Login

अवनी एक प्रवास भाग ९५

“कधी नव्हे ते तुमच्या लेकांसोबत मी राजला पाहिलं आहे.” सुरजचा मित्र “आता त्याच ते आसुरी डोक आणि तुमच्या लेकांचा राग. हे दोघ जर एकत्र आले तर काय धुडघूस घालतील ते वेगळ सांगायला नको.” आता मात्र ही मित्र मंडळी चांगलीच टेन्शनमध्ये आली. राजच डोक कुठपर्यंत चालत हे त्या सगळ्यांनाच चांगल माहिती होत. त्याला जर त्यांच्या लेकांची साथ मिळाली तर पूर्ण जग बदलायची धमक ते ठेवत होते.
मागील भागात.

“दी आता असे झटके द्यायला लागल्यावर त्यातून आम्हाला सावरायला वेळ तर लागणारच ना.” सुजय विचार करत बोलला.

आता नयनला जरा परीचा अंदाज आला. नक्कीच सुजय आणि तिचं लग्न लवकर व्हाव म्हणून परी खोट बोलली असणार.

“ठीक आहे,” नयन “मी आता घरी निघते. आई पण चिडली आहे माझ्यावर.”

“हम्म.” सुजयने तिला जवळ बोलावलं.

पण ती काही त्याच्याजवळ गेली नाही. कारण ते जरी खोलीत एकटे होते. तरी खोलीच्या बाहेर सगळीच मंडळी बसलेली होती. म्हणून तिने मानेनेच नकार नकार.

“प्लीज.” सुजयने आर्जव केली. “आता परत कधी भेट होईल ते माहिती नाही ना.”

तशी नयन जरा विचार करू लागली.

आता पूढे.

पुढच्याच क्षणाला नयन पटकन त्याच्याजवळ गेली. तिला जवळ आलेलं बघताच सुजयने तिला त्याच्या कवेत घेतलं. तिच्या कपाळवर त्याचे हलकेच ओठ टेकवले आणि तिला सोडून देखील दिल.

सूजयच्या एवढूश्या कृतीने देखील नयनच्या गालावर लाज चढली. तिने सुजयचा निरोप घेतला आणि सुजयच्या खोलीबाहेर आली. तिचा तो लाजेने भरलेला चेहरा बघून सुजयची बंधू मंडळी तिला रोखून बघू लागली तर वरिष्ठ महिला मंडळ तिची मस्करी करू लागले. नयन तिथे जास्त काही थांबली नाही आणि पटकन सर्वाना निरोप देत घराबाहेर पडली.

तिला बाहेर गेले बघून सगळी बंधू मंडळी सुजयच्या खोलीत गेली. तसे ते नयन खोलीत गेली तसे ते देखील जाणार होते. पण परीने त्यांना जाण्यापासून अडवलं होत. आता नयन गेली म्हणून ते लागलीच त्याच्या खोलीत गेले.

“काय बोलत होती रे ती?” आरुषने लागलीच विचारलं.

“ते दीने काय सांगितलं बाहेर की तिचं पण लग्न ठरलं म्हणून?” सुजयने उलटा प्रश्न विचारला.

“ते ऐकून तर आम्हाला पण शॉक बसला राव.” माला विचार करत बोलली.

“काही नाही,” सुजय “तिच्या आईने विचारलं असणार. त्यांना पण माहिती आहे माझी अट. त्यामुळे दी सरळ सरळ खोट बोलून गेली आहे.” सुजय आता जरा चिडून बोलला..

“आपली लग्न व्हावीत म्हणून?” आदेश विचार करत बोलला.

तस सुजयने हुंकार भरला.

“अस कस करू शकते? दी यार.” जय पण चिडून बोलला.

“ती आपल्यासाठी काहीही करू शकते.” आरुष

“बरं आपल मिशन?” सुजय

“स्टार्टेड.” आरुष “आपले डॅड लोक मनालीच्या मामांना भेटायला गेले आहेत. तिला पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून.”

“व्हॉट?” सुजयला अजून एक धक्का बसला.

“हो,” आरुष “नेमकी मनालीचे मामा त्या माणसासोबत तिथे होते म्हणून ती वाचली. नयनवर पण लक्ष ठेवावं लागेल.”

“पण ती तर आता एकटीच गेली.” सुजय घाबरून बोलला.

“नको काळजी करूस.” आदेश “आपली टीम आहे तिच्या मागे.”

“आणि मनालीच्या आई आणि भावाला देखील आता टाकायला सांगितल आहे.” जय

“का?” सुजय

“काय माहित?” आरुष तोंड वाकड करत बोलला. “राजच डोक ते.”

“तो पण काय करत आहे काय माहित?” सुजय

“जे काही करेल ते चांगलच करेल.” आरुष दीर्घ श्वास घेत बोलला.

ह्यांच बोलण चालूच होत की सर्व वरिष्ठ महिला मंडळ सुजयच्या खोलीत आले. त्यांची देखील आता निघायची तयारी होती. त्यांनी सुजयची परत विचारपूस केली आणि त्याला काळजी घे अस सांगून ते देखील त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले. गेले दोन दिवस कोणीही काहीही काम केल नव्हत. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या कामावर जायला लागणार होत.

इकडे विजय त्याच्या मित्रांसोबत मनालीच्या मामाजवळ जाऊन पोहोचला.

“गौतमला माझ्यावर पण आता शंका यायला लागली आहे,” मनालीचे मामा जरा टेन्शनमध्ये येत बोलले. “त्याने आजच मला तिकडे बोलावलं होत. पण मी उद्या येतो म्हणून टाळल.”

“पण त्यांना मनालीचा फोटो कसा मिळाला?” राहुल “त्यांनी तिला कस ओळखल?”

“ते मी सांगतो.” ह्या सगळ्यांना मागून आवाज आला.

त्यांनी मागे वळून पाहिलं तर सुरजचा मित्र आलेला होता. ज्याचा कॅफे होता.

“आम्ही इथे आहोत हे तुला कस समजल?” सुरजने त्याच्या मित्राला विचारलं.

“खरं तर मी विजयच्या घरीच यायला निघालो होतो,” सुरजचा मित्र “पण तुम्हालाच घराच्या बाहेर जाताना पाहिलं. मग विचार केला जी गोष्ट सांगायची आहे ती घरात बोलण्यासारखी नव्हती. म्हणून म्हटलं जिथे थांबाल तिथे बोलेन. नाहीच तर तुला फोन करणार होतो.” त्याने सुरजकडे पाहिलं.

“बरं बोल काय बोलायचं होत?” सुरज

“माझ्या कॅफेचा मनेजर होता,” सुराजचा मित्र “त्याने ते सगळ सांगितलं आहे. पैश्यांसाठी तो फुटला. एकदा रावी आणि मनाली आमच्या कॅफेमध्ये आली होती. तेव्हा कॉफी देण्याच्या बहाण्याने तो आत गेला आणि त्याच सगळ बोलण ऐकल होत.”

“कुठे आहे तो हरामखोर?” संदेश चांगलंच चिडीला आला.

“मी जस त्याला पकडल तसा तो पळून गेला आहे.” सुरजचा मित्र

“शिट.” महेश

“आता काय करायचं?” सुरजचा मित्र

“मी तर म्हणतो आरूच्या बाबांना सांगूयात.” राहुल “कारण समोरची माणस चांगली दिसत नाहीयेत.”

“वेळ पडली तर त्यांना पण सांगू,” विजय विचार करत बोलला. “आधी आपण शांतपणे बोलून बघू.”

“त्यादिवशी पण आपण शांतपणेच बोलून आलो ना,” राहुल चिडून बोलला. “कय झाल त्याच? शेवटी मनूला पकडायला आलेच ना ते.”

“हम्म ते पण आहे." विजय

“काय ते लवकर करा,” सुरजचा मित्र “कारण तुमच्या लेकांच्या कानावर पण गेल आहे वाटत. त्यांची पण बरीच हालचाल चालू झाली आहे.”

“म्हणजे?” राहुलचे डोळे विस्फारले गेले.

“कधी नव्हे ते तुमच्या लेकांसोबत मी राजला पाहिलं आहे.” सुरजचा मित्र दिर्घ श्वास घेत बोलला. “आता त्याच ते आसुरी डोक आणि तुमच्या लेकांचा राग. हे दोघ जर एकत्र आले तर काय धुडघूस घालतील? ते वेगळ सांगायला नको.”

आता मात्र ही मित्र मंडळी चांगलीच टेन्शनमध्ये आली. राजच डोक कुठपर्यंत चालत हे त्या सगळ्यांनाच चांगल माहिती होत. त्याला जर त्यांच्या लेकांची साथ मिळाली तर पूर्ण जग बदलायची धमक ते ठेवत होते.

“त्या आधीच आपण बोलून घेतलेलं बर.” विजय विचार करत बोलला.

“तुला आताही बोलायचंच आहे?” राहुल.

“आपण बोलून घेऊयात अस बोललो मी.” विजय

मग ते सगळेच जवळपास अर्धा ते एक तास बोलत राहिले.

इकडे विजयच्या घरी सगळे गेल्यावर सुजयने सायली आणि परीला त्याच्या खोलीत बोलावून घेतले.

“दी,” सुजय चिडून बोलला. “तू तुझ लग्न ठरवलस आणि मला सांगितलं पण नाही.”

आता मात्र परीने तिची मान खाली घातली.

“मला तर नाही पण मॉमला पण नाही?” सुजयने प्रश्नार्थक पाहिले.

“कशासाठी बोलली ते पण तुला तिने सांगितलं असेल ना?” सायली पण चिडून विचारू लागली. परीवर अस बोट ठेवलेलं सायलीला आवडलंच नव्हत.

“हो,” सुजय “पण खोट का बोलली ती? आज ना उद्या त्यांना कळेलच ना की तिचं लग्न ठरलं नाहीये ते. मग त्यांची फसवणूक होईल. तेव्हा जर ते दीला काही बोलले ना तर..” तो बोलता बोलता थांबला.

“तर काय?” परी चिडून बोलली. “अशी धमकी देणार का?”

“मग बोललीच आहेस आता तर कर फिक्स लग्न.” सुजयच्या डोक्यात राजने दिलेली कल्पना धावू लागली.

“काय खाऊ आहे?” सायली कपाळावर आठ्या आणत बोलली.

“आमच्या सरांना दी आवडते.” सुजय बेधडक बोलून मोकळा झाला.

तशी परी त्याला चमकून बघायला लागली. तर सायली गोंधळून गेली.

“त.. तू .. चल काहीही बोलू नकोस.” परी चाचारली आणि तिथून जाऊ लागली.

“आणि दीला पण सर...”’ सुजय बोलता बोलता थांबाला कारण परी त्याला मागे वळून तिच्या नाकपुड्या फुगवून बघू लागली.

सायली तर तिच्या पुढे काय चालू आहे तेच समजून घेत होती. “काय चालू आहे तुमच?” सायली गोंधळून विचारु लागली.

“काही नाही,” परी चिडून बोलली. “डोक्यावर पडला आहे ना तो तर त्याच डोक सरकलं आहे.”

“घे मॉमची शपथ.” सुजयने त्याच शेवटच अस्त्र बाहेर काढलं.

“सुजय.” परी अजूनच रागाला आली आणि तिथून जाऊ लागली.

“गेलीस तर बघ.” आता सायलीचा आवाज गुंजला.

परीने तिच्या आईची शपथ घ्यायची टाळली म्हणजे सुजयच्या बोलण्यात तथ्य असल्याच सायलीला जाणवलं.

सायलीच्या आवाजाने परी जायची थांबली पण तिने मागे सायलीकडे वळून पाहिलं नाही.

“इथे ये.” सायली

तशी परी तिची मान खाली घालून सायलीजवळ आली. सायलीने तिचा चेहरा वर केला. त्या चेहऱ्यावरचे तिचे ते टपोरे डोळे भरून आले होते.

“सुजय जे बोलत आहे ते खरं आहे?” सायली

“मला इतकच माहित आहे की मी तुमची मुलगी आहे आणि मला फक्त तुमच्यासाठी जगायचं आहे.” परी

“माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही.” सायली “एका बाजूला तू आमची मुलगी आहे अस पण बोलतेस आणि दुसरीकडे मात्र त्याच्या उलट वागतेस. तू मागेच बोलली होतीस ना की मन मारून जगणार नाही. मग आता अस का बोलत आहेस तू? आमच्या प्रेमाची किंमत करत आहेस?”

“नाही,” परी लागलीच दाटलेल्या गळ्याने बोलली. “अस आज्जीबात नाही हं आई. उलट तुम्ही मला इतक सुंदर आयुष्य दिलत. मग माझ्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये. इतकचं मला वाटत.”

“आम्ही बोललो कधी तुला की तुझा आम्हाला त्रास झाला?” सायली “तुला इतका पण आमच्यावर विश्वास नाही का?”

“तस नाही ना आई.” परी सायलीला मनवायला लागली. “तुमच मन दुखवावं अस माझ्या मनात कधीच येणार नाही आणि आता ही बघ ना. फक्त विषय काढला तरी तुमच मन दुखावलं गेल आणि मला हेच नको आहे.”

“आमच मन दुखलं कारण तू आमच्यापासून लपवलं.” सायली पण हळवी झाली. “आम्ही तुला आयुष्य दिल हे खरं आहे. पण ते तू तुझ्यावर आम्ही उपकार केले अस तू वागलीस त्याच दुःख झाल. समजा तू आमच्या पोटी जन्माला आली असतीस तरी अशीच वागली असती का? तुझ्यावर माला किंवा रावी यांची सावली नसती पडली? ते सोड, आता लहान असून डोक्यावर पडलेल्या सारखा वागतो. तू तर मोठी बहिण झाली असती. मग तू कशी वागली असती?”

‘आता मला मध्ये घ्यायची काय गरज आहे?’ सुजय मनातच बोलू लागला.

“ते पण जाउदे,” सायली “तू आमच्या लेकांना इतक छान संभाळल आहेस तर मग त्याची पण आम्ही तुला किंमत दिली पाहिजे ना?”

“काहीही काय बोलतेस आई?” आता परी चिडून बोलली. “भावांना सांभाळायची कोणी किंमत घेत का?”

“मग तू काय करत होतीस?” सायली हाताची घडी घालून विचारू लागली.

आता मात्र परी गप्प बसली.

“तुला ह्यांचे सर आवडतात का?” सायलीने परीला थेट विचारलं.

पण परीने परत तिची मान खाली केली.

“तुला माझी शपथ आहे.” सायली कडक आवाजात बोलली.

तशी परीने हलकेच तिची मान खाली वर केली.

“ठीक आहे.” सायली “आम्ही जाऊन बोलतो त्यांच्या घरच्यांशी.”

“नको.” परी तिची मान खाली घालूनच बोलली.

“आता काय झाल?” सायलीने परत कपाळाला हात लावला.

“ते त्यांची आई मला भेटून गेली.” परी

“का?” सुजय गोंधळात पडला.

परी परत शांत झाली.

“तुला प्रत्येक वेळेस शपथ घातली पाहिजे का?” सायली चिडून बोलली.

“ते त्यांच्या आईनी मला त्यांच्याशी बोलायला सांगितलं आहे की माझा विचार सोडून द्या.” परी पटकन बोलून मोकळी झाली.

सुजय आणि सायली दोघेही परीला डोळे विस्फारून बघत राहिले.

“भले मी त्यांना आवडत असेल,” परी “पण त्यांच्या घरच्यांना मी नाही आवडत. मग मी कशी काय?” परी बोलता बोलता शांत झाली.

ते बघून सुजय लागलीच उठून उभा राहीला. “ते तू माझ्यावर सोड.” सुजय कसल्याश्या विचारात बोलला.

“नाही नको,” परी “मी जाऊन भेटणार आहे त्यांना. माझ्यामुळे कोण्या माय लेकाची ताटातूट झालेली मला आवडणार नाही.”

“अगं पण..” सायली काळजीने बोलली.

“नाही आई,” सायलीची बोलण अर्धवट तोडत परी बोलू लागली. “आई वडील नसणं याची किंमत काय आहे हे माझ्यापेक्षा कोणाला जास्त माहिती असणार? मी समजावेल त्यांना.”

सायली पुढे काही बोलणार तोच सुजयने तिला इशारातच शांत राहायला सांगितलं. मग सायली पण काही बोलली नाही आणि परी त्या खोलीतून बाहेर पडली.

तिकडे नयन जशी घरी पोहोचली तस तिच्या आईने तिला फैलावर घेतलं. ज्या मुलामुळे तिला इतका त्रास झाला होता त्याच मुलाच्या उपचारासाठी तिने सगळा वेळ घालवला होता. त्यात तिने तिच्या घरी देखील काहीच कळवल नव्हत.

“ठीक आहे ना की तो त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता,” नयनची आई रागात बोलली. “पण मग थेट त्याच्या घरी जायची काय गरज होती?”

“त्याची मावशीच बोलली मला,’ नयन बारीक आवजात बोलली. “त्यांना जस समजल की तो माझ्यासोबत असा वागला, तस त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं. त्याला पण खूप ओरडा बसला. त्याचा जो गैरसमज झाला होता तो आता दूर झाला. आता आपली बहिणीबद्दल कोणी काहीही येऊन बोलेलं तर राग येणारच ना?”

“हो,” नयनची आई “पण समोरच्याने ऐकून पण घेतलं पाहिजे ना. आत्ताच तर तो ऐकत नाही. तर तो पुढे कसा ऐकणार?”

“खरं म्हणजे मीच त्याला अश्या पद्धतीने विचारलं होत की कोणीही असच वागल असत.” नयन तिचे ओठ बाहेर काढून बोलली.

“कस विचारलं होत?” नयनची आई बारीक डोळे करून विचारू लागली.

“तुझी मोठी बहिण रूड वागते तर,” नयन “आणि त्याने पुढे बोलूच दिल नाही.”

“म्हणजे तू पण पूर्ण ऐकल नाहीस,” नयनची आई डोक्याला हात लावत बोलली. “आणि थेट त्याला जाऊन शिकवायला गेलीस ना.”

आता ती पण बारीक तोंड करून बसली.

“आता तुझ्या बाबांसोबत पण बोलाव लागेल,” नयनची आई विचार करत बोलली. “एकतर ते आधीच तापट आहेत. तुम्हा मुलांना ना संयम नावाचा प्रकारच नाहीये.”

“प्लीज ना मॉम.” नयन आता तिच्या आईला विनंती करू लागली. “असेही ती माणस आपल्याच नात्यातली आहेत.”

“आपल्याच नात्यातली म्हणजे?” नयनची आई

“त्याच्या डॅडच गाव पण कोल्हापुरच आहे.” नयन उत्साहात येत बोलली.

“समजा चौकशी केली आणि तो तुझा भाऊ निघाला तर.” नयनची आई मनातच हसत बोलली.

“अस नको ना बोलू मॉम.” नयनच तोंड परत बारीक झाल. “असही तुझ माहेर कोल्हापुरचं आहे. मग तो भाऊ कसा होईल?”

“हे भगवान,” नयनची आई कपाळवर आठ्या आणत बोलली. “एवढं बरं बोलयला सुचत.”

आता नयनने तिचे दात दाखवले.

“जा आता फ्रेश हो.” नयनची आई तोंड वाकड करत बोलली.

ते ऐकून नयन पटकन तिच्या खोलीकडे पळाली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →