच गडद झाल्या. ती अजूनच आरुषला रोखून बघू लागली. यावरून तिला आताच इथून जायचं नाहीये हे आरुषला समजून गेल होत. त्यालाच काय परीला देखील ते समजून गेल.

“मनु येईल नंतर.” परी बोलून गेली. मनालीने सुटकेचा श्वास सोडला तर आरुषने त्याच डोक खाजवलं.

मग मनालीचे आई वडील सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले. तर बाकी जण घरी आले. सायली आणि विजय तर त्यांच्या कामावर निघून गेले. आता राहिले तर परी, सुजय, आरुष, मनाली आणि नयन.

परी पण कॉलेजला जाण्यासाठी तिचं आवरायला तिच्या खोलीत गेली. तिला गेलेलं पाहतच मनाली आणि नयनने आरुष आणि सुजयच्या कॉलरला पकडून घेतलं.

“मला बोलाले की आजवर कोणत्याही मुलीकडे पाहिलं सुद्धा नाही,” मनाली तिचं दोन्ही हातांनी आरुषची कॉलर पकडून विचारू लागली. तिच्या ताकदीपुढे तो हलत देखील नव्हता. जशी मनाली आरुषला घट्ट पकडून मागे पुढे हालवायला बघायची तशी फक्त तिचं हलत होती. ते बघून आरुषला खूपच हसू येत होत. पण चिडलेली मनाली बघून त्याने त्याच हसू दाबून ठेवलं होत.

“तू तर बोलला होता की ती फक्त तुझी मैत्रीण होती,” नयनने पण सुजयचा गळा पकडला होता. “मग मैत्रिणीसोबत असे फोटो काढतोस? मग भेटल्यावर काय काय करत असशील?”

हे ऐकून सुजयला मात्र खूप राग आला आणि त्याने सरळ नयनच्या मानेला पाठीमागून पकडून घेतलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या कमरेत पकडून जवळ ओढलं. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले.

अचानक झालेल्या ह्या कृतीमुळे नयन गोंधळून गेली आणि ती घाबरली. ती सुजयच्या त्या पकडीतून सुटायला बघत होती. बाजूलाच मनाली आणि आरुष होते. परी कधीही तिच्या खोलीतून बाहेर येण्याची शक्यता होती. पण सुजयचा तो किस करण्याचा आवेश बघून नयन देखील वितळत चालली. सुजयच्या छातीला मागे ढकलणारे तिचे हात आता थेट सुजयच्या केसात जाऊन विसावले.

मनाली तर आरुषला भांडण्यात व्यस्त होती तर आरुष तिला बघण्यात व्यस्त होता. त्यामुळे नयन आणि सुजय काय करत होते? हे त्यांना माहितच नव्हत.

पण मनाली भांडण थांबवायचं काही नाव घेत नसलेली बघून आरुषने देखील तिला कमरेत पकडून स्वतःच्या जवळ ओढलं आणि तिला त्याच्या मिठीत घेतलं. ती पण आरुषच्या ह्या कृतीने बावरली आणि इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा तिला नयन आणि सुजय दिसले जे किस करण्यात मग्न होते. तस तिने तोंडावर हात ठेवून तिची मान दुसरीकडे फिरवून घेतली. आरुषला ते वेगळच वाटल आणि त्याने पण नयन आणि सुजयवर नजर टाकली.

ते बघून आरुषने मनालीला सोडलं आणि सुजयला बाजूच्या सोफ्यावरची एक उशी त्याला फेकून मारली.

एवढा वेळ स्वतःच्या विश्वास गुंग असणारे सुजय आणि नयन लागलीच भानावर आले. आता नयनला वास्तवाची जाणीव झाली आणि ती लाजेने पाणी पाणी झाली. मनाली तर अजूनही इकडे बघत नव्हती. ते चौघेही आता एकमेकांच्या विरूध्द चार दिशेला बघत उभे राहिले.

परी तिचं आवरून बाहेर आली आणि ती पण ह्या चौघांना बघत राहिली.

“काय रे काय झाल?” परी गोंधळून विचारू लागली. “असे चार दिशेला चार तोंड करून बसला आहात?”

“काही नाही ते असच.” आरुष चाचरत बोलला.

“मला ते इथेच उभ राहायची सवय आहे ना,” सुजय पण उगीच हसून दाखवत बोलला. “ह्या खिडकीत.”

“आणि तुमच काय?” परी मनाली आणि नयनकडे बघत बोलली.

“हे मनवायला येतच नाहीयेत.” मनालीला जे सुचल तर ती बोलली.

“हो ना,” नयन पण सुरु झाली. “वरून एक्सप्लेन पण करत नाहीये.”

“मी अजून एक्सप्लेन करू का?” सुजय तिला रोखून बघत बोलला.

तस आरुष आणि मनाली हळूच हसले होते. तर नयनने तिच तोंड वाकड केल होत.

“जाऊदे सोडा त्यांना,” परी “ते तर काल मला चिडवत होते म्हणून मी तुम्हाला जरा मीठ मसाला लावून ते सांगितल.”

“पण ते खरं तर होत ना?” नयन

“हो,” परी “पण जाउदे ना आता. तो फक्त तिला मदत करत होता.”

“ठीक आहे,” नयन “तू म्हणते म्हणून सोडते.” नयन जरा तोऱ्यात बोलली.

“तुम्हाला जायचं नाही का तुमच्या कामावर?” परी आरुष आणि सुजयकडे बघत बोलली.

तसे ते दोघे चमकून एकमेकांकडे बघू लागले. जणू काही त्यांनी वेगळाच प्रश्न ऐकला होता. नंतर जसा तो प्रश्न समजला तस त्यांनी त्यांच्या प्रेमिकाकडे पाहिले. आत्ताच कुठे त्यांनी त्यांचा राग सोडला होता. आता लगेच निघून गेलो आणि त्यांना परत राग आला तर? हा विचार करून ते गोंधळात पडले.

“जातील ना मग,” मनाली “आम्हाला घरी सोडून मग जातील.” मनाली चिडवण्याच्या सुरात बोलली.

तशी परी खुदकन हसली आणि त्यांचा निरोप घेत घराबाहेर पडली. इकडे सुजय परत नयनकडे बघून बोलला.

“तुला परत एक्स्प्लेन करून हवं आहे?” सुजय नयनच्या जवळ जात बोलला.

तस नयनने त्याच्या हातावर चापट मारली. “दी बरोबर बोलते. कुठे काय करायचं? याची अक्कलच नाही तुला.”

“तुला होती ना,” सुजय खट्याळ झाला. “मग तू का नाही अडवलं मला?”

“अडवलं होत,” नयन “तूच मला घट्ट पकडून ठेवलं.”

“जाउदे आता,” आरुष “जे झाल ते सोडा.”

“आम्हाला घरी सोडा.” मनाली तिची पर्स उचलत बोलली.

तस ते चौघे देखील घराबाहेर पडले. जाता जाता ते एका कॅफेमध्ये बसून नाश्ता करायला विसरले नव्हते.

इकडे परी तिच्या कॉलेजला जात असताना तुषारला कस मनवायच? याचा विचार करत होती. त्याच्या त्या दुखऱ्या मनावर तिला तिच्या प्रेमाची फुंकर घालायची होती. पण तुषार तिला त्याच्या जवळ पण येऊन देत नव्हता. स्कुटी चालवता चालवता तिला त्यांच्या कॉलेजच्या गेटवर त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमाचा मोठा फ्लेक्स दिसला. मग तिला तुषारची ती अट आठवली जी तिला वाचवल्यानंतर त्याने तिला घातली होती. मागच्या वेळेस प्रिन्सिपल सरांनी तिला डान्स बद्दल विचारल्यावर तिने तेव्हा काही उत्तर दिल नव्हत. पण आता तिने त्याच उत्तर द्यायचं ठरवलं.

कॉलेजमध्ये त्यांच्या कार्क्रमाची तयारी जोरात चालू होती. त्यांचा तो कार्यक्रम तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपला होता. तेजश्रीच्या ग्रुपची जोरात तयारी चालू होती. आता तर परी पण त्यांची अंतिम तयारी त्यांच्याकडून करून घ्यायला पोहोचली होती.

त्यांची डान्सची प्रॅक्टिस घेत असताना तिला स्वतःचा देखील डान्स बसवायचा होता. ह्याची खबर मात्र ती कोणालाच देणार नव्हती. सगळ काही तिला गपचूप करायचं होत. पण कोणाची तरी मदत घ्यावी लागणार होती.

ती डान्स बघत असताना तिला तेजश्री दिसली आणि तिला तिचं काम सोप होताना दिसलं. एकतर तेजश्रीला सगळ काही माहिती होत आणि ती इतर कोणालाही काहीही सांगणार नव्हती.

डान्सची प्रॅक्टिस झाल्यावर परीने पाहिलं त्यांच्या प्रिन्सिपल सरांचं ऑफिस गाठलं. परी तिचा डान्स करायला तयार झाल्याचे समजताच प्रिन्सिपल सरांना खूप आनंद झाला.

“पण सर माझी एक अट आहे.” परी

“कोणती?” प्रिन्सिपल सर “काही हवं आहे का तुला? सगळ काही मिळेल.”

“काही हवं नाहीये,” परी “फक्त मी डान्स करणार आहे ते कोणाला समजू देऊ नका. अगदीच सिक्रेट ठेवायचं आहे ते.”

“आणि का ते?” प्रिन्सिपल सर “असही डान्स करायला स्टेजवर येशील तेव्हा तर समजेलच ना?”

“असच ते जरा सरप्राईज आहे,” परी आता जरा लहान मुलीसारखी बोलली. “प्लीज ना सर.”

“ठीक आहे,” प्रिन्सिपल सर जरा हसूनच बोलले. “पण ऑर्गेनाइजेशन कमिटिला तर सांगाव लागेल ना.”

“अम्म,” परीने विचार केला. “फक्त प्रेसिडेंट आणि जो कोणी ॲन्कर आहे त्यांना सांगा.”

“ठीक आहे.” प्रिन्सिपल सर

तशी परीची कळी खुलली. “थ्यांकू सर.”

एवढ बोलून परी तिथून बाहेर गेली.

इकडे शशांकला जसा राजचा फोन गेला तसा तो दुपारपर्यंत राजच्या घरी देखील येऊन पोहोचला. राजने त्यालां आलेलं बघून डोक्यालाच हात लावला.

“अरे मलाच अजून कन्फर्मेशन मिळाल नाही रे,” राज “तू थेट येऊनच पोहोचलास?”

“हो,” शशांक घरात बघत बोलला. “मावशी कुठे आहे?”

“आहे रे,” राज वैतागून बोलला. “ती जरा बाहेर गेली आहे. पण माझी नोकरी नवी आहे रे. निघताना फोन तर करायचा? अस मला अर्जंट सुट्टी नसती घ्यावी लागली.”

“मी माझ्या मावशीच्या घरी आलो आहे,” शशांक तोऱ्यात बोलला. “तू नसता आला तरी चालल असत.”

“का?” राज “माझ्या चुगल्या करायला?”

यावर शशांकने फक्त हसून दाखवलं. आता तर तारा पण तिथे आली.

“अरे दादा,” तारा शशांकजवळ जात बोलली. “तू कधी आलास?” तिने शशांकला बाजूनेच हलकीशी मिठी मारली.

“आमची तारा राणी किती मोठी झाली ते बघायला आलो.” शशांक

“बरं,” तारा “तुला म्हणे आमची बहिण आवडली आहे?”

तशी शशांकने होकारात मान हलवली.

“तुला दुसरी कोणी भेटली नाही का?” तारा खुदकन हसत बोलली.

तस राज आणि शशांक दोघांनाही हसू आल होत.

आता राधिका देखील घरी आली. “अरे आलास पण तू?” राधिकाने प्रेमाने विचारलं.

तसा शशांक उठला आणि राधीकाच्या पाया पडला. “तुम्ही एकट्याच? तुमच्या जाऊबाई?”

“ती आहे तिच्या कामावर, तुझे दोन्ही काका पण कामावर आणि आज्जी आजोबा गावाला,” राधिका “अजून काही?”

तसा शशांक हसू लागला. “आणि हो एक राहिला.”

तसे सगळे शशांकला बघू लागले. पण शशांक काही बोलणार त्या आधीच तारा बोलू लागली.

“आपले राम राजे पण त्यांच्या कामावर.” तारा पोट धरून हसत बोलली.

प्रसादचा स्वभाव बघून शशांक त्याला राम राजे बोलायचा. त्यांच्यातले बरेचसे गुण प्रसादमध्ये जे होते.

ताराच्या ह्या बोलण्यावर सगळेच हसू लागले.

“बस, आता जेवण करूनच जा.” राधिका

“त्याला आता त्याच्या सासऱ्यांना भेटल्याशिवाय जेवण नाही जाणार मॉम.” राज चिडवण्याच्या सुरात बोलला.

यावर शशांकने फक्त डोळे फिरवले. “मला कांदा भजी.” शशांकने ऑर्डर सोडली.

तशी राधिका लागलीच कामाला लागली. ह्यांच्या गप्पा आणि कांदा भजी होईपर्यंत सोनालीचा राजला फोन आला. त्यावेळी राधिका नेमकीच सगळ्यांना कांदा भजी देत होती.

आपल्याला सोडून आपपल्या लेकाला फोन आलेला बघून राधिकाने राजचा मोबाईल स्वतःच्या हातात घेतला.

“आता गरज नाही ना माझी,” राधिका जरा चिडून बोलली. “म्हणून मला सोडून माझ्या लेकाला फोन लावते ना?”

“ताई?” सोनाली जरा घाबरलीच. “तस नाही म्हणजे, त्यानेच सांगितलं म्हणून. तुला सांगणार होती. पण मग ठरलं नाही, काही नाही. मग काय कस सांगू?”

सोनालीची चालू झालेली ततपप ऐकून राधिकाला खूप हसू येत होत. आपला अजूनही धाक असलेला बघून त्यांच्या ह्या ताईला जरा कौतुकच वाटलं.

“एवढी मोठी झालीस,” राधिकाने आधीचाच सूर पकडला. “आता जावई येईल तुला. तरी तू अशी बावचळली? पुढे कस व्हायचं?” तिने एक नजर शशांकवर टाकली. पण तो तर कांदा भजी खाण्यात व्यस्त होता. राधिकाला रावीच्या आईचा फोन आला होता हे देखील माहिती नव्हत.

“काय गं ताई तू पण ना?” सोनालीने सुटकेचा श्वास सोडला. कारण राधिका तिची मस्करी करत होती ते तिला समजून गेल होत.

तशी राधिका अजूनच हसायला लागली. “बर काय बोलायचं होत माझ्या लेकाशी?”

“तेच ते राज विचारत होता ना की त्याला भेटायचं आहे ह्यांना,” सोनाली “तर ह्यांनी दिली आहे परमिशन त्याला आज भेटायची.”

“अच्छा थेट सासऱ्यांजवळ वशिला?” राधिका

“आता ते काही माला माहित नाही,” सोनाली “राज बोलला होता की ह्यांच नाव ऐकल आणि त्याने ह्यांना भेटायचा हट्टच धरल म्हणे.”

“ठीक आहे,” राधिका “मी सांगते त्याला.”

“अम्म ताई.” सोनाली जरा चाचरत बोलली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →