मागील भागात.
राज आणि सुजयने त्यांचे डोळे घट्ट मिटून परत उघडले. सुजयने लगेच तिच्या हातातून मोबाईल काढून घेतला.
“नाही बोललो का?” सुजय वैतागून बोलला. “एखाद हॉटेल तर दिसू दे.”
तस परीने बाहेर बघायला सुरवात केली. मग तिला एक कल्पना सुचली आणि तिने परत सुजयच्या हातून तिचा मोबाईल घेतला.
“अरे बोललो ना एखाद चांगल हॉटेल येऊ दे.” सुजय गोंधळून बोलला.
“बाबांना नाही लावत फोन.” परी
एवढं बोलून परीने एक नंबर डायल करून मोबाईल कानाला लावला. पुढच्या काही सेकंदात तो उचलला देखील गेला.
“मला भूक लागली आणि हे दोघ नुसतेच हॉटेल बघत आहेत.” परीने एवढं बोलून फोन ठेवून देखील दिला.
राज आणि सुजय परीला गोंधळून बघत राहिले.
आता पूढे.
पुढच्या काही क्षणातच तुषारची बाईक राजच्या गाडीच्या पुढे आली आणि तुषारने थेट राजला पुढच्या एका हॉटेलच्या दिशेने इशारा केला.
मग दोघांना समजल होत की परीने तुषारला फोन लावला होता. तुषारला तिचा राग तर होता पण तिला अस अडचणीत देखील तो पाहू शकत नव्हता. तुषारची ही काळजी बघून परी मनातच खूप खुश झाली.
पुढचा अर्धा तास नाश्ता करण्यात गेला. ह्या वेळेस परीने पोट भरून खाल्ल होत. जसे ते तिथून निघाले तशी परी गाडीत झोपून गेली. एकतर तर पहाटेपासून जागी होती. आता सगळचं टेशन गेल्यामुळे तिला शांत झोप लागली होती.
संध्याकाळी परत एकदा चहा पिण्यासाठी ते सगळे एका ठिकाणी थांबले. तेव्हा सुजयने परीला उठवलं. परीने गाडीतून खाली उतरायला नकार दिला. त्यामुळे राजने तिला गाडीतच चहा आणून दिला होता.
तो चहा घेऊन परीला जरा तरतरी आली आणि त्यांचा पुन्हा घराकडील प्रवास सुरु झाला. अंधार पडल्यावर ते सगळेच परीच्या घरी जाऊन पोहोचले. तुषार तर तसाच त्याच्या घराकडे निघून गेला. तिथून निघताना त्याने फक्त बंधू मंडळींचा निरोप घेतला. परीवर त्याने फक्त नजर टाकली आणि निघून गेला.
परी गाडीतून उतरली तर होती पण तिला आता घरी जायला टेन्शन आल होत. विजय एखाद वेळेस तिला समजून घेऊ शकणार होता. पण सायली मात्र तिच्यावर चांगलीच बरसणार होती. ती तिची हलकी हलकी पावले टाकत घराच्या दाराजवळ पोहोचली. आता ते दार उघडं होत. कारण जेव्हा प्रसाद तिथे जाउन पोहोचला होता. तेव्हा त्याने माला आणि रावीला ते दार उघडायला लावलं. कारण आता परी तर घरी यायला निघाली होती.
परी सर्वात पुढे उभी होती, तर तिच्या मागे तिची बंधू मंडळी आणि राज. परीने हळूच तिची मान दाराच्या आत टाकली. तर सगळी वरिष्ठ मंडळी टेन्शनमध्ये बसलेली तिला दिसली. तशी परी हळूच आत आली.
परीला आलेलं बघून सायली पटकन तिच्याजवळ गेली. “कशी आहेस बाळा? तुला कुठे लागल तर नाही ना?” सायली दाटलेल्या गळ्याने परीला तपासून बघू लागली.
सायलीच्या आवाजाने सगळ्याचं लक्ष परीकडे गेल. तश्या सर्व महिलामंडळींनी परीला घेराव टाकला. तिला ओरडू लागले, तिची काळजीने विचारपूस करू लागले.
“तिला आधी आत तर येउद्यात.” रावी खोचक आवाजात बोलली. “मग सर्वांना तिची सरबराई करायची संधी मिळेल.
तेव्हा कुठे सर्व महिला मंडळींनी तिला घरात घेतले. मालाने तिच्यासाठी पाणी आणले. ही सगळी मंडळी तिची चौकशी करत असताना परीच लक्ष फक्त तिच्या वडिलांकडे होत. विजयने तिच्यावर एक नजर टाकली आणि सुटकेचा श्वास सोडला होता. पण तो तिच्याशी एका शब्दानेही बोलला नव्हता.
परीला याच खूपच वाईट वाटल आणि ती उठून विजयजवळ जाऊन त्याच्या गुढघ्यापाशी बसली. “बाबा.” परी थरथरत्या आवाजात विजयला पुकारल.
पण विजयने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि उठून हॉलच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहीला.
“जेव्हा सांगत होती रागवायला तेव्हा एका शब्दाने काही बोलला नाहीत,” सायली चिडून बोलली. “आणि आता लेक स्वतः आवाज देत आहे तर बसलेत गाल फुगवून.”
यावर विजयने सायलीवर एक रागीट कटाक्ष टाकला.
“तू जा गं आधी फ्रेश होऊन ये.” सायलीच्या आईने परीला सांगितले.
तशी परी विजयकडे बघतच उठली. तिने मनात काहीतरी ठरवलं आणि तिच्या खोलीकडे गेली.
“आम्हाला तर बोलत होता की तिच्यावर कोणी रागवायचं नाही म्हणून,” राहुल आठ्या पाडून बोलला. “आणि स्वतः काय करत आहेस?”
“कारण तुम्हाला ती लगेच गुंडाळते.” विजय त्याच तोंड वाकड करत बोलला.
“आणि तुला नाही अस?” महेश हलकेच हसत बोलला.
यावर विजय मात्र गप्प बसला. तोपर्यंत मालाने किचनमध्ये जाऊन चहा देखील ठेवला होता. ही बदलत चाललेली माला बघून तिथल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्या सगळ्यांनीच प्रसादकडे पाहिलं. त्यावर प्रसाद मात्र गोंधळून गेला आणि राजकडे बघू लागला.
“लग्न झाल तरी मी किचनमध्ये पाय ठेवणार नाही,” प्रणाली मालाची नक्कल करत बोलली. “हवं तर घर जावई शोधू. अस ती आम्हाला बोलली होती आणि आता बघा ती थेट सगळ काही बनवायला पण लागली.”
“नाहीतर काय?” सोनाली पण लगेच सुरु झाली. “कोणता डोस पाजालास रे तिला?” सोनाली खट्याळ होत प्रसादला विचारू लागली.
आता यावर प्रसाद तरी काय बोलणार होता? प्रसादसोबत जस जस तिचं मन जुळत गेल होत. तस तस त्याने त्याला येणाऱ्या बऱ्याचश्या रेसिपीज तिला सांगितल्या होत्या. आता त्याला स्वयंपाकातलं इतक काही येत म्हटल्यावर माला विचारात पडली आणि तिनेही हळू हळू सगळ काही करायला सुरवात केली होती.
माला चहा घेऊन आली आणि सर्वांना देऊ लागली. तशी सगळ्यांची रावीवर नजर पडली. पण ती काही उठली नाही. ती रागात असली की कोणाचचं ऐकत नव्हती. आता ती परीवर चिडून राहिलेली होती.
शेवटी बाकी तिघे बंधू मंडळी उठली आणि मालाला मदत करू लागली. ते सगळे चहा पितच होते तेवढ्यातच त्यांची नजर समोर गेली आणि ते बघतच राहिले. रावीला चहा पिता पिता ठसकाच बसला होता. राज पण डोळे मोठे करून करून बघत राहीला.
“मॉम मला पण चहा.” सुजयची नक्कल करत परी तिथल्याच एका सोफ्यावर बसली.
पण बाकी सगळे अजूनही परीला डोळे फाडून बघत राहिले होते. कारण परीने फ्रेश होऊन येताना रावीसारखा पेहराव घातलेला होता. नेहमी साधे कुडते पायजमा घालून वावरणारी परी एकदम साधी दिसत होती. तिचं परी आता एकदम खुलून दिसायला लागली होती.
“माले आता प्रसादपुढे माझ ऐकायला पण येत नाही का?” परी सहज बोलून गेली.
माला पण तिला बघत बघत चहा देऊन गेली. परीने एक दोन घोट चहा घेतला आणि परत उभी राहिली.
“कशी दिसते मी डॅड?” परी तिच्या डोळ्यात हलकी आसव घेऊन बोलली.
विजय तर तिच्या ह्या लाडक्या परीला कधीचा बघत होता. परी जर खरचं त्यांच्या पोटी जन्माला आली असती तर ती कशी वागली असती? याचा विचार तो नेहमी करत राहायचा.
“मॉम सांग ना..” परी सायलीकडे बघत विचारू लागली.
तशी सायली पटकन परीजवळ आली आणि तिच्या कानामागे काळा टीका लावला. “खूप गोड दिसत आहेस.” सायलीने तिचा मुका घेतला.
“डॅड,” परी तिचे गाल फुगवून बोलली. “तुम्ही अजून काहीच बोलले नाही.” परी विजयच्या जवळ गेली.
विजयने परीला त्याच्या कवेत घेतलं. “परत जर कधी मला न सांगता गेलीस तर तो दिवस माझा शेवटचा दिवस असेल.”
“डॅड,” परी चिडून बोलली. “काहीही काय बोलता? असही मला माहिती होत की मी जरी गेले तरी माझी वानरसेना लगेच माझ्या मागे मागे येईल. तिथे गेल्या गेल्या तर मी त्यांना वार्निंग पण दिली होती की मी तिथून लगेच निघाली नाही तर पुढची जबाबदारी माझी नाही म्हणून.”
तरी विजय परीला रोखून बघत राहीला.
“हवं तर मनालीच्या मामांना विचारा,” परी तिचा चेहरा अगदी निरागस करत बोलली. “ते तिथेच होते.”
“ते आले आहेत?” विजयने चमकून विचारलं.
“हो,” परी “त्यांना मनालीच्या घरी पाठवून दिल आहे.”
विजय परत शांत झाला.
“सांगा ना.” परी आता चिडूनच बोलली.
“काय?” विजय काहीच न समजल्यासारख बोलला.
“कशी दिसते मी?” परीने तिचे गाल अजूनच फुगवले.
आताचा परीचा तो हट्ट बघून बाकीच्यांना हलकेच हसू आल.
“तू हे फक्त आमच्या मनाला आवडत म्हणून करत असशील तर मला हे आवडलं नाही.” विजय तिच्या डोळ्यात बघत बोलला.
“तस नाही,” परी “तुम्हाला आवडतील म्हणून मी आधी ते साधे ड्रेस घालत होती.”
“मग ठीक आहे,” विजयने तिला परत कवटाळून घेतलं. “खूप गोड दिसत आहेस.”
आता परीची कळी खुलली.
“आज जर मी मुलगा असती ना.” रावी परीला फ्लाइंग किस देत बोलली. “तर त्यांना खूप भारी पडलं असत.”
रावीच्या ह्या वाक्याने परीला ठसकाच गेला. सगळी वरिष्ठ मंडळी रावीला प्रश्नार्थक बघू लागले. तर बंधू मंडळींनी मनातच डोक्याला हात लावला.
“त्यांना कोणाला?” विजय
आता मात्र रावीने तिची जीभ चावली.
“तिला सोडा,” परी परत विजयकडे बघत बोलली. “आता नाही ना रागावले माझ्यावर?”
तशी विजयने नकारार्थी मान हलवली. ते बघून परीने सुटकेचा श्वास सोडला. तिने तिच्या आई वडिलांना तर मनवलं होत. आता राहीला होता तो तुषार आणि त्याची आई. आताही त्याच्या आईने जर मनाई केली तर ती लग्नाला नकार देणार होती. आई वडील नसण्याची किंमत तिच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल नाही का? भले तिने तिकडून निघताना ती तुषारसोबत लग्नाला तयार असल्याचे सांगितले. पण ती माय लेकाची ताटातून होऊ देणार नव्हती.
परीने टाळलेला विषय बघून राजच्या मनात पाल चुकचुकली. ह्या बंधू मंडळीपेक्षा तो तिला नक्कीच जास्त चांगल ओळखत होता. आता तर सगळेच जमले देखील होते आणि राजच डोक धावायला लागल.
“ते त्यांना म्हणजे कोणाला याच उत्तर नाही दिलस तू.” राज रावीला रोखून बघत बोलला.
“मी बोललो आहे त्यांच्याशी.” विजय हलकेच हसत बोलला.
तशी परीसकट सगळ्या बंधूमंडळीची तोंडच उघडी पडली. राज देखील डोळे विस्फारून बघत राहीला. त्यालाही याची काहीच कल्पना नव्हती. तो तर आता तुषार आणि परीचा विषय काढायच्या तयारीत होता. पण त्या आधीच अस ऐकायला आलेलं बघून तोही बघतच राहीला होता.
“आमच्या लेकीला कोणी आवडेल आणि आम्ही असच बघत बसणार का?” सायली तोऱ्यात बोलली.
“मग काय तर?” आराध्या देखील त्याच सुरात बोलली. “करोडोत एक आहे आमची लेक आणि तिला आवडलेला कोणी साधा माणूस असेल का?”
परी तर आता भांबावून बघत राहिली.
परीने जस सायली समोर कबुल केल होत तस सायलीने विजयच्या कानावर घातलं होत. परी जशी तुषारला भेटायला घराबाहेर पडली तशी सायली देखील घराबाहेर पडली आणि विजयला सोबत घेत थेट तुषारच्या घरी जाऊन पोहोचली.
“हे बघा तुमच म्हणण बरोबर आहे,” तुषारच्या आईची काळजी बघून विजय बोलायला लागला. “एका आईला आपल्या लेकांची काळजी असणे अगदी बरोबर आहें. पण मग त्यांच्या मनाचा विचार नको का करायला?”
“मला त्याच्या जीवाचा प्रश्न आहे,” तुषारची आई कडक आवाजात बोलली. “एकतर तिच्या मागे कोण कोण लागले आहेत. त्या नादात माझ्या मुलाच्या जीवच बरं वाईट झाल मग?”
“त्याच मुलाने परीला वाचवल आहे,” सायली “त्याच कस काय वाईट होईल?”
“तृम्ही तुमच्या मुलाला चांगलच ओळखता ना?” विजय “मग त्याच्या जीवाची पर्वा आहे की आमची मुलगी आमची रक्ताची नाही म्हणून..” विजय बोलता बोलता थांबला.
“अहो अस कस बोलता?” तुषारची आई चिडून बोलली. “ते तर त्याचा जीव..”
“त्याचा जीव तर आमच्या मुलीमध्ये आहे,” तुषारच्या आईच बोलण तोडत सायली बोलू लागली. “तिला जर त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलं तर तो जगेल?”
आता मात्र तुषारची आई शांत झाली.
“आणि जीवाच बोलाल तर इथे पुढच्या क्षणाची गेरेंटी देता येत नाही,” विजय “नुसता पडला म्हणून पण माणसाचा जीव गेलेला आहे आणि एखाद्या भयानक अपघातातून वाचलेली देखील माणस आहेत.”
“पण काळजी तर वाटतेच ना.” तुषारची आई
“आम्ही तिच्या रक्ताचे नसून सुद्धा ती आमच्यासाठी तिचं मन मारून जगत होती. आम्हाला आवडेल तर वागत होती.” विजय “तुमच्याशी तर तिचं नात जोडलं जाईल. ती तुमच्यासाठी काहीच करणार नाही का? अजूनही तुम्हाला काळजी वाटत असेल तर त्याची जबाबदारी माझी. तुमच्या लेकाच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण ती मोहिते साहेबांची नात आहे.”
इकडे सायली विजयला आठ्या पाडून बघू लागली. कारण विजय परत रक्ताची नाही म्हणून बोलून गेलेला तिला आवडलं नव्हत.
तुषारची आई यावर तिच्या विचारात हरवली.
“मी तर एवढचं सांगेल,” तुषारचे वडील “तुझ्या त्या चुलत भावाच जे झाल तर आपल्या मुलाच होऊ नये.”
तुषारच्या आईने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं.
“आणि खोट बोलू नकोस,” तुषारचे वडील “तू जेव्हा तिला भेटायला गेली होती तेव्हा तुलाही ती आवडली होती. तिचे विद्यार्थी तिचं किती कौतुक करत होते ते तूच आनंदाने सांगत होतीस.”
तुषारची आई परत शांतच बसली.
“स्वतःच्या सुखाला विसरून दुसऱ्यासाठी जगणारी माणस खूप कमी असतात,” तुषारचे वडील “नाहीतर तुषारला इतक्या मुली दाखवल्या. अगदी लाखोंचे पकेज असणाऱ्या. त्याला शोभतील अश्या. पण त्याला त्यातली एकही आवडली नाही. कारण त्यां मुलीच्या अटीच तश्या होत्या. त्या सगळ्यांना बाजूला सारून त्याने परीला निवडल आहे. तू त्याच्या निवडीवर शंका घेत आहेस?”
“मी जबरदस्ती करणार नाही,” विजयने आता थेट हात जोडले. “पण माझ्या मुलीने यापुढे तिचं मन मारून जगण मला आवडणार नाही. म्हणून मी इथे आलो आहे. एका मुलीच्या बापाची अवस्था तुम्हालाही चांगलीच माहिती असेल.”
तशी तुषारच्या आईला त्यांची लेक तेजश्री आठवली. तिच्यासाठी आलेल्या त्या स्थळाची देखील तुषारने अशीच कसून चौकशी केली होती. म्हणून तर त्यांची मुलगी त्या घरात कोंडली जाण्यापासून वाचली होती.
“ठीक आहे मग,” तुषारची आई एक दिर्घ श्वास घेत बोलली. “असही तुषार खुश राहीला तर आमच्या सुखाला किंमत राहील ना.”
“खूप खूप धन्यवाद.” विजयच्या डोळ्यात हलकीच आसव दाटली. सायलीने देखील हात जोडले.
तसे तुषारच्या आईने सायलीचे जोडलेले हात खाली घेतले आणि दोघींनी मिठी मारली. “आज रात्रीच बोलून घेते त्याच्याशी.”
“तस उद्या सांगा मग,” विजय “आम्ही पण परीच्या कानावर घालतो.”
तुषारच्या वडिलांनी होकार भरला तसे विजय आणी सायली समाधानाने तिथून बाहेर पडले होते.
“काय मग करायची ना बोलणी?” जिया पण हसतच विचारू लागली.
जियाच्या आवाजाने सायली परवाच्या आठवणीतून बाहेर आली. तिने परीकडे पाहिलं तर ती अजूनही संभ्रम अवस्थेत होती.
“तिचा अजूनही विश्वास बसत नाही वाटत,” सायली “थांब त्याच्या आईसोबत इच बोलण करून देते.” एवढ बोलून सायलीने तुषारच्या आईला फोन लावला.
तिकडे तुषारच्या घरी मात्र त्याचे आई वडील तुषारच्या खोलीत डोक्याला हात लावून बसले होते.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
आता तूषारने काय केल असेल बाबा?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
