Login

अवनी एक प्रवास भाग ९९

कैलासचं ते बोलण ऐकून परी तर स्तब्धच झाली होती. कारण ती तर इथे सही करायला आली होती. पण त्याचा परिणाम असा काही होईल? याची तिला कल्पना देखील नव्हती. विजयने तिला का? सही करू दिली नव्हती याच कारण तिला आता समजायला लागल. त्यांनी मानलेले आभार देखील परीला आता टोचू लागले. पण तिची स्पष्ट बोलायची हिम्मत झाली नव्हती. तिच्या डोळ्यात आता फक्त पाणी उभ राहील होत.
मागील भागात.

“तुषार सोडा त्याला प्लीज.” परी तुषारला विनंती करू लागली. “त्याला काही झाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्हाला काही झाल तर माझ काय होईल?”

तसा तुषार चमकून परीला बघू लागला. मग परीला जाणवलं की भावनेच्या भरात ती काय बोलून गेली होती ते. तोपर्यंत तुषारने त्या माणसाला सोडल होत.

मग तुषार गौतमकडे वळला. तस परीने त्याचा हात पकडला. ते बघून तुषार परीला रागात बघू लागला आणि परीच्या हातातून त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या जागी दुसर कोणी असता तर इतक्याच ज्या हाताने त्याला पकडल होत तो हात मोडून तुषार पुढे गेला असता. पण परीच्या पकडीपुढे तो काहीच करू शकत नव्हता.

त्यांची ही झटापट चालू असताना शशांक तिथे पोहोचला. त्याला वाटलं की परीचा हात कोण्या गौतमच्या माणसाने पकडून ठेवला आहे आणि तिचीच सुरक्षा करण्यासाठी तर तो इथे आला होता. तसा तो पटकन तुषार आणि परीजवळ पोहोचला.

आता पुढे.

शशांक तुषारला पकडायला पुढे आलच होता की तुषारने त्याला गोल फिरवत दुसरीकडे फेकून दिले. तसा शशांकचा राग अजूनच विकोपाला गेला. तो तितक्याच तत्परतेने उठला आणि परत तुषारवर धावून आला. ते बघून तुषारने परीला त्याच्या पाठी लपवून घेतले.

तुषारला वाटल होत की तो गौतमचा माणूस आहे आणि परीला इजा पोहोचावाण्याठी येत आहे. शशांकने तुषारला मारायला त्याचा हात उचलला. तोपर्यंत तुषारचा एक मजबूत ठोसा शशांकच्या थेट चेहऱ्यावर बसला. तसा शशांक पण लांब जाऊन पडला.

आजवर बऱ्याच गुंडाशी त्याची हातापायी झाली होती. पण आजवर त्याची अशी हालत कोणीही केली नव्हती. शशांक अजूनच रागाला आला. आता त्याने सरळ त्याची सर्व्हिसची बंदूक बाहेर काढली आणि तुषारवर ताणली.

“अरे थांब.” दाराकडून राज येत ओरडला.

तस शशांक राजकडे बघू लागला.

“ते आपलेच माणूस आहेत.” राज

राजकडून तुषारला अस आदरयुक्त बोलताना बघून शशांक राजला बारीक डोळे करून बघू लागला.

परीने तर तुषारला गौतमपर्यंत पोहोचू दिल नव्हत. पण आरुष मात्र थेट त्याच्यासमोर जाऊन उभा राहीला. गौतम त्याला कपाळवर आठ्या पडून बघू लागला. दुसऱ्याच क्षणाला गौतम त्याचा गाल पकडून खाली वाकला गेला.

गौतम आरुषला बघून काही बोलण्याच्या आत आरुषने त्याच्या थेट कानाखाली वाजवली होती.

“बोललो होतो ना की आमाच्या दी पासून लांब राहा.” आरुषने गौतमची कॉलर पकडली आणि त्याला सरळ उभ केल. “का ऐकल नाही? एकदा सांगून समजत नाही का तुला? आणि कुठे आहे तुझा तो सो कॉल्ड भाचा?” आरुष इकडे तिकडे बघत बोलला.

“आरुष,” परी तिकडून चिडली. “अरे किमान ते वयाने मोठे आहेत त्याचा तर विचार कर.”

“आपल्या जीवावर उठलेल्या माणसांचा आपण का विचार करायचा?” सुजय तिरकस हसत बोलला.

तशी आरुषने परत गौतमच्या कानाखाली वाजवली. “कुठे लपून बसला आहे तुझा भाचा? खूप हौस आहे ना त्याला दीसोबत लग्न करायची.”

पण हरीश काही दिसायला मागतच नव्हता. तो तरी कसा दिसणार होता? मनालीच्या मामांना पकडण्याच्या नादात त्यांच्याकडून त्याने चांगलाच मार खाल्ला होता. त्यात भर म्हणून ह्या बंधूमंडळीचा राग पहिला आणि तो गपचूप आतल्या खोलीतल्या मागच्या भिंतीच्या आड जाऊन लपून बसला.

“तुम्हाला हे महाग पडेल.” गौतम अजूनही त्याच्या गुर्मीत होता. “तुम्ही मला नीट ओळखत नाहीये. एक फोन करू द्या, मग बघा मी तुमची काय हालत करतो.”

“तुला काय वाटल?” राज “हा सगळा घाट आम्ही असाच घातला आहे?” राज पण आता आसुरी स्मित देत बोलला. आज तू कोणालाही फोन लावशील तरी तुला कोणाचीच मदत मिळणार नाहीये.”

“फोन तर लावू दे.” गौतम पण त्याच सुरात बोलला.

तसा आरुषने त्याची पकड सोडली आणि गौतमने पटकन त्याचा मोबाईल हातात घेत फोन लावायला सुरवात केली. पहिला फोन त्याने जिल्हा आयुक्तांना लावला. पण त्यांनी तो काही उचलला नाही. नंतर पोलीस आयुक्तांना लावला. पण त्यांनीही काही फोन उचलला नाही. मग त्याने त्याच्या पक्षातल्या खासदाराला फोन लावला. त्याने तर फोन उचलला पण त्याचा काहीच फायदा झाली नाही. उलट त्यानेच गौतमला टीव्ही लावायला सांगितला.

गौतमने आरुष आणि त्याच्या बाकी बंधूमंडळींवर नजर टाकली आणि टीव्ही लावला. तर त्यावर ताज्या बातम्या चालू होत्या ज्यात आता काही वेळापूर्वी ज्या त्याला व्हिडीओ दाखवल्या होत्या त्याच टीव्हीवर दाखवल्या जात होत्या.

आता मात्र गौतम मटकन खाली बसला. त्याच सगळ काही संपवलं गेल होत. त्याला आता परीच्या त्या वाक्याची आठवण आली होती. ‘मला जर उशीर झाला तर त्याच्या पुढच्या परिणामाची जबाबदारी तिची रहाणार नाही.’ त्याचा अर्थ गौतमला आता समजला होता. तो मेरेज रजिस्ट्रार का इतका घामाघूम होऊन आला होता आणि इथे आल्यावर तो का इतका उशीर करत होता? ते ही आता गौतमला समजल होत.

इकडे परीला नयनची आठवण आली. तशी ती सुजयकडे गेली.

“तू नयनला सोडून इकडे का आलास?” परी टेन्शनमध्ये येत बोलली. “तुला माहिती नाही की..”

“काही झाल नाहीये तिला.” परी पुढे काही बोलणार तोच सुजय बोलला आणा तेही रागात बोलला.

नयनला पकडतेवेळी जेव्हा व्हिडीओ कॉल चालू असेलला मोबाईल पडला तेव्हा तो पडला नव्हता तर तो पडला गेला होता.

नयनला पकडत असताना नेमकी तिथून सुजाता आणि तिचा भाऊ चालला होता. सुजाताने नयनला लगेच ओळखलं आणि तिला असा संकटात बघून तिने तिच्या भावाला मदत करायला लावली.

मग तिच्या भावानेच नयनकडे पळत जात त्या माणसांना अडवून धरलं. सोबत त्याचेही मित्र होतेच. त्याच वेळेस सुजाताच्या भावाचा धक्का त्या मोबाईल पकडलेल्या माणसाला लागला आणि मोबाईल खाली पडला.

अचानक आलेली ही माणस बघून नयनला पकडायला आलेली माणस पळून गेली. तसा नयनने सुटकेचा श्वास सोडला.

“खूप खूप धन्यवाद,” नयन दाटलेल्या गळ्याने बोलली. “तुमच्यासारखी माणस आहेत म्हणून आज माणुसकी जिवंत आहे.”

“माणुसकी अस नाही,” एवढा वेळ लांब उभी असणारी सुजाता आता तिथे आली. “माझी जी आवड आहे ना त्याच तू पहिलं प्रेम आहेस. माझ पहिलं प्रेम तर मला मिळाल नाही. किमान त्याच तर त्याला मिळाल पाहिजे, म्हणून आलो.”

नयनने सुजाताच्या डोळ्यात पाहिलं तर त्याला हलकीशी आसवांची किनार आली होती. मग सुजातानेच तिच्या भावाच्या मित्रांना सांगून नयनला घरी पोहोचवलं होत.

नयनबद्दल ऐकून परीच्या जीवात जीव आला. मग तिला घरचे बाकी वरिष्ठ मंडळी आठवली.

“आणि आई आबा?” परी

“सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो,” सुजय परत गौतमकडे बघत बोलला. “आधी याचा निकाल लावूयात.”

आता तर तिथे बाकी सरकारी अधिकारी पण येऊन पोहोचले. जे राजने बोलावले होते. परीच्या वडिलांनी त्यांच्या विलमध्ये जस नमूद केल होत त्याप्रमाणे त्यांची वारस भेटली नाही तर ती संपती सरकार दफ्तरी जमा होणार होती. त्यासाठी ती सरकारी मंडळी कधीची गौतमकडे परीबद्ल चौकशी करत होती. पण गौतम त्यांना नेहमीच उडवाउडवीची उत्तर देत होता. त्याच कारण राजने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगून दिल होत आणि ते आज इथे येऊन पोहोचले होते.

तिथल्या सर्व संपत्तीचा आज निकाल लावणार होता. जेणेकरून भविष्यात पुन्हा कोणालाही त्रास होणार नव्हता. इकडे आरुषचा परत फोन वाजला. तस त्याने राजकडे पाहिलं. तस राजला जरा हसूच आल आणि त्याने इशारातच नंतर उचलुयात अस त्याला सांगितलं.

शशांकने आधीच त्याची बाकीची टीम बोलावून घेतली होती. टीव्हीवर चाललेल्या त्या व्हिडीओममुळे गौतमला अटक करण्याचे आदेश थेट आयुक्तांकडून आले होते. सोबतच आदेशने लपलेल्या हरीशला देखील शोधून काढले. आतल्या खोलीतून हॉलमध्ये येता येता आदेशने त्याच्यावर देखील हात साफ करून घेतला होता.

आता आपल्याला अटक होणार हे बघून हरीशच्या आईने गळा काढायला सुरवात केली.

“मला तर यातलं काहीच माहिती नव्हत,” हरीशची आई रडत रडत बोलू लागली. “ह्या माणसाने पैशाच आमिष दाखवलं म्हणून मी आणि माझा लेक इथे आलो. आम्हाला पण या नीच माणसाने फसवल आहे.”

गौतम हरीशच्या आईकडे डोळे फाडून बघायला लागला. माणस इतके लवकर बदलतात त्याने आज स्वतः पाहिलं होत. जस त्याने त्याच्या मोठ्या भावाला फसवल होत तासच आज त्याच्यासोबत घडायला लागल होत.

“हो का?” काकू लागलीच चिडून बोलल्या. “मग काल रात्री अस का म्हणल्या की माझ्या लेकाच एकदा का लग्न झाल की गौतमला धक्का मारून इथून हाकलून लावणार? म्हणजे तुम्हाला पण पैसाच पाहिजे होता ना. आता परिस्थिती बदलली तर लगेच स्वतःला बाजूला सवारायला बघत आहात?” काकू शशांककडे बघू लागली. “ही पण तितकीच साथीदार आहे. त्या सेक्रेटरीच्या कुटुंबाला फसवण्यात हिचाच हात आहे.”

“पण त्यांना सांगितलं तर गौतमनेच होत ना.” राज गूढ होत बोलला. “मग त्या साथीदार असल्यामूळे त्यांना शिक्षा जरा कमी होईल आणि जर त्या माफीच्या साक्षीदार झाल्या तर अजून जास्त काही शिक्षा होणार नाही.”

हे ऐकून हरीशच्या आईने गौतमचे सगळेच भांडे फोडायला घेतले आणि माफीची साक्षीदार व्हायला तयार झाली.

आधी तर काकूचा त्यात काहीच संबंध नसलेला दिसून येत होता. पण हरीशच्या आईने जे काही खुलासे केले त्यातून आता काकुलाही अटक होणार होती.

राजने त्याच्या एकाच वाक्याने दोघींमध्ये ठिणगी टाकली आणि आता दोघी जणी अटक व्हायच्या मार्गावर होत्या. ते बघू शशांकला हसूच आल.

“तू अजूनही तसाच आहेस रे,” शशांक “ठरवलं तर सगळ्यांची गेम वाजवतो. तू आम्हाला का जॉईन होत नाहीस रे?”

यावर राज फक्त हसला होता. यावरून ह्या सगळ्या घटनेचा सूत्रधार तोच असल्याचे परीला समजले. जशी पोलिसांची बाकीची टीम आली तस गौतम, काकू, हरीश आणि त्याची आई ह्यांना अटक केली गेली. सोबतच जी माणस नीट होती त्यांना देखील अटक झाली. जी जखमी होती त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

‘पोलिसांवर हल्ला केल्याने पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला.’ असा रिपोर्ट शशांकने मारला.

तिथून निघताना शशांक परत मागे फिरला आणि राजजवळ गेला. त्याने त्याच्या खिशातला तो फोटो काढला जो गौतम पोलीस स्टेशनला घेऊन आला होता. त्यात असणाऱ्या रावीच्या फोटोवर त्याने बोट ठेवलं आणि तिची माहिती विचारली. तस राज त्याला डोळे विस्फारून बघू लागला.

“तुला दुसरी कोणी भेटली नाही?” राज प्रश्नार्थक बघत बोलला.

“का रे?” शशांक टेन्शनमध्ये येत बोलला. “तिचं ठरलं का?”

“ठरलं नाही,” राज हळूच उसासा टाकत बोलला. “आताच ही बंधू मंडळी पाहिलीस ना?”

राजसोबत त्यानेही बंधूमंडळीवर नजर टाकली. मग शशांक परत राजकडे बघू लागला.

“ही त्यांचीच कॉपी आहे,” राज “त्यात तू पण तापट आहेस. काय घरात महाभारत घडवायचं आहे?”

“ह्यांच्यासारखी असेल तर मला धावेल.” शशांक तो फोटो बघत बोलला.

तस राजने नकारार्थी मान हलवली. “बोलतो मी घरात. आधी मॉमसोबत बोलाव लागेल. नाहीतर परी आहेच.”

आता शशांकने परीकडे पाहिलं. “आधी तू मला वेडा वाटत होता. पण तिला पाहीलं आणा आता तुझ बरोबर वाटायला लागल.” शशांक हलकेच हसत बोलला आणि तिथून निघून गेला.

मग बाकी सरकारी अधिकाऱ्यांनी परीला त्या संपत्तीची मालकी घेण्यासाठी परीला सांगितले. परीने त्या सगळ्या कागदपत्रांवर सही केली.

आता तर ते सेक्रेटरी कैलास आणि त्यांची बायको तिथे येऊन पोहोचली. त्यांनी राहिलेली संपत्तीची कागद देखील तिथे ठेवली. आपल्या मालकाच्या मुलीला पाहून त्यांना भरून आल. त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“मालकांनी त्यांच्या माणसांसाठी खूप काही केल होत,” कैलास “रस्त्यावर असणाऱ्या आमच्यासारख्या माणसांना सन्मानाने उभ केल. नोकऱ्या दिल्या. अगदी पोटच्या लेकारांसारखी माया ह्या शहरातल्या प्रत्येक माणसाला लावली. तुम्ही जर अश्या सह्या करून दिल्या असत्या तर मालकांनी उभारलेले बरेच समाजसेवी संस्था, सहकारी कारखाने ह्या नालायाकाने विकन खाल्ले असते. पण तुम्ही तस नाही केलत. त्यांच्या शब्दाचा तुम्ही मान राखालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.”

कैलासचं ते बोलण ऐकून परी तर स्तब्धच झाली होती. कारण ती तर इथे सही करायला आली होती. पण त्याचा परिणाम असा काही होईल? याची तिला कल्पना देखील नव्हती. विजयने तिला का? सही करू दिली नव्हती याच कारण तिला आता समजायला लागल.

त्यांनी मानलेले आभार देखील परीला आता टोचू लागले. पण तिची स्पष्ट बोलायची हिम्मत झाली नव्हती. तिच्या डोळ्यात आता फक्त पाणी उभ राहील होत. तिने कसेतरी कैलास यांना संभाळल. मग तिला त्यांची मुलगी आठवली.

“एक बातमी द्यायची आहे.” परी त्यांचे हात आपल्या हातात घेऊन बोलली.

कैलास परीला बघू लागले.

“तुमची मुलगी आता आमची सून होणार आहे.” परी आरुषकडे बघायला लागली. “हा तुमचा होणारा जावई. मोहिते साहेबांचा नातू आणि एआर कंपनीच्या मालकाचा मुलगा.”

आता मात्र कैलास आरुषला समाधानाने बघू लागले. त्यांनी आरुषसमोर त्यांचे हात जोडले. तसा आरुष लागलीच त्यांच्या समोर आला आणि त्यांचे जोडलेले हात स्वतःच्या हातात घेतले.

“लेकीला भेटायला जायचं ना?” आरुष प्रेमाने बोलला.

तस त्यांनी त्यांची मान फिरवली. तसा आरुष गोंधळून गेला.

“तुम्हाला शोधायला तिने बरीच मेहनत घेतली आहे,” आरुष “तिचं मन मोडणार? तिच्या सेफ्टीसाठी तिला लांब ठेवलं हे ऐकून ती थोडीच तुमच्यावर रागावणार आहे?”

“तस नाही,” कैलास दाटलेल्या गळ्याने बोलला. “तिच्या समोर जायची माझी तर हिम्मत नाही. असही तिचे खरे आई वडील हे माझा मित्र आणि वहिनी आहे. त्यांनीच तर तिला सांभाळले, वाढवले. इतक कि त्यांनी स्वतःला मुल बाळ देखील होऊ दिल नाही. आता जर तिच्यासमोर गेलो आणि ती आमच्याकडे आली तर तो माझ्या मित्राच्या प्रेमाचा तो अपमान होईल. एका बापाने त्याच्या मुलीला लांब होताना पाहिलं आहे. मग मी माझ्या मित्राला त्याच्या मुलीपासून लांब होताना बघू शकणार नाही.”

आता मात्र आरुष जरा भावूक झाला. परीची मात्र एक शब्दही बोलायची हिम्मत होत नव्हती आणि नाही तिच्याकडे कोणी बघत होत. ती आळीपाळीने सर्वांवर नजर टाकत होती. पण कोणीच तिला प्रतिसाद देत नव्हते. आधी तिच्या मागे मागे फिरून तिला त्रास देणारा तुषार देखील तिला बघत नव्हता. मग परीच मन नाराज व्हायला लागल.

“मॅम,” सरकारी अधिकारी “राहिलेल्या कागदांवर सह्या करा, म्हणजे आम्ही मोकळे. बरेच दिवसांपासून हे प्रकरण रेंगाळल आहे..”

परीने त्या राहिलेल्या कागदांवर सह्या केल्या.

“आता जर तुम्हाला परत तुमच्या त्या घरी जायचं असेल तर इथे एका केअर टेकरची तुम्ही नियुक्ती करू शकता.” सरकारी अधिकारी

तस परीने परत सर्वांवर नजर टाकली. आताही तिला तसाच निर्विकार प्रतिसाद मिळाला.

“मी नाही जाणार कुठे,” परीने तिथल्या एका खुर्चीवर बसून घेतलं. “असही आता तिकडे माझ्याशी बोलायला कोणी नाहीये.”

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →