Login

अवनी एक प्रवास भाग ९७

ह्या बातम्या बघून गौतम चांगलंच टेन्शनमध्ये आला. त्यालाही त्याच्या पक्षाच्या वरीष्टांकडून फोन येऊ लागले. स्वतः मोहिते साहेब येणार म्हणून त्या जिल्ह्यातले सगळेच पक्षांचे धाबे दणाणले होते. शेवटी ते एक केंद्रीय मंत्री होते आणि त्यांच अस अचानक त्यांच्या जिल्ह्यात येण ही साधी गोष्ट नव्हती. यामागच कारण मात्र कोणालाच समजल नव्हत.
मागील भागात.

“मग आज एवढ प्रेम का उतू चालल आहे?” विजय

“का?” परी तिचे गाल फुगवून बोलली. “मी अशी येऊन बसू शकत नाही का?”

“मी कुठे नाही म्हटलं?” विजय प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला.

मग बराच वेळ दोघा बाप लेकीच्या गप्पा रंगल्या. इथेही तिने तिच्या बाकी काका लोकांना फोन लावला आणि त्यांच्याशी मनसोक्त बोलून घेतलं.

रात्रीच जेवण तयार झाल्यावर परीने स्वतःच्या हातानी ते सुजयला चारल. ती जेवण घेऊन आली असताना तो नेमका नयनसोबत बोलत होता. मग परीने त्यावेळेस त्याला चिडवायची संधी सोडली नाही. नयनने देखील फोनवर तिचं बोलण ऐकल असल्याने तिनेही लगेच तो फोन ठेवून दिला.

“आमच्या मागे तू तुझ काहीतरी वेगळच तर करत नाहीयेस ना?” परीने त्याचे हात धुवून दिल्यावर सुजयने तिला बारीक डोळे करून विचारलं.

तशी परी त्याला चमकून बघू लागली.

आता पूढे.

पण लागलीच स्वतःला सावरत ती बोलू लागली. “तुला पडल्या पडल्या काहीही सुचायला लागल आहे.” परी तिच्या कपाळावर आठ्या आणत बोलली.

ते ऐकून सुजयने फक्त दीर्घ श्वास घेतला पण त्यावर काहीच बोलला नाही. परीला याच जरा आश्चर्य वाटलं. त्याच्यावर एक नजर टाकून ती त्याच्या खोलीतून बाहेर पडली.

सायली आणि परीने मिळून किचनमधल सर्व आवरलं आणि त्या दोघी देखील त्यांच्या खोलीत झोपायला जायला निघाल्या. परी तिच्या खोलीकडे जाणार तोच सायलीने परीला तिच्या खोलीत यायला सांगितलं.

परी देखील पटकन सायलीच्या मागे मागे त्यांच्या खोलीत जाऊन पोहोचली. विजय तर आधीच त्यांच्या खोलीतल्या बेडवर पसरलेला होता. परीला आलेलं बघतच तो जरा सावरून बसला.

“आलीस का, ये.” विजयने लागलीच परीला त्याच्या बाजूला बसवलं. तशी परी लगेच विजयच्या बाजूला जाऊन बसली.

“हे बरं आहे,” सायली बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊन बसत बोलायला लागली. “घेऊन मी आली आणि पहिले वडिलांच्या कुशीत जाऊन बसली.

सायलीच बोलण ऐकून विजय आणि परीने एकमेकांकडे पाहिलं आणि खांदे उडविले. यावर सायलीने तिचे डोळे फिरवले.

“बोला काय म्हणता?” परी आता सरळ विजयच्या मांडीवर तिचं डोक ठेवत पसरली.

विजयने देखील लगेच तिच्या केंसावरून हात फिरवायला सुरवात केली. “तुला मनाली बद्दल सांगायचं आहे.”

मनालीच नाव ऐकून परी विजयकडे प्रश्नार्थी बघू लागली. “मागे आई पण बोलली होती की तिला अंतर देऊ नको म्हणून, नंतर काय ते सांगेल.”

“हम्म तेच सांगायचं आहे.” सायली

“तर ऐक,” विजयने बोलायला सुरवात केली. “तुझ्या बाबांचे जे काही विश्वासू माणस होती त्यापैकी एक माणूस म्हणजे तुझ्या बाबांचे सेक्रेटरी कैलास म्हात्रे. अगदी एकनिष्ठ माणूस. आजही ते त्यांच्या एकनिष्ठपणाला जागत आहेत. मनाली ही त्यांचीच मुलगी. तुझ्या त्या काकांचं कारस्थान त्यांनी ओळ्खल म्हणून त्यांनी मनालीच्या आई वडिलांना तेव्हापासून त्रास द्यायला सुरवात केली होती. पण तेव्हा तुझ्या बाबांची माणस जास्त असल्याने तुझ्या त्या काकांना जास्त काही करता येत नव्हते. पण आज ना उद्या की कमी होणारच होती म्हणून मनालीच्या वडिलांनी मनालीच्या जन्माच्या वेळेस मनालीच्या आईला त्यांच्या मित्राच्या घरी पाठवले. ते कधीच त्यांच्या गावी आले नव्हते. त्यामुळे त्यांना कोणीच ओळखत नव्हत. जसा मनालीचा जन्म झाला तेव्हापासून मनालीला त्यांच्याकडेच ठेवलं गेल. जे तिचे आताचे वडील आहेत ते मनालीच्या खऱ्या वडिलांचे मित्र आहेत.”

आता परीला इतक तर माहिती होत की मनालीचे आताचे आत वडील तिचे खरे आई वडील नाहीत. पण मनाली ही तिच्या खऱ्या वडिलांच्या सेक्रेटरीची मुलगी आहे ऐकून तिलाही जरा धक्काच बसला. पण मग ते आता तिला हे सगळ का सांगत आहेत? हे परीला समजत नव्हत.

“पण मग आता गे सगळ सांगायची काय गरज?” परी

“कारण तू ऐकत नाही म्हणून मनालीचा वापर करून ते तुला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू शकतात.” विजय गंभीर होऊन बोलला. “त्यामुळे ही गोष्ट जर तुला माहिती झाली तर तू पुढे ती योग्य रित्या हाताळशील.”

“असही ती आता आपल्याच घरात येणार आहे ना.” परी

“हो ना.” सायली “पण तू भावनेच्या भरात काहीही करू नये म्हणून तुला आता सांगितल.”

मग मात्र परी तिच्या आईला बघत राहिली. उद्याचा दिवस तिच्यासाठी काय घेऊन येणार होता? हे तिलाही माहित नव्हत. अजून थोडावेळ तिथे गप्पा मारून परी तिच्या खोलीकडे निघून आली.

आपल्यामुळे मनालीला देखील त्रास होऊ शकतो एवढ मात्र तिला समजून आल होत. शेवटी तिने गौतमचा नंबर काढला आणि त्यावर एक मेसेज टाईप करून पाठवून दिला.

तर दुसरीकडे बंधू मंडळीच्या मोबाईलवर देखील एक मेसेज येऊन धडकला.

“ॲक्टिवेट प्लान बी.”

हा मेसेज वाचून सगळी बंधू मंडळी सतर्क झाली आणि त्यांची पण व्हिडीओ कॉलवर मिटिंग सुरु झाली.

तिकडे गौतमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. एकतर त्या सेक्रेटरी कैलासच्या बायकोला आणि मुलाला शशांकने जेलमध्ये टाकल होत. ती बातमी त्याला संध्याकाळी मिळाली होती. तर आता रात्रीच्या वेळेस परी त्यांच्याकडे येत असल्याचा मेसेज मिळाला होता. त्याला आता त्याची सगळीच स्वप्न पूर्ण होताना दिसायला लागली. त्याला वाटल होत की परी अजून तरी त्यांच्या हातात येणार नव्हती. पण तिला इतक्या लवकर हार मानताना बघून त्याची विचार करण्याची क्षमता जरा वेळासाठी लांब पळून गेली.

त्याने त्याच्या बायकोला, हरीश आणि त्याच्या आईला पटकन हॉलमध्ये बोलावून घेतले. छत्रपती संभाजी नगर मध्ये तो अलिशान असा दोन मजली वाडा होता. रात्रीची जेवण आटपून सर्व जण ज्यांच्या त्यांच्या खोलीत गेले होते. पण गौतमचा उत्साहाचा आलेला आवाज एकून ते सगळेच पटकन हॉलमध्ये आले. सोबतच त्यांची इतर माणस देखील गोळा झाली.

ते सगळीच येताच गौतमने परीच्या मेसेजबद्दल त्यांना सांगितल. पहिले तर गौतमच्या बायकोला जरा संशय आला. तिने तस बोलून देखील सांगितलं.

“इथे फक्त आपली सत्ता आहे,” गौतम त्याच्या गुर्मीत बोलला. “एकदा की इथे आली की तिचा तो सो कॉल्ड बाप काहीच करु शकणार नाही. त्यानेही बराच जोर लावला. पण आपल्यापुढे त्याच काहीच चालल नाही. मग ती इथे आली तर तो काय करू शकणार आहे?”

“पण मग मोहिते साहेब?” हरीश

“त्यांना समजेपर्यंत सगळ काही आपल्या हातात येईल.” गौतम असुरी हसत बोलला.

“ठीक आहे मग.” हरीश “तिला किती वेळ लागेल यायला?”

“बघू,” गौतम “ती सकाळीच निघेल अस बोलली होती. मग इथे यायला तिला किमान सहा तास तरी लागतील.”

“मग तिला स्टेशनला घ्यायला मी जाईल.” हरीश उत्साहात येत बोलला.”

“तुझ्या उत्साहाला जरा लगाम घाल.” हरीशची आई तिचं तोंड वाकड करत बोलली. तिला नाही गौतमशी काही घेण होत आणि नाही त्याच्या कोणत्या प्लानशी. एकदा का हरीशच परीसोबत लग्न झाल की ती सरळ गौतमच्या विरुद्ध जाणार होती. कारण एकदा का लग्न झाल की सगळी बाजी हरीशच्या हाती येणार होती. अस तिला वाटत होत. त्यामुळे ती तिच्या मनात वेगळेच प्लान शिजवत होती.

तर हरीशने केलेले बरेचशे कांड गौतमच्या हाती आलेले होते. त्यामुळे हरीश काही त्याच्या विरुद्ध जायची हिम्मत करणार नव्हता. याची कल्पना गौतमला होतीच त्यामुळे हरीशच्या आईच्या मनात असणारे मनसूब्यांची जाणीव असून सुध्दा गौतम तिला काहीच बोलत नव्हता.

आता ते फक्त उद्याची वाट बघत होते.

पहाटेचे चार वाजले तशी परी उठली. तिने तिचं सगळ काही आवरलं आणि तिच्या आई वडिलांच्या खोलीत आली. तिने हलकेच त्यांच्या पायाला हात लावला आणि मनापासून त्यांची माफी मागितली. तिला एकवेळ तर वाटल होत की त्यांना सगळ काही सांगून मग जाव. पण तिची परत यायची श्वास्वती नव्हती. वरून तिला कोणीही जाऊ दिल नसत. ती तिथून निघाली आणि सुजयच्या खोलीत गेली. तिथेही तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

‘सॉरी रे बच्चा,’ परी मनातच बोलू लागली. ‘तुला अजून कुठल्या त्रासात मला टाकायचं नाहीये. आय होप तू समजून घेशील.’

परीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुजयच्या खोलीच्या बाहेर आली. ती घरातून बाहेर पडणार तोच तिला काहीतरी आठवलं आणि ती परत तिच्या खोलीत गेली. तिने काल रात्री लिहून ठेवलेली चिठ्ठी उचलली आणि हॉलमधल्या टेबलावर आणून ठेवली. तिने परत तिच्या घरावर नजर टाकली आणि घरातून सरळ बाहेर पडली.

तिच्या बिल्डींग खाली तिने बुक केलेली गाडी तिची वाट बघत होती. ती थेट तिला गौतमच्या घराजवळ सोडणार होती. तिथून निघताना देखील तिने तिच्या घरच्या खिडकीकडे एकवार नजर टाकली. एक क्षण तर तिला अस वाटल की त्या खिडकीतून तिला कोणीतरी बघत आहे. पण तिने तो मनाचा भास समजला आणि तिथून निघून गेली.

सकाळ झाली. विजय आणि सायली हॉलमध्ये डोक्याला हात लावून बसले होते. दोघेही सुन्न झाले होते. परी त्यांना काही न सांगता अस काही पाउल उचलेल अस त्यांच्या मनातही आली नव्हत. सायलीच्या डोळ्यांना तर धारा लागल्या होत्या.

बरं तिला शोधायला जाव तर तिने त्या चिठ्ठी मध्ये तिची शपथ घातली होती. त्यामुळे विजय जागेवरून हलत देखील नव्हता. पण त्याच्या काळजाचा तुकडा सरळ पैश्यांसाठी हपापलेल्या जनावरांच्या तावडीत चालला होता याची कल्पना करूनच विजयच हृदय तीळ तीळ तुटत होत.

शेवटी त्याला काहीही उपाय दिसायचा बंद झाल्याने त्याने आता मोहिते साहेबांना फोन लावायचा निर्णय घेतला.

इकडे गौतमच्या घरी त्यांची सकाळ मात्र जरा उत्साहात झाली. परीने निघाल्याचा मेसेज गौतमच्या मोबाईलवर रात्री येऊन झळकला होता. पण त्यांचा हा उत्साह थोडावेळच टिकला. कारण काही वेळातच गौतमच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यावरच बोलण ऐकून गौतमला टेन्शन आल. त्याने लागलीच त्यांच्या घराचा टीव्ही लावला.

‘अखेर मोहिते साहेबांचा नातू राजकारणात उतरला.’

‘त्याच्या राजकारणाच्या प्रवेशाच्या चर्चेला अखेर विराम मिळणार.’

‘नातुच्या सपोर्टसाठी स्वतः मोहिते साहेब येण्याची शक्यता.’

‘राजकारणात प्रवेश करण्यासाठी निवडलेला जिल्हा पाहून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण.’

‘स्थानिक पातळीवर युवांचे प्रश्न धडाडीने सोडवणारा आरुष आता राजकारणात किती यशस्वी होणार हे बघत उत्सुकतेच.’

ह्या बातम्या बघून गौतम चांगलंच टेन्शनमध्ये आला. त्यालाही त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून फोन येऊ लागले. स्वतः मोहिते साहेब येणार म्हणून त्या जिल्ह्यातले सगळेच पक्षांचे धाबे दणाणले होते. शेवटी ते एक केंद्रीय मंत्री होते आणि त्यांच अस अचानक त्यांच्या जिल्ह्यात येण ही साधी गोष्ट नव्हती. यामागच कारण मात्र कोणालाच समजल नव्हत.

गौतमच्या पक्षातले बाकी माणस लागलीच नियोजित केलेल्या सभेच्या ठिकाणी जायला निघाली. सभेची परवानगी, त्यासाठी जागा ह्या सगळ्याची तयारी कशी झाली? आणि असेल झाली तर ती कशी करायची? हे बघाव लागणार होत. अस अचानक ऐकायला आल असल्याने ते सगळेच टेन्शनमध्ये आले होते.

आता आपल्यासोबत जास्त काही माणस नसलेली बघून गौतम जरा विचारात पडला. त्याने लागलीच तिथल्या मेरेज रजिस्ट्रारला फोन केला आणि त्याला सरळ त्याच्या स्वतःच्या घरी बोलावून घेतले.

फोन केल्यावर त्याने घरच्यांना सगळ्यांना बोलावलं आणि हरीशच्या लग्नाची तयारी करायला सांगितली. अस अचानक लग्नच ऐकून सगळेच गोंधळले. पण हरीशच्या आईच्या डोळ्यात चमक आली. तसे ते सगळेच तयारीला लागले.

परी तिच्या त्या गाडीने गौतमच्या घरी पोहोचली. तिने ते घर पाहिलं तर तो एक मोठा वाडा होता. ते तिचं स्वतःच अस घर होत आणि ती ते पहिल्यांदाच बघत होती. त्या घराच्या प्रवेशद्वारातून ती आत आली. ती आजूबाजूचा परिसर न्याहाळत हळू हळू चालत होती. घराच्या समोर बरच मोठ अस गार्डन होत. तिथे बरीचशी झाड लावलेली होती. त्यात फुलांची, फळांची आणि बरीच अशी झाडे होती.

तिला अस चालत येताना मनालीच्या मामांनी पाहिलं. पहिले तर त्यांना जर धक्काच बसला. त्यांनी स्वतःचे डोळे जरा मोठे करून निरखून पाहिलं आणि ते खूपच टेन्शनमध्ये आले.त्यांनाही गौतमने सकाळीच तिथे बोलावून घेतलं होत. त्यांना वाटल होत की दुसर काही काम असेल पण त्यांना जशी परी दिसली तसे ते खूपच गोंधळून गेले.

त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि पटकन परीजवळ गेले. “तू का इथे आलीस?” त्यांनी हळूच पण चिडून विचारलं.

आता परी काही मनालीच्या मामांना ओळखत नव्हती. त्यांच्या अश्या वागण्याने परी पुरती गोंधळली गेली आणि बावरून त्यांना बघत राहिली. मनालीच्या मामांनी परीचा चेहरा वाचला.

“मी मनालीचा मामा,” मनालीचे मामा इकडे तिकडे बघत बोलले. “तुला इथे कोणी यायला सांगितलं? कोणी तुला ब्लॅकमेल केल का? घरी विचारून आलीस का? की तुला विजयने पाठवलं?”

मनालीच्या मामांचे ते प्रश्न ऐकून परी अजूनच गोंधळात पडली. ती टेन्शनमध्ये येऊन त्यांना फक्त बघतच राहिली.

“लवकर बोल,” मनालीचे मामा वैतागून बोलले. “मला वेळ नाहीये. मला कोणी तुझ्यासोबत पाहिलं तर मला प्रोब्लेम येईल.”

“मी स्वतः इथे आली आहे,” परी कपाळवर आठ्या आणत बोलली. “माझ्यामुळे कोणाला त्रास नको.”

“घरी विचारलंस का?” मनालीचे मामा

“मला सोडलं असत?” परी “मला तर याच टेन्शन आल आहे की बंधू मंडळी इथे नको यायला.”

तेवढ्यातच मनालीच्या मामांचा फोनवर मेसेज आला. परीला पहिल्या पहिल्या त्यांनी पहिले विजयला मेसेज टाकला होता. आता त्यानेच मनालीच्या मामांना रिप्लाय दिला होता. तो मनालीच्या मामांनी वाचला आणि तो वाचून त्यांनी दीर्घ श्वास घेतला.

ह्याचं बोलण चालूच होत की हरीशने परीला पाहिलं आणि त्याच्या आनंदाला पारावर राहीला नाही. तो पटकन परीजवळ आला.

“शेवटी आलीसच ना.” हरीश क्रूर हसत बोलला.

यावर परी देखील तिरकस हसली. ते बघून हरीश गोंधळून गेला. कारण तिचं ते हसण त्याला काही बरोबर वाटल नव्हत.

“चल,” हरीश “तुझे काका तुझी वाट बघत आहे.”

परी यावर काहीच बोलली नाही आणि पुढे चालू लागली. हरीश परत तिरकस हसू लागला. तर मनालीचे मामा मनातून खूपच टेन्शनमध्ये आले होते. पुढच्या काही तासांनी ह्या वाड्याची काय हालत होईल? हा विचार करून त्याचं टेन्शन अजून वाढल होत. नाही म्हटलं तरी परीच्या खऱ्या आई वडिलांनी हा वाडा त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने बांधला होता. त्यावर आता त्यांचे छोटे काका आयते बसणार होते. त्यात मनालीची ओळख लागल्याने जी काही राहिलेली संपत्ती होती ती देखील आता बाहेर येण्याची दाट शक्यता होती. पण नेमकी पोलीस अधिकारी बदलल्याने आणि कैलाससोबत भेट न झाल्याने ती अजूनही गुप्त होती. पण अस कधीपर्यंत चालणार होत? याची माहिती कोणलाच नव्हती.

हे दोघे पुढे गेल्यावर मनालीचे मामा देखील पटकन त्यांच्या मागे मागे गेले.

काही वेळातच परी घराच्या मुख्य हॉलमध्ये जाऊन पोहोचली. तिला आलेलं बघताच परीची काकू पटकन पुढे आली आली परीला मिठी मारू लागली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →