Login

अवनी एक प्रवास भाग ९८

तसा हरीशने त्याच्या त्या माणसांना फोन लावला आणि नयनला पकडायला सांगितले. तशी ती माणसं नयनला पकडायला तिच्या मागे जाऊ लागली. व्हिडीओ कॉल चालू असल्याने परी देखील डोळे विस्फारून बघू लागली. तिला पकडणार तोच परी जोरात ओरडली आणि तिकडे चालू असलेला व्हिडीओ कॉलचा मोबाईल देखील धक्का लागून पडला.
मागील भागात.

“शेवटी आलीसच ना.” हरीश क्रूर हसत बोलला.

यावर परी देखील तिरकस हसली. ते बघून हरीश गोंधळून गेला. कारण तिचं ते हसण त्याला काही बरोबर वाटल नव्हत.

“चल,” हरीश “तुझे काका तुझी वाट बघत आहे.”

परी यावर काहीच बोलली नाही आणि पुढे चालू लागली. हरीश परत तिरकस हसू लागला. तर मनालीचे मामा मनातून खूपच टेन्शनमध्ये आले होते. पुढच्या काही तासांनी ह्या वाड्याची काय हालत होईल? हा विचार करून त्याचं टेन्शन अजून वाढल होत. नाही म्हटलं तरी परीच्या खऱ्या आई वडिलांनी हा वाडा त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने बांधला होता. त्यावर आता त्यांचे छोटे काका आयते बसणार होते. त्यात मनालीची ओळख लागल्याने जी काही राहिलेली संपत्ती होती ती देखील आता बाहेर येण्याची दाट शक्यता होती. पण नेमकी पोलीस अधिकारी बदलल्याने आणि कैलाससोबत भेट न झाल्याने ती अजूनही गुप्त होती. पण अस कधीपर्यंत चालणार होत? याची माहिती कोणलाच नव्हती.

हे दोघे पुढे गेल्यावर मनालीचे मामा देखील पटकन त्यांच्या मागे मागे गेले.

काही वेळातच परी घराच्या मुख्य हॉलमध्ये जाऊन पोहोचली. तिला आलेलं बघताच परीची काकू पटकन पुढे आली आली परीला मिठी मारू लागली.

आता पूढे.

पण परी देखील तितक्याच तत्परतेने मागे झाली. कारण त्यांची ती दिखावूपणाची मिठी परीला चांगलीच माहिती होती.

“अस काय करतेस गं?” काकू कपाळवर आठ्या आणत बोलली. “इतक्या वर्षांनी भेटत आहेस आणि लगेच काय दूर लोटू लागलीस?”

“कारण तुम्ही माझ्याशी खोट बोललात,” परी जरा चिडून बोलली. “तुमची मुल म्हणे तुमच्याकडे लक्ष देत नाही. तुमचे हाल होत आहेत. पण इथे तर काही वेगळच दिसत आहे मला.” परी चौफेर बघत बोलली.

त्या वाड्याच्या पहिल्या माळ्यावरून एक मुलगा आणि एक मुलगी वैतागलेल्या नजरेने परीकडे बघत होते.

“त.. तस नाही ते,” काकूंनी वर कडक नजर टाकली. ज्यावर तिच्या त्या मुलांनी त्यांची तोंड वाकडी केली आणि परत त्यांच्या खोलीकडे निघून गेले. “ते कालच आले आहेत.”

“जाऊदे,” परी पण तिचं तोंड वाकड करत बोलली. “काय आहे ते सह्यांचा सोक्ष मोक्ष तो आजच लावते. म्हणजे तुम्हाला परत परत इतक्या लांब यायचे आणि नको तिथे डोक लावायचे कष्ट नको. कुठे करयची आहे सही?” परीने थेट मुद्याला हात लावला. जेणेकरून तिला परत तिच्या आई वडिलांकडे जाता येईल.

“इतकी पण काय घाई आहे?” परीचे काका चेहऱ्यावर हसू ठेवून बोलले. “पहिल्यांदाच घरी आली आहेस तर चहा पाणी तर घेशील.”

“नको,” परी कपाळवर आठ्या आणत बोलली. “फक्त सही कुठे करायची आहे ते सांगा?”

“इतक सोप असत तर तिकडे आलो होतो तेव्हाच तुझी सही घेतली असती,” काका “फक्त तुझी सही नाही तर तूच इथे असायला हवी तरचं हे सगळ आम्हाला वापरता येईल.”

“त्याला मी काय करू?” परी चिडून बोलली. “माझी काही हरकत नाही तर कोणाला काय प्रोब्लेम असणार आहे?”

“तुझ्या बापाची प्लनिंग आहे ती,” काका पण आता चिडून बोलले. “जाता जाता कामाला लावून गेला.”

“आता तुमचाच असा स्वभाव आहे म्हटल्यावर तुमची मुल पण तुम्हाला पुढे सांभाळतील की नाही याच टेन्शन तुम्हाला जास्त पाहिजे.” परी कुत्सित हसत बोलली. “आता तर मला अस वाटत की माझ्या वडिलांनी जे केल ते योग्यच होत.”

“तुला सगळ आयत मिळाल आहे त्यामुळे तुला आमच टेन्शन नाही समजणार.” काकू चिडून बोलली.

“आणि मला ते समजून पण घ्यायचं नाहीये.” परी विषय बदलत बोलली. “आत्ताच त्या अधिकारी यांच्याकडे जाऊ आणि काय ते फिक्स करून येऊ.”

“कुठेही जायची गरज नाहीये,” गौतम तिरकस हसत बोलला. “त्या मेरेज रजिस्ट्रारला मी घरीच बोलावलं आहे.”

“संपत्तीची काम तो कधीपासून करू लागला?” परी

“संपत्तीची नाही,” गौतम “तो लग्न लावायची काम करतो.”

“कोणाच लग्न?” परी टेन्शनमध्ये येत बोलली.

“तुझ आणि हरीशच,” गौतम “ते झाल की तुला तर इथेच रहाव लागेल आणि तुझ्या नावावर संपत्ती झाली की हरीशला त्या संपत्तीचे केअर टेकर बनवू.”

“म्हणजे तुम्ही मला इथे कायमची ठेवणार?” परी कपाळावर आठ्या आणत बोलली.

“तुझी आता इथून सुटका नाही,” काकू तिरकस हसत बोलली. “तुला आता फक्त आमच ऐकाव लागेल.”

“आणि तुम्हाला वाटत की मी इथे राहील?” आता परी तिरकस हसत बोलली.

तिचं ते हसण बघून बाकी मंडळी जरा गोंधळात पडली.

“का?” कोण येणार आहे तुला इथून घेऊन जायला?” गौतम तोऱ्यात बोलला. “इथे सगळ आम्ही सांगू तेच होत. आम्ही मनाई केली तर कोणीही इथे पाय देखील ठेवू शकणार नाही.”

“तुमच्या भल्यासाठी सांगत आहे मी,” परी आता त्यांना समजावून सांगू लागली. “मी सही देते आणि ही सगळी संपत्ती तुम्हालाच ठेवा. मला त्यातल्या एका काडीची देखील गरज नाही. जर मला इथून निघायला उशीर झाला तर त्याच्या पुढील परिणामाची जबाबदारी माझी राहणार नाही.” परी आता पूर्ण ठसक्यात बोलली.

“तू अशी नाही ऐकणार.” हरीश आता चिडूनच बोलला. “हे बघ.”

एवढ बोलून त्याने एक व्हिडीओ कॉल चालू केला. त्यात काही माणस एका मुलीच्या मागे जात असलेली दिसली.

“हिला ओळखलस का?” हरीश क्रूर हसत बोलला.

जसा त्या मुलीचा चेहरा दिसला तशी परी खूपच टेन्शनमध्ये आली. “तुम्हाला फक्त मुलींना ब्लॅकमेल करता येत ना?” परी चिडून बोलली. “माझ्या भावाने तुमच्या त्या माणसाची काय हालत केली ते विसरलात का? मर्दच आहात ना?”

परीच्या वाक्याने हरीशला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात परीची केल घट्ट पकडून घेतली.

“थोडा वेळ थांब मग तुला माझा मर्दपण दाखवतो.” हरीश

यावर परी तिरकस हसली. “एकट्या मुलीला गाठून तिच्यावर दादागिरी करता, यातच मला तुमचा मर्दपण दिसला.”

तसे हरीशने परीला पकडलेल्या केसांना धरून त्याच्या समोर आणलं आणि तो तिच्यावर हात उचलणार तोच गौतमने त्याला अडवलं. कारण तिला काही झालेलं त्यांच्या घराच्या बाहेर पडलं आणि ती गोष्ट मोहिते साहेबांच्या कानावर गेली. तर ह्या सगळ्याचं थेट आयुष्यातून उठण लागलीच लिहील गेल असत.

“ती बोलते ना सही करते म्हणून,” गौतम परीकडे बघत बोलली. “मग लग्नाच्या कागदपत्रांवर पण करेल. शेवटी तिलाही तिच्या भावाच्या बायकोची काळजी असेल ना? एकतर ती एकटी आहे. तिला कोणी उचलून घेऊन गेल तर तिच्यापर्यंत कोणी पोहोचेपर्यंत तिच्यासोबत बरच काही होऊ शकत.”

गौतमच्या ह्या शांत बोलण्यामागे असेलली धमकी परीला समजून आली आणि तिने रागात तिची मान फिरवून घेतली.

“ठीक आहे सांग त्यांना.” गौतम हरीशकडे बघून बोलला.

तसा हरीशने त्याच्या त्या माणसांना फोन लावला आणि नयनला पकडायला सांगितले. तशी ती माणसं नयनला पकडायला तिच्या मागे जाऊ लागली. व्हिडीओ कॉल चालू असल्याने परी देखील डोळे विस्फारून बघू लागली. तिला पकडणार तोच परी जोरात ओरडली आणि तिकडे चालू असलेला व्हिडीओ कॉलचा मोबाईल देखील धक्का लागून पडला.

“करते मी सही.” परी बंद झालेल्या व्हिडीओ कडे बघत घाबरून बोलली.

तस गौतम आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि पटापट त्याच्या बाकी कामाला लागले. दुपार झालेली असल्याने जेवणाची देखील तयारी पूर्ण झाली होती. तो मेरेज रजिस्ट्रार येईपर्यंत त्यांनी जेवण आटपून घ्यायचे ठरवले. सही होत नाही तोपर्यंत ही माणस आपल्याला काहीच करणार नाहीत याची परीला खात्री असल्याने ती देखील निवांत जेवायला बसली. ते जेवण तर तिला काहीच आवडलं नव्हतं. पण पहाटेपासून तिने काहीच न खाल्याने तिने आता फक्त दाळ आणि भात खाऊन घेतला.

व्हिडीओ बघून ती घाबरली असावी अस समजून बाकी माणस निवांत जेवू लागले. त्यांची जेवण होतच आली होती की तो मेरेज रजिस्ट्रार देखील येऊन पोहोचला. तो देखील गडबडीत आलेला दिसला कारण तो पूर्ण घामाने भिजलेला होता.

आता मोहिते साहेब येणार आहेत म्हणून बाकी प्रशासनावर देखील कामाचा ताण आला होता. त्या गडबडीत हा आला समजून सगळेच निवांत होते.

यथावकाश जेवण आटोपली. गौतमने त्यांना जेवणाच देखील विचारलं होत. पण त्यांनी लागलीच त्याला मनाई केली आणि त्यांचे लिखापढीचे कागद बघू लागले.

इकडे हरीश देखील त्याचे नवे कपडे घालून तयार झाला आणि लागलीच हॉलमध्ये येऊन थांबला. तसा तर हरीशच्या आईने देखील परीला नवे कपडे घालायला लावले होते. पण परीने त्याला साफ नकार दिला. तिचं लक्ष सारख घड्याळाकडे जात होत.

आतापर्यंत तिला फोन यायला हवे होते. पण तिचा फोन अजूनही शांतच असलेला बघून परीला जरा वाईट वाटायला लागल. तिचं म्हणण त्यांनी इतक गंभीर घेतलं जाईल अस तिला वाटल नव्हत. पण तिलाही तर तेच हवं होत. म्हणून तिने तिचं तेच नशीब समजून शांत राहाण पसंत केल.

मेरेज रजिस्ट्रारने कागद मागितली आणि गौतमने ती लगेच दिली. त्याच्याकडे परीची देखील कागद असलेली बघून परीला आश्चर्यच वाटलं.

“साक्षीदार?” मेरेज रजिस्ट्रार

“आमच्याकडून हा आहे,” हरीश त्याच्या एका मित्राकडे बोट करत बोलला.

“आणि आमच्याकडून मी करते.” काकू सहज बोलून गेली.

“पण तुम्ही तर त्यांच्या घरच्या ना?” मेरेज रजिस्ट्रार प्रश्नार्थक बघत बोलले. “तुमची सही नाही चालणार. जे रक्ताचे नाही पण तिला ओळखत असतील अशी माणस लागतील.”

“त्याची काय गरज आहे?” गौतम रागात बोलला. “इथे माझी बाकीची माणस आहेत ते करतील सही. तुम्ही तुमच काम करा.”

“अस नाही चालत,” मेरेज रजिस्ट्रार आवाजात जरब आणत बोलला. तो पुढे काही बोलणार तोच तिथे एक कडक आवाज घुमला.

“मग आमची चालेल ना?” ..

सगळ्याचं लक्ष तिकडे गेल आणी इकडे परीने दचकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले.

“तुम्ही कोण?” मेरेज रजिस्ट्रार

“मी तिचा मित्र,” तुषार “माझी आणि तिची चांगलीच ओळख आहे.”

“आणि माझ्या तर रक्ताची पण नाही.” तिथे अजून एक आवाज आला.

तही परी उठूनच उभी राहिली. ती आता भीतीने थरथर कपू लागली.

“तू इथे काय करत आहेस?” गौतम रागात बोलला. “तू तर आज राजकारणात उतरणार होतास ना तुझ्या आजोबांच्या जीवावर.” गौतमच्या आवाजात कुत्सित पण होता.

“तुमच्या सारखी वाकडी माणस समोर असली की आम्ही पण कधीच सरळ वागत नाही.” आरुष तिरकस हसत बोलला.

“कोण आहे रे तिकडे?” गौतम रागात ओरडला. “ह्यांना धक्के देऊन हाकलून द्या.”

“बघा कोणी बाहेर दिसतय का?” जय त्याच्या हातातली हॉकीची काठी स्वतःच्या खांद्यावर ठेवत बोलला.

तोच त्या हॉलच्या दारातून गौतमचा एक माणूस कण्हत आला. “साहेब ह्यांनी सगळीच माणस..” त्याला पुढे बोलवलंच गेल नाही.

“थांबा आता,” गौतमचे त्याचा मोबाईल हातात घेतला आणि त्यावर फोन लावू लागला.

पण आज त्याचा फोन कोणीही उचलत नव्हते. तसा तो अजूनच रागाला आला आणि त्याने सरळ पोलिसांना फोन लावला. त्यावरच बोलण ऐकून गौतमला जरा हायस वाटल.

“आता पोलीसच तुम्हाला इथून बाहेर काढतील.” गौतम रागात गुरगुरला.

“बरं झाल ते त्यांना बोलावलस,” तुषार तिरकस हसत बोलला. “तुमचे जुने व्हिडीओ पण त्यांना दाखवयचे आहेत.” एवढं बोलून त्याने त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ चालू केले. ज्यात त्याचे बाकी काळे धंदे दिसत होते. इतकच नाही, तर त्याच्या एका खास माणसाने त्याच्या कबुली जबाबात असही सांगून दिल की गौतमने कश्याप्रकारे त्याच्या मोठ्या भावाला आणि त्याच्या बायकोचा अपघात घडवून त्यांची निर्घुण हत्या केली.

हे सगळ बघून गौतमचा राग खूपच अनावर झाला आणि त्याने त्यांच्या जे काही उरले सुरले माणस होती त्यांना तुषार आणि बाकी जणांवर हल्ला करायला लावला. पण त्यांच्या बाकी साथीदारांची हालत बघून त्या कोणाचीच पुढे यायची हिम्मत होत नव्हती.

ते बघून हरीशने सरळ परीला मागून धरल.

“तिच्या अंगाला थोड जरी खरचटलं ना तर पहिला तुझा जीव घेईल.” तुषार प्रचंड रागात गरजला.

“तू इथे पोहोचेपर्यंत ही ढगात पोहोचेल.” हरीश परीची मान आवळत बोलला.

“गप गुमान इथून जा,” गौतम पण रागात बोलू लागला. “नाहीतर तुम्ही कोणीही इथून जिवंत परत जाणार नाही.”

“काय गं?” काकू परीकडे बघून चिडून बोलली. “तुझ्या मागे तुझ्या लव्हर आणि भावांना बोलावून घेतलस?”

‘लव्हर?’ परी काकूल आठ्या पाडून बघू लागली.

“तिने बोलवायची काय गरज आहे?” आता सुजय पण इथे येऊन पोहोचला. बांधलेल्या पट्टीनेच तो इथे आला होता. “आम्हीच तिच्या मागे मागे आलो आहोत.”

सगळ्याचं लक्ष सुजयकडे गेलेलं बघून मनालीच्या मामांनी त्यांच्याकडे असणारी एक बंदूक काढाली आणि सरळ हरीशच्या पाठीला लावली.

“सोड तिला.” मनालीचे मामा पण आता कडक आवजात बोलले.

“माझ्याशी गद्दारी?” गौतमचा राग उफाळून आला आणि त्याने देखील त्याची बंदूक काढायला त्याच्या कमरेत हात घातला. पण त्यची बंदूक काही त्याच्या जवळ नव्हती. ती तर आधीच मनालीच्या मामाने चलाखीने त्याच्यापासून लांब केली होती.

आता बंदूक नसलेली बघून गौतम सरळ तुषारच्या अंगावर धावून आला. तिकडे हरीशने देखील चलाखीने त्याच्या पाठी असणारी मनालीच्या मामाची बंदूक बाजूला सारून मनालीच्या मामांना पकडायचा प्रयत्न केला.

अशीच तर संधी पाहिजे होती आपपल्या बंधू मंडळींना. मग काय? ते चौघे जे गौतम आणि त्याच्या बाकी राहिलेल्या माणसांवर तुटून पडले.

गौतमची बायको आणि हरीशची आई तर घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना मदतीला बोलावलं. पण त्यांची देखील काही खालि उतरून यायची हिम्मत झाली नाही.

परी तर हे सगळ भांबावून बघत राहिली. तिच्यामुळे तिच्या भावांना आणि तुषारला काही झाल तर या विचारात ती खूपच घाबरून गेली. तिने तुषारवर नजर टाकली तर त्याने रागातच त्याची नजर फिरवून घेतली.

ते परीने पाहिलं आणि सरळ तुषारजवळ गेली. “तुम्हाला कोणी सांगितलं होत इथे यायला? तुमच्या आईला मी वचन दिल होत की तुम्हाला काही होणार नाही. तुमच्यामुळे ते वचन आता तुटेल.”

तुषार तर परीच्या ह्या वाक्यावर तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. त्यानेही रागात एक पाउल पुढे टाकलं. ते बघून परी एक पाउल मागे जाणार तोच त्याने परीला त्याच्या मिठीत घेतलं.

परी त्याला परत भांबावून बघू लागली. पण त्याचा तर एकच हात तिच्या कमरेत होता. मग त्याचा दुसरा हात कुठे आहे ते परी बघू लागली. तर तुषारने त्याच्या दुसऱ्या हाताने एका माणसाचा गळा पकडून ठेवला होता. जो परीला पाठीमागून मारण्याचा प्रयत्न करणार होता. तुषारची पकड इतकी घट्ट होती की पुढच्या सेकंदाला त्या माणसाचे डोळे पांढरे पडले.

“तुषार सोडा त्याला प्लीज.” परी तुषारला विनंती करू लागली. “त्याला काही झाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्हाला काही झाल तर माझ काय होईल?”

तसा तुषार चमकून परीला बघू लागला. मग परीला जाणवलं की भावनेच्या भरात ती काय बोलून गेली होती ते. तोपर्यंत तुषारने त्या माणसाला सोडल होत.

मग तुषार गौतमकडे वळला. तस परीने त्याचा हात पकडला. ते बघून तुषार परीला रागात बघू लागला आणि परीच्या हातातून त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या जागी दुसर कोणी असता तर इतक्याच ज्या हाताने त्याला पकडल होत तो हात मोडून तुषार पुढे गेला असता. पण परीच्या पकडीपुढे तो काहीच करू शकत नव्हता.

त्यांची ही झटापट चालू असताना शशांक तिथे पोहोचला. त्याला वाटलं की परीचा हात कोण्या गौतमच्या माणसाने पकडून ठेवला आहे आणि तिचीच सुरक्षा करण्यासाठी तर तो इथे आला होता. तसा तो पटकन तुषार आणि परीजवळ पोहोचला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →