मागील भागात.
“प्लीज ना मॉम.” नयन आता तिच्या आईला विनंती करू लागली. “असेही ती माणस आपल्याच नात्यातली आहेत.”
“आपल्याच नात्यातली म्हणजे?” नयनची आई
“त्याच्या डॅडच गाव पण कोल्हापुरच आहे.” नयन उत्साहात येत बोलली.
“समजा चौकशी केली आणि तो तुझा भाऊ निघाला तर.” नयनची आई मनातच हसत बोलली.
“अस नको ना बोलू मॉम.” नयनच तोंड परत बारीक झाल. “असही तुझ माहेर कोल्हापुरचं आहे. मग तो भाऊ कसा होईल?”
“हे भगवान,” नयनची आई कपाळवर आठ्या आणत बोलली. “एवढं बरं बोलयला सुचत.”
आता नयनने तिचे दात दाखवले.
“जा आता फ्रेश हो.” नयनची आई तोंड वाकड करत बोलली.
ते ऐकून नयन पटकन तिच्या खोलीकडे पळाली.
आता पूढे.
आरुषला भेटायला निघालेल्या मनालीला मात्र परत घरात जाव लागल होत. मनालीच्या मामांनी तिच्या आताच्या वडिलांना फोन करून जे झाल ते सांगून दिल होत. त्यामुळे तिला आता एकटीला कुठेही सोडणार नव्हते. म्हणून बाहेर निघालेल्या मनालीला तिच्या आईने परत घरात बोलावून घेतलं.
आता मनालीला काही माहित नाही अस तिच्या आई वडिलांना वाट होत. तर मनालीला सगळ काही माहिती झाल असून तिला काहीही माहिती नाही अस तिला वागाव लागत होत. पण आरुषला भेटायला मिळाल नाही म्हणून ती तिच्या आईवर जरा रुसून बसली. असही तिचा हा लटका राग जास्त वेळ टिकणार नाही याची माहिती तिच्या आईला होतीच. मग तिनेही ते जास्त काही मनावर घेतलं नाही.
इकडे परी सुजयच्या खोलीतून निघून थेट घराबाहेर देखील पडली. निघता निघता तिने तुषारला फोन लावला. तिचा असा अचानक आलेला फोन बघून तुषार जरा विचारात पडला. फोनवर परी भेटायला येत असल्याच बघून पहिले तर त्यांना जरा आनंद झाला. पण नंतर लागलीच ती एकटी येणार हे ऐकून तो टेन्शनमध्ये देखील आला.
त्याने लागलीच तिला तिच्या बिल्डींगच्या इथेच थांबायला सांगितलं. पण परी तिथे थांबायला नकार देत होती. आधीच सुजयचा हॉस्पिटलमधून आणल आहे ही गोष्ट त्या बिल्डींगमध्ये समजली होती. जो भेटत होता तो सुजयची चौकशी करत होता. त्यात परीला अश्या कोण्या मुलासोबत जाताना कोणी पाहिलं तर उगाच चर्चेला विषय नको म्हणून ती घाबरत होती.
पण तुषार देखील काही ऐकायला मागत नव्हता. त्याने परीला तिच्या बिल्डींगपासून थोड पुढे चालत यायला लावलं. ते ही जेव्हा तो तिथे पोहोचणार होता तेव्हा तो परीला कॉल करून बोलावणार होता तेव्हाच तिला यायला सांगितल. हा उपाय परीला बरोबर वाटला आणि ती तिच्या बिल्डींगच्या खाली तुषारची वाट बघत उभी राहिली.
परीचा फोन झाल्यावर त्याने परत एक फोन लावला. त्यावर दोन मिनिट बोलून मग तो परीच्या घराकडे यायला निघाला.
परी तुषारची वाटच बघत होती तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला. तिने पाहिलं तर अनोळखी नंबर वरून फोन येत होता. मग तिने काही त्याच्याकडे लक्ष दिल नाही. अस दोन ते तीन वेळा झाल. परी काही तो फोन उचलायला मागत नव्हती. शेवटी त्या नंबर वरून एक मेसेज आला. जो वाचून परीला खूप घाबरायला झाल.
‘भले आम्ही तुला काही करू शकत नाही. पण तुझी माणस? त्याच उदाहरण तर तू तुझ्या भावाच पहिलच आहेस. तू अजूनही जर आमच ऐकायला मागत नसशील तर पुढचा नंबर मनाली आणि नयनचा देखील असू शकतो.’
हा मेसेज वाचून परीला धक्का बसला होता आणि ती खूपच घाबरून गेली. ह्या सगळ्यांत त्या मुलींना देखील गोवल गेल तर? हा विचार करूनच तिला धडकी भरली. तिच्यामुळे कोण्या निर्दोष मुलींचा बळी देणे तिला नक्कीच आवडणार नव्हते. आधीच तिच्यामुळे तिच्या भावाचा अपघात घडवून आणला होता.
परीच डोक आता वेगाने धावायला लागलं. तसा तिला लागलीच राज आठवला. जो नेहमीच तिच्या मागे भक्कमपणे उभा राहीला होता. तिने लगेच राजला फोन लावला. ती तुषारला भेटून झाल्यावर राजला भेटणार होती.
पुढच्या काही क्षणातच तुषार त्यांच्या बिल्डींगच्या जरा आधीच येऊन थांबला. त्याने परीला फोन लावून त्यांच्या बिल्डींगच्या बाहेर यायला लावलं. तुषारचा फोन येताच परी तिच्या बिल्डींगमधून बाहेर पडली. तिला लांबूनच तुषार दिसला. पण ती त्याच्या बाजूला जाण्याऐवजी त्याच्या विरुद्ध बाजूला जायला लागली. तुषार देखील लगेच न निघता थोडा वेळ थांबला. त्याच परीवर चांगलच लक्ष होत. जशी ती त्यांच्या बिल्डींगपासून लांब असणाऱ्या एका चौकात गेली तसा तुषार पटकन निघाला आणि थेट परीजवळ जाऊन थांबला.
तुषारला आलेलं बघून परी देखील पटकन त्याच्या बाईकवर बसली आणि ते दोघे शहराच्या जरा बाहेर येऊन एका मंदिरात येऊन थांबले. परीने तिथल्या महादेवाच दर्शन घेतलं. तुषार तर तिच्याच मागे मागे फिरत दर्शन घेत होता आणि एका सेकंदासाठी दोघांच जोडीने दर्शन झाल. त्याचवेळेस परीने तुषारवर नजर टाकली आणि ती मंदिराच्या बाहेरच्या आवारात येऊन एका बेंचवर बसली. तसा तुषार देखील तिच्या बाजूला येऊन बसला.
बराच वेळ झाला तरी परी काहीच बोलली नव्हती.
“फक्त मंदिर दाखवायला मला घेऊन आली होती का?” तुषारने शांततेचा भंग केला.
तशी परी त्याला कपाळावर आठ्या आणून बघू लागली. “का? आधी हे मंदिर पाहिलं नव्हत का?”
“तुझ्यासोबत तर नाही.” तुषार मिश्कील होत बोलला.
तशी परीने नकारार्थी मान हलवली. “हे बघा, तुमच्या मनात माझ्या विषयी काय भावना आहेत ते मला माहिती नाही. पण एक सांगते की तुम्ही माझा विचार सोडा. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल.”
“तुझ्या वाक्यातच किती विरोधाभास आहे ना.” तुषार किंचित हसत बोलला. “माझ्या मनात काय आहे ते माहिती नाही आणि दुसरीकडे बोलतेस की माझा विचार सोडा. म्हणजे तुला सगळच माहिती आहे.”
तशी परी जरा चपापली. “म्हणजे मला तस नव्हत म्हणायचं.” परी गोंधळून गेली. “माझ्या मनात तुमच्याविषयी काहीही नाहीये आणि कधी होणार पण नाहीये. त्यामुळे तुम्ही दुसरी मुलगी बघा आणि तिच्यासोबत आनंदाने संसार करा.”
“माझा आंनद कोणासोबत आहे हा माझा प्रश्न आहे.” तुषार आता कडक आवाजात बोलला. “राहीला विषय तुमच्या मनाचा तर तेच वाक्य माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल.”
तशी परी तुषारला तिचे डोळे मोठे करून बघू लागली.
“बोल मी वाट बघतोय.” तुषार परीला शांत बसलेल बघून बोलला.
इकडे परीच्या मनात मात्र मोठ वादळ उठल होत. त्याच्या डोळ्यात बघून बोलणे तर तिला शक्यच होणार नव्हत. कारण तिच्या मनाने तर त्याला आपल मानल होत ना. त्याच्या डोळ्यात बघताना तिचे डोळे तिच्या बुद्धीच ऐकणारच नव्हते. त्यांनी जर ऐन वेळेस धोका दिला तर तिचं मन तिच्या बुद्धीवर नक्कीच भारी पडलं असत. म्हणून ती त्याच्याकडे बघण देखील टाळत होती. पण काहीतरी कराव तर लागणार होत. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि थेट तुषारच्या डोळ्याला तिचे डोळे भिडवले.
“नाहीये माझ्या मनात तुमच्याविषयी काही.” परी एकदम कडक आवाजात बोलली. “माझ्या नवऱ्याकडून असणाऱ्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत आणि त्यात तुम्ही बसत नाही.”
बोलता बोलता परीला दम लागला होता. हे दोनच वाक्य बोलण्यासाठी तिने तिचा किती धीर एकवटला होता हे तिलाच माहिती होत.
परी एवढ सगळ बोलून गेल्यावरही तुषार मात्र तिला मंद स्मित करत बघत होता. यावरून परीला इतक तर समजल की ती खोट बोलत आहे हे त्याला कदाचित समजून गेल असाव.
“आधी घरच्यांची काळजी करा,” परीने पूढे बोलायला सूरवात केली. “आपल्यामुळे आपल्या घरचे दुखावले गेले तर आपल्या सुखाला काहीच किंमत राहत नाही. त्यामुळे स्वतःचा हा स्वार्थ सोडून द्या. तुम्हाला तुमच्या घरच्यांची काळजीच नाही वाटत. किमान आईची असेल अस तरी मला वाटल होत.”
आता मात्र तुषारला परीचा खरोखर राग आला. “एकदम चूप.”
तुषारचा तो रागातला स्वर ऐकून परीला मनातून धडकी भरली. पण तिने चेहऱ्यावर तस दाखवू दिल नाही. “खरं बोलल की राग येतो ना माणसाला.”
तसा तुषारने तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. परीने त्याच्या घरच्यांवर बोललेलं त्याला आवडलच नव्हत. जेव्हा की त्याच्या घरचे त्याचा जीव का प्राण होते. आता तिथे परीच्या जागी दुसर कोणी असता तर कदाचित तो पुन्हा त्या जागेवरून उठलाच नसता. इतका सध्या त्याला राग आला होता.
“चल तुला घरी सोडतो.” तुषार इतकच कडक आवाजात बोलला आणि त्याच्या बाईककडे वळला.
परीने इतक बोलून देखील तुषारला असलेली तिची काळजी बघून तिने मनातच त्याची माफी मागितली.
‘सॉरी,’ परी ‘तुमच मन दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. पण दुसरा काही उपाय पण मला दिसला नव्हता. ज्या मुलीच्या आयुष्यात तुम्ही जाल ती खूप नशीबवान असेल.’ तुषारच्या पाठी पाठी जाता जाता परी मनातच बोलली.
तिथून ते परीच्या घरी पोहोचेपर्यंत दोघेही अगदीच शांत होते. परीला इतकही भान नव्हत की जाताना बिल्डींग पासून दूर जाऊन उभी राहिलेली परी आता थेट तुषारच्या बाईकवर तिच्या बिल्डींगच्या आवारात पोहोचली होती.
परीला अजुनही विचारात हरवलेलं बघून तुषारने त्याच्या बाईकचा हॉर्न वाजवला. तशी परी तिच्या विचारातून बाहेर आली आणि त्याच्या बाईकवरून उतरली. जशी परी त्याच्या बाईकवरून उतरली तसा तुषार तिच्याकडे न बघतच तिथून पटकन निघून गेला. परीला याच जरा वाईटच वाटल. पण तिच्याकडे दुसरा उपाय पण नव्हता. ती तिच्या घरी जाणार तोच तिचा मोबाईल परत वाजला. तिने पाहिलं तर राज तिला फोन करत होता. मग परीला आठवलं की तिने राजला देखील भेटायला बोलावलं होत.
घराकडे जाणारी परी लगेच मागे वळली आणि राजचा फोन उचलून त्यावर बोलू लागली. तिने राजला त्यांच्या बिल्डींगजवळच्या त्या पार्कमध्ये यायला सांगितले.
काही वेळातच राज त्या पार्कमध्ये जाऊन पोहोचला.
“मी एकदा तिकडे जाऊन त्यांना भेटणार आहे.” परी थेट मुद्याच बोलू लागली. “एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून येते.”
“आणि हे तू घरात सांगितलं नाहीस.” राज दीर्घ श्वास घेत बोलला.
“त्यांना सांगितलं तर ते जाऊ देतील?” परीचा उलट प्रश्न.
“यातच तुला समजल पाहिजे की तुला तिथे जायची काहीच गरज नाहीये.” राज “मामा काय ते बघून घेतील.”
“त्यांना त्रास नको म्हणूनच मी स्वतः जात आहे ना.” परी
“आणि तू अशी न सांगता जाशील तर त्यांना त्रास होणार नाही?” राज
“मी परत येणार आहे.” परी
“तुला काय वाटत मी मूर्ख आहे?” राज रागात बोलला. “तू जिवंत असते पर्यंत ती प्रोपर्टी दुसऱ्या कोण्या माणसाच्या नावे होणे शक्य नाही. याचा अर्थ ती माणस तुला परत घरी येऊ देतील?”
“त.. तू .. तुला कस माहित?” परीचे डोळे विस्फारले गेले.
इकडे राजने मनातच स्वतःला भांडून घेतलं. “तितकी माहिती काढणे मला जमत. तू तुझ काय ते सांग. नाहीतर मला मामांसोबत बोलावं लागेल.”
“तुला माझी शपथ आहे कोणाला काही सांगितलं तर.” परीने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला.
तसा राज तिरकस हसला. “आणि मी तुझी शपथ मानेल? माझ सोड तुझे भाऊ, त्यांच काय करशील? त्यांना तर तुझ्यासमोर काहीही दिसत नाही. अगदी तू पण नाही.”
“बोलले ना मी,” परी आठया पाडून बोलली. “मी परत येईल म्हणून.”
“बघ बाबा,” राज उसासा टाकत बोलला. “तुझ्या भावांच्या त्या हट्टापुढे मी काहीच बोलणार नाही.”
“माझी शपथ मोडली तर बघ.” परी त्याला दम देत बोलली. “मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.”
आता राजने एक उसासा टाकला. परीला तिचं उत्तर मिळाल आणि ते दोघेही त्या पार्क मधून बाहेर पडले. परीला बिल्डींगमध्ये सोडून मगच राज त्याच्या घरी निघून गेला.
परी जशी घरी आली तशी ती पहिले सुजयच्या खोलीत गेली. तिथून तिने तिच्या सर्व बंधूमंडळीना व्हिडीओ कॉल लावला. ती सर्वांसोबत हसून खेळून बोलली. ती उद्या तिथून जाणार होती. ती परत येईल की नाही याची तिलाही खात्री नव्हती. म्हणून तिने आताचे हे सर्व क्षण तिच्या डोळ्यात साठवायला सुरवात केली.
सर्व बंधू मंडळीसोबत बोलून झाल्यावर ती तिच्या आईला मदत करायला किचनमध्ये गेली. एवढा वेळ ती कुठे गेली होती म्हणून सायलीने तिला लटक्या रागात विचारले होते. तेव्हा ती राजला भेटायला गेली असल्याचे सायलीला सांगितले. तिथेही तिने तिच्या सर्व मावश्यांना आणि आत्याला व्हिडीओ कॉल लावला आणि त्यांच्याशी बोलू लागली.
आताच तर ते सगळे भेटले होते. तरी परीने त्यांना व्हिडीओ कॉल लावलेला बघून सायलीला ते जरा विचित्र वाटल. पण तिचं अस काहीना काही चालू असत म्हणून सायलीने तिकडे काही लक्ष दिले नाही.
काही वेळात विजय देखील घरी परत आला. जसा तो फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला तशी परी किचनमधून बाहेर आली आणि विजय जिथे बसला होता त्याच्या बाजूला जाऊन त्याला बिलगून बसली.
“तुला पण तुझ्या बंधू मंडळीची हवा लागली का?” विजय हलकेच हसत बोलला.
“म्हणजे?” परी
“त्यांना काही हव असल की ते असेच जवळ लाडात येतात.” विजय परीला त्याच्या कुशीत घेत बोलला.
“पण मला तर काहीच नको आहे.” परी लाडात येत बोलली.
“मग आज एवढ प्रेम का उतू चालल आहे?” विजय
“का?” परी तिचे गाल फुगवून बोलली. “मी अशी येऊन बसू शकत नाही का?”
“मी कुठे नाही म्हटलं?” विजय प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला.
मग बराच वेळ दोघा बाप लेकीच्या गप्पा रंगल्या. इथेही तिने तिच्या बाकी काका लोकांना फोन लावला आणि त्यांच्याशी मनसोक्त बोलून घेतलं.
रात्रीच जेवण तयार झाल्यावर परीने स्वतःच्या हातानी ते सुजयला चारल. ती जेवण घेऊन आली असताना तो नेमका नयनसोबत बोलत होता. मग परीने त्यावेळेस त्याला चिडवायची संधी सोडली नाही. नयनने देखील फोनवर तिचं बोलण ऐकल असल्याने तिनेही लगेच तो फोन ठेवून दिला.
“आमच्या मागे तू तुझ काहीतरी वेगळच तर करत नाहीयेस ना?” परीने त्याचे हात धुवून दिल्यावर सुजयने तिला बारीक डोळे करून विचारलं.
तशी परी त्याला चमकून बघू लागली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
